< लेवीय 13 >
1 १ परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
Locutusque est Dominus ad Moysen, et Aaron, dicens:
2 २ एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ट्यासारखा दिसत असेल तर त्यास अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे.
Homo, in cuius cute et carne ortus fuerit diversus color sive pustula, aut quasi lucens quippiam, id est plaga leprae, adducetur ad Aaron sacerdotem, vel ad unum quemlibet filiorum eius.
3 ३ मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा व त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा; मग त्या मनुष्याची तपासणी झाल्यावर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे.
Qui cum viderit lepram in cute, et pilos in album mutatos colorem. ipsamque speciem leprae humiliorem cute et carne reliqua; plaga leprae est, et ad arbitrium eius separabitur.
4 ४ त्या मनुष्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याजकाने त्या चट्टा पडलेल्या मनुष्यास सात दिवस इतर मनुष्यापासून वेगळे एकटे ठेवावे.
Sin autem lucens candor fuerit in cute, nec humilior carne reliqua, et pili coloris pristini, recludet eum sacerdos septem diebus,
5 ५ सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्यास दिसून आले तर याजकाने त्यास आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे.
et considerabit die septimo: et siquidem lepra ultra non creverit, nec transierit in cute priores terminos, rursum recludet eum septem diebus aliis.
6 ६ सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या मनुष्याने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे.
Et die septimo contemplabitur: si obscurior fuerit lepra, et non creverit in cute, mundabit eum, quia scabies est: lavabitque homo vestimenta sua, et mundus erit.
7 ७ परंतु त्या मनुष्याने स्वत: ला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.
Quod si postquam a sacerdote visus est, et redditus munditiae, iterum lepra creverit; adducetur ad eum,
8 ८ याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.
et immunditiae condemnabitur.
9 ९ एखाद्या मनुष्यास महारोगाचा चट्टा असेल तर त्यास याजकाकडे न्यावे.
Plaga leprae si fuerit in homine, adducetur ad sacerdotem,
10 १० याजकाने त्यास तपासावे; आणि जर त्याच्या कातडीच्या पांढऱ्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर
et videbit eum. Cumque color albus in cute fuerit, et capillorum mutaverit aspectum, ipsa quoque caro viva apparuerit:
11 ११ त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; अधिक तपासणीसाठी त्यास काही काळासाठी इतरापासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे.
lepra vetustissima iudicabitur, atque inolita cuti. Contaminabit itaque eum sacerdos, et non recludet, quia perspicuae immunditiae est.
12 १२ एखाद्या मनुष्याच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याजकाने त्यास अंगभर तपासावे,
Sin autem effloruerit discurrens lepra in cute, et operuerit omnem carnem a capite usque ad pedes, quidquid sub aspectum oculorum cadit,
13 १३ याजकाने त्याची तपासणी करावी त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्यास दिसून आले तर त्याने त्यास शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे.
considerabit eum sacerdos, et teneri lepra mundissima iudicabit: eo quod omnis in candorem versa sit, et idcirco homo mundus erit.
14 १४ पण त्याच्या अंगावर काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा.
Quando vero caro vivens in eo apparuerit,
15 १५ याजकाने कोवळे मांस पाहून त्यास अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
tunc sacerdotis iudicio polluetur, et inter immundos reputabitur. caro enim viva si lepra aspergitur, immunda est.
16 १६ परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे;
Quod si rursum versa fuerit in alborem, et totum hominem operuerit,
17 १७ याजकाने पुन्हा त्यास तपासावे आणि जर त्याचा चट्टा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.
considerabit eum sacerdos, et mundum esse decernet.
18 १८ कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला
Caro autem et cutis in qua ulcus natum est et sanatum,
19 १९ व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा.
et in loco hulceris cicatrix alba apparuerit, sive subrufa, adducetur homo ad sacerdotem:
20 २० याजकाने त्यास तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्यास अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा आहे.
qui cum viderit locum leprae humiliorem carne reliqua, et pilos versos in candorem, contaminabit eum: plaga enim leprae orta est in hulcere.
21 २१ पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे.
Quod si pilus coloris est pristini, et cicatrix subobscura, et vicina carne non est humilior, recludet eum septem diebus.
22 २२ त्यानंतर तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो चट्टा आहे.
et si quidem creverit, adiudicabit eum leprae.
23 २३ पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाहीतर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे.
sin autem steterit in loco suo, hulceris est cicatrix, et homo mundus erit.
24 २४ एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस-पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल.
Caro autem et cutis, quam ignis exusserit, et sanata albam sive rufam habuerit cicatricem,
25 २५ तर याजकाने त्यास तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.
considerabit eam sacerdos, et ecce versa est in alborem, et locus eius reliqua cute est humilior: contaminabit eum, quia plaga leprae in cicatrice orta est.
26 २६ परंतू तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे.
Quod si pilorum color non fuerit immutatus, nec humilior plaga carne reliqua, et ipsa leprae species fuerit subobscura, recludet eum septem diebus,
27 २७ सातव्या दिवशी त्याने त्यास तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय;
et die septimo contemplabitur: si creverit in cute lepra, contaminabit eum.
28 २८ परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.
sin autem in loco suo candor steterit non satis clarus, plaga combustionis est, et idcirco mundabitur, quia cicatrix est combusturae.
29 २९ एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्टा असला,
Vir, sive mulier, in cuius capite vel barba germinaverit lepra, videbit eos sacerdos.
30 ३० तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ही चाई म्हणजे तो डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय.
et si quidem humilior fuerit locus carne reliqua, et capillus flavus, solitoque subtilior; contaminabit eos, quia lepra capitis ac barbae est.
31 ३१ तो चाईचा चट्टा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या व्यक्तीला याजकाने सात दिवस वेगळे ठेवावे.
Sin autem viderit locum maculae aequalem vicinae carni, et capillum nigrum: recludet eum septem diebus,
32 ३२ सातव्या दिवशी याजकाने त्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,
et die septimo intuebitur. Si non creverit macula, et capillus sui coloris est, et locus plagae carni reliquae aequalis:
33 ३३ तर त्या मनुष्याने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या मनुष्यास आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
radetur homo absque loco maculae, et includetur septem diebus aliis.
34 ३४ सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे.
Si die septimo visa fuerit stetisse plaga in loco suo, nec humilior carne reliqua, mundabit eum, lotisque vestibus suis mundus erit.
35 ३५ परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली
Sin autem post emundationem rursus creverit macula in cute,
36 ३६ तर याजकाने त्यास तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत न बसता त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे.
non quaeret amplius utrum capillus in flavum colorem sit commutatus, quia aperte immundus est.
37 ३७ परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्यास दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो मनुष्य शुद्ध झाला आहे; याजकाने त्यास शुद्ध ठरवावे.
Porro si steterit macula, et capilli nigri fuerint, noverit hominem sanatum esse, et confidenter eum pronunciet mundum.
38 ३८ कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर पांढरे डाग असतील.
Vir, sive mulier, in cuius cute candor apparuerit,
39 ३९ तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
intuebitur eos sacerdos. si deprehenderit subobscurum alborem lucere in cute, sciat non esse lepram, sed maculam coloris candidi, et hominem mundum.
40 ४० कोणा मनुष्याचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो मनुष्य शुद्ध होय.
Vir, de cuius capite capilli fluunt, calvus et mundus est:
41 ४१ त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो मनुष्य शुद्ध आहे.
et si a fronte ceciderint pili, recalvaster et mundus est.
42 ४२ परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे.
Sin autem in calvitio sive in recalvatione albus vel rufus color fuerit exortus,
43 ४३ मग याजकाने त्यास तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले,
et hoc sacerdos viderit, condemnabit eum haud dubiae leprae, quae orta est in calvitio.
44 ४४ तर त्या मनुष्याच्या डोक्यावर पडलेला चट्टा महारोगाचा होय; तो मनुष्य अशुद्ध होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे.
Quicumque ergo maculatus fuerit lepra, et separatus est ad arbitrium sacerdotis,
45 ४५ ज्या मनुष्यास महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांस इशारा देण्यासाठी अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे.
habebit vestimenta dissuta, caput nudum, os veste contectum, contaminatum ac sordidum se clamabit.
46 ४६ जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध रहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे रहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
Omni tempore quo leprosus est, et immundus, solus habitabit extra castra.
47 ४७ “एखाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्टा पडला,
Vestis lanea sive linea, quae lepram habuerit
48 ४८ किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चमड्याला किंवा चामड्याच्या वस्तुला पडला.
in stamine atque subtegmine, aut certe pellis, vel quidquid ex pelle confectum est,
49 ४९ आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूचा चट्टा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय; तो याजकाला दाखवावा.
si alba vel rufa macula fuerit infecta, lepra reputabitur, ostendeturque sacerdoti.
50 ५० याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करून ठेवावी.
qui consideratam recludet septem diebus:
51 ५१ त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासावा आणि चामड्यावर किंवा वस्त्राचा ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चामडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे.
et die septimo rursus aspiciens si deprehenderit crevisse, lepra perseverans est: pollutum iudicabit vestimentum, et omne in quo fuerit inventa:
52 ५२ ते वस्त्र लोकरीचे असो किंवा सणाचे असो त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला तर याजकाने ते वस्त्र किंवा चामडे जाळून टाकावे.
et idcirco comburetur flammis.
53 ५३ परंतु तो चट्टा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे.
Quod si eam viderit non crevisse,
54 ५४ याजकाने लोकांस ते वस्त्र किंवा चामडे धुण्यास सांगावे. मग धुवून झाल्यावर ते त्याने आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
praecipiet, et lavabunt id, in quo lepra est, recludetque illud septem diebus aliis.
55 ५५ त्यानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी, आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडे अग्नीत जाळून टाकावे.
Et cum viderit faciem quidem pristinam non reversam, nec tamen crevisse lepram, immundum iudicabit, et igne comburet, eo quod infusa sit in superficie vestimenti vel per totum, lepra.
56 ५६ परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.
Sin autem obscurior fuerit locus leprae, postquam vestis est lota, abrumpet eum, et a solido dividet.
57 ५७ इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.
Quod si ultra apparuerit in his locis, quae prius immaculata erant, lepra volatilis et vaga: debet igne comburi.
58 ५८ परंतु तो चट्टा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे.”
si cessaverit, lavabit aqua ea, quae pura sunt, secundo, et munda erunt.
59 ५९ लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत.
Ista est lex leprae vestimenti lanei et linei, staminis, atque subtegminis, omnisque supellectilis pelliceae, quomodo mundari debeat, vel contaminari.