< लूक 2 >
1 १ त्या दिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की, सर्व जगाची नावनोंदणी लिहिली जावी.
Стало ся ж тими днями, вийшло повелїннє від кесаря Августа переписати всю вселенну.
2 २ ही पहिली नावनोंदणी होती जेव्हा क्वीरीनिय हा सिरीया प्रांताचा राज्यपाल होता.
Ся перепись була перва за правлення Киринея в Сириї.
3 ३ प्रत्येकजण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गांवी गेले.
Ійшли всі записуватись, кожен у свій город.
4 ४ मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता.
Пійшов же й Йосиф із Галилеї, з города Назарета, в Юдею, в город Давидів, що зветь ся Витлеєм: (був бо він з дому й роду Давидового)
5 ५ व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले.
вписатись із Мариєю, зарученою йому жінкою, що була тяжка.
6 ६ आणि असे झाले, ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन,
Стало ж ся, як були вони там, сповнились днї родити їй.
7 ७ तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
І вродма Сина свого перворідня, і сповила Його, й положила Його в ясла, бо не було їм місця в гостинницї.
8 ८ त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते.
І були пастухи в сторонї тій, що ночлїгували та стерегли сторожею в ночі отари своєї.
9 ९ अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले.
І ось ангел Господень став коло них, і слава Господня осияла їх; і полякались страхом великим.
10 १० देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो.
І рече їм ангел: Не бійтесь, ось бо благовіщу вам радість велику, що буде всім людям.
11 ११ दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे.
Бо народивсь вам сьогодні Спас, що єсть Христос Господь, у городі Давидовому.
12 १२ तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल.
І се вам ознака: Знайдете дитинку сповиту, лежачу в яслах.
13 १३ मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले,
І зараз явилось із ангелом множество воїнства небесного, хвалячи Бога й глаголючи:
14 १४ “परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.”
Слава на вишинах Богу, а на землї впокій, між людьми благоволеннє.
15 १५ मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट परमेश्वराने आम्हास कळवली ती बघू या.
І сталось, як пійшли від них на небо ангели, пастухи казали один до одного: Ходїмо ж аж у Витлеєм, та побачимо слово се, що сталось, що Господь обявив нам.
16 १६ तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले.
І пійшли з поспіхом, та й знайшли Марию і Йосифа, й дитинку лежачу в яслах.
17 १७ जेव्हा मेंढपाळांनी त्यास पाहिले तेव्हा त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते त्यांनी सर्वांना जाहीर केले.
І побачивши, обявили слово, сказане їм про хлопятко се.
18 १८ मग ऐकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले.
І всї, слухаючи, дивувались тим, що розказували пастухи перед ними.
19 १९ परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.
Мария ж ховала всї слова сї, роздумуючи в серці своїм.
20 २० नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले.
І вернулись пастухи, прославляючи та хвалячи Бога за все, що чули й бачили, як казано до них.
21 २१ आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते.
І як сповнилось вісїм днів, щоб обрізати хлопятко, наречено Йому імя Ісус, наречене від ангела, перш ніж зачавсь Він в утробі.
22 २२ पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरूशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे.
І, як сповнились дні очищення п по закону Мойсейовому, понесли Його в Єрусалим, поставити перед Господом,
23 २३ म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे.
як написано в законі Господньому: Що всяке мужеське, відчинивши утробу, сьвяте Господеві звати меть ся;
24 २४ आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा कबुतरांची दोन पिल्ले यांचा यज्ञ अर्पावा म्हणून त्यांनी त्यास तेथे आणले.
і принесли жертву, по сказаному в законї Господньому: Пару горлиць або двоє голубенят.
25 २५ तेव्हा पाहा, यरूशलेम त शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य होता. तो मनुष्य नीतिमान व भक्तिमान होता. तो इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता.
І ось був чоловік у Єрусалимі на ймя Симеон; і чоловік сей праведний та побожний сподівавсь потіхи Ізраїлеві; й Дух сьвятий був на йому.
26 २६ आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही असे पवित्र आत्म्याने त्यास प्रकट केले होते.
І було йому сповіщено від Духа сьвятого, що не бачити ме він смерти, перш нїж побачить Христа Господнього.
27 २७ आणि तो आत्म्यांत असता परमेश्वराच्या भवनात आला आणि जेव्हा आईवडीलांनी येशू बाळाला, त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरीता, आत आणले,
І прийшов він Духом у церкву; й, як принесли батько-мати хлопятко Ісуса, щоб зробити їм, що треба, по звичаю законному для Него,
28 २८ तेव्हा शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले आणि त्याने देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले,
узяв він Його на руки свої, і благословив Бога, і сказав:
29 २९ “हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासास शांतीने जाऊ देत आहेस.
Нині відпускаєш раба твого, Владико, по глаголу твоєму, з упокоєм:
30 ३० कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,
бо виділи очі мої спасеннє твоє
31 ३१ ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले.
що приготовив єси перед лицем усіх людей,
32 ३२ ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”
сьвітло на одкриттє поганам, і славу народа Твого Ізраїля.
33 ३३ त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले.
І дивувавсь Йосиф і мати Його тим, що сказано про Него.
34 ३४ आणि शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, पाहा, इस्राएलातील अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे यासाठी आणि ज्याविरूद्ध बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे.
І благословив їх Симеон, і рече до Мариї, матери Його: Ось Сей лежить на паданнє і вставаннє многих в Ізраїлі і на ознаку, проти котрої говорити муть,
35 ३५ यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जिवांतून तलवार भोसकून जाईल.
(і тобі самій перейде душу меч, ) щоб відкрились многих сердець думки.
36 ३६ तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली.
І була Анна пророчиця, дочка Фануїлова, з роду Асирового; ся зістарілась у днях многих, живши з чоловіком сім років од дівування свого;
37 ३७ ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे.
і ся вдова до восьмидесяти й чотирох років, що не відходила від церкви, постом та молитвою служила ніч і день.
38 ३८ तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरूशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
І вона тієї ж години прийшовши, оддала хвалу Господеві, й говорила про Него всім, що сподївали ся збавлення в Єрусалимі.
39 ३९ जेव्हा त्यांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पूर्ण केल्यावर, ते गालील प्रांतातील आपले गाव नासरेथ येथे परत गेले.
І, як скінчили все по закону Господньому, вернулись у Галилею, у город свій Назарет.
40 ४० बालक मोठा होत गेला आणि बलवान झाला व ज्ञानातही वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.
Хлопятко ж росло й міцніло духом, сповняючись премудростю; і благодать Божа була на Ньому; ,
41 ४१ प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरूशलेम शहरास जात.
І ходили батько-мати Його щороку в Єрусалим у сьвято пасхи.
42 ४२ जेव्हा तो बारा वर्षांचा झाला, ते सणाच्या रीतीप्रमाणे वर यरूशलेम शहरास गेले.
І як було Йому дванайцять років, пійшли вони в Єрусалим сьвятковим звичаєм,
43 ४३ मग सणाचे पूर्ण दिवस तेथे घालविल्या नंतर ते घराकडे परत येण्यास निघाले. परंतु मुलगा येशू मात्र यरूशलेमेतच मागे राहिला आणि हे त्याच्या आई-वडीलांना माहीत नव्हते.
і, сповнивши дні, як вертались, зостав ся хлопчик Ісус у Єрусалимі, й не знав Йосиф і мати Його,
44 ४४ तो बरोबर प्रवास करणाऱ्या घोळक्या सोबत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर त्यांनी नातलग व मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
а думаючи, що Він між товариством, увійшли на день ходи; й шукали Його між родиною та знакомими.
45 ४५ जेव्हा तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते यरूशलेम शहरास परत आले आणि तेथे त्यांनी त्याचा शोध घेतला.
І, не знайшовши Його, вернулись у Єрусалим, шукаючи Його.
46 ४६ असे घडले की, तीन दिवसानंतर तो त्यांना परमेश्वराच्या भवनात सापडला, तो शिक्षकांमध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता.
І сталось, через три дні знайшли Його в церкві, сидячого серед учителїв, і слухаючого їх, і питаючого.
47 ४७ ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले.
Дивували ся ж усї, хто, слухав Його, розумом і відповідями Його.
48 ४८ जेव्हा त्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्यास म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का वागलास? ऐक, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.”
І, побачивши Його, здивувались вони, й сказала мати Його до Него: Дитино, що се зробив єси з нами? ось батько Твій і я, болїючи, шукали Тебе.
49 ४९ येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का करीत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुम्हास माहीत नव्हते काय?”
І рече Він до них: Чого ж шукали мене? хиба ж не знали, що в тому, що єсть Отця мого, треба бути мені?
50 ५० परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही.
Та й вони не зрозуміли слова, що промовив їм,
51 ५१ मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या.
І пійшов з ними, й прийшов у Назарет, і був слухняний їм; і мати Його ховала всі слова тиї в серці своїм.
52 ५२ येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.
І виростав Ісус премудростю й станом, у ласцї в Бога і в людей.