< लेवीय 21 >

1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे पुत्र, जे याजक त्यांना असे सांग की, आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वत: ला अशुद्ध करून घेऊ नये.
Još reèe Gospod Mojsiju: kaži sveštenicima sinovima Aronovijem, i reci im: za mrtvacem da se ne skvrni ni jedan u narodu svojem,
2 परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ,
Osim za rodom svojim po krvi, za materom svojom ili za ocem svojim ili za sinom svojim ili za kæerju svojom ili za bratom svojim,
3 आणि आपल्याजवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे.
Ili za roðenom sestrom svojom, djevojkom, koja nije imala muža; za njom se može oskvrniti.
4 याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वत: ला अपवित्र करून घेऊ नये.
Ako je oženjen, da se ne oskvrni za ženom svojom u narodu svojem uèinivši se neèist.
5 याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;
Da se ne naèine æelavi èupajuæi kosu s glave svoje i da ne briju brade svoje, niti se režu po tijelu svojem.
6 त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र रहावे आणि आपल्या देवाच्या नावाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वरास अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र रहावे.
Neka budu sveti Bogu svojemu, i neka ne skvrne imena Boga svojega, jer prinose žrtve ognjene Gospodnje, hljeb Boga svojega, zato neka su sveti.
7 याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली पत्नी करून घेऊ नये.
Neka se ne žene ženom kurvom ili silovanom; ni puštenicom neka se ne žene; jer su sveti Bogu svojemu.
8 याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्यास पवित्र मानावे, त्यास तू पवित्र लेखावे; कारण तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.
I tebi neka je svaki svet, jer prinosi hljeb Boga tvojega; svet neka ti je, jer sam ja svet, Gospod, koji vas posveæujem.
9 एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करून घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाला कलंक लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
A kæi sveštenièka koja se oskvrni kurvajuæi se, skvrni oca svojega, ognjem neka se spali.
10 १० आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांमध्ये शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;
A sveštenik najviši izmeðu braæe svoje, kojemu se na glavu izlilo ulje pomazanja i koji je posveæen da se oblaèi u svete haljine, neka ne otkriva glave svoje, i haljina svojih neka ne razdire.
11 ११ त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये.
I k mrtvacu nijednom neka ne ide, ni za ocem svojim ni za materom svojom da se ne oskvrni.
12 १२ त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
I iz svetinje neka ne izlazi, da ne bi oskvrnio svetinju Boga svojega, jer je na njemu vijenac, ulje pomazanja Boga njegova; ja sam Gospod.
13 १३ मुख्य याजकाने कुमारीशीच लग्न करावे,
On neka se ženi djevojkom.
14 १४ भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने पत्नी करून घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे.
Udovicom ni puštenicom ni silovanom ni kurvom da se ne ženi; nego djevojkom iz naroda svojega neka se oženi.
15 १५ अशा प्रकारे त्याने आपल्या लोकात आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्यास पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”
I neka ne skvrni sjemena svojega u narodu svojem, jer sam ja Gospod, koji ga posveæujem.
16 १६ परमेश्वर मोशेला म्हणाला,
Opet reèe Gospod Mojsiju govoreæi:
17 १७ “अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यानमध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग शारीरिक दोष निघाले तर त्याने आपल्या देवाकरता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये.
Kaži Aronu i reci: u koga bi iz sjemena tvojega od koljena do koljena bila mana na tijelu, onaj neka ne pristupa da prinosi hljeb Boga svojega.
18 १८ शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही मनुष्याने मला अर्पण आणू नये; याजक या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी: आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,
Jer niko na kome bi bila mana ne valja da pristupa, ni slijep, ni hrom, ni u koga bi bio koji ud preveæ mali ili preveæ veliki,
19 १९ मोडक्या पायाचा, थोटा,
Ni u koga je slomljena noga ili ruka.
20 २० कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला;
Ni grbav, ni drljav, ni ko ima bionu na oku, ni šugav, ni lišajiv, ni prosut.
21 २१ अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वरास अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊ नये; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ जाऊ नये.
U koga bi god iz sjemena Arona sveštenika bila kaka mana na tijelu, neka ne pristupa da prinosi žrtve ognjene Gospodu; mana je na njemu; da ne pristupa da prinosi hljeb Boga svojega.
22 २२ तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;
Ali hljeb Boga svojega od stvari presvetih i od stvari svetih neka jede;
23 २३ परंतु त्यास व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परमपवित्र स्थाने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”
Ali za zavjes neka ne ulazi; k oltaru neka se ne približuje, jer je mana na njemu, pa neka ne skvrni svetinje moje, jer sam ja Gospod koji ih posveæujem.
24 २४ तेव्हा मोशेने अहरोन, त्याचे पुत्र व सगळे इस्राएल लोक ह्याना हे सर्व सांगितले.
I Mojsije kaza to Aronu i sinovima njegovijem i svijem sinovima Izrailjevim.

< लेवीय 21 >