< लूक 10 >
1 १ यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्याठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.
After this the Lord appointed seventy others, and sent them before Him, by twos, to go to every town or place which He Himself intended to visit.
2 २ तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत, यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.”
And He addressed them thus: "The harvest is abundant, but the reapers are few: therefore entreat the Owner of the harvest to send out more reapers into His fields. And now go.
3 ३ जा; पाहा, लांडग्यांच्या मध्ये जसे कोंकरांस पाठवावे तसे मी तुम्हास पाठवतो.
Remember that I am sending you out as lambs into the midst of wolves.
4 ४ पिशवी किंवा झोळी किंवा वहाणा घेऊ नका व वाटेने कोणाला सलाम करू नका.
Carry no purse, bag, nor change of shoes; and salute no one on your way."
5 ५ तुम्ही ज्या कोणत्याही घरात जाल तेथे पहिल्याने, या घराला शांती असो असे म्हणा.
"Whatever house you enter, first say, 'Peace be to this house!'
6 ६ जर तेथे कोणी शांतिप्रिय मनुष्य असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; पण तो नसला तर ती तुमच्याकडे परत येईल.
And if there is a lover of peace there, your peace shall rest upon it; otherwise come back upon you.
7 ७ तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खातपीत जा; कारण कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे; घरोघरी फिरू नका.
And in that same house stay, eating and drinking at their table; for the labourer deserves his wages. Do not move from one house to another.
8 ८ आणि तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुम्हास स्वीकारतो, त्यामध्ये ते जे तुमच्यापुढे वाढतील ते खा,
"And whatever town you come to and they receive you, eat what they put before you.
9 ९ आणि त्यामध्ये जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.
Cure the sick in that town, and tell them, "'The Kingdom of God is now at your door.'
10 १० परंतु तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुमचे स्वागत नाही केले तर रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा,
"But whatever town you come to and they will not receive you, go out into the broader streets and say,
11 ११ तुमच्या नगराची धूळ आमच्या पायांला लागली ती देखील आम्ही तुमच्याविरुध्द झाडून टाकतो; तरी हे जाणा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
"'The very dust of your town that hangs about us we wipe off as a protest. Only be sure of this, that the Kingdom of God is close at hand.'
12 १२ मी तुम्हास सांगतो की त्यादिवशी सदोमाला त्या नगरापेक्षा अधिक सोपे जाईल.
"I tell you that it will be more endurable for Sodom on the great day than for that town.
13 १३ “हे खोराजिना, तुला हाय! हे बेथसैदा, तुला हाय! कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्याची कृत्ये होत आहेत ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये झाली असती तर त्यांनी मागेच गोणताट अंगावर घेऊन व राखेत बसून पश्चात्ताप केला असता.
"Alas for thee, Chorazin! Alas for thee, Bethsaida! For had the miracles been performed in Tyre and Sidon which have been performed in you, long ere now they would have repented, sitting in sackcloth and ashes.
14 १४ यामुळे न्यायकाळी सोर व सिदोन यांना अधिक सोपे जाईल.
However, for Tyre and Sidon it will be more endurable at the Judgement than for you.
15 १५ हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंचावला जाशील काय? तू नरकापर्यंत उतरशील. (Hadēs )
And thou, Capernaum, shalt thou be lifted high as Heaven? Thou shalt be driven down as low as Hades. (Hadēs )
16 १६ जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास नाकारतो.”
"He who listens to you listens to me; and he who disregards you disregards me, and he who disregards me disregards Him who sent me."
17 १७ ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभू, तुझ्या नावाने भूतेसुद्धा आम्हास वश होतात!”
When the Seventy returned, they exclaimed joyfully, "Master, even the demons submit to us when we utter your name."
18 १८ तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले!
"I saw Satan fall like a lightning-flash out of Heaven," He replied.
19 १९ पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही.
"I have given you power to tread serpents and scorpions underfoot, and to trample on all the power of the Enemy; and in no case shall anything do you harm.
20 २० तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”
Nevertheless rejoice not at this, that the spirits submit to you; but rejoice that your names are registered in Heaven."
21 २१ त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बालकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.
