< लेवीय 19 >
1 १ परमेश्वर मोशेला म्हणाला,
És szólt az Örökkévaló Mózeshez, mondván:
2 २ सर्व इस्राएलाच्या मंडळीतील लोकांस सांग की, मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.
Szólj Izrael fiai egész községéhez és, mondd nekik: Szentek legyetek, mert szent vagyok én, az Örökkévaló, a ti Istenetek.
3 ३ तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
Kiki az ő anyját és atyját félve tisztelje és szombataimat őrizzétek meg; én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek.
4 ४ तुम्ही मूर्तीपूजा करु नका, आपल्यासाठी ओतीव देव करु नका. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
Ne forduljatok a bálványokhoz és öntött isteneket ne készítsetek magatoknak; én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek.
5 ५ तुम्ही परमेश्वरासाठी शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तो असा करा की त्यामुळे तुम्ही मला मान्य व्हाल.
Ha pedig áldoztok békeáldozatot az Örökkévalónak, kedves fogadtatásra áldozzátok azt.
6 ६ त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी जर त्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
Áldozástok napján egyék és másnap; ami pedig megmarad harmadnapra, tűzben égettessék el.
7 ७ तिसऱ्या दिवशी त्यातील खाणे भयंकर पाप आहे; ते अर्पण मान्य होणार नाही.
Ha azonban ennék a harmadik napon, megvetett az, nem fogadtatik kedvesen.
8 ८ कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या मनुष्यास आपल्या लोकातून बाहेर टाकावे.
Aki eszi, viselje bűnét, mert az Örökkévaló szentségét megszentségtelenítette, irtassék ki az a személy az ő népéből.
9 ९ तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक काढू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका.
És ha learatjátok országtok termését, ne arasd le földed szélét teljesen; és aratásod hulladékát ne szedegesd össze:
10 १० आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळयात खाली पडलेली फळे गोळा करु नका; गोरगरीबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
Szőlődben ne böngéssz és szőlődnek elhullott szemeit ne szedegesd föl, a szegénynek és az idegennek hagyd azokat; én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek.
11 ११ तुम्ही चोरी करु नये. कोणाला फसवू नये. एकमेकाशी कपटाने बोलू नये.
Ne lopjatok; ne tagadjatok le és ne hazudjatok egyik a másik ellen.
12 १२ तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे!
Ne esküdjetek nevemre hamisan, hogy megszentségtelenítsd Istened nevét; én vagyok az Örökkévaló.
13 १३ आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्यास लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.
Ne zsarold felebarátodat és ne rabolj, ne tartsd éjjelen át a bérmunkás munkadíját magadnál reggelig.
14 १४ बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
Ne átkozz süketet és vak elé ne vess gáncsot, hanem félj Istenedtől; én vagyok az Örökkévaló.
15 १५ न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्याना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या.
Ne kövessetek el jogtalanságot az ítéletben, ne tekintsd a szegényt és ne tiszteld a nagynak színét, hanem igazság szerint ítélj embertársad fölött:
16 १६ आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नका, आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे!
Ne járj rágalmazóként néped között; ne állj veszteg felebarátod vérénél; én vagyok az Örökkévaló.
17 १७ आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
Ne gyűlöld testvéredet szívedben, intve intsed embertársadat, hogy ne viselj miatta bűnt.
18 १८ लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
Ne állj bosszút és ne tarts haragot néped fiai ellen, szeresd felebarátodat, mint tenmagadat; én vagyok az Örökkévaló.
19 १९ तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका. दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नका. भिन्न सूत एकत्र करून विणलेला कपडा अंगात घालू नका.
Törvényeimet őrizzétek meg, barmodat ne egyesítsd kétféle fajban, meződet ne vesd be kétféle maggal, és kétféléből való ruha, vegyes szövés ne jöjjön testedre.
20 २० एखाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरून मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीरसंबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये.
Midőn férfi hál nővel, közösülve vele, és az rabszolganő, odaszánva egy férfinak, de ki nem váltatott, vagy szabadság nem adatott neki, büntetés érje, ne ölessenek meg, mert nem volt fölszabadítva.
21 २१ हे पाप केलेल्या मनुष्याने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा;
Vigye el bűnáldozatát az Örökkévalónak a találkozás sátorának bejáratához: bűnáldozati kost.
22 २२ आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्यास क्षमा होईल.
És szerezzen számára engesztelést a pap a bűnáldozat kosával az Örökkévaló színe előtt, vétke miatt, melyet vétkezett, és megbocsáttatik neki a vétke, melyet vétkezett.
23 २३ तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळझाडे लावाल, तेव्हा फळझाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊ नयेत.
És ha bementek az országba és ültettek bármely gyümölcsfát, érintetlenül hagyjátok gyümölcsét; három évig legyen nektek érintetlen, ne egyék meg.
24 २४ पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी.
A negyedik évben pedig legyen minden gyümölcse szent, hálaadásul az Örökkévalónak.
25 २५ मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
Az ötödik évben azonban ehetitek gyümölcsét, hogy szaporítsa nektek termését; én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek.
26 २६ तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका. तुम्ही काही जादूटोणा, मंत्रतंत्र व शकूनमुहूर्त ह्याच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करु नका.
Ne egyetek a vér mellett; ne jósoljatok és ne jövendöljetek.
27 २७ आपल्या डोक्याला घेर ठेवू नका; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका.
Ne nyírjátok kerekre hajatok szélét és ne rontsd el szakállad szélét.
28 २८ मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करून घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊ नका. मी परमेश्वर आहे!
Bevágást halott miatt ne csináljatok testeteken és bélyegírást ne csináljatok magatokon; én vagyok az Örökkévaló.
29 २९ तू आपल्या मुलीला वेश्या करुन भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका.
Ne szentségtelenítsd meg leányodat, hogy paráznaságra engedd, hogy ne paráználkodjék az ország és megteljék az ország fajtalansággal.
30 ३० तुम्ही माझे शब्बाथ, काम न करता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
Szombatjaimat őrizzétek meg és szentélyemet féljétek; én vagyok az Örökkévaló.
31 ३१ सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्यामागे लागू नका; ते तुम्हास अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
Ne forduljatok a szellemidézőkhöz, se a jóslókhoz, ne törekedjetek tisztátalanná válni általuk; én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek.
32 ३२ वडीलधाऱ्या मनुष्यांना मान द्या; वृद्ध मनुष्य घरात आल्यास उठून उभे राहा; आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
Ősz ember előtt állj föl és tiszteld az öreg színét; félj Istenedtől, én vagyok az Örökkévaló.
33 ३३ कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असेल तर त्याच्याशी वाईट वागू नका.
És ha tartózkodik nálad idegen, országtokban, ne sanyargassátok őt.
34 ३४ तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्यास स्वदेशीय मनुष्यासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एकेकाळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
Mint a bennszülött közületek, legyen nektek az idegen, aki tartózkodik nálatok és szeresd őt, mint tenmagadat, mert idegenek voltatok Egyiptom országában; én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek.
35 ३५ लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा; मोजण्यामापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करु नका.
Ne kövessetek el jogtalanságot az ítéletben, se mértékben, se súlyban, se űrmértékben.
36 ३६ तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले!
Igaz mérleg, igaz súlykő, igaz éfo, igaz hín legyen nálatok; én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek, aki kivezettelek benneteket Egyiptom országából.
37 ३७ “म्हणून तुम्ही माझे विधी व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे!”
Őrizzétek meg minden törvényeimet és minden rendeleteimet, hogy megtegyétek azokat; én vagyok az Örökkévaló.