< लेवीय 16 >

1 अहरोनाचे दोन पुत्र परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.
亞郎的兩個兒子,因擅自走近上主面前而遭受死亡;他們死後,上主訓示梅瑟,
2 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याच्याशी बोल व त्यास सांग की: त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो.
對他這樣說:」你告訴你的哥哥亞郎,不可隨時進入帳慢後的聖所,到約櫃上的贖罪蓋前去,免得在我乘雲顯現在贖罪蓋上時,遭受死亡。
3 परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी अहरोनाने पापार्पणासाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा.
亞郎應這樣進入聖所:帶上一隻公牛贖作贖罪祭,一隻公綿羊作全番祭;
4 त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
應穿上亞麻聖長衣,身著亞麻短褲,束上一亞麻腰帶,戴上亞麻頭巾;這些都是聖衣,他用水洗身後才能穿上。
5 मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.
此外,還應由以色列子民會眾,取兩隻公山羊作贖罪祭,一隻公綿羊作全番祭。
6 अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करून स्वत: साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
亞郎先要奉獻為自己作贖罪祭的公牛贖,替自己和家人贖罪;
7 त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत.
以後牽那兩隻公山羊來,放再會幕門口上主面前,
8 अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी
為這兩隻公羊抽籤:一籤為上主,一籤為」阿匝則耳「。
9 ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा;
亞郎將那為上主抽到的公山羊,獻作贖罪祭;
10 १० पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
至於那為」阿匝則耳「抽到的公山羊,應讓牠活著,立在上主面前,用牠行贖罪禮,放入曠野,歸於「阿匝則耳。」
11 ११ अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत: साठी व स्वत: च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत: साठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा.
於是亞郎先奉獻自己作贖罪祭得公牛贖,替自己和家人贖罪,宰殺為自己作贖罪祭的公牛贖;
12 १२ नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.
隨後由上主面前的祭壇上,拿下盛滿紅炭的火盤,再拿一滿捧細乳香,帶進帳幔內,
13 १३ त्याने तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर, असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही.
在上主面前將乳香放在火上,使乳香的煙遮住約櫃上的贖罪蓋,免得遭受死亡。
14 १४ त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनावर पूर्वेस बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.
以後,取些牛血,用手指灑在贖罪蓋東面;又用手指在贖罪蓋前,灑血七次。
15 १५ मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.
此後,宰殺了為人民作贖罪祭的公山羊,將羊血帶進帳幔內,照灑牛血的方式,將羊血灑在贖罪蓋上和贖罪蓋的前面,
16 १६ आणखी त्याने इस्राएली लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे या सर्वांबद्दल परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित करावे; परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वस्ती करतो त्या, लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने तसेच करावे.
為以色列子民得不潔,和他們犯的種種罪過,給聖所取潔;給存留在他們中,為他們不潔玷汙的會幕,也舉行同樣的禮儀。
17 १७ अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्रस्थानात प्रवेशकरण्यासाठी जाईल तेव्हा, तो स्वतःसाठी व स्वत: च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपामध्ये कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये.
當他走近聖所行贖罪禮時,直到他出來,任何人不許再會幕內。幾時他為自己,為家人,為以色列全會眾贖罪完畢,
18 १८ मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
就出來,回到上主面前的祭壇前,為祭談行取潔禮;取些牛血汗羊血,抹在祭壇四周的角上;
19 १९ मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी.
再用手指向祭壇灑血七次:這樣使祭壇免於以色列子民的不潔,而獲潔淨和祝聖。
20 २० जेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.
為聖所、會幕及祭壇行完取潔禮後,便將那隻活公山羊牽來,
21 २१ अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.
亞郎將雙手案在牠的頭上,明認以色列子民的一切罪惡,和所犯的種種過犯和罪過,全放在這公山羊頭上;然後命派定的人將牠送到曠野。
22 २२ तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.
羊負著他們種種過犯和罪惡到了荒野地方,那人應在曠野裡釋放那隻羊。
23 २३ मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपामध्ये जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत.
然後亞郎進入會幕,脫下他在聖所時穿的亞麻衣服,放在那裡,
24 २४ मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत: साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत: साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे.
在聖地方用水洗身,在穿上自己的衣服,出來奉獻自己的全番祭和人民的全番祭,為自己和人民型贖罪禮。
25 २५ मग त्याने पापार्पणाच्या चरबीचा वेदीवर होम करावा.
贖罪祭犧牲的脂肪,應放在祭壇上焚燒。
26 २६ ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो.
那送公山羊給」阿匝則耳「的,應先洗自己的衣服,用水洗身,然後方可進入營幕。
27 २७ पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.
作贖罪祭的公牛贖和做贖罪祭的公山羊,牠們的血既帶到勝所內贖罪,皮、肉及糞,都應運到營外,用火燒了。
28 २८ ज्या मनुष्याने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी; त्यानंतर तो छावणीत येऊ शकतो.
那燒的人,應先洗自己的衣服,用水洗身,然後方可進入營幕。
29 २९ तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये, मग तो तुमच्यात जन्मलेल्यांपैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशी असो;
這位你們是一條永久的法令:七月初十,你們應先克己苦身,不論是本地人,或僑居在你們中間的外方人,任何勞工都不許做,
30 ३० हे यासाठी की या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल.
因為這一天,你們應為自己贖罪,使自己潔淨,應除去自己的種種過犯,在上主面前再成為潔淨的。
31 ३१ तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बाथ आहे; तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करु नये; हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे.
這是你們全休息日的安息日,應克己苦身:這是永久的法令。
32 ३२ तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.
那位受傅,被委任繼承他父親執行司祭任務的大司祭,應舉行贖罪禮。他應穿上亞麻聖衣,
33 ३३ त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.”
為至聖所,為會幕和為祭壇型取潔禮,為眾司祭和全會眾人民行贖罪禮。
34 ३४ इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधी होय; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.
每年一次,應為以色列子民,為他們種種罪過型贖罪禮:這位你們是永久的法令。」人就依照上主吩咐梅瑟的做了。

< लेवीय 16 >