< लूक 12 >
1 १ आणि त्यादरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता आणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोललाः “परूश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा.
Meanwhile the people had come streaming towards Him by tens of thousands, so that they were trampling one another under foot. And now He proceeded to say to His disciples first, "Beware of the yeast of the Pharisees, that is to say, beware of hypocrisy.
2 २ उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही.
There is nothing that is covered up which will not be uncovered, nor hidden which will not become known.
3 ३ म्हणून तुम्ही जे काही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि तुम्ही कोणाच्या कानात जे काही एकांतात सांगाल ते घराच्या छतावरुन घोषित केले जाईल.”
Whatever therefore you have said in the dark, will be heard in the light; and what you have whispered within closed doors will be proclaimed from the house-tops.
4 ४ “परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही.
"But to you who are my friends I say, "'Be not afraid of those who kill the body and after that can do nothing further.
5 ५ तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा. (Geenna )
I will warn you whom to fear: fear him who after killing has power to throw into Gehenna: yes, I say to you, fear him. (Geenna )
6 ६ पाच चिमण्या दोन नाण्यांना विकतात की नाही? तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही.
Are not five sparrows sold for a penny? and yet not one of them is a thing forgotten in God's sight.
7 ७ पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे.
But the very hairs on your heads are all counted. Away with fear: you are more precious than a multitude of sparrows.'
8 ८ जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्यास देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील.
"And I tell you that every man who shall have acknowledged me before men, the Son of Man will also acknowledge before the angels of God.
9 ९ परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल.
But he who disowns me before men will be disowned before the angels of God.
10 १० प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो, त्यास क्षमा केली जाईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्यास क्षमा केली जाणार नाही.
"Moreover every one who shall speak against the Son of Man, may obtain forgiveness; but he who blasphemes the Holy Spirit will never obtain forgiveness.
11 ११ जेव्हा ते तुम्हास सभास्थाने, राज्यकर्ते व अधिकारी यांच्यासमोर धरुन आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका.
And when they are bringing you before synagogues and magistrates and governors, do not anxiously ponder the manner or matter of your defence, nor what you are to say;
12 १२ कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्याचवेळी तुम्हास शिकवील.”
for the Holy Spirit shall teach you at that very moment what you must say."
13 १३ नंतर लोकसमुदायातील एकजण त्यास म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!”
Just then a man in the crowd appealed to Him. "Rabbi," he said, "tell my brother to give me a share of the inheritance."
14 १४ परंतु येशू त्यास म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?”
"Man," He replied, "who has constituted me a judge or arbitrator over you?"
15 १५ मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही.”
And to the people He said, "Take care, be on your guard against all covetousness, for no one's life consists in the superabundance of his possessions."
16 १६ नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या शेतजमिनीत फार उत्तम पीक आले.
And He spoke a parable to them. "A certain rich man's lands," He said, "yielded abundant crops,
17 १७ तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला, ‘मी काय करू, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’
and he debated within himself, saying, "'What am I to do? for I have no place in which to store my crops.'
18 १८ मग तो असे म्हणाला, ‘मी आता असे करतो, मी माझी धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीतो, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन’
"And he said to himself, "'This is what I will do: I will pull down my barns and build larger ones, and in them I will store up all my harvest and my wealth;
19 १९ आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’
and I will say to my life, "'Life, you have ample possessions laid up for many years to come: take your ease, eat, drink, enjoy yourself.'
20 २० पण देव त्यास म्हणतो, ‘अरे मूर्खा, जर आज तुझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’
"But God said to him, "'Foolish man, this night your life is demanded from you; and these preparations--for whom shall they be?'
21 २१ जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”
"So is it with him who amasses treasure for himself, but has no riches in God."
22 २२ मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हास सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका.
Then turning to His disciples He said, "For this reason I say to you, 'Dismiss all anxious care for your lives, inquiring what you are to eat, and for your bodies, what you are to put on.'
23 २३ कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे.
For life is a greater gift than food, and the body is a greater gift than clothing.
24 २४ कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात!
Observe the ravens. They neither sow nor reap, and have neither store-chamber nor barn. And yet God feeds them. How far more precious are you than the birds!
25 २५ चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे?
And which of you is able by anxious thought to add a moment to his life?
26 २६ ज्याअर्थी तुम्हीही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही, तर इतर गोष्टींविषयीची चिंता का करता?
If then you are unable to do even a very little thing, why be over-anxious about other matters?
27 २७ रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता.
Observe the lilies, how they grow. They neither labour nor spin. And yet I tell you that not even Solomon in all his splendour was as beautifully dressed as one of these.
28 २८ तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हास तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय!
But if God so clothes the vegetation in the fields, that blooms to-day and to-morrow will be thrown into the oven, how much more certainly will He clothe you, you men of feeble faith!
29 २९ तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका.
"Therefore, do not be asking what you are to eat nor what you are to drink; and do not waver between hope and fear.
30 ३० कारण परराष्ट्री हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हास गरज आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे.
For though the nations of the world pursue these things, as for you, your Father knows that you need them.
31 ३१ त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हास दिल्या जातील.
But make His Kingdom the object of your pursuit, and these things shall be given you in addition.
32 ३२ हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो.
"Dismiss your fears, little flock: your Father finds a pleasure in giving you the Kingdom.
