< लेवीय 11 >
1 १ परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला:
INkosi yasikhuluma kuMozisi lakuAroni isithi kibo:
2 २ इस्राएल लोकांस असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:
Tshonini ebantwaneni bakoIsrayeli lithi: Lezi zinyamazana elingazidla kuzo zonke inyamazana ezisemhlabeni.
3 ३ ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे.
Konke okwehlukanisa isondo lokwehlukanisa isondo kabili lokwetshisayo phakathi kwenyamazana, lokhu lizakudla.
4 ४ काही प्राणी रवंथ करतात परंतु त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशूद्ध समजावे, जसे उंट, हा रवंथ करतो पंरतू त्याचा खुर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
Kodwa lezi kaliyikuzidla kulezo ezetshisayo kumbe kulezo ezehlukanisa isondo: Ikamela, ngoba liyetshisa, kodwa kalehlukanisi amasondo; lingcolile kini.
5 ५ शाफान हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो अशुद्ध समजावा.
Lembila, ngoba iyetshisa, kodwa kayehlukanisi isondo; ingcolile kini.
6 ६ ससा हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो सुध्दा अशुद्ध समजावा.
Lomvundla, ngoba uyetshisa, kodwa kawehlukanisi isondo; ungcolile kini.
7 ७ डुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही म्हणून तो तुम्हाकरिता अशुद्ध आहे.
Lengulube, ngoba iyehlukanisa isondo lokwehlukanisa isondo kube kubili kodwa kayetshisi; ingcolile kini.
8 ८ या प्राण्यांचे मांस तुम्ही खाऊ नये व त्यांच्या शवांना शिवू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.
Lingadli okwenyama yazo, lingathinti isidumbu sazo; zingcolile kini.
9 ९ “जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.
Lezi lingazidla kuzo zonke ezisemanzini: Zonke ezilempiko lamaxolo, emanzini, enlwandle lemifuleni, lezo lingazidla.
10 १० जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टीने ते अयोग्य आहेत.
Kodwa zonke ezingelampiko lamaxolo enlwandle lemifuleni, phakathi kwazo zonke ezibhinqika emanzini laphakathi kwaso sonke isidalwa esiphilayo esisemanzini, ziyisinengiso kini.
11 ११ ते तुम्ही अयोग्य समजावे; त्यांचे मांस खाऊ नये; त्यांच्या शवांना देखील शिवू नये.
Yebo, zizakuba yisinengiso kini; lingadli okwenyama yazo; kodwa lizanengwa yisidumbu sazo.
12 १२ जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.”
Konke okungelampiko lamaxolo emanzini, kuyisinengiso kini.
13 १३ देवाच्या दृष्टीने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर,
Lezi-ke lizanengwa yizo phakathi kwezinyoni; kaziyikudliwa, ziyisinengiso; ukhozi lelinqe lengqungqulu edla inhlanzi,
14 १४ घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे,
lomzwazwa, lohelwane ngohlobo lwalo,
15 १५ निरनिराळ्या जातीचे कावळे,
lonke iwabayi ngohlobo lwalo,
16 १६ शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे,
lesikhova, lomandukulo, lenkanku, lokhozi ngohlobo lwalo,
17 १७ पिंगळा, करढोक, मोठे घुबड,
lesikhova esincinyane, letshayamanzi, lesikhova esikhulu,
18 १८ पांढरे घुबड, पाणकोळी, गिधड,
lesikhova esimhlophe, lewunkwe, lelinqe elikhulu,
19 १९ करकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
lengabuzane, ihemu ngohlobo lwalo, lemvenduna, lolulwane.
20 २० जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये!
Zonke izibungu ezilempiko ezihamba ngezine ziyisinengiso kini.
21 २१ परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे.
Kodwa lezi lizazidla ezibungwini ezilempiko ezihamba ngezine ezilemilenze ephezu kwenyawo zazo ezeqa ngayo emhlabeni;
22 २२ त्याचप्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावू शकता.
lezi lingadla kuzo: Isikhonyane ngohlobo lwaso, lonyelele ngohlobo lwakhe, lediye ngohlobo lwalo, lentethe ngohlobo lwayo.
23 २३ परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये.
Kodwa zonke izibungu ezilempiko, ezilenyawo ezine, ziyisinengiso kini.
24 २४ त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवांना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल;
Langalezi lizangcoliswa; wonke othinta isidumbu sazo uzakuba ngongcolileyo kuze kuhlwe.
25 २५ जो कोणी मरण पावलेल्या कीटकांना उचलील, त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
Njalo wonke ophakamisa okwesidumbu sazo uzahlamba izembatho zakhe, abe ngongcolileyo kuze kuhlwe.
26 २६ ज्या प्राण्याचे खूर दुभागलेले आहेत पण ते दोन अगदी सारखे भाग करीत नाहीत व जे रवंथ करीत नाहीत ते तुम्ही अशुद्ध समजावेत;
Yonke inyamazana eyehlukanisa isondo, kodwa ingehlukanisi isondo kabili, njalo ingetshisi, ingcolile kini; wonke oyithintayo uzangcola.
27 २७ चार पायावर चालणाऱ्या सर्व पशूपैकी जे आपल्या पंजावर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे; त्याचा शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
Konke-ke okuhamba ngezidladla zakho, phakathi kwazo zonke inyamazana ezihamba ngezine, zingcolile kini; wonke othinta isidumbu sazo uzangcola kuze kuhlwe.
28 २८ जो कोणी त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे.
Lothwala isidumbu sazo uzahlamba izembatho zakhe, abe ngongcolileyo kuze kuhlwe; zingcolile kini.
29 २९ जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे,
Futhi lezi zizakuba ngezingcolileyo kini, phakathi kwezihuquzelayo ezihuquzelayo emhlabeni; ubuchakide, legundwane, legwababa ngohlobo lwalo,
30 ३० चोपई, घोरपड, पाल, सांडा व गुहिऱ्या सरडा.
lontulo, lembulumakhasana, lombankwa, lesiqhuza, lonwabu.
31 ३१ हे प्राणी तुम्हाकरिता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
Lezi zingcolile kini phakathi kwazo zonke ezihuquzelayo; wonke ozithintayo sezifile uzakuba ngongcolileyo kuze kuhlwe.
32 ३२ त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे.
Konke-ke ewela phezu kwakho enye yazo isifile kuzakuba ngokungcolileyo, lokwasiphi isitsha sesihlahla, loba isembatho, loba isikhumba, loba isaka, lasiphi isitsha okusetshenzwa ngaso; kuzafakwa emanzini, njalo kuzakuba ngokungcolileyo kuze kuhlwe; khona kuzahlambuluka.
33 ३३ त्यांच्यापैकी एखादा मरुन मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
Layo yonke imbiza yebumba ewela phakathi kwayo enye yazo, konke okukiyo kuzakuba ngokungcolileyo, njalo lizayibulala.
34 ३४ अशुद्ध भांड्याचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध समजावे व अशा भांड्यातील कोणतेही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे.
Ekudleni konke okudliwayo afike kukho amanzi kuzakuba ngokungcolileyo; lakuphi okunathwayo okunganathwa phakathi kwaloba yiyiphi imbiza enjalo kuzakuba ngokungcolileyo.
35 ३५ त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करून ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
Konke-ke okuwela kukho okwesidumbu sazo kuzakuba ngokungcolileyo; iziko loba isitofu, kuzaphohlozwa, kungcolile, futhi kuzakuba ngokungcolileyo kini.
36 ३६ झरा किंवा विहीर, ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात; परंतु त्याच्यातील शवांना जो स्पर्श करेल तो अशुद्ध होईल.
Kodwa umthombo loba umgodi aqoqene khona amanzi uzakuba ngohlambulukileyo; kodwa okuthinta izidumbu zazo kuzakuba ngokungcolileyo.
37 ३७ त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे;
Njalo uba okwesidumbu sazo kuwela phezu kwenhlanyelo ehlanyelwayo ezahlanyelwa, ihlambulukile;
38 ३८ परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
kodwa uba okwamanzi kufakwa enhlanyelweni, lokwesidumbu sazo kuwela phezu kwayo, ingcolile kini.
39 ३९ खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
Uba kusifa-ke enyamazaneni eyikudla kini, othinta isidumbu sayo uzakuba ngongcolileyo kuze kuhlwe.
40 ४० कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.
Lodla okwesidumbu sayo uzahlamba izembatho zakhe, abe ngongcolileyo kuze kuhlwe; lothwala isidumbu sayo uzawatsha izembatho zakhe, abe ngongcolileyo kuze kuhlwe.
41 ४१ “जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत.
Lazo zonke ezihuquzelayo ezihuquzela emhlabeni ziyisinengiso; kaziyikudliwa.
42 ४२ जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.
Konke okuhamba ngesisu, lakho konke okuhamba ngezine, kuze kube yikho konke okulenyawo ezinengi, phakathi kwazo zonke ezihuquzelayo ezihuquzela emhlabeni kaliyikukudla, ngoba kuyisinengiso.
43 ४३ कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत: ला अशुद्ध करून घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत: ला अशुद्ध करून विटाळवू नका!
Lingazenzi linengeke langakuphi okuhuquzelayo kuhuquzela, lingazingcolisi ngakho ukuthi lingcoliswe yikho.
44 ४४ कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्हीही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!
Ngoba ngiyiNkosi uNkulunkulu wenu. Ngakho zingcweliseni, libe ngcwele, ngoba ngingcwele. Lingazingcolisi langakuphi okuhuquzelayo okuhuquzela emhlabeni.
45 ४५ मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
Ngoba ngiyiNkosi eyalenyusa lisuka elizweni leGibhithe ukuthi ngibe nguNkulunkulu wenu. Ngakho banini ngcwele, ngoba ngingcwele.
46 ४६ प्राणी, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्याच्याविषयी हे नियम आहेत.
Lo ngumlayo wezinyamazana lezinyoni, laso sonke isidalwa esiphilayo esibhinqika emanzini lakuso sonke isidalwa esihuquzela emhlabeni,
47 ४७ या नियमावरून शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी, तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी ह्याच्यातील भेद तुम्हास समजावा.
ukwehlukanisa phakathi kokungcolileyo lokuhlambulukileyo, laphakathi kokuphilayo okungadliwa lokuphilayo okungadliwayo.