< लूक 14 >
1 १ एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते.
Un jour de sabbat, Jésus entra dans la maison d'un des principaux pharisiens pour y manger; et on l'observait.
2 २ आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता.
Comme il se trouvait avoir devant lui un homme hydropique,
3 ३ येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?”
il prit la parole, et s'adressant aux docteurs de la Loi et aux pharisiens, il leur dit: «Est-il permis, oui ou non, de guérir au jour du sabbat?»
4 ४ परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले.
Ils gardèrent le silence. Alors Jésus saisissant l'hydropique, le guérit, et le renvoya.
5 ५ मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्यास ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?”
Puis, prenant la parole, il dit: «Qui de vous, si son fils ou son boeuf vient à tomber dans un puits, ne l'en retire aussitôt, le jour du sabbat?»
6 ६ आणि या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.
Et ils ne surent que lui répondre.
7 ७ नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला,
Ayant remarqué que les conviés choisissaient les premières places, il leur adressa cette comparaison:
8 ८ “जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल.
«Quand on t'invitera à des noces, ne prends pas la première place, de peur qu'il ne se trouve parmi les invités un homme plus considéré que toi,
9 ९ मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल.
et que celui qui vous aura invités, l'un et l'autre, ne te dise: «Cède-lui la place, » car alors tu auras la confusion d'aller occuper la dernière place.
10 १० पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल.
Mais, lorsqu'on t'invite, va te mettre à la dernière place, et, quand celui qui t'a invité viendra, il te dira: «Cher ami, monte plus haut; » alors ce sera pour toi un honneur aux yeux des autres convives.
11 ११ कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
Car quiconque s'élève, sera abaissé; et quiconque s'abaisse, sera élevé.»
12 १२ मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल.
Il disait aussi à celui qui l'avait invité: «Quand tu donnes à dîner ou à souper, n'invite ni tes amis, ni tes frères, ni tes parents, ni tes voisins riches, de peur qu'ils ne t'invitent aussi a leur tour et ne te rendent la pareille.
13 १३ पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे.
Mais, quand tu donnes un repas, invite les pauvres, les estropiés, les boiteux, les aveugles,
14 १४ म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
et tu seras heureux de ce qu'ils ne peuvent te le rendre: cela te sera rendu à la résurrection des justes.»
15 १५ मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य.”
Un des convives, qui avait entendu ces recommandations, lui dit: «Heureux celui qui sera a table dans le royaume de Dieu!»
16 १६ मग येशू त्यास म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांस आमंत्रण दिले.
Jésus lui dit: «Un homme donna un grand souper, et y convia beaucoup de monde.
17 १७ भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या कारण सर्व तयार आहे’ असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले.
A l'heure du souper, il envoya son serviteur dire aux invités: «Venez, car tout est prêt.»
18 १८ ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्यास म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपाकरून मला क्षमा कर.’
Et ils se mirent à s'excuser tout d'une voix. Le premier lui dit: «J'ai acheté un champ, et je suis forcé de sortir pour le voir; je te prie de m'excuser.»
19 १९ दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे, कृपाकरून मला क्षमा कर.’
Un autre dit: «J'ai acheté cinq paires de boeufs, et je vais les essayer; je te prie de m'excuser.»
20 २० आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
Un autre dit: «Je viens de me marier, ainsi je n'y puis aller.»
21 २१ तो नोकर परत आला व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’
Le serviteur étant de retour, rapporta ces refus à son maître. Alors le maître de la maison, irrité, dit à son serviteur: «Va vite dans les places et dans les rues de la ville, et amène ici les pauvres, les estropiés, les aveugles, les boiteux.»
22 २२ नोकर म्हणाला, ‘मालक, आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही आणखी जागा रिकाम्या आहे.’
Le serviteur de retour, dit: «Maître, tes ordres ont été exécutés, et il y a encore de la place.»
23 २३ मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल.
Et le maître dit à son serviteur: «Va dans les chemins et le long des haies, et presse les gens d'entrer, afin que ma maison soit pleine;
24 २४ कारण मी तुम्हास सांगतो की, त्या आमंत्रित मनुष्यांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.”
car je vous déclare qu'aucun de ceux qui avaient été conviés, ne goûtera de mon souper.»
25 २५ मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला,
Comme une foule considérable cheminait avec Jésus, il se retourna, et lui dit:
26 २६ “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
«Si quelqu'un vient à moi, et ne hait pas son père, sa mère, sa femme, ses enfants, ses frères et ses soeurs, bien plus, s'il ne hait pas sa propre vie, il ne peut être mon disciple;
27 २७ जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
et quiconque ne porte pas sa croix et ne me suit pas, ne peut être mon disciple.
28 २८ जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय?
Car quel est celui d'entre vous, qui, voulant bâtir une tour, ne s'asseye premièrement pour calculer la dépense, et pour voir s'il a de quoi en venir à bout?
29 २९ नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील,
de peur qu'après avoir posé les fondements de l'édifice, il ne puisse l'achever, et que tous ceux qui le verront ne se mettent à se moquer de lui,
30 ३० या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही!
et à dire: «Cet homme a commencé à bâtir, et il n'a pu achever.»
31 ३१ किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय?
Ou bien, quel est le roi, qui, étant sur le point d'aller livrer bataille à un autre roi, ne s'asseye premièrement pour délibérer, et pour voir s'il peut, avec dix mille hommes, marcher à la rencontre d'un ennemi qui s'avance contre lui avec vingt mille?
32 ३२ जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील.
Autrement, pendant que celui-ci est encore éloigné, il lui envoie une ambassade pour négocier la paix.
33 ३३ त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही.
De même, quiconque d'entre vous ne renonce pas à tout ce qu'il possède, ne peut être mon disciple.
34 ३४ मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल?
C'est donc une bonne chose que le sel; mais si le sel aussi devient insipide, avec quoi lui donnera-t-on de la saveur?
35 ३५ ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
Il n'est bon ni pour la terre ni pour le fumier: on le jette dehors. Que celui qui a des oreilles pour entendre, entende.»