< विलापगीत 1 >
1 १ यरूशलेम नगरी जी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे. जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे. राष्ट्रांमध्ये जी राजकुमारी होती, पण आता तिला दासी केले गेले आहे.
Kako osamljena sjedi prijestolnica, nekoć naroda puna; postade kao udovica, nekoć velika među narodima. Vladarica nad pokrajinama, na tlaku sad ide.
2 २ ती रात्री फार रडते व तिचे अश्रू तिच्या गालांवर असतात. तिच्या सर्व प्रियकरांमध्ये तिला दिलासा देणारा कोणी नव्हता. तिच्या सर्व मित्रांनी तिच्याशी विश्वासघात केला. ते तिचे शत्रू झाले आहेत.
Noći provodi gorko plačući, suzama pokriva obraze. Nikog nema da je utješi, od svih koji su je ljubili. Svi je prijatelji iznevjeriše i postaše joj neprijatelji.
3 ३ दारिद्र्य आणि जुलमामुळे यहूदा दास्यपनात बंदिवान झाली आहे. ती राष्ट्रंमध्ये राहत आहे, पण तिला आराम मिळत नाही. तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला तिच्या अत्यंत निराशेच्या मनस्थितीत तिला संकटावस्थेत गाठले आहे.
Izagnan je Juda, u nevolji je i u progonstvu teškom. Sad živi među poganima, ne nalazi počinka. Svi ga gonitelji sustižu u tjesnacima.
4 ४ सियोनेचे मार्ग शोक करतात, कारण नेमलेल्या पवित्र सणाला कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी ओसाड झाल्या आहेत व तिचे याजक कण्हत आहेत. तिच्या कुमारी दु: खात आहेत, व ती स्वत: निराशेत आहेत.
Putovi sionski tuguju jer nitko ne dolazi na svetkovine. Sva su vrata razvaljena, svećenici uzdišu, ucviljene su djevice njegove, a on je pun gorčine.
5 ५ तिचे शत्रू तिचे धनी झाले आहेत; तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे. परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दु: ख दिले आहे. तिची मुले वैऱ्यांच्यापुढे पाडावपणांत गेली आहेत.
Tlačitelji njegovi sada gospodare, neprijatelji likuju: Jahve ga ucvili zbog grijeha njegovih premnogih. Djeca mu otišla u izgnanstvo pred tlačiteljem.
6 ६ सियोनकन्येचे सौंदर्य सरले आहे. तिचे राजपुत्र चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरीणासारखे ते झाले आहेत, आणि पाठलाग करणाऱ्यांसमोर ते हतबल झाले आहेत.
Povukla se od Kćeri sionske sva slava njezina. Knezovi joj postadoše k'o ovnovi koji paše ne nalaze; nemoćni vrludaju ispred goniča.
7 ७ यरूशलेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात, पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टीं आठवते. तिच्या लोकांस वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणीही नव्हते. तिच्या शत्रूंनी तिला पाहिले व तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले.
Jeruzalem se spominje danÄa bijede i lutanja, kad mu narod dušmanu u ruke pade a nitko mu pomoći ne pruži. Tlačitelji ga gledahu smijući se njegovoj propasti.
8 ८ यरूशलेमेने फार पाप केले आहेत; म्हणून ती अशुद्ध झाली आहे. सर्व जे तिचा आदर करत असत, त्यांनी तिला आता तुच्छ मानले आहे. कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती कण्हत आहे व ती तोंड फिरविते आहे.
Teško sagriješi Jeruzalem, postade kao nečistoća ženina. Svi što ga štovahu, sada ga preziru: jer vidješe golotinju njegovu. On samo plače i natrag se okreće.
9 ९ तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्राला लागला आहे, तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही. ती खूपच अधोगतीस गेली आहे. तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझे दु: ख पाहा! कारण शत्रू त्याच्या मोठेपणाचा तोरा मिरवितो आहे ते पाहा.”
Skuti su mu uprljani, nije ni sanjao što ga čeka. Duboko je pao, a nikog da ga tješi. “Pogledaj, Jahve, moju nevolju: jer neprijatelj likuje.”
10 १० तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूंनी आपला हात ठेवला आहे. परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभास्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरीही, तिने त्यांना तिच्या पवित्रस्थानात जाताना पाहिले आहे.
Neprijatelj poseže rukom za svim dragocjenostima njegovim. Gledao je gdje pogani provaljuju u njegovo Svetište, oni kojima si zabranio i pristup u svoj zbor.
11 ११ यरूशलेमेमधील सर्व लोक कण्हत आहेत, ते अन्न शोधत आहेत. त्यांनी आपला जीव वाचावा म्हणून अन्नासाठी त्यांच्या जवळच्या मनोरम वस्तू दिल्या आहेत. “परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी कशी कवडीमोलाची झाली आहे.”
Sav narod njegov jeca, tražeći kruha; svi daju dragulje za hranu da bi ponovo živnuli. Evo, Jahve, pogledaj kako sam prezren.
12 १२ “जे तुम्ही जवळून जाता, तुम्हास काहीच वाटत नाही काय? पण जरा माझ्याकडे निरखून पाहा. परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु: ख दिले, या माझ्या दु: खा सारखे दुसरे कोणतेही दु: ख आहे काय, हे लक्ष देऊन पाहा.
Svi vi što putem prolazite, pogledajte i vidite ima li boli kakva je bol kojom sam ja pogođen, kojom me Jahve udari u dan žestokog gnjeva svoga!
13 १३ त्याने वरून माझ्या हाडात अग्नी पाठवला आहे, आणि तो त्याजवर प्रबल होतो. त्याने माझ्या पायांसाठी जाळे पसरवीले आहे आणि मला मागे वळवले आहे. त्याने मला सतत ओसाड व दुर्बल केले आहे.
S visine pusti oganj, utjera ga u kosti moje. Pred noge mrežu mi razape i tako me nauznak obori; ucvili me, ožalosti za sva vremena.
14 १४ माझ्या पुष्कळ अपराधांचे जू त्याने आपल्या हाताने जखडले आहे. ते एकत्र गुंफले आहेत, आणि ते माझ्या मानेवर आले आहेत; त्यांनी माझी शक्ती निकामी केली आहे. ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही, अशांच्या हाती परमेश्वराने मला दिले आहे.
Natovario me mojim grijesima, rukom ih svojom pritegnuo; na vrat mi ih navalio, snagu mi oduzeo. Predao me Gospod u ruke njihove, ne mogu se uspraviti.
15 १५ माझ्या शूर सैनिकांना जे माझे रक्षण करतात, त्यांना परमेश्वराने दूर फेकले आहे. त्याने माझ्या तरुण सैनिकांना चिरडण्यासाठी भारी सभा बोलावली आहे. जसे द्राक्षकुंडात द्राक्षे तुडविली जातात तसे प्रभूने यहूदाच्या कुमारी कन्येला तुडवले आहे.
Sve junake iz moje sredine Gospod odbaci: digao je zbor protiv mene da uništi uzdanicu moju. U tijesku izgazi Gospod mene, djevicu, kćerku Judinu.
16 १६ या सगळयाबद्दल मी आक्रोश करते; माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत. कारण माझे सांत्वन करणारा माझ्यापासून दूर आहे. माझी मुले खिन्न झाली आहेत, कारण शत्रूचा विजय झाला आहे.”
Zato moram plakati, oči mi suze liju, jer daleko je od mene moj tješitelj da mi duh povrati. Sinovi su moji poraženi, odveć silan bijaše neprijatelj.
17 १७ सियोनने तिचे हात पसरवले, पण तिचे सांत्वन करायला कोणी नाही. परमेश्वराने याकोबाच्या शत्रूंना हुकूम केला आहे. परमेश्वराने याकोबासंबधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैऱ्यांनी त्यास घेरले. यरूशलेम त्यांच्याकरिता एका फाटलेल्या मासिकपाळीच्या अशुद्ध कपड्याप्रमाणे आहे
Sion pruža ruke: nema mu tješitelja. Jahve je protiv Jakova sa svih strana pozvao tlačitelje; i tako Jeruzalem postade među njima strašilo.
18 १८ “परमेश्वर न्यायीच आहे, कारण मी त्याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले आहे. सर्व लोकांनो, ऐका! आणि माझे दु: ख पाहा! माझ्या कुमारी व माझे तरुण पाडावपणांत गेले आहेत.
Jahve, on je pravedan; jer riječi se njegovoj protivih. Oh, čujte, narodi svi, gledajte moju bol: djevice moje, moji mladići, svi odoše u izgnanstvo!
19 १९ मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या, पण त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला. माझे याजक आणि वडील आपला जीव वाचावा म्हणून, स्वत: साठी अन्न शोधीत असता नगरात प्राण सोडले.
Pozvah sve ljubavnike svoje, ali me oni prevariše. Moji svećenici i starješine pogiboše u gradu tražeći hrane da bi ponovo živnuli.
20 २० हे परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! कारण मी दु: खी झाले आहे. माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे. माझे मन माझ्यामध्ये उलटले आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर तलवार निर्वंश करते, तर घरांत मृत्यू आहे.
Pogledaj, Jahve, u kakvoj sam tjeskobi, moja utroba strepi, srce mi se u grudima grči jer bijah opako prkosan! Vani mač pokosi moje sinove, a unutra - smrt.
21 २१ मी कण्हत आहे हे त्यांनी ऐकले आहे. माझे सांत्वन करायला कोणी नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझे अनिष्ट ऐकले आहे. तू असे केल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. जो दिवस तू नेमला आहे तो तू आणशील तेव्हा ते माझ्यासारखे होतील.
Čuj kako stenjem: nema mi tješitelja! Svi neprijatelji čuju za moju nesreću i likuju što si to učinio! Daj da dođe dan što si ga objavio, da njima bude kao meni.
22 २२ त्यांची सर्व दुष्टाई तुझ्यासमोर येवो, माझ्या पापांमुळे तू माझ्याशी जसा वागलास तसाच तू त्यांच्याशी वाग. कारण माझे कण्हणे पुष्कळ आहे आणि माझे हृदय दुर्बल झाले आहे.”
Neka se pokaže sva njina zloća pred licem tvojim, a onda postupaj s njima kao što si sa mnom postupio za sve grijehe moje! Jer samo uzdišem, a srce moje tuguje.