< लेवीय 7 >

1 दोषार्पणाविषयीचा विधी असा आहे: हे अर्पण परमपवित्र आहे.
«قوانین قربانی جبران که قربانی بسیار مقدّسی است، از این قرار می‌باشد:
2 ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा, आणि याजकाने त्या बलीचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे.
حیوان قربانی باید در مکانی که قربانی سوختنی را سر می‌برند، ذبح شود و خونش بر چهار طرف مذبح پاشیده شود.
3 त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी; त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यावरील चरबी,
کاهن تمام چربی آن را تقدیم کند، یعنی دنبه و چربی داخل شکم،
4 दोन्ही गुरदे, त्याच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा वेगळे करावेत.
دو قلوه و چربی روی آنها در قسمت تهیگاه، و نیز سفیدی روی جگر. اینها باید همراه قلوه‌ها جدا شوند.
5 या सर्वांचा याजकाने होम करावा; हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय.
سپس، کاهن آنها را به عنوان قربانی جبران بر آتش مذبح برای خداوند بسوزاند.
6 याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बली खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे, ते पवित्र स्थानी बसून खावे.
پسران کاهنان می‌توانند از این گوشت بخورند. این گوشت باید در جای مقدّسی خورده شود. این قربانی، بسیار مقدّس است.
7 दोषार्पण पापार्पणासारखेच आहे; त्या दोघांचे विधी एकच आहेत; जो याजक ह्याच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क आहे.
«قانونی که باید در مورد قربانی گناه و قربانی جبران رعایت شود این است: گوشت قربانی به کاهنی تعلق خواهد داشت که مراسم کفاره را اجرا می‌کند.
8 प्रायश्चित करणाऱ्या याजकाचा त्या होमार्पणाच्या बलीच्या कातड्यावरही हक्क असेल.
(در ضمن پوست قربانی سوختنی نیز به آن کاهن تعلق دارد.)
9 भट्टीत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल.
هر هدیهٔ آردی که در تنور یا در تابه یا روی ساج پخته می‌شود به کاهنی تعلق خواهد گرفت که آن را به خداوند تقدیم می‌کند.
10 १० प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे, ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच हक्क आहे.
تمام هدایای آردی دیگر، خواه مخلوط با روغن زیتون و خواه خشک، به طور مساوی به پسران هارون تعلق دارد.
11 ११ परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:
«قوانین قربانی سلامتی که به خداوند تقدیم می‌شود از این قرار است:
12 १२ त्यास तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळया उपकारस्तुतीच्या यज्ञासोबत अर्पाव्या.
اگر قربانی به منظور شکرگزاری باشد، همراه آن باید این نانهای بدون خمیرمایه نیز تقدیم شوند قرصهای نان که با روغن زیتون مخلوط شده باشند، نانهای نازک که روغن مالی شده باشند، نانهایی که از مخلوط آرد مرغوب و روغن زیتون تهیه شده باشند.
13 १३ त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत त्याने खमिर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या
همچنین همراه قربانی باید قرصهای نان خمیرمایه‌دار نیز تقدیم شوند.
14 १४ या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी प्रत्येकी एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाचा त्या पोळीवर हक्क आहे.
از هر نوع نان باید یک قسمت به عنوان هدیهٔ مخصوص به خداوند تقدیم شود تا به کاهنی تعلق گیرد که خون حیوان قربانی را روی مذبح می‌پاشد.
15 १५ त्याने उपकारस्तुतीसाठी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस, अर्पण करण्याच्या दिवशीच खावे; त्यातील काही सकाळपर्यंत ठेवू नये.
گوشت حیوان قربانی سلامتی باید در روزی که به عنوان هدیۀ شکرگزاری تقدیم می‌گردد، خورده شود و چیزی از آن برای روز بعد باقی نماند.
16 १६ यज्ञबलीचे अर्पण नवसाचे किंवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्यादिवशीच त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरेल तर त्याने दुसऱ्या दिवशीही खावे.
«اگر قربانی، داوطلبانه یا نذری باشد، گوشت قربانی در روزی که آن را تقدیم می‌کنند، باید خورده شود. اگر از گوشت قربانی چیزی باقی بماند می‌توان آن را روز بعد نیز خورد.
17 १७ त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे.
ولی هر چه تا روز سوم باقی بماند، باید کاملاً سوزانده شود.
18 १८ जर कोणी शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वरास ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.
اگر در روز سوم چیزی از گوشت قربانی خورده شود، خداوند آن قربانی را قبول نخواهد کرد و به حساب نخواهد آورد زیرا آن گوشت نجس شده است. کسی هم که آن را بخورد مجرم می‌باشد.
