< लेवीय 5 >
1 १ जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहित असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;
If a soule synneth, and hereth the vois of a swerere, and is witnesse, `for ether he siy, ether `is witynge, if he schewith not, he schal bere his synne.
2 २ किंवा कोणी अशुद्ध वस्तुला किंवा मरण पावलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी नकळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल.
A persone that touchith ony vnclene thing, ether which is slayn of a beeste, ether is deed bi it silf, ether touchith ony other crepynge beeste, and foryetith his vnclennesse, he is gilti, and trespassith.
3 ३ त्याचप्रमाणे मनुष्याशी संबध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तुला नकळत स्पर्श केला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्यास नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.
And if he touchith ony thing of the vnclennesse of man, bi al the vnclennesse bi which he is wont to be defoulid, and he foryetith, and knowith afterward, he schal be suget to trespas.
4 ४ किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल.
A soule that swerith, and bryngith forth with hise lippis, that it schulde do ether yuel, ether wel, and doith not, and confermeth the same thing with an ooth, ethir with a word, and foryetith, and aftirward vndirstondith his trespas, do it penaunce for synne,
5 ५ तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;
and offre it of the flockis a femal lomb, ethir a goet;
6 ६ आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातुन आणावी; आणि मग याजकाने त्या मनुष्याच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.
and the preest schal preie for hym, and for his synne.
7 ७ त्यास कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.
But if he may not offre a beeste, offre he twei turtlis, ethir `briddis of culuers to the Lord, oon for synne, and the tother in to brent sacrifice.
8 ८ त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये
And he schal yyue tho to the preest, which schal offre the firste for synne, and schal folde ayen the heed therof to the wengis, so that it cleue to the necke, and be not `brokyn outirli.
9 ९ पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरु द्यावे; हे पापार्पण होय.
And the preest schal sprynge the wal of the auter, of the blood therof; sotheli what euer `is residue, he schal make to droppe doun at the `foundement of the auter, for it is for synne.
10 १० मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; म्हणजे त्याची क्षमा होईल.
Sotheli he schal brenne the tother brid in to brent sacrifice, as it is wont to be doon; and the preest schal preie for hym, and for his synne, and it schal be foryouun to hym.
11 ११ “जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले देखील देण्याची त्याची ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग सपिठ पापार्पण म्हणून आणावे; त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय.
That if his hond mai not offre twei turtlis, ethir twei `briddis of culueris, he schal offre for his synne the tenthe part of ephi of wheete flour; he schal not putte oile `in to it, nether he schal putte ony thing of encense, for it is for synne.
12 १२ त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याच्या स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगूलपणा करिता होम करावा; हे पापार्पण होय.
And he schal yyue it to the preest, which preest schal take vp an handful therof, and schal brenne on the auter, in to mynde of hym that offeride,
13 १३ अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचे उरलेले सपिठ याजकाचे होईल.”
and the preest schal preie for hym, and schal clense; forsothe he schal have the tother part in yifte.
14 १४ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
And the Lord spak to Moises,
15 १५ “परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा दोष नसलेला मेंढा असावा, हे शेकेल पवित्र निवास मंडपातील चलनाप्रमाणे असावे; हे दोषार्पण होय.
and seide, If a soule brekith cerymonyes bi errour, and synneth in these thingis that ben halewid to the Lord, it schal offre for his trespas a ram without wem of the flockis, that may be bouyt for twey siclis, bi the weiyte of the seyntuarie.
16 १६ ज्या पवित्र वस्तूची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पाचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
And he schal restore that harm that he dide, and he schal putte the fyuethe part aboue, and schal yyue to the preest, which preest schal preye for hym, and offre the ram, and it schal be foryouun to hym.
17 १७ परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा नकळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
A soule that synneth bi ignoraunce, and doith oon of these thingis that ben forbodun in the lawe of the Lord, and is gilti of synne, and vndirstondith his wickidnesse,
18 १८ त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय, तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
it schal offre to the preest a ram without wem of the flockis, bi the mesure of estymacioun of synne; and the preest schal preye for hym, for he dide vnwytynge, and it schal be foryouun to him,
19 १९ हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.”
for by errour he trespasside ayens the Lord.