< लूक 13 >
1 १ त्यावेळी येशूला तेथे उपस्थित लोकांनी, पिलाताने गालील प्रांतातील मनुष्यांचे रक्त त्यांच्याच यज्ञपशूंच्या रक्तात कसे मिसळले होते, त्याविषयी सांगितले,
V té době lidé přinesli Ježíšovi zprávu, že Pilát dal pobít galilejské poutníky, zrovna když obětovali.
2 २ त्याने त्यांना उत्तर दिले, “या गालीलकरांनी हे जे दुःख भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते, असे तुम्हास वाटते का?
Ježíš na to řekl: „Myslíte si, že ti, které zavraždili, byli horšími hříšníky než ostatní obyvatelé Galileje?
3 ३ मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल.
Ne, nebyli. Ať je vám to výstrahou: Smrt čeká na každého z vás a potom bude pozdě litovat svých hříchů.
4 ४ किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठराजण यरूशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का?
Anebo těch osmnáct, na které se zřítila věž v Siloe; ti také nebyli horší než druzí lidé v Jeruzalémě.
5 ५ नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.”
Když však nebudete litovat svých zlých činů, i vás čeká Boží soud.“
6 ६ नंतर येशूने हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने त्याच्या द्राक्षमळ्यात अंजिराचे झाड लावले होते, त्यावर काही फळ असेल म्हणून तो ते पाहावयास आला परंतु त्यास काहीही आढळले नाही.
Ježíš pak vyprávěl toto podobenství. „Jeden muž si vypěstoval na své vinici fíkovník. Když přišel čas sklizně, hledal na něm ovoce, avšak marně.
7 ७ म्हणून तो माळ्याला म्हणाला, पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?
Řekl vinaři: ‚Podívej, už třetí rok čekám na ovoce z tohoto fíkovníku, ale nic nerodí. Poraž ho, jenom tu překáží.‘
8 ८ माळ्याने उत्तर दिले, मालक, हे एवढे एक वर्षभर ते राहू द्या. म्हणजे मी त्याच्याभोवती खणून त्यास खत घालीन.
Vinař se přimlouval: ‚Pane ponech ho ještě jeden rok. Zkypřím mu a pohnojím půdu, snad přece bude rodit.
9 ९ मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”
Když na něm ani příští rok nic nebude, dáš ho porazit.‘“
10 १० आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता.
Jednou v sobotu kázal Ježíš v synagoze.
11 ११ तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते.
Mezi posluchači byla také žena postižená již osmnáct let nemocí, která ji tak pokřivila, že se nemohla napřímit.
12 १२ येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.”
Když ji Ježíš uviděl, zavolal ji k sobě a řekl: „Ženo, tvé trápení končí.“Dotkl se jí
13 १३ नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली.
a v tom okamžiku se žena narovnala a srdečně děkovala Bohu.
14 १४ नंतर, येशूने तिला बरे केले होते तो शब्बाथाचा दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये असा यहूद्यांचा नियम आहे. तो लोकांस म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”
Představený synagogy však byl pobouřen, že Ježíš uzdravoval v sobotu a napomínal zástup: „Šest dní se má pracovat! Nechte se uzdravit jindy a ne v sobotu, kdy dodržujeme klid.“
15 १५ येशूने त्यास उत्तर दिले आणि म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येकजण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का?
Ježíš na to řekl: „Pokrytci! Kdo z vás neodvazuje dobytek, aby ho zavedl k napajedlu?
16 १६ ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?”
A tato žena, která je potomkem Abrahamovým, neměla být v sobotu zbavena toho, co ji osmnáct let svazovalo?“
17 १७ तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला.
Jeho odpůrci se zastyděli, ale ostatní lidé se upřímně radovali z podivuhodných činů, které konal.
18 १८ मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्यास कशाची उपमा देऊ.
Ježíš řekl: „K čemu mám přirovnat Boží království?
19 १९ देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला व ते वाढून त्याचे मोठे झाड झाले आणि आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”
Je jako nepatrné hořčičné semeno, které si člověk zaseje do zahrady. Ono vyklíčí a vyroste z něho tak mohutná bylina, že na ní mohou hnízdit ptáci.
20 २० तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला आणखी कशाची उपमा देऊ?
Boží království se dá také přirovnat ke kvasu, který žena zadělá do těsta. I když mouky bude hodně, postačí jen trochu kvasu, aby celé těsto nakynulo.“
21 २१ ते खमिरासारखे पिठ किंवा इतर पदार्थांना आंबविण्यासाठी उपयोगात येणारा पदार्थ आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”
22 २२ येशू यरूशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांस शिकवीत होता.
Ježíš pokračoval na své cestě do Jeruzaléma. Chodil od města k městu, od vesnice k vesnici a všude kázal.
23 २३ कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला,
Kdosi se ho zeptal: „Pane, je asi málo těch, kteří budou zachráněni, že?“
24 २४ “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.
Ježíš odpověděl: „Do Božího království vedou úzké dveře a těmi se snažte za každou cenu vejít.
25 २५ घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.
Jakmile totiž jednou Pán domu přijde, zamkne a pak už bude pozdě. Mnozí by potom ještě rádi vešli, ale už to nepůjde. Marně byste tloukli na dveře a volali: ‚Pane, Pane, otevři nám!‘Zůstanete venku a Pán vám odpoví: ‚Nevím, kdo jste a odkud jste.‘
26 २६ नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!
A i kdybyste říkali: ‚Sedávali jsme s tebou u stolu a učil jsi v našich ulicích, ‘ani to vám nepomůže.
27 २७ आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा.
Jen byste znovu slyšeli: ‚Neznám vás a nevím, odkud jste. Promarnili jste svůj život v hříchu, pryč s vámi.‘
28 २८ तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल.
Bude pozdě na nářek, až uvidíte Abrahama, Izáka, Jákoba a všechny proroky v Božím království a vy budete odmítnuti.
29 २९ आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील.
Ze všech světových stran budou proudit lidé, aby v něm zaujali svá místa.
30 ३० जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.”
Mnozí, kteří dnes platí mezi lidmi za poslední, budou první a mnozí, kteří jsou dnes vysoce ceněni, se octnou mezi posledními.“
31 ३१ त्यावेळी काही परूशी येशूकडे आले आणि ते त्यास म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हास ठार मारणार आहे.”
Za Ježíšem přišlo několik farizejů a varovali ho: „Měl bys utéci z Galileje, Herodes tě chce zabít.“
32 ३२ येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’
On jim řekl: „Jděte a řekněte tomu lišákovi: Ještě po nějaký čas budu uzdravovat, zbavovat lidi trápení na těle i na duchu.
33 ३३ तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरूशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही.”
Ale přijde chvíle, kdy odtud odejdu do Jeruzaléma a tam všechno dokonám. Vždyť je nesmyslné, aby prorok zemřel jinde než tam.
34 ३४ यरूशलेमे, यरूशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकांस एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती.
Jeruzaléme, Jeruzaléme, zabíjíš proroky a kamenuješ ty, které ti Bůh posílá. Jak často jsem toužil shromáždit svoje děti jako kvočna kuřátka pod ochranná křídla, ale nechtěli jste.
35 ३५ “पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हास सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”
I váš slavný chrám bude Bohem opuštěn. Říkám vám, že mne neuvidíte do chvíle, kdy budete volat: ‚Sláva tobě, který přicházíš ve jménu Božím.‘“