33 ३३ तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही.
Sell your possessions and give alms. Provide yourselves with purses that will never wear out, a treasure inexhaustible in Heaven, where no thief can come nor moth consume.
34 ३४ कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
For where your wealth is stored, there also will your heart be.
35 ३५ तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या.
"Have your girdles on, and let your lamps be alight;
36 ३६ लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा.
and be yourselves like men waiting for their master--on the look-out till he shall return from the wedding feast--that, when he comes and knocks, they may open the door instantly.
37 ३७ मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.
Blessed are those servants, whom their Master when He comes shall find on the watch. I tell you in solemn truth, that He will tie an apron round Him, and will bid them recline at table while He comes and waits on them.
38 ३८ तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य.
And whether it be in the second watch or in the third that He comes and finds them so, blessed are they.
39 ३९ परंतु याविषयी खात्री बाळगा; चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्याने आपले घर त्यास फोडू दिले नसते.
Of this be sure, that if the master of the house had known what time the robber was coming, he would have kept awake and not have allowed his house to be broken into.
40 ४० तुम्हीही तयार असा कारण तुम्हास वाटत नाही अश्या क्षणी? मनुष्याचा पुत्र येईल.”
Be you also ready, for at an hour when you are not expecting Him the Son of Man will come."
41 ४१ मग पेत्र म्हणाला, “प्रभू, तुम्ही हा दाखला आम्हासच सांगत आहात की सर्वांना?”
"Master," said Peter, "are you addressing this parable to us, or to all alike?"
42 ४२ तेव्हा प्रभू म्हणाला, “प्रभू त्याच्या इतर नोकरांना त्यांचे धान्य योग्यवेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा व विश्वासू कारभारी कोण आहे?
"Who, then," replied the Lord, "is the faithful and intelligent steward whom his Master will put in charge of His household to serve out their rations at the proper times?
43 ४३ त्याचा मालक येईल त्यावेळी असे करतांना जो नोकर त्यास आढळेल तो धन्य.
Blessed is that servant whom his Master when He comes shall find so doing.
44 ४४ मी तुम्हास खरे सांगतो, मालक त्यास त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील.
I tell you truly that He will put him in authority over all His possessions.
45 ४५ पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे,’ आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नोकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंगतो,
But if that servant should say in his heart, 'My Master is a long time in coming,' and should begin to beat the menservants and the maids, and to eat and drink, drinking even to excess;
46 ४६ तर तो नोकर वाट पाहत नाही त्यादिवशी आणि त्यास माहीत नाही तेव्हा त्याचा मालक येईल व त्यास कापून त्याचे तुकडे करील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवील.
that servant's Master will come on a day when he is not expecting Him and at an hour that he knows not of, and will punish him severely, and make him share the lot of the unfaithful.
47 ४७ आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.
And that servant who has been told his Master's will and yet made no preparation and did not obey His will, will receive many lashes.
48 ४८ परंतु ज्याला माहीती नव्हते म्हणून त्याने मालकाला न आवडणारे असे कृत्य जर नोकराने केले असेल तर त्यास कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.”
But he who had not been told it and yet did what deserved the scourge, will receive but few lashes. To whomsoever much has been given, from him much will be required; and to whom much has been entrusted, of him a larger amount will be demanded.
49 ४९ “मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आणि जर ती अगोदरच पेटलेली असेल तर मग मला आणखी काय पाहीजे?
"I came to throw fire upon the earth, and what is my desire? Oh that it were even now kindled!
50 ५० मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे!
But I have a baptism to undergo; and how am I pent up till it is accomplished!
51 ५१ मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हास वाटते का? नाही, मी तुम्हास सांगतो, मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे.
Do you suppose that I came to give peace on earth? No, I tell you that I came to bring dissension.
52 ५२ मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकांविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल.
For from this time there will be in one house five persons split into parties. Three will form a party against two and two will form a party against three;
53 ५३ त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल, आईविरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल.
father against son and son against father; mother attacking daughter and daughter her mother, mother-in-law her daughter-in-law, and daughter-in-law her mother-in-law."
54 ५४ तो लोकसमुदायाला म्हणाला, जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, पाऊस पडेल आणि तसेच घडते.
Then He said to the people also, "When you see a cloud rising in the west, you immediately say, 'There is to be a shower;' and it comes to pass.
55 ५५ जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते.
And when you see a south wind blowing, you say, 'It will be burning hot;' and it comes to pass.
56 ५६ अहो ढोंग्यांनो! तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हांची लक्षणे पारखता येतात, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हास का काढता येत नाही काय?
Vain pretenders! You know how to read the aspect of earth and sky. How is it you cannot read this present time?
57 ५७ आणि तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही स्वतःचे स्वतःच का ठरवीत नाही?
"Why, too, do you not of yourselves arrive at just conclusions?
58 ५८ तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हास न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हास दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील आणि अधिकारी तुम्हास तुरुंगात टाकील.
For when, with your opponent, you are going before the magistrate, on the way take pains to get out of his power; for fear that, if he should drag you before the judge, the judge may hand you over to the officer of the court, and the officer lodge you in prison.
59 ५९ मी तुम्हास सांगतो, अगदी शेवटली दमडी न दमडी फेडीपर्यंत तुम्ही तेथून सुटणारच नाही.”
Never, I tell you, will you get free till you have paid the last farthing."