< लेवीय 23 >

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
וידבר יהוה אל משה לאמר׃
2 “इस्राएल लोकांस असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्रसण आहेत.
דבר אל בני ישראל ואמרת אלהם מועדי יהוה אשר תקראו אתם מקראי קדש אלה הם מועדי׃
3 सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
ששת ימים תעשה מלאכה וביום השביעי שבת שבתון מקרא קדש כל מלאכה לא תעשו שבת הוא ליהוה בכל מושבתיכם׃
4 परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे,
אלה מועדי יהוה מקראי קדש אשר תקראו אתם במועדם׃
5 पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळपासून परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.
בחדש הראשון בארבעה עשר לחדש בין הערבים פסח ליהוה׃
6 त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर (खमीर न घातलेली भाकर खावी).
ובחמשה עשר יום לחדש הזה חג המצות ליהוה שבעת ימים מצות תאכלו׃
7 सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
ביום הראשון מקרא קדש יהיה לכם כל מלאכת עבדה לא תעשו׃
8 सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्नीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी काही काम करु नये.”
והקרבתם אשה ליהוה שבעת ימים ביום השביעי מקרא קדש כל מלאכת עבדה לא תעשו׃
9 परमेश्वर मोशेला म्हणाला,
וידבר יהוה אל משה לאמר׃
10 १० “इस्राएल लोकांस सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;
דבר אל בני ישראל ואמרת אלהם כי תבאו אל הארץ אשר אני נתן לכם וקצרתם את קצירה והבאתם את עמר ראשית קצירכם אל הכהן׃
11 ११ याजकाने ती पेंढी शब्बाथाच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी म्हणजे ती तुमच्यासाठी मान्य होईल. शब्बाथाच्या पुढच्या दिवशी ती याजकाने ओवाळावी.
והניף את העמר לפני יהוה לרצנכם ממחרת השבת יניפנו הכהן׃
12 १२ पेंढी ओवाळाल त्यादिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण परमेश्वरासाठी करावे;
ועשיתם ביום הניפכם את העמר כבש תמים בן שנתו לעלה ליהוה׃
13 १३ तुम्ही त्याचबरोबर तेलात मळलेल्या दोन दशमांश सपिठा अन्नार्पण अर्पावे. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; आणि त्या बरोबरचे पेयार्पण म्हणून एकचतुर्थांश हीन द्राक्षरस अर्पावा.
ומנחתו שני עשרנים סלת בלולה בשמן אשה ליהוה ריח ניחח ונסכה יין רביעת ההין׃
14 १४ तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल, त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर, किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे रहाल तेथे तुमच्याकरिता हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील.
ולחם וקלי וכרמל לא תאכלו עד עצם היום הזה עד הביאכם את קרבן אלהיכם חקת עולם לדרתיכם בכל משבתיכם׃
15 १५ तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे;
וספרתם לכם ממחרת השבת מיום הביאכם את עמר התנופה שבע שבתות תמימת תהיינה׃
16 १६ सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे.
עד ממחרת השבת השביעת תספרו חמשים יום והקרבתם מנחה חדשה ליהוה׃
17 १७ त्यादिवशी तुम्ही आपल्या घरातून दोन दशांश एफाभर मैद्याच्या, खमीर घालून भाजलेल्या दोन भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्या; परमेश्वराकरिता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय.
ממושבתיכם תביאו לחם תנופה שתים שני עשרנים סלת תהיינה חמץ תאפינה בכורים ליהוה׃
18 १८ एक गोऱ्हा, दोन मेंढे व प्रत्येकी एक वर्षाची सात नर कोकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पण आणि पेयार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वरास संतोष होईल.
והקרבתם על הלחם שבעת כבשים תמימם בני שנה ופר בן בקר אחד ואילם שנים יהיו עלה ליהוה ומנחתם ונסכיהם אשה ריח ניחח ליהוה׃
19 १९ आणि पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणासाठी प्रत्येकी एक वर्षाची दोन नर कोंकरे अर्पावित.
ועשיתם שעיר עזים אחד לחטאת ושני כבשים בני שנה לזבח שלמים׃
20 २० याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी.
והניף הכהן אתם על לחם הבכורים תנופה לפני יהוה על שני כבשים קדש יהיו ליהוה לכהן׃
21 २१ त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हास पिढ्यानपिढ्या निरंतरचा नियम होय.
וקראתם בעצם היום הזה מקרא קדש יהיה לכם כל מלאכת עבדה לא תעשו חקת עולם בכל מושבתיכם לדרתיכם׃
22 २२ तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचू नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!”
ובקצרכם את קציר ארצכם לא תכלה פאת שדך בקצרך ולקט קצירך לא תלקט לעני ולגר תעזב אתם אני יהוה אלהיכם׃
23 २३ आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला,
וידבר יהוה אל משה לאמר׃
24 २४ “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी;
דבר אל בני ישראל לאמר בחדש השביעי באחד לחדש יהיה לכם שבתון זכרון תרועה מקרא קדש׃
25 २५ तुम्ही कोणतेही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वरास अर्पण अर्पावे.”
כל מלאכת עבדה לא תעשו והקרבתם אשה ליהוה׃
26 २६ परमेश्वर मोशेला म्हणाला,
וידבר יהוה אל משה לאמר׃
27 २७ “सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पण अर्पावे.
אך בעשור לחדש השביעי הזה יום הכפרים הוא מקרא קדש יהיה לכם ועניתם את נפשתיכם והקרבתם אשה ליהוה׃
28 २८ त्यादिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे; त्यादिवशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.
וכל מלאכה לא תעשו בעצם היום הזה כי יום כפרים הוא לכפר עליכם לפני יהוה אלהיכם׃
29 २९ त्यादिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जिवास ताडन करून आपणाला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
כי כל הנפש אשר לא תענה בעצם היום הזה ונכרתה מעמיה׃
30 ३० त्यादिवशी कोणाही मनुष्याने जर कसलेही काम केले तर मी देव त्यास त्याच्या लोकातून नाहीसा करीन.
וכל הנפש אשר תעשה כל מלאכה בעצם היום הזה והאבדתי את הנפש ההוא מקרב עמה׃
31 ३१ तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
כל מלאכה לא תעשו חקת עולם לדרתיכם בכל משבתיכם׃
32 ३२ तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्यादिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास ताडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”
שבת שבתון הוא לכם ועניתם את נפשתיכם בתשעה לחדש בערב מערב עד ערב תשבתו שבתכם׃
33 ३३ परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला,
וידבר יהוה אל משה לאמר׃
34 ३४ “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा;
דבר אל בני ישראל לאמר בחמשה עשר יום לחדש השביעי הזה חג הסכות שבעת ימים ליהוה׃
35 ३५ पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी कसलेही काम करु नये.
ביום הראשון מקרא קדש כל מלאכת עבדה לא תעשו׃
36 ३६ सात दिवस परमेश्वरास अर्पण अर्पावे; आठव्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वरास अर्पण अर्पावे; त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
שבעת ימים תקריבו אשה ליהוה ביום השמיני מקרא קדש יהיה לכם והקרבתם אשה ליהוה עצרת הוא כל מלאכת עבדה לא תעשו׃
37 ३७ परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत: त्यादिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यामध्ये योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वरास अर्पावे.
אלה מועדי יהוה אשר תקראו אתם מקראי קדש להקריב אשה ליהוה עלה ומנחה זבח ונסכים דבר יום ביומו׃
38 ३८ परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वरास अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत.
מלבד שבתת יהוה ומלבד מתנותיכם ומלבד כל נדריכם ומלבד כל נדבותיכם אשר תתנו ליהוה׃
39 ३९ जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसापर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे.
אך בחמשה עשר יום לחדש השביעי באספכם את תבואת הארץ תחגו את חג יהוה שבעת ימים ביום הראשון שבתון וביום השמיני שבתון׃
40 ४० पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन तुमचा देव परमेश्वर यासमोर सात दिवस उत्सव करावा.
ולקחתם לכם ביום הראשון פרי עץ הדר כפת תמרים וענף עץ עבת וערבי נחל ושמחתם לפני יהוה אלהיכם שבעת ימים׃
41 ४१ प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.
וחגתם אתו חג ליהוה שבעת ימים בשנה חקת עולם לדרתיכם בחדש השביעי תחגו אתו׃
42 ४२ तुम्ही सात दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावे; जन्मापासून जे इस्राएल आहेत त्या सर्वानी मांडवात रहावे,
בסכת תשבו שבעת ימים כל האזרח בישראל ישבו בסכת׃
43 ४३ म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!”
למען ידעו דרתיכם כי בסכות הושבתי את בני ישראל בהוציאי אותם מארץ מצרים אני יהוה אלהיכם׃
44 ४४ तेव्हा ह्याप्रमाणे परमेश्वराने नेमिलेले सण मोशेने इस्राएल लोकांस कळवले.
וידבר משה את מעדי יהוה אל בני ישראל׃

< लेवीय 23 >