< लेवीय 8 >
1 १ परमेश्वर मोशेला म्हणाला,
I reèe Gospod Mojsiju govoreæi:
2 २ अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन,
Uzmi Arona i sinove njegove s njim i odijelo i ulje pomazanja i tele za žrtvu radi grijeha i dva ovna i kotaricu prijesnijeh hljebova.
3 ३ दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.
I saberi sav zbor pred vrata šatoru od sastanka.
4 ४ परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमली.
I uèini Mojsije kako mu zapovjedi Gospod, i sabra se zbor pred vrata šatoru od sastanka.
5 ५ मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.”
I reèe Mojsije zboru: ovo je zapovjedio Gospod da se uèini.
6 ६ मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली.
I dovede Mojsije Arona i sinove njegove, i opra ih vodom.
7 ७ मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्यास झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली.
I obuèe mu košulju, i opasa ga pojasom, i ogrnu ga plaštem, i metnu mu svrh njega opleæak, i steže oko njega pojas od opleæka, i opasa ga njim.
8 ८ मग मोशेने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले;
I metnu na nj naprsnik, a na naprsnik metnu Urim i Tumim.
9 ९ नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.
Još mu metnu kapu na glavu, i na kapu metnu sprijed ploèu zlatnu, krunu svetu, kao što zapovjedi Gospod Mojsiju.
10 १० मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवासमंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना आभिषेक करुन त्यांना पवित्र केले.
I uze Mojsije ulje pomazanja, i pomaza šator i sve stvari u njemu, i osveti ih.
11 ११ अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडून पवित्र केले.
I pokropi njim oltar sedam puta, i pomaza oltar i sve sprave njegove, i umivaonicu i podnožje njezino, da se osveti.
12 १२ मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्यास पवित्र केले.
I izli ulja pomazanja na glavu Aronu, i pomaza ga da se osveti.
13 १३ मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
I dovede Mojsije sinove Aronove, i obuèe im košulje, i opasa ih pojasom, i veza im kapice na glave, kao što mu bješe zapovjedio Gospod.
14 १४ मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
I dovede tele za grijeh, i Aron i sinovi njegovi metnuše ruke svoje na glavu teletu za grijeh.
15 १५ मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि उरलेले रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, देवासाठी त्याने ती वेगळी केली. या प्रकारे ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
I zakla ga Mojsije, i uzevši krvi njegove pomaza rogove oltaru unaokolo prstom svojim, i oèisti oltar, a ostalu krv izli na podnožje oltaru, i osveti ga da se na njemu èini oèišæenje od grijeha.
16 १६ गोऱ्हाच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहीत दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला.
I uze sve salo što je na crijevima, i mrežicu s jetre, i oba bubrega, i salo oko njih, i zapali Mojsije na oltaru.
17 १७ परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
A tele s kožom i s mesom i balegom spali ognjem iza okola, kao što bješe Gospod zapovjedio Mojsiju.
18 १८ मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.
I dovede ovna za žrtvu paljenicu, i Aron i sinovi njegovi metnuše ruke svoje na glavu ovnu;
19 १९ मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.
I zakla ga Mojsije, i pokropi krvlju njegovom oltar ozgo unaokolo.
20 २० मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला.
I isjekavši ovna na dijelove zapali Mojsije glavu i dijelove i salo.
21 २१ त्याची आतडी पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
A crijeva i noge opra vodom, i tako spali Mojsije svega ovna na oltaru; i bi žrtva paljenica za ugodni miris, žrtva ognjena Gospodu, kao što bješe Gospod zapovjedio Mojsiju.
22 २२ मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.
I dovede drugoga ovna, ovna za posveæenje; i Aron i sinovi njegovi metnuše ruke svoje na glavu ovnu.
23 २३ मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले.
I zaklavši ga Mojsije uze krvi njegove, i pomaza njom kraj desnoga uha Aronu i palac desne ruke njegove i palac desne noge njegove.
24 २४ मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले.
I dovede Mojsije sinove Aronove, pa i njima pomaza istom krvlju kraj desnoga uha i palac desne ruke i palac desne noge; a ostalu krv izli Mojsije po oltaru unaokolo.
25 २५ मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली;
Potom uze salo i rep i sve salo što je na crijevima, i mrežicu s jetre, i oba bubrega, i salo oko njih, i pleæe desno,
26 २६ परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतील एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या.
A iz kotarice u kojoj stajahu prijesni hljebovi pred Gospodom uze jedan kolaè prijesan, i jedan kolaè hljeba s uljem i jednu pogaèu, i metnu na salo i na pleæe desno.
27 २७ हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले.
I metnu to sve Aronu u ruke, i sinovima njegovijem u ruke, i obrnu tamo i amo za žrtvu obrtanu pred Gospodom.
28 २८ मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहीत त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते हे सुवासीक हव्य होय. हे अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण होते.
Poslije uzevši to iz ruku njihovijeh Mojsije zapali na oltaru svrh žrtve paljenice; to je posveæenje na ugodni miris, žrtva ognjena Gospodu.
29 २९ मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.
I uze Mojsije grudi, i obrnu ih tamo i amo za žrtvu obrtanu pred Gospodom; i od ovna posvetnoga dopade Mojsiju dio, kao što bješe Gospod zapovjedio Mojsiju.
30 ३० मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहीत त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे पवित्र केली.
I uze Mojsije ulja za pomazanje i krvi koja bješe na oltaru, i pokropi Arona i haljine njegove, i sinove njegove i haljine njihove s njim; i tako posveti Arona i haljine njegove, i sinove njegove i haljine njihove s njim.
31 ३१ मोशे अहरोन व त्याचे पुत्र ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा.
Potom reèe Mojsije Aronu i sinovima njegovijem: kuhajte to meso na vratima šatora od sastanka, i ondje ga jedite i hljeb posvetni što je u kotarici, kao što sam zapovjedio rekavši: Aron i sinovi njegovi neka jedu to.
32 ३२ मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका;
A što ostane mesa ili hljeba, ognjem sažezite.
33 ३३ तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये.
I ne izlazite s vrata šatora od sastanka sedam dana, dokle se ne navrše dani posveæenja vašega, jer æete se sedam dana posveæivati.
34 ३४ परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे.
Kako je bilo danas, tako je Gospod zapovjedio da se èini, da biste se oèistili od grijeha.
35 ३५ तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाहीतर तुम्ही मराल; कारण मला तशी आज्ञा दिली आहे.”
Zato na vratima šatora od sastanka ostanite danju i noæu za sedam dana, i izvršite što je Gospod zapovjedio da izvršite, da ne pomrete, jer mi je tako zapovjeðeno.
36 ३६ तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या.
I Aron i sinovi njegovi uèiniše sve što bješe Gospod zapovjedio preko Mojsija.