< लेवीय 26 >
1 १ तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
Ne készítsetek magatoknak bálványokat, faragott képet és oszlopot ne állítsatok fel magatoknak, és követ képpel ne helyezzetek el országotokban, hogy leboruljatok rája, mert én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek.
2 २ तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्बाथांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे.
Szombatjaimat őrizzétek meg és szentélyemet féljétek; én vagyok az Örökkévaló.
3 ३ तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या,
Ha a törvényeim szerint jártok és parancsolataimat megőrzitek és megteszitek azokat,
4 ४ तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.
akkor megadom esőiteket az ő idejükben és a föld megadja termését, a mező fája megadja gyümölcsét.
5 ५ तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत रहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत रहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल.
És eléri nálatok a cséplés a szüretet és a szüret eléri a vetést, enni fogjátok kenyereteket jóllakásig és biztonságban laktok országotokban.
6 ६ मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही.
Én pedig adok békét az országban, lefeküsztök és senki sem ijeszt fel; elpusztítom a fenevadat az országból és kard nem vonul át országotokon.
7 ७ तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल.
Üldözni fogjátok ellenségeiteket és elesnek előttetek kard által.
8 ८ तुमच्यातील पाच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
És üldöznek öten közületek százat és százan közületek tízezret fognak üldözni, és elesnek ellenségeitek előttetek kard által.
9 ९ मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;
Én pedig felétek fordulok, megszaporítlak benneteket, megsokasítlak benneteket és fenntartom szövetségemet veletek.
10 १० तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
És enni fogtok réges-régit és a régit kitakarítjátok az új elől.
11 ११ मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही.
És helyezem hajlékomat közétek és meg nem utál lelkem benneteket.
12 १२ मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल.
És járok közepettetek, leszek a ti Istenetek, ti pedig lesztek az én népem.
13 १३ मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे!
Én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek, aki kivezettelek benneteket Egyiptom országából, hogy ne legyetek az ő szolgáik; összetörtem jármotok rúdjait és engedtelek benneteket fölegyenesedve járni.
14 १४ परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत;
De ha nem hallgattok reám és nem teszitek meg mind a parancsolatokat;
15 १५ तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला.
ha törvényeimet megvetitek, ha rendeleteimet megutálja lelketek, hogy meg ne tegyétek mind a parancsolataimat, hogy megbontsátok szövetségemet.
16 १६ जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.
Én is ezt teszem veletek és rendelem reátok rettegésül a sorvadást és a lázat, melyek elepesztik a szemeket és elsorvasztják a lelket; és hiába vetitek magatokat, fölemésztik azt ellenségeitek.
17 १७ मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
És haragomat fordítom ellenetek és vereséget szenvedtek ellenségeitek előtt; és uralkodnak majd rajtatok gyűlölőitek és ti menekültök, bár senki sem üldöz benneteket.
18 १८ या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास सातपट शिक्षा करीन.
És ha még erre sem hallgattok reám, akkor tovább fenyítelek benneteket, hétszeresen vétkeitekért.
19 १९ मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.
Megtöröm hatalmatok gőgjét, teszem egeteket vassá, földeteket érccé.
20 २० तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.
És hiába vész el erőtők, földetek nem adja meg termését és a föld fája nem adja meg gyümölcsét.
21 २१ तरीसुध्दा तुम्ही माझ्याविरूद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हावर तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक संकटे आणीन.
És ha ellenemre jártok és nem akartok reám hallgatni, akkor tovább hozok reátok csapást, hétszeresen vétkeitek szerint.
22 २२ मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना उचलून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; आणि तुमची संख्या कमी करतील. त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.
Reátok bocsátom a mező vadját és megfoszt benneteket gyermekeitektől, kiirtja barmotokat, megkevesbít bennetek és puszták lesznek utatok.
23 २३ एवढे करुनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही परंतु माझ्या विरुध्द चालत राहिलात,
Ha ezek által sem hajtotok fenyítésemre, hanem ellenemre jártok,
24 २४ तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन.
akkor én is járok ellenetekre és megverlek, benneteket vétkeitekért.
25 २५ मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल.
És hozok reátok kardot, mely bosszút áll a szövetségért, és ti egybegyűltök városaitokba és akkor halálvészt bocsátok közétek és az ellenség kezébe adattok,
26 २६ मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.
midőn eltöröm nálatok a kenyér botját és süti majd tíz asszony a ti kenyereteket egy kemencében, és visszaszolgáltatják kenyereteket a súly szerint, esztek, de nem laktok jól.
