< लेवीय 3 >
1 १ जर कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी परमेश्वरासमोर अर्पावा.
Аще же жертва спасения дар его Господу, аще убо от говяд е принесет, аще мужеск пол или женск, непорочен да принесет и пред Господа:
2 २ त्याने त्याच्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.
и возложит руце свои на главу дара, и да заколет и пред Господем у дверий скинии свидения: и да возлиют сынове Аарони жерцы кровь на олтарь всесожжений окрест,
3 ३ परमेश्वरास शांत्यर्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी,
и да принесут от жертвы спасения принос Господу, тук покрывающий утробу, и весь тук иже на утробе,
4 ४ दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे
и обе почки, и тук иже на них и иже на стегнах, и препонку, яже на печени, с почками отимет:
5 ५ व या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वरासाठी केलेले सुवासीक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.
и да вознесут я сынове Аарони жерцы, на олтарь во всесожжения на дрова сущая на огни, яже на олтари: принос воня благовония Господу.
6 ६ परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे.
Аще же от овец дар его жертва спасения Господу, мужеск пол или женск, непорочен да принесет,
7 ७ जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे.
аше агнца принесет дар свой, да приведет его пред Господа,
8 ८ त्याने त्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोवती टाकावे.
и да возложит руку на главу дара своего, и да заколет его у дверий скинии свидения: и да пролиют сынове Аарони жерцы кровь на олтарь окрест,
9 ९ अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.
и да принесет от жертвы спасения принос Господу, тук и чресла чиста с лядвиями да отлучит и: и весь тук покрывающий утробу, и весь тук иже на утробе,
10 १० दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
и обе почки, и тук иже на них, иже на стегнах: и препонку, яже на печени, с почками отемь,
11 ११ मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे.
да вознесет жрец на олтарь: воня благоухания, принос Господви.
12 १२ “कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा.
Аще же от козлов дар его Господу, да принесет пред Господа:
13 १३ त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व त्याच्या सभोवती टाकावे.
и возложит руце на главу его, и да заколют е пред Господем у дверий скинии свидения: и да пролиют сынове Аарони жерцы кровь на олтарь около:
14 १४ त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी.
и да вознесет от него принос Господу тук покрывающий утробу, и весь тук иже на утробе,
15 १५ दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
и обе почки, и весь тук, иже на них, иже на стегнах, и препонку, яже на печени, с почками отлучит:
16 १६ मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा या सुवासिक शांत्यर्पणाने परमेश्वरास आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे.
и да вознесет жрец на олтарь, принос воня благовония Господу: весь тук Господу.
17 १७ तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढया कायमचा चालू राहील.”
Законное в веки в роды вашя, во всяком обитании вашем: всякаго тука и всякия крове да не ясте.