On that same occasion Jesus was filled by the Holy Spirit with rapturous joy. "I give Thee fervent thanks," He exclaimed, "O Father, Lord of Heaven and earth, that Thou hast hidden these things from sages and men of understanding, and hast revealed them to babes. Yes, Father, for such has been Thy gracious will.
22 २२ माझ्या पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”
All things are delivered to me by my Father; and no one knows who the Son is but the Father, nor who the Father is but the Son, and he to whom the Son may choose to reveal Him."
23 २३ आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला, “तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य.
And He turned towards His disciples and said to them apart, "Blessed are the eyes which see what you see!
24 २४ मी तुम्हास सांगतो, अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली, परंतु त्यांनी ते ऐकले नाही.”
For I tell you that many Prophets and kings have desired to see the things you see, and have not seen them, and to hear the things you hear, and have not heard them."
25 २५ नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे?” (aiōnios )
Then an expounder of the Law stood up to test Him with a question. "Rabbi," he asked, "what shall I do to inherit the Life of the Ages?" (aiōnios )
26 २६ तेव्हा येशू त्यास म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यामध्ये काय वाचतोस?”
"Go to the Law," said Jesus; "what is written there? how does it read?"
27 २७ तो म्हणाला, “तू तुझा देव प्रभू याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तीने प्रीती कर.” व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर.
"'Thou shalt love the Lord thy God,'" he replied, "'with thy whole heart, thy whole soul, thy whole strength, and thy whole mind; and thy fellow man as much as thyself.'"
28 २८ तेव्हा येशू त्यास म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील.”
"A right answer," said Jesus; "do that, and you shall live."
29 २९ पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”
But he, desiring to justify himself, said, "But what is meant by my 'fellow man'?"
30 ३० येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरूशलेम शहराहून यरीहोस निघाला होता आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्यास मारले व त्यास अर्धमेला टाकून ते निघून गेले.
Jesus replied, "A man was once on his way down from Jerusalem to Jericho when he fell among robbers, who after both stripping and beating him went away, leaving him half dead.
31 ३१ तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्यास पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
Now a priest happened to be going down that way, and on seeing him passed by on the other side.
32 ३२ त्याच रस्त्याने एक लेवी त्याठिकाणी आला. लेव्याने त्यास पाहिले व तो सुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
In like manner a Levite also came to the place, and seeing him passed by on the other side.
33 ३३ मग एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत असता तो होता तेथे आला त्या मनुष्यास पाहून त्यास त्याचा कळवळा आला
But a certain Samaritan, being on a journey, came where he lay, and seeing him was moved with pity.
34 ३४ तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षरस ओतून त्या बांधल्या आणि त्यास आपल्या गाढवावर बसवून त्यास उतारशाळेत आणले व त्याची देखभाल केली.
He went to him, and dressed his wounds with oil and wine and bound them up. Then placing him on his own mule he brought him to an inn, where he bestowed every care on him.
35 ३५ दुसऱ्या दिवशी त्याने दोन चांदीचे नाणे काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’
The next day he took out two shillings and gave them to the innkeeper. "'Take care of him,' he said, 'and whatever further expense you are put to, I will repay it you at my next visit.'
36 ३६ लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?”
"Which of those three seems to you to have acted like a fellow man to him who fell among the robbers?"
37 ३७ तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्याच्यावर दया केली तो.” तेव्हा येशू त्यास म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”
"The one who showed him pity," he replied. "Go," said Jesus, "and act in the same way."
38 ३८ मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका गावात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले.
As they pursued their journey He came to a certain village, where a woman named Martha welcomed Him to her house.
39 ३९ तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली.
She had a sister called Mary, who seated herself at the Lord's feet and listened to His teaching.
40 ४० पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभू, माझ्या बहिणीने सर्व काम माझ्यावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
Martha meanwhile was busy and distracted in waiting at table, and she came and said, "Master, do you not care that my sister is leaving me to do all the waiting? Tell her to assist me."
41 ४१ प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस.
"Martha, Martha," replied Jesus, "you are anxious and worried about a multitude of things;
42 ४२ पण एकच गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो आणि मरीयेने तिच्यासाठी चांगला वाटा निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
and yet only one thing is really necessary. Mary has chosen the good portion and she shall not be deprived of it."