< लूक 13 >

1 त्यावेळी येशूला तेथे उपस्थित लोकांनी, पिलाताने गालील प्रांतातील मनुष्यांचे रक्त त्यांच्याच यज्ञपशूंच्या रक्तात कसे मिसळले होते, त्याविषयी सांगितले,
NOW at that time came some and told him of the Galiloyee, they whose blood Pilatos had mingled with their sacrifices.
2 त्याने त्यांना उत्तर दिले, “या गालीलकरांनी हे जे दुःख भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते, असे तुम्हास वाटते का?
Jeshu answered and said to them, Think you that these Galiloyee were sinners more than all the Galiloyee, that thus it was (with) them?
3 मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल.
No; but I tell you that all of you also, if you repent not, will thus perish.
4 किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठराजण यरूशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का?
Or those eighteen on whom fell the tower in Silucha, and killed them; think you that they were sinners above all men who dwell in Urishlem?
5 नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.”
No; but I tell you that, if you repent not, all of you likewise shall perish.
6 नंतर येशूने हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने त्याच्या द्राक्षमळ्यात अंजिराचे झाड लावले होते, त्यावर काही फळ असेल म्हणून तो ते पाहावयास आला परंतु त्यास काहीही आढळले नाही.
And he spake this parable: A man had a fig-tree which was planted in his vinery: and he came and sought fruits on it, but did not find.
7 म्हणून तो माळ्याला म्हणाला, पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?
And he said to the husbandman, Behold, three years come I seeking fruits from this fig-tree, but I have not found: cut it down; why maketh it the ground useless?
8 माळ्याने उत्तर दिले, मालक, हे एवढे एक वर्षभर ते राहू द्या. म्हणजे मी त्याच्याभोवती खणून त्यास खत घालीन.
The husbandman saith to him, My lord, suffer it also this year, until I tend it and manure it:
9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”
and if it produce fruits, (well): but if not, then afterwards I will cut it down.
10 १० आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता.
AS Jeshu was teaching on a shabath in one of the synagogues,
11 ११ तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते.
a woman was there who had a spirit of infirmity eighteen years; and she was bowed down, and could not be straight at all.
12 १२ येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.”
But Jeshu saw her, and called her, and said to her, Woman, thou art loosed from thine infirmity.
13 १३ नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली.
And he laid his hand upon her; and at once she was made straight, and glorified Aloha.
14 १४ नंतर, येशूने तिला बरे केले होते तो शब्बाथाचा दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये असा यहूद्यांचा नियम आहे. तो लोकांस म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”
But the chief of the synagogue answered, being angry that Jeshu had healed on the shabath, and said to the congregation, Six days there are in which it is lawful to work: in them come and be healed, and not on the day of shabath.
15 १५ येशूने त्यास उत्तर दिले आणि म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येकजण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का?
But Jeshu answered and said to him, Hypocrite, doth not any one of you on the shabath loose his ox or his ass from the manger, and going giveth to drink?
16 १६ ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?”
But this daughter of Abraham, whom, behold, the Accuser hath bound eighteen years, is it not lawful to loose from this binding on the day of shabath?
17 १७ तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला.
And as he said these things, ashamed were all they who had risen up against him; and all the people rejoiced in all these wonders that were done by his hand.
18 १८ मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्यास कशाची उपमा देऊ.
Jeshu said, What doth the kingdom of Aloha resemble, and to what shall I compare it?
19 १९ देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला व ते वाढून त्याचे मोठे झाड झाले आणि आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”
It resembles a grain of mustard, which a man took (and) cast into his garden: and it grew, and became a great tree; and the fowl of the heaven built in its branches.
20 २० तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला आणखी कशाची उपमा देऊ?
Jeshu said again, To what shall I compare the kingdom of Aloha?
21 २१ ते खमिरासारखे पिठ किंवा इतर पदार्थांना आंबविण्यासाठी उपयोगात येणारा पदार्थ आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”
It is like leaven which a woman took; (and) hid in three satas of meal, until all had leavened.
22 २२ येशू यरूशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांस शिकवीत होता.
And he journeyed, teaching in the villages and in the cities, and going forwards to Urishlem.
23 २३ कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला,
ONE had demanded (of) him if they are few who are saved. But Jeshu said to them,
24 २४ “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.
Strive to enter in at the strait gate: for I say to you that many will seek to enter in, but shall not be able.
25 २५ घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.
From the hour that the Lord of the house shall have risen up and have shut the door, you may stand without, knocking at the door, and may begin to say, Our Lord, our Lord, open to us! But he will answer and say, I tell you that I know not whence you are.
26 २६ नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!
And you shall begin to say, Before thee we have eaten and drunk, and in our streets thou hast taught.
27 २७ आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा.
And he shall say to you, I know you not whence you are: depart from me, workers of falsity.
28 २८ तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल.
There will be weeping and gnashing of teeth, when you shall see Abraham and Ishok and Jakub and all the prophets in the kingdom of Aloha, but you be cast forth without.
29 २९ आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील.
And they shall come from the east, and from the west, and from the south, and from the north, and shall recline in the kingdom of Aloha.
30 ३० जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.”
And, behold, there are last who shall be first, and there are first who shall be last.
31 ३१ त्यावेळी काही परूशी येशूकडे आले आणि ते त्यास म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हास ठार मारणार आहे.”
In that day came men from the Pharishee, saying to him, Remove, go from hence, because Herodes desireth to kill thee.
32 ३२ येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’
Jeshu saith to them, Go, tell that fox, Behold, I cast out devils and perform cures to-day and to-morrow, and the third day I am perfected.
33 ३३ तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरूशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही.”
Nevertheless it behoveth me to-day and to-morrow to work and the (day) after I shall go; because it cannot be that a prophet perish out of Urishlem.
34 ३४ यरूशलेमे, यरूशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकांस एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती.
Urishlem, Urishlem! killing the prophets, and stoning them that are sent to her, what times would I have gathered thy sons as the hen gathereth her chickens under her wings, and you willed not!
35 ३५ “पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हास सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”
Behold, left to you is your house a desert; for I say to you, that you will not see me until you shall say, Blessed is he who cometh in the name of the Lord.

< लूक 13 >