27 २७ एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला,
Ha ezáltal sem hallgattok rám és ellenemre jártok,
28 २८ तर मग संतापून मी तुमच्याविरुध्द चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट शिक्षा करीन!
akkor járok ellenetekre haraggal és megfenyítelek benneteket én is hétszeresen vétkeitekért.
29 २९ तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल.
Eszitek majd fiaitok húsát, és leányaitok húsát eszitek.
30 ३० तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
Akkor lerontom magaslataitokat, kiirtom naposzlopaitokat, és teszem holttesteiteket bálványaitok holttesteire és megutál lelkem benneteket.
31 ३१ मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही.
Városaitokat rommá teszem és elpusztítom szentélyeiteket és nem szagolom áldozataitok kellemes illatát.
32 ३२ मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील.
És elpusztítom én az országot, hogy eliszonyodnak rajta ellenségeitek, akik laknak benne.
33 ३३ परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.
Benneteket pedig elszórlak a népek közé és kardot rántok mögöttetek; így lesz országotok puszta, városaitok pedig romokká lesznek.
34 ३४ जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात रहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील.
Akkor lerója a föld szombatjait pusztasága egész ideje alatt, ti pedig lesztek ellenségeitek országában; akkor nyugszik a föld és lerója szombatjait.
35 ३५ देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्यास मिळेल.
Pusztasága egész ideje alatt nyugszik, amiért hogy nem nyugodott szombatjaitokon, midőn laktatok rajta.
36 ३६ तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रुंच्या देशात असता मी अशी भिती घालीन की, उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील, तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीमागे लागले नसतांनाही ते पडतील.
És akik megmaradnak közületek, félénkséget hozok azoknak a szívébe az ő ellenségeik országában, hogy üldözi őket a szélhajtott falevél zöreje és menekülnek, amint a kard elől menekülnek és elesnek, bár nincs üldöző.
37 ३७ कोणी पाठीस लागले नसतांनाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेंकावर पडतील. तुमच्या शत्रूविरूद्ध उभे राहण्याइतके बळ तुमच्यात नसणार.
Elbotlanak egymásban, mint a kard előtt, bár nincs üldöző; és nem lesz megállástok ellenségeitek előtt.
38 ३८ राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल.
Elvesztek a népek között és fölemészt benneteket ellenségeitek országa.
39 ३९ तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.
Akik pedig megmaradnak közületek, azok elenyésznek bűneik miatt ellenségeitek országaiban, meg őseik bűnei miatt is, mint a magukéi miatt, elenyésznek.
40 ४० परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे व त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला व माझ्या विरुध्द चालले हे कबूल करतील.
Akkor bevallják bűnüket és őseik bűnét az ő hűtlenségükben, amellyel hűtlenséget követtek el ellenem, és hogy ellenemre jártak,
41 ४१ या कारणामुळे, मीही त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापांबद्दलची शिक्षा मान्य करतील.
meg én is jártam ellenükre és vittem őket ellenségeik országába; bizony akkor megalázkodik megátalkodott szívük és akkor leróják bűnüket.
42 ४२ तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी आठवेन तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहाम ह्याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन.
És én megemlékezem Jákobbal való szövetségemről, meg Izsákkal való szövetségemről is és Ábrahámmal való szövetségemről is megemlékezem, meg az országról is megemlékezem.
43 ४३ त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल.
Az ország pedig el lesz hagyatva tőlük és lerója szombatjait, míg puszta lesz nélkülük és ők leróják bűnüket, azért, mert rendeleteimet megvetették és törvényeimet megutálta lelkük.
44 ४४ इतके असताही ते त्यांच्या शत्रुंच्या देशात असताना, त्यांचा सपूंर्ण नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नकार करणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे.
De még akkor is, mikor lesznek ellenségeik országában, nem vetem és nem utálom rneg őket, hogy végkép megsemmisítsem őket, hogy megbontsam velük való szövetségemet, mert én vagyok az Örökkévaló, az ő Istenük.
45 ४५ त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!
Megemlékezem értük az elődökkel való szövetségről, akiket kivezettem Egyiptom országából a népek szeme láttára, hogy legyek az ő Istenük, én az Örökkévaló.
46 ४६ हे विधी, नियम व निर्बंध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांस सांगितले.
Ezek a törvények és rendeletek, meg a tanok, melyeket adott az Örökkévaló önmaga közé és Izrael fiai közé a Szináj hegyén Mózes által.