< लेवीय 24 >
1 १ परमेश्वर मोशेला म्हणाला,
Yahweh parla à Moïse, en disant:
2 २ “इस्राएल लोकांस आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतूनाचे हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.
« Ordonne aux enfants d’Israël de t’apporter pour le chandelier de l’huile pure d’olives concassées, pour entretenir les lampes continuellement.
3 ३ अहरोनाने दर्शनमंडपामध्ये साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
En dehors du voile qui est devant le témoignage, dans la tente de réunion, Aaron la préparera pour brûler continuellement du soir au matin en présence de Yahweh. C’est une loi perpétuelle pour vos descendants.
4 ४ त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे.
Il arrangera les lampes sur le chandelier d’or pur, pour qu’elles brûlent constamment devant Yahweh.
5 ५ तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.
« Tu prendras de la fleur de farine, et tu en cuiras douze gâteaux; chaque gâteau sera de deux dixièmes d’épha.
6 ६ त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
Tu les placeras en deux piles, six par pile, sur la table d’or pur devant Yahweh.
7 ७ प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे परमेश्वरास अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल.
Tu mettras de l’encens pur sur chaque pile, et il servira, pour le pain, de mémorial offert par le feu à Yahweh.
8 ८ प्रत्येक शब्बाथ दिवशी अहरोनाने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय.
Chaque jour de sabbat, on disposera ces pains devant Yahweh constamment, de la part des enfants d’Israël: c’est une alliance perpétuelle.
9 ९ ती भाकर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वरास अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्यास परमपवित्र होय.”
Ils appartiendront à Aaron et à ses fils, qui les mangeront en lieu saint; car c’est pour eux une chose très sainte parmi les offrandes faites par le feu à Yahweh. C’est une loi perpétuelle. »
10 १० त्याकाळी कोणा एका इस्राएली स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल मनुष्याशी भांडू लागला.
Le fils d’une femme israélite, mais qui était fils d’un Égyptien, vint au milieu des enfants d’Israël, et il y eut une querelle dans le camp entre le fils de la femme israélite et un homme d’Israël.
11 ११ तो इस्राएली स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्यास मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती;
Le fils de la femme israélite blasphéma le Nom sacré et le maudit, et sa mère s’appelait Salumith, fille de Dabri, de la tribu de Dan.
12 १२ त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्यास अटकेत ठेवले.
On le mit sous garde, pour que Moïse leur déclarât de la part de Yahweh, ce qu’il y avait à faire.
13 १३ मग परमेश्वर देव मोशेला म्हणाला,
Yahweh parla à Moïse, en disant:
14 १४ “तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या मनुष्याच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्यास दगडमार करून मारुन टाकावे.
« Fais sortir du camp le blasphémateur; que tous ceux qui l’ont entendu posent leurs mains sur sa tête, et que toute l’assemblée le lapide.
15 १५ तू इस्राएल लोकांस अवश्य सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी.
Tu parleras aux enfants d’Israël, en disant: Tout homme qui maudit son Dieu portera son péché;
16 १६ जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्यास अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्यास दगडमार करावी; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्यास अवश्य जिवे मारावे.
et celui qui blasphémera le nom de Yahweh sera puni de mort: toute l’assemblée le lapidera. Étranger ou indigène, s’il blasphème le Nom sacré, il mourra.
17 १७ जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्यास ठार मारील तर त्यास अवश्य जिवे मारावे.
Celui qui frappe un homme mortellement sera mis à mort.
18 १८ जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी.
Celui qui frappe mortellement une tête de bétail en donnera une autre: vie pour vie.
19 १९ जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्यास उलट त्याच प्रकारची दुखापत करावी.
Si quelqu’un fait une blessure à son prochain, on lui fera comme il a fait:
20 २० हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा मनुष्यास जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्यास केली जावी.
fracture pour fracture, œil pour œil, dent pour dent; on lui fera la même blessure qu’il a faite à son prochain.
21 २१ पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
Celui qui aura tué une pièce de bétail en rendra une autre; mais celui qui aura tué un homme sera mis à mort.
22 २२ परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!”
La même loi régnera parmi vous, pour l’étranger comme pour l’indigène; car je suis Yahweh, votre Dieu ».
23 २३ मोशेने इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.
Moïse ayant ainsi parlé aux enfants d’Israël, ils firent sortir du camp le blasphémateur, et le lapidèrent. Les enfants d’Israël firent selon que Yahweh avait ordonné à Moïse.