19 १९ ज्या मांसास कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये; ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच यज्ञबलीचे मांस खावे;
«گوشتی را که به چیزی نجس خورده است نباید خورد، بلکه باید آن را سوزاند. گوشت قربانی را فقط کسانی می‌توانند بخورند که طاهر هستند.
20 २० परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वरास अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.
هر که طاهر نباشد و گوشت قربانی سلامتی را که از آنِ خداوند است، بخورد باید از میان قوم منقطع شود.
21 २१ एखादा मनुष्य जर एखाद्या अशुद्ध वस्तुला स्पर्श करेल मग ती अशुद्धता मनुष्याची, पशूची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो, तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वरास अर्पण केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे जर तो मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.
اگر کسی به چیزی نجس دست بزند، خواه نجاست انسان باشد، خواه حیوان نجس و یا هر چیز نجس دیگر، و بعد از گوشت قربانی سلامتی که از آنِ خداوند است، بخورد، باید از میان قوم خدا منقطع شود.»
22 २२ परमेश्वर मोशेला म्हणाला,
خداوند به موسی فرمود:
23 २३ सर्व इस्राएल लोकांस असे सांग: तुम्ही बैलाची मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये.
«این دستورها را به بنی‌اسرائیل بده. هرگز چربی گاو و گوسفند و بز را نخورید.
24 २४ मरण पावलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरावी पण ती मुळीच खाऊ नये.
چربی حیوانی که مرده یا توسط جانوری دریده شده باشد هرگز خورده نشود بلکه از آن برای کارهای دیگر استفاده شود.
25 २५ परमेश्वरास होमाद्ववारे अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे
هر کس چربی حیوانی را که بر آتش به خداوند تقدیم می‌شود بخورد باید از میان قوم منقطع شود.
26 २६ “तुम्ही कोठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये.
هر جا که ساکن باشید، هرگز خون نخورید، نه خون پرنده و نه خون چارپا.
27 २७ जर कोणी कोणतेही रक्त खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.”
هر کس، در هر جا، خون بخورد، باید از میان قوم خدا منقطع شود.»
28 २८ परमेश्वर मोशेला म्हणाला,
سپس خداوند به موسی فرمود:
29 २९ “इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा.
«این دستورها را به بنی‌اسرائیل بده: هر کس بخواهد قربانی سلامتی به خداوند تقدیم کند باید قسمتی از آن قربانی را به عنوان هدیه نزد خداوند بیاورد.
30 ३० त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी; त्याने चरबी व ऊर याजकाकडे आणावा; ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल; हे ओवाळणीचे अर्पण होय.
او باید به دست خود آن را همچون هدیۀ مخصوص به خداوند تقدیم کند. چربی حیوان را با سینه تقدیم کند و سینهٔ قربانی را به عنوان هدیهٔ مخصوص، در حضور خداوند تکان دهد.
31 ३१ मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा होईल.
کاهن چربی را بر مذبح بسوزاند، ولی سینهٔ قربانی متعلق به هارون و پسرانش باشد.
32 ३२ तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
ران راست قربانی، به عنوان هدیهٔ مخصوص، به کاهنی داده شود که خون و چربی قربانی را تقدیم می‌کند؛
33 ३३ अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.
34 ३४ मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे पुत्र ह्याना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यानपिढया पाळावा.”
زیرا خداوند سینه و ران قربانی سلامتی را از قوم اسرائیل گرفته و آنها را به عنوان هدیهٔ مخصوص به کاهنان داده است و همیشه به ایشان تعلق خواهند داشت.
35 ३५ परमेश्वराकरिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे.
(این قسمت از هدایایی که بر آتش به خداوند تقدیم می‌شود در روز انتصاب هارون و پسرانش به خدمت خداوند، به ایشان داده شد.
36 ३६ परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्यादिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली व हा त्यांचा पिढ्यानपिढ्या कायमचा हक्क ठरला आहे.
در روزی که ایشان مسح شدند، خداوند دستور داد که قوم اسرائیل این قسمت را به ایشان بدهند. این، قانونی برای تمام نسلهای ایشان می‌باشد.)»
37 ३७ हे विधी होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पणाच्या वेळचे अर्पण आणि शांत्यर्पण या विषयीचे आहे;
اینها قوانینی بود در مورد قربانی سوختنی، هدیهٔ آردی، قربانی گناه، قربانی جبران، قربانی انتصاب و قربانی سلامتی
38 ३८ इस्राएल लोकांनी परमेश्वराकरिता काय अर्पणे आणावीत या विषयी त्याने त्यांना सीनाय रानात आज्ञा दिली त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सीनाय पर्वतावर हे विधी लावून दिले.
که خداوند در بیابان، در کوه سینا به موسی داد تا قوم اسرائیل بدانند چگونه قربانیهای خود را به خداوند تقدیم کنند.

< लेवीय 7 >