< लेवीय 22 >
1 १ परमेश्वर मोशेला म्हणाला,
Och Herren talade med Mose, och sade:
2 २ “अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्यापासून त्यांनी दूर रहावे व माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे!
Säg Aaron och hans söner, att de hålla sig ifrån Israels barnas helgo, hvilket de mig helga, och icke ohelga mitt helga Namn; ty jag är Herren.
3 ३ तुझ्या वंशजापैकी कोणी जर अशुद्ध असेल त्याने इस्राएल लोकांनी समर्पीत केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावू नये, त्यास मजसमोरुन दूर करावे. मी परमेश्वर आहे!
Säg dem nu till, och deras efterkommandom: Hvilken af edor säd går till det helga, som Israels barn helga Herranom, och orenar sig så på det, hans själ skall utrotad varda för mitt anlete; ty jag är Herren.
4 ४ अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी किंवा स्त्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याजकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला मनुष्य,
Hvilken af Aarons säd är spitelsk, eller hafver ena flöd, den skall icke äta af de helgo, tilldess han varder ren. Den som kommer vid någon oren kropp, eller den som hans säd afgår i sömnen;
5 ५ किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्यास स्पर्श केल्यामुळे
Eller den som kommer vid en matk, den honom oren är, eller en mennisko, som honom oren är, och allt det honom orenar;
6 ६ याजकाने अशा कोणालाही स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. त्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; त्याने पाण्याने स्नान केले तरी पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
Hvilken själ kommer vid något deraf, den är oren intill aftonen, och skall icke äta af de helgo; utan skall först bada sin kropp med vatten.
7 ७ सूर्य मावळल्यावरच तो मनुष्य शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.
Och när solen är nedergången, och han ren vorden är, då må han äta deraf; ty det är hans spis.
8 ८ आपोआप मरण पावलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारुन टाकलेल्या जनावराचे मांस याजकाने खाऊ नये, जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल; मी परमेश्वर आहे!
Ett as, och hvad af vilddjur rifvet är, skolen I icke äta, att I icke skolen varda orene deruppå; ty jag är Herren.
9 ९ त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; त्यांनी ती घेतील नाही तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरतील. मी परमेश्वराने त्यांना या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे.
Derföre skola de hålla mina stadgar, att de icke skola lägga synd uppå sig, och dö deröfver, när de ohelga sig; ty jag är Herren, som dem helgar.
10 १० फक्त याजकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे; त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याजकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये;
Ingen annar skall äta af de helgo, ej heller Prestens husman, ej heller någon dagakarl.
11 ११ परंतु याजकाने स्वत: चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे.
När Presten köper ena själ för sina penningar, den må äta deraf. Och det i hans huse födt är, det må ock äta af hans bröd.
12 १२ याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या मनुष्याबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
Om Prestens dotter varder ens främmandes hustru, skall hon icke äta af dess helgas häfoffer.
13 १३ याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या वडिलाच्या घरी राहत असेल तर मग आपल्या वडिलाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे परकियाने खाऊ नये.
Varder hon en enka, eller utdrifven, och hafver ingen säd, och kommer igen till sins faders hus, så skall hon äta af sins faders bröd, såsom då hon ännu piga var; men ingen främmande skall äta deraf.
14 १४ एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यामध्ये घालून याजकास द्यावी.
Hvilken som eljest äter af de helgo ovetandes, han skall lägga femtedelen dertill, och gifva Prestenom med de helgo;
15 १५ इस्राएल लोक परमेश्वरास अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत;
På det att de icke skola ohelga Israels barnas helga, som de häfoffra Herranom;
16 १६ जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत: वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे!
Att de icke skola lägga missgerning och skuld på sig, när de äta af deras helgo; ty jag är Herren, som dem helgar.
17 १७ मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
Och Herren talade med Mose, och sade:
18 १८ अहरोन, त्याचे पुत्र व सर्व इस्राएल लोक ह्याना सांग की तुम्हा इस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुशीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल,
Säg Aaron och hans söner, och all Israels barn: Hvilken Israelit eller främling i Israel vill göra sitt offer, vare sig af löfte, eller af fri vilja, att de vilja göra Herranom ett bränneoffer, det honom skall vara tacknämligit af eder;
19 १९ व तो मान्य असणारा असावा जसे गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा!
Det skall vara ett mankön, och utan vank, af fä, lambom eller getom.
20 २० परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्विकारू नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही!
Allt det som något fel hafver, skolen I icke offra; förty det varder icke tacknämligit för eder.
21 २१ एखाद्या मनुष्यास आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुशीच्या अर्पणासाठी परमेश्वरास गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल.
Och hvilken ett tackoffer Herranom göra vill, ett besynnerligit löfte, eller af fri vilja, af fä eller får, det skall vara utan vank, att det må varda tacknämligit. Det skall hafva ingen vank.
22 २२ आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वरास अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये.
Är det blindt, eller brutet, eller sargadt, eller förtvinadt, eller maslogt, eller skabbogt; så skola de icke sådant offra Herranom, och intet offer deraf gifva på Herrans altare.
23 २३ गोऱ्हा किंवा मेंढा ह्याचा एखादा पाय आखुड पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर तो खुशीच्या अर्पणाकरिता चालेल, पण नवस फेडण्याकरिता त्याचा स्वीकार होणार नाही.
En oxe eller får, som oskickeliga eller lytta lemmar hafver, må du offra af en fri vilja; men icke varder det tacknämligit för ett löfte.
24 २४ ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वरास अर्पण करु नये अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करु नयेत.
Du skall ock icke offra Herranom något det förkramadt, eller förstött, eller förslitet, eller utskuret är; och skolen sådant icke göra i edro lande.
25 २५ देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून कोणतेही प्राणी तुम्ही परराष्ट्रीय लोकांकडून घेऊ नये कारण त्या प्राण्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांच्यात काही दोष असेल तर; ते प्राणी स्वीकारले जाणार नाहीत!
Du skall ock icke offra något sådant af ens främlings hand, med edars Guds bröd; ty det doger intet, och hafver en vank; derföre varder det icke tacknämligit för eder.
26 २६ परमेश्वर मोशेला म्हणाला,
Och Herren talade med Mose, och sade:
27 २७ वासरू, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.
När en kalf, eller lamb, eller get födt är, så skall det vara när sine moder i sju dagar; på åttonde dagen och derefter må man offra det Herranom, så är det tacknämligit.
28 २८ परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्याप्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये.
Vare sig nöt eller får, så skall man icke slagta det med sin unga på enom dag.
29 २९ परमेश्वराकरिता तुम्हास उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा.
När I viljen göra Herranom ett lofoffer, det för eder tacknämligit skall vara;
30 ३० अर्पण केलेल्या पशूचे मांस त्याच दिवशी तुम्ही खाऊन टाकावे; त्यातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे!
Så skolen I äta det på samma dagen, och skolen intet behålla qvart intill morgonen; ty jag är Herren.
31 ३१ तुम्ही माझ्या आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या; मी परमेश्वर आहे!
Derföre håller min bud, och görer dem; ty jag är Herren;
32 ३२ तुम्ही माझ्या पवित्र नांवाचा अनादर करू नये. माझे भय धरावे! इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; मी तुम्हास माझे पवित्र लोक केले आहे मी परमेश्वर आहे!
Att I icke ohelgen mitt helga Namn, och att jag må helgad varda ibland Israels barn; ty jag är Herren, den eder helgar;
33 ३३ मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले, आणि मी तुमचा देव झालो, मी परमेश्वर आहे!”
Den eder utur Egypti land fört hafver, att jag skulle vara edar Gud: Jag är Herren.