< विलापगीत 3 >
1 १ तो पूरूष मीच आहे, ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली.
我是因耶和華忿怒的杖, 遭遇困苦的人。
2 २ त्याने मला दूर करून प्रकाशाकडे न जाता अंधारात चालण्यास भाग पाडले.
他引導我,使我行在黑暗中, 不行在光明裏。
3 ३ खचितच तो माझ्याविरूद्ध झाला आहे; पूर्ण दिवस त्याने आपला हात माझ्यावर उगारला आहे.
他真是終日再三反手攻擊我。
4 ४ त्यांने माझा देह व त्वचा जीर्ण केली आहे आणि माझी हाडे मोडली आहेत
他使我的皮肉枯乾; 他折斷我的骨頭。
5 ५ त्याने माझ्याविरूद्ध विष व दुःखाचे बांधकाम करून मला वेढले आहे.
他築壘攻擊我, 用苦楚和艱難圍困我。
6 ६ फार पूर्वी मृत्यू पावलेल्या मनुष्याप्रमाणे त्याने मला काळोखात रहावयास लावले आहे.
他使我住在幽暗之處, 像死了許久的人一樣。
7 ७ त्याने माझ्याभोवती तटबंदी केल्याने त्यातून माझी सुटका होऊ शकत नाही. त्याने माझे बंध अधिक मजबूत केले आहेत.
他用籬笆圍住我,使我不能出去; 他使我的銅鍊沉重。
8 ८ मी मदतीसाठी आक्रोशाने धावा केला तेव्हाही तो माझ्या प्रार्थनांचा धिक्कार करतो.
我哀號求救; 他使我的禱告不得上達。
9 ९ त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भिंतीने अडवला आहे. त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे.
他用鑿過的石頭擋住我的道; 他使我的路彎曲。
10 १० तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे.
他向我如熊埋伏, 如獅子在隱密處。
11 ११ त्याने माझ्या मार्गावरून मला बाजूला करून, फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे.
他使我轉離正路, 將我撕碎,使我淒涼。
12 १२ त्याने आपला धनुष्य वाकवला आहे आणि मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले आहे.
他張弓將我當作箭靶子。
13 १३ त्याने आपले बाण माझ्या अंतःकरणात घुसवले आहेत.
他把箭袋中的箭射入我的肺腑。
14 १४ माझ्या स्वजनामध्येच मी चेष्टेचा विषय; प्रतिदिवशी त्यांचे हास्यास्पद गीत झालो आहे.
我成了眾民的笑話; 他們終日以我為歌曲。
15 १५ त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडू दवणा प्यायला भाग पाडले आहे.
他用苦楚充滿我,使我飽用茵蔯。
16 १६ त्याने खड्यांनी माझे दात तोडले आहेत. त्याने मला राखेत लोटले आहे.
他又用沙石磣斷我的牙, 用灰塵將我蒙蔽。
17 १७ माझ्या जीवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस; कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही.
你使我遠離平安, 我忘記好處。
18 १८ मी म्हणालो, “माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे.”
我就說:我的力量衰敗; 我在耶和華那裏毫無指望!
19 १९ माझे दुःख, कष्ट, कडू दवणा आणि विष ह्याचे स्मरण कर.
耶和華啊,求你記念我 如茵蔯和苦膽的困苦窘迫。
20 २० मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे.
我心想念這些, 就在裏面憂悶。
21 २१ पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते.
我想起這事, 心裏就有指望。
22 २२ ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे.
我們不致消滅, 是出於耶和華諸般的慈愛; 是因他的憐憫不致斷絕。
23 २३ ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे.
每早晨,這都是新的; 你的誠實極其廣大!
24 २४ माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.”
我心裏說:耶和華是我的分, 因此,我要仰望他。
25 २५ जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे.
凡等候耶和華,心裏尋求他的, 耶和華必施恩給他。
26 २६ परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे.
人仰望耶和華, 靜默等候他的救恩, 這原是好的。
27 २७ पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्यास फार चांगले आहे.
人在幼年負軛, 這原是好的。
28 २८ ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ रहावे.
他當獨坐無言, 因為這是耶和華加在他身上的。
29 २९ त्याने आपले मुख धुळीत घातल्यास, कदाचित त्यास आशा प्राप्त होईल.
他當口貼塵埃, 或者有指望。
30 ३० एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे;
他當由人打他的腮頰, 要滿受凌辱。
31 ३१ कारण परमेश्वर त्यांचा कायमचा त्याग करणार नाही.
因為主必不永遠丟棄人。
32 ३२ जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनूसार करुणा करील.
主雖使人憂愁, 還要照他諸般的慈愛發憐憫。
33 ३३ कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनूष्य संतानास दुःख देत नाही.
因他並不甘心使人受苦, 使人憂愁。
34 ३४ पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडविणे,
人將世上被囚的踹在腳下,
35 ३५ परात्पराच्या समोर मनुष्याचे हक्क बुडवणे,
或在至高者面前屈枉人,
36 ३६ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसविणे, या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टी आड आहेत काय?
或在人的訟事上顛倒是非, 這都是主看不上的。
37 ३७ परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का?
除非主命定, 誰能說成就成呢?
38 ३८ इष्ट व अनिष्ट ही सर्वश्रेष्ठ देवाच्या मुखातून येत नाहीत काय?
禍福不都出於至高者的口嗎?
39 ३९ कोणत्याही जिवंत मनुष्याने व पुरूषाने आपल्या पापांच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी?
活人因自己的罪受罰, 為何發怨言呢?
40 ४० चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू.
我們當深深考察自己的行為, 再歸向耶和華。
41 ४१ आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचावूया.
我們當誠心向天上的上帝舉手禱告。
42 ४२ आम्ही पाप केले आहे, फितूरी केली आहे. म्हणूनच तू आम्हास क्षमा केली नाहीस.
我們犯罪背逆, 你並不赦免。
43 ४३ तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखविता आम्हास ठार केलेस.
你自被怒氣遮蔽,追趕我們; 你施行殺戮,並不顧惜。
44 ४४ कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस.
你以黑雲遮蔽自己, 以致禱告不得透入。
45 ४५ लोकांमध्ये तू आम्हास कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.
你使我們在萬民中成為污穢和渣滓。
46 ४६ आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरूद्ध आपले तोंड वासले आहे.
我們的仇敵都向我們大大張口。
47 ४७ भय व खाच, नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे.
恐懼和陷坑,殘害和毀滅, 都臨近我們。
48 ४८ माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे, म्हणून माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत.
因我眾民遭的毀滅, 我就眼淚下流如河。
49 ४९ माझे डोळे गळत आहेत व थांबत नाही;
我的眼多多流淚, 總不止息,
50 ५० परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही.
直等耶和華垂顧, 從天觀看。
51 ५१ माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात.
因我本城的眾民, 我的眼,使我的心傷痛。
52 ५२ निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे.
無故與我為仇的追逼我, 像追雀鳥一樣。
53 ५३ गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे. आणि माझ्यावर दगड लोटला आहे.
他們使我的命在牢獄中斷絕, 並將一塊石頭拋在我身上。
54 ५४ माझ्या डोक्यावरून पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता माझा अंत होत आहे.”
眾水流過我頭, 我說:我命斷絕了!
55 ५५ परमेश्वरा मी खोल खाचेतून तुझ्या नावाचा धावा केला.
耶和華啊, 我從深牢中求告你的名。
56 ५६ तू माझा आवाज ऐकलास. माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको.
你曾聽見我的聲音; 我求你解救, 你不要掩耳不聽。
57 ५७ मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, “भिऊ नकोस.”
我求告你的日子,你臨近我, 說:不要懼怕!
58 ५८ परमेश्वरा, माझ्या जीवनातील वादविवादाकरिता तू मध्यस्थी केलीस, तू खंडणी भरून माझा जीव सोडवलास.
主啊,你伸明了我的冤; 你救贖了我的命。
59 ५९ परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे, तो तू बघितला आहेस. तू मला न्याय दे.
耶和華啊,你見了我受的委屈; 求你為我伸冤。
60 ६० माझ्याविरूद्ध रचलेले सुडाचे सर्व कृत्ये; आणि त्यांच्या योजना तू पाहिल्यास.
他們仇恨我,謀害我, 你都看見了。
61 ६१ त्यांनी केलेला माझा उपहास आणि माझ्याविरूध्द आखलेले बेत. परमेश्वरा, तू ऐकले आहेस.
耶和華啊,你聽見他們辱罵我的話, 知道他們向我所設的計,
62 ६२ माझ्यावर उठलेले ओठ आणि सारा दिवस त्यांनी माझ्याविरुध्द केलेली योजना तू ऐकली आहे.
並那些起來攻擊我的人口中所說的話, 以及終日向我所設的計謀。
63 ६३ परमेश्वरा, त्यांचे बसने व उठने तू पाहा, मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे.
求你觀看, 他們坐下,起來,都以我為歌曲。
64 ६४ परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे. त्यांच्या कार्मांची परतफेड कर.
耶和華啊,你要按着他們手所做的 向他們施行報應。
65 ६५ तू त्यांना हृदयाची कठोरता देशील, तुझा शाप त्यांना देशील.
你要使他們心裏剛硬, 使你的咒詛臨到他們。
66 ६६ क्रोधाने तू त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखाली तू त्यांचा विध्वंस करशील.
你要發怒追趕他們, 從耶和華的天下除滅他們。