< लूक 21 >
1 १ येशूने दृष्टी वर करून श्रीमंत लोकांस दानपेटीत दान टाकतांना पाहीले.
And, looking up, he saw the, rich, who were casting their gifts into the treasury, —
2 २ त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले.
and he saw a certain poor widow, casting in thither two mites;
3 ३ तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले.
and he said—Of a truth, I say unto you—This destitute widow, more than they all, hath cast in;
4 ४ कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”
For, all these, out of their superfluity, have cast in among the gifts, but, she, out of her deficiency, all the living that she had, hath cast in.
5 ५ शिष्यातील काहीजण परमेश्वराच्या भवनाविषयी असे बोलत होते की, “ते सुंदर दगडांनी आणि अर्पणांनी सुशोभित केले आहे.” येशू म्हणाला,
And, certain saying, of the temple—With beautiful stones and offerings, hath it been adorned! he said—
6 ६ “असे दिवस येतील की, हे जे तुम्ही पाहता त्यांतून जो पाडून टाकला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही.”
As to these things, which ye are looking upon, There will come days, in which there will not be left here, stone upon stone, which will not be taken down.
7 ७ त्यांनी त्यास प्रश्न विचारला, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”
And they questioned him, saying—Teacher! when, therefore, will these things be? And, what the sign, when these things shall be about to come to pass?
8 ८ येशू म्हणाला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि ‘तो मी आहे’ असे म्हणतील आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे. त्यांच्यामागे जाऊ नका!’
And, he, said—Be taking heed ye be not deceived; for, many, will come upon my name, saying—I, am he, —and—The season, hath drawn near! Do not go after them.
9 ९ जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”
But, whensoever ye shall hear of wars and revolutions, be not terrified, —for these things, must needs, come to pass first, but, not immediately, is the end.
10 १० मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल.
Then, said he unto them—There will rise up, nation against nation, and kingdom against kingdom;
11 ११ मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
As well great earthquakes, as also, in places, pestilences and famines, will there be, as well objects of terror, as also, from heaven, great signs, will there be.
12 १२ परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हास राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील.
And before, all these things, they will thrust upon you their hands, and persecute you, delivering you up into the synagogues and prisons, —when ye have been led away before kings and governors, for the sake of my name;
13 १३ यामुळे तुम्हास माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल.
But it shall turn out to you for a witness.
14 १४ तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही अशी मनाची तयारी करा,
Settle, then, in your hearts, not to be studying beforehand, how to make defense;
15 १५ कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.
For, I, will give you a mouth and wisdom, which one-and-all who are setting themselves against, you shall be unable to withstand or gainsay.
16 १६ परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील.
But ye will be delivered up, even by parents, and brethren, and kinsfolk, and friends, and they will put to death some from among you;
17 १७ माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील.
And ye will be hated by all, because of my name:
18 १८ परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही.
And, a hair of your head, in nowise shall perish, —
19 १९ तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवून घ्याल.
By your endurance, shall ye gain your lives for a possession.
20 २० तुम्ही जेव्हा यरूशलेम शहरास सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हास कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.
But whensoever ye shall see Jerusalem, encompassed by armies, then, know, that her desolation hath drawn near.
21 २१ जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये.
Then they who are in Judaea, let them flee into the mountains, and they who are in her midst, let them go forth, —and they who are in the fields, let them not enter into her;
22 २२ ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.
For, days of avenging, are, these, for all the things written to be fulfilled.
23 २३ त्या दिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल.
Alas! for the women with child, and for them who are giving suck, in those days; for there will be great distress upon the land, and anger against this people.
24 २४ ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेम शहरास पायाखाली तुडवतील.
And they will fall by the edge of the sword, and be carried away captive into all the nations, and, Jerusalem, shall be trodden down by the nations, until the seasons of the nations shall be fulfilled [and shall be].
25 २५ सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.
And there will he signs in sun, and moon, and stars, and, on the earth, anguish of nations in embarrassment—sea and surge resounding, —
26 २६ भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणोन्मुख होतील व आकाशातील बळे डळमळतील.
Men fainting, from fear and expectation of the things overtaking the inhabited earth. For, the powers of the heavens, will be shaken.
27 २७ नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील.
And, then, will they see the Son of Man—coming in a cloud, with great power and glory.
28 २८ परंतु या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे डोके वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
And, when these things are beginning to come to pass, unbend and lift up your heads, because that, your redemption, is drawing near.
29 २९ नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “अंजिराचे झाड व इतर दुसऱ्या झाडांकडे पाहा.
And he spake a parable unto them: See the fig-tree, and all the trees, —
30 ३० त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे.
Whensoever they have already budded, seeing it, of yourselves, ye observe that, already near, is, the summer:
31 ३१ त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
Thus, ye also, whensoever ye shall see, these, things coming to pass, observe ye, that, near, is the kingdom of God!
32 ३२ मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
Verily, I say unto you—In nowise shall this generation pass away, until, all things, shall happen:
33 ३३ आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.
Heaven and earth, will pass away, but, my word, in nowise will pass away.
34 ३४ परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व या हल्लीच्या जीवनासंबंधीच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल.
But be taking heed unto yourselves, lest once your hearts be made heavy—with debauch and drunkenness and anxieties about livelihood, and that day come upon you suddenly,
35 ३५ खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांवर येईल.
as a snare, —For it will come in by surprise, upon all them that are dwelling on the face of all the earth.
36 ३६ यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.”
But be watching in every season, making supplication, that ye may gain full vigour, to escape all these things that are about to be coming to pass, and to stand before the Son of Man.
37 ३७ प्रत्येक दिवशी तो परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे.
And he was, by day, in the temple, teaching; but, by night, going forth, he was lodging in the mount which is called the Mount of Olives.
38 ३८ सर्व लोक भवनात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे येत असत.
And, all the people, were coming at day-break unto him, in the temple, to be hearkening unto him.