< लेवीय 18 >

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
Jehovha akati kuna Mozisi,
2 इस्राएल लोकांस सांग, मी परमेश्वर तुमचा देव आहे.
“Taura kuvaIsraeri uti kwavari, ‘Ndini Jehovha Mwari wenyu.
3 तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.
Hamufaniri kuita sezvavanoita kuIjipiti, kwamaigara uye hamufaniri kuita sezvavanoita kuKenani, kwandiri kukuendesai. Musatevera zviito zvavo.
4 तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा! कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
Munofanira kutevera mitemo yangu uye mugochenjerera kuti mutevere mirayiro yangu. Ndini Jehovha Mwari wenyu.
5 म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
Chengetai mirayiro nemitemo yangu nokuti munhu anoiteerera achararama nayo. Ndini Jehovha.
6 तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे:
“‘Hapana anofanira kuswedera kuhama yepedyo kuti avate naye. Ndini Jehovha.
7 तू तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून आपल्या बापाचा अनादर करु नको. ती तुझी आई आहे, म्हणून तिचा आदर कर.
“‘Usazvidza baba vako nokusangana namai vako. Ndimai vako usasangana navo.
8 तू तुझ्या सावत्र आईबरोबर शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज उघडी करू नको.
“‘Usasangana nomukadzi wababa vako, izvi zvingazvidza baba vako.
9 तू तुझ्या बहिणीशी शरीरकसंबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो तू तिच्यापाशी जाऊ नको.
“‘Usasangana nehanzvadzi yako kana mwanasikana wababa vako kana mwanasikana wamai vako, zvisinei kuti akaberekwa mumba mumwe chete kana kumwewo.
10 १० तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; कारण ती तुझीच लाज आहे!
“‘Usasangana nomwanasikana womwanakomana wako kana mwanasikana womwanasikana wako; izvi zvingauyisa kuzvidzwa kwauri.
11 ११ जर तुझ्या वडिलाच्या पत्नीला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.
“‘Usasangana nomwanasikana womukadzi wababa vako akaberekwa nababa vako, ihanzvadzi yako.
12 १२ तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.
“‘Usasangana nehanzvadzi yababa vako, ihama yababa vako yepedyo.
13 १३ तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे.
“‘Usasangana nomukoma kana mununʼuna wamai vako nokuti ihama yamai vako yepedyo.
14 १४ तू तुझ्या चुलत्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून त्याची लाज उघडी करु नको त्या हेतूने तिच्या जवळ जाऊ नको; ती तुझी चुलती आहे.
“‘Usazvidza mununʼuna kana mukoma wababa vako nokuswedera kumukadzi wavo kuti uvate naye; nokuti ndimaiguru kana mainini.
15 १५ तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची पत्नी आहे तिच्याशी शारीरिक संबध ठेवू नको.
“‘Usasangana nomuroora wako, mukadzi womwanakomana wako; usasangana naye.
16 १६ तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ह्याप्रकारे त्याची लाज काढू नको.
“‘Usasangana nomukadzi womukoma kana mununʼuna wako; izvi zvingauyisa kuzvidzwa kwomukoma kana mununʼuna wako.
17 १७ एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शरीरसंबंध ठेवू नको. कारण त्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अतिदुष्टपणाचे आहे.
“‘Usasangana nomukadzi pamwe chete nomwanasikana wake. Usasangana nomwanasikana womwanakomana wake kana mwanasikana womwanasikana wake; ihama dzake dzepedyo. Zvakaipa izvozvo.
18 १८ तुझी पत्नी जिवंत असताना तिच्या बहिणीला पत्नी करून तिला सवत करून घेऊ नको; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
“‘Usatora mununʼuna womukadzi wako kuti ave mukadzinyina, varwisane, ugosangana naye mukadzi wako achiri mupenyu.
19 १९ स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते.
“‘Usaswedera kumukadzi kuti usangane naye panguva yokusachena kwokuenda kumwedzi kwake.
20 २० तू आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नको. आणि हे करून अमंगळ होऊ नको.
“‘Usasangana nomukadzi womuvakidzani wako ugozvisvibisa naye.
21 २१ तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे.
“‘Usapa ani zvake pakati pavana vako kuti vabayirwe kuna Moreki nokuti haufaniri kumhura zita raJehovha. Ndini Jehovha.
22 २२ स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
“‘Usavata nomurume somurume anovata nomukadzi; zvinonyangadza.
23 २३ कोणत्याही पशूशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको. त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गाविरूद्ध आहे.
“‘Usasangana nemhuka uye ugozvisvibisa nayo. Mukadzi haafaniri kuzvipa kumhuka kuti asangane nayo; uku kunyangadza kukuru.
24 २४ अशाप्रकारे स्वत: ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले.
“‘Musazvisvibisa neimwe yenzira idzi nokuti ndudzi dzandichadzinga pamberi penyu dzakazvisvibisa naizvozvo.
25 २५ त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहीवाशांचा त्याग करीत आहे.
Kunyange nyika yakasvibiswa; naizvozvo ndakairanga nokuda kwezvakaipa zvayo uye nyika yakarutsa vagari vayo.
26 २६ ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करु नये.
Asi imi munofanira kuchengeta mirayiro yangu nemitemo yangu. Zvizvarwa zvenyu navatorwa vagere pakati penyu havafaniri kuita kana chimwe chezvinhu zvinonyangadza izvi,
27 २७ कारण तुमच्या पूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे.
nokuti zvinhu zvose izvi zvakaitwa navanhu vaigara munyika iyoyo musati mavamo, uye nyika ikasvibiswa.
28 २८ जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.
Uye kana mukasvibisa nyika, ichakurutsirai kunze sokurutsa kwayakaita ndudzi dzaigaramo imi musati mavamo.
29 २९ जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ कृत्य करतील त्या सर्वांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
“‘Ani naani anoita zvinonyangadza izvi, vanhu vakadaro vanofanira kubviswa kubva pavanhu vokwavo.
30 ३० इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ कृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; अशी भयंकर अमंगळ कृत्ये करून तुम्ही आपणाला अमंगळ करून घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे!
Chengetai zvandakakurayirai uye musatevedzera kana imwe yetsika dzinonyangadza dzaiitwa musati mauya, uye musazvisvibisa nadzo. Ndini Jehovha Mwari wenyu.’”

< लेवीय 18 >