< शास्ते 8 >

1 तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनाला म्हणाली, “तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयाला गेलास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले.
Basi Waefraimu wakamuuliza Gideoni, “Mbona mmetutenda hivi? Kwa nini hukutuita ulipokwenda kupigana na Wamidiani?” Wakawalaumu kwa ukali sana.
2 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की, त्याची तुलना तुमच्याशी करावी? एफ्राईमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबीयेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय?
Gideoni akawajibu, “Nilichofanya mimi ni nini kulinganisha na kile ninyi mlichofanya? Je, kuokoa masazo ya zabibu za Efraimu si bora kuliko mavuno kamili ya zabibu ya Abiezeri?
3 मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे?” तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.
Mungu amewatia Orebu na Zeebu, hao viongozi wa Wamidiani, mikononi mwenu. Je, mimi niliweza kufanya nini kulinganisha na mlichofanya ninyi?” Aliposema hili, hasira yao dhidi yake ikatulia.
4 गिदोन व त्याच्याबरोबर जी तीनशे माणसे होती, ती यार्देन ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला.
Gideoni akiwa pamoja na wale watu 300 waliofuatana naye, wakiwa wamechoka na wenye njaa lakini bado wakiwafuatia, wakafika Yordani na kuuvuka.
5 तेव्हा तो सुक्कोथातल्या मनुष्यांना म्हणाला, “माझ्याबरोबरच्या लोकांस तुम्ही कृपा करून भाकरी द्या; कारण ते दमलेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे.”
Akawaambia watu wa Sukothi, “Tafadhali lipatieni jeshi langu mikate, kwa maana wamechoka, nami ningali ninawafuatia Zeba na Salmuna, wafalme wa Midiani.”
6 तेव्हा सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबह व सलमुन्ना यांच्यावर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हास माहीत नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी?
Lakini maafisa wa Sukothi wakasema, “Je, mikono ya Zeba na Salmuna tayari mnayo sasa ili tuweze kulipatia jeshi lako mikate?”
7 तेव्हा गिदोन म्हणाला, “जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना ह्यांच्यावर मला विजय देईल, तेव्हा मी रानातल्या काट्यांनी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन.”
Gideoni akajibu, “Kwa ajili ya hilo tu, Bwana atakapowatia Zeba na Salmuna mkononi mwangu, nitaichana nyama ya miili yenu kwenye miiba ya nyikani na kwenye michongoma.”
8 नंतर तो तेथून पनुएलास गेला आणि तेथल्या लोकांबरोबर त्याच प्रकारे बोलला, परंतु जसे सुक्कोथातल्या मनुष्यांनी उत्तर दिले होते, तसेच पनुएलातल्या मनुष्यांनी त्यास उत्तर दिले.
Kutoka hapo alikwea mpaka Penieli na kutoa ombi lile lile, lakini nao watu wa Penieli wakamjibu kama watu wa Sukothi walivyokuwa wamemjibu.
9 तेव्हा तो पनुएलातल्या मनुष्यांना असे म्हणाला, “जेव्हा मी शांतीने माघारी येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.”
Hivyo akawaambia watu wa Penieli, “Nitakaporudi baada ya kushinda, nitaubomoa mnara huu.”
10 १० तेव्हा जेबाह व सलमुन्ना कर्कोरात होते, त्यांचे सैन्यही त्यांच्याबरोबर होते; पूर्वेकडल्या त्यांच्या अवघ्या सैन्यांतले जे उरलेले होते ते सर्व पंधरा हजार होते; त्यांच्यातले जे लढणारे एक लाख वीस हजार पुरुष तलवारीने पडले होते.
Wakati huu Zeba na Salmuna walikuwa Karkori wakiwa na jeshi lenye watu wapatao 15,000 wale wote waliokuwa wamesalia wa mataifa ya mashariki, kwa kuwa watu wapatao 120,000 wenye panga walikuwa wameuawa.
11 ११ तेव्हा गिदोन नोबाह व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला.
Basi Gideoni akakwea kwa njia ya wasafiri mashariki ya Noba na Yogbeha na kulishambulia jeshi ambalo halikushuku lolote.
12 १२ जेबाह व सलमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून हे मिद्यानाच्या ह्या दोन राजांना पकडले, आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराहट पसरली.
Zeba na Salmuna, hao wafalme wawili wa Midiani, wakakimbia lakini yeye Gideoni akawafuata na kuwakamata, akalishinda hilo jeshi lao lote.
13 १३ मग योवाशाचा पुत्र गिदोन हेरेस घाटावरून लढाईहून माघारा आला.
Gideoni mwana wa Yoashi akarudi kutoka vitani kwa kupitia Mwinuko wa Heresi.
14 १४ तेव्हा त्याने सुक्कोथातला एक तरुण मनुष्य धरला, आणि त्याच्याजवळ सल्ला मागितला. त्या तरुण मनुष्याने त्यांना सुक्कोथाचे अधिकारी आणि त्यातले वडील अशा सत्याहत्तर मनुष्यांचे वर्णन लिहून दिले.
Akamkamata kijana mmoja wa Sukothi na kumuuliza maswali, naye yule kijana akamwandikia majina ya maafisa sabini wa Sukothi, ambao ni viongozi wa mji.
15 १५ मग तो सुक्कोथातल्या मनुष्यांजवळ जाऊन बोलला, “हे पाहा, जेबाह व सलमुन्ना! याविषयी तुम्ही माझी थट्टा करीत बोलला, काय, जबाह व सलमुन्ना यांना आधीच जिंकले आहेस काय? आम्हास माहीत नाही तुझ्या सैन्याला आम्ही भाकर का द्यावी?”
Ndipo Gideoni akaja na kuwaambia watu wa Sukothi, “Tazama, hapa wapo Zeba na Salmuna mlionisimanga kwa ajili yao mkisema, ‘Je, mikono ya Zeba na Salmuna tayari mnayo sasa ili tuweze kulipatia jeshi lako mikate?’”
16 १६ नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानातल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या मनुष्यांना शिक्षा केली
Akawachukua hao viongozi wa mji na kuwafundisha watu wa Sukothi somo kwa kuwaadhibu kwa miiba na michongoma ya nyikani.
17 १७ आणि त्याने पनुएलाचा बुरूज खाली ओढून टाकला, त्या नगरातल्या मनुष्यांना मारून टाकले.
Pia akaubomoa mnara wa Penieli na kuwaua watu wa mji.
18 १८ मग जेबह व सलमुन्ना यांस तो म्हणाला, “जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती?” तेव्हा ते बोलले, “जसा तू आहेस तशीच ती होती; त्यातला प्रत्येकजण राजाच्या पुत्रासारखा होता.”
Kisha akawauliza Zeba na Salmuna, “Ni watu wa aina gani mliowaua huko Tabori?” Wakajibu, “Ni watu kama wewe, kila mmoja wao akiwa na nafasi ya uana wa mfalme.”
19 १९ गिदोन म्हणाला, “ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यांना जिवंत वाचवले असते, तर परमेश्वराशपथ मी तुम्हाला मारले नसते.”
Gideoni akajibu, “Hao walikuwa ndugu zangu, wana wa mama yangu hasa. Hakika kama aishivyo Bwana, kama mngekuwa mmewaacha hai, mimi nisingewaua ninyi.”
20 २० तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, “तू उठून त्यांना मार. परंतु त्या तरुणाने आपली तलवार काढली नाही; कारण अजूनपर्यंत तो लहानच होता,” म्हणून तो घाबरला.
Akamgeukia Yetheri, mwanawe mzaliwa wa kwanza, akasema, “Waue hawa!” Lakini Yetheri hakuufuta upanga wake, kwa sababu aliogopa, kwa kuwa alikuwa bado kijana mdogo tu.
21 २१ तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हांला मार, कारण जसा पुरुष, तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यांना मारले, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले.
Zeba na Salmuna wakasema, “Njoo ufanye hivyo wewe mwenyewe. ‘Alivyo mtu, ndivyo zilivyo nguvu zake.’” Hivyo Gideoni akatoka mbele na kuwaua, naye akayaondoa mapambo kwenye shingo za ngamia zao.
22 २२ तेव्हा इस्राएलातल्या मनुष्यांनी गिदोनाला म्हटले, “तू, तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने आमच्यावर राज्य करावे, कारण तू आम्हास मिद्यानाच्या तावडीतून सोडवले आहे.”
Waisraeli wakamwambia Gideoni, “Ututawale, wewe, wanao na wana wa wana wako, kwa kuwa umetuokoa kutoka mikononi mwa Wamidiani.”
23 २३ तेव्हा गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही, माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही, तर परमेश्वर तुमच्यावर राज्य करील.”
Lakini Gideoni akawaambia, “Mimi sitatawala juu yenu, wala wanangu hawatatawala juu yenu. Bwana ndiye atakayetawala juu yenu ninyi.”
24 २४ तरी गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्याजवळ एक मागणे करीन की तुम्ही एकएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे.” त्यामध्ये तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्माएली लोक होते.
Naye akasema, “Ninalo ombi moja, kwamba kila mmoja wenu anipatie kipuli kutoka kwenye fungu lake la nyara.” (Ilikuwa desturi ya Waishmaeli kuvaa vipuli vya dhahabu.)
25 २५ तेव्हा ते बोलले, “आम्ही देतोच देतो.” मग त्यांनी वस्त्र पसरले, आणि त्यातल्या एकएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली.
Wakajibu, “Tutafurahi kuvitoa.” Hivyo wakatanda vazi chini na kila mwanaume akatupia juu yake pete kutoka kwenye fungu lake la nyara.
26 २६ आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने एक हजार सातशे शेकेल वजनाचे होते; चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यानी राजांची जांभळी वस्रे यांखेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज ते होते.
Uzito wa pete za dhahabu alizoomba zilifikia shekeli 1,700, bila kuhesabu mapambo mengine, pete za masikio na mavazi ya zambarau yaliyovaliwa na wafalme wa Midiani, au mikufu iliyokuwa kwenye shingo za ngamia zao.
27 २७ तेव्हा गिदोनाने त्याचे याजकाचे एफोद केले, आणि आपले नगर अफ्रा यामध्ये ते ठेवले, मग सर्व इस्राएलानी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला; असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले.
Gideoni akatengeneza kisibau kwa kutumia ile dhahabu, ambacho alikiweka katika mji wake, yaani, Ofra. Waisraeli wote wakafanya uasherati kwa kukiabudu huko, nacho kikawa mtego kwa Gideoni na jamaa yake.
28 २८ मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.
Hivyo Midiani ikashindwa mbele ya Israeli nayo haikuinua kichwa chake tena. Wakati wa siku za uhai wa Gideoni, nchi ikafurahia amani miaka arobaini.
29 २९ योवाशाचा पुत्र यरूब्बाल तर आपल्या घरी जाऊन राहिला.
Yerub-Baali mwana wa Yoashi akarudi kwenda kuishi katika nyumba yake.
30 ३० आणि गिदोनाला सत्तर पुत्र झाले; कारण त्यास पुष्कळ पत्नी होत्या.
Alikuwa na wana sabini wa kwake mwenyewe, kwa kuwa alikuwa na wake wengi.
31 ३१ आणि शखेमात जी