< लेवीय 4 >

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
And Yahweh spake, unto Moses, saying:
2 इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वराने निषिद्ध केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले किंवा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात:
Speak thou unto the sons of Israel, saying—When any person, shall sin by mistake, departing from any of the commandments of Yahweh, as to things which should not be done, and shall do any one of them, —
3 जर अभिषेक झालेल्या मुख्य याजकाने लोकावंर दोष येईल, असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.
If, the anointed priest, shall sin, so as to bring guilt upon the people, then shall he bring near for his sin which he hath committed a choice young bullock without defect, unto Yahweh as a sin-bearer.
4 त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.
And he shall bring in the bullock unto the entrance of the tent of meeting, before Yahweh, —and shall lean his hand upon the head of the bullock, and shall slay the bullock before Yahweh.
5 मग अभिषिक्त याजकाने गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे.
And the anointed priest shall take of the blood of the bullock, —and bring it into the tent of meeting;
6 याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर, परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
and the priest shall dip his finger in the blood, —and sprinkle of the blood seven times, before Yahweh, in front of the veil of the sanctuary.
7 मग याजकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शनमंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे; मग त्या गोऱ्हाचे राहिलेले सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
Then shall the priest put of the blood upon the horns of the altar of fragrant incense before Yahweh, which is in the tent of meeting, —and, all the [remainder of the] blood of the bullock, shall he pour out at the base of the altar of ascending-sacrifice, which is at the entrance of the tent of meeting,
8 आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी;
And all the fat of the sin-bearing bullock, shall he heave up therefrom, —the fat that covereth over the inwards, and all the fat that is upon the inwards;
9 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी;
and the two kidneys, and the fat that is upon them which is upon the loins, —and as for the caul upon the liver, upon the kidneys, shall he remove it:
10 १० शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
just as it is heaved up from the ox of the peace-offering, —and the priest shall make of them a perfume on the altar of ascending-sacrifice,
11 ११ गोऱ्ह्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,
But, as for the skin of the bullock and all its flesh with its head and with its legs, —and its inwards, and its dung,
12 १२ अशाप्रकारे सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.
he shall take forth the entire bullock—unto the outside of the camp, unto a clean place unto the outpoured heap of fat-ashes, and shall burn it up on wood in the fire, —upon the outpoured heap of fat-ashes, shall it be burned up.
13 १३ इस्राएलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केले तर ते सर्वजण दोषी ठरतील.
And, if the whole assembly of Israel, shall make a mistake, and a matter be hidden from the eyes of the convocation, —and so they do something, whereby they depart from any of the commandments of Yahweh as to things which should not be done, and become guilty;
14 १४ आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व लोकांकरिता पापार्पण म्हणून एक गोऱ्हा दर्शनमंडपाजवळ आणून अर्पावा.
and the sin shall become known, which they have committed therein, then shall the convocation bring near a choice young bullock as a sin-bearer, yea they shall bring it in. before the tent of meeting;
15 १५ मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा वध करावा.
and the elders of the assembly shall lean their hands upon the head of the bullock before Yahweh, —and shall slay the bullock, before Yahweh;
16 १६ नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे;
and the anointed priest shall bring in of the blood of the bullock, —into the tent of meeting;
17 १७ मग याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवून परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.
and the priest shall dip his finger in the blood, —and shall sprinkle of the blood seven times before Yahweh, upon the face of the veil;
18 १८ मग त्याने परमेश्वरासमोर दर्शनमंडपामध्ये असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे, व बाकीचे सर्व रक्त दर्शनमंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
and, some of the blood, shall he put upon the horns of the altar which is before Yahweh, which is in the tent of meeting; and, all the [remainder of the] blood, shall he pour out at the base of the altar of ascending-sacrifice, which is at the entrance of the tent of meeting;
19 १९ त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी याजकाने काढून तिचा वेदीवर होम करावा.
and, as for all the fat thereof, he shall heave up therefrom, —and make a perfume at the altar.
20 २० पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.
And he shall do to the bullock, as he did to the [first] sin-bearing bullock, so shall he do with this, —and the priest shall put a propitiatory-covering over them, and it shall be forgiven them.
21 २१ आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व लोकांकरिता पापार्पण होय.
And he shall take forth the bullock unto the outside of the camp, and burn it up, just as he burned up the first bullock, —the sin-bearer of the convocation, it is.
22 २२ एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला,
When a prince, shall sin, —and shall do something, departing from any of the commandments of Yahweh his God as to things which should not be done, by mistake and shall become aware of his guilt;
23 २३ व त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा.
or his sin wherein he hath sinned be made known unto him, then shall he bring in. as his oblation a he-goat a male without defect;
24 २४ त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.
and shall lean his hand upon the head of the goat, and shall slay it in the place where they slay the ascending-sacrifice before Yahweh, —a sin-bearer, it is.
25 २५ मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
And the priest shall take of the blood of the sin-bearer with his finger, and put upon the horns of the altar of ascending-sacrifice; and, the [remainder of the] blood thereof, shall he pour out at the base of the altar of ascending-sacrifice;
26 २६ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; अशाप्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल.
and with all the fat thereof, shall he make a perfume at the altar, as with the fat of the peace-offering, —so shall the priest put a propitiatory-covering over him because of his sin, and it shall be forgiven him.
27 २७ सामान्य मनुष्यांमधून कोणाकडून चुकून पाप घडले किंवा परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे दोषी तो ठरला;
And, if, any person, shall sin, by mistake from among the people of the land, —by his doing anything departing from any of the commandments of Yahweh, as to things which should not be done, and shall become aware of his guilt;
28 २८ आणि त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी.
or his sin which he hath committed shall be made known unto, him, then shall he bring in, as his oblation, a kid of the goats a female, without defect, for his sin which he hath committed;
29 २९ त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा;
and shall lean his hand upon the head of the sin-bearer, —and shall slay the sin-bearer in the place of the ascending-sacrifice.
30 ३० मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे.
Then shall the priest take of the blood thereof with his finger, and put upon the horns of the altar of ascending-sacrifice, —and all the [remaining] blood thereof, shall he pour out, at the base of the altar;
31 ३१ आणि याजकाने त्या बकरीची चरबी शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे वेगळी काढून तिचा परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा; अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित्त करावे म्हणजे परमेश्वर त्यास क्षमा करील.
and all the fat thereof, shall he remove as the fat from off the peace-offering was removed, and the priest shall make a perfume at the altar, for a satisfying odour unto Yahweh, —so shall the priest put a propitiatory-covering over him, and it shall be forgiven him.
32 ३२ त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी.
And, if a lamb, he bring in. as his oblation for a sin-bearer, a female without defect, shall he bring in;
33 ३३ त्याने त्या कोकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्यास वधावे.
and shall lean his hand upon the head of the sin-bearer, —and shall slay it as a sin-bearer, in the place where they slay the ascending-sacrifice.
34 ३४ याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
Then shall the priest take of the blood of the sin-bearer with his finger, and put upon the horns of the altar of ascending-sacrifice, —and all the [remaining] blood thereof, shall he pour out, at the base of the altar;
35 ३५ त्याने शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
and all the fat thereof, shall he remove as the fat of the lamb is removed, from the peace-offering, and the priest shall make a perfume therewith at the altar, upon the altar-flames of Yahweh, —so shall the priest put a propitiatory-covering over him on account of his sin which he hath committed, and it shall be forgiven him.

< लेवीय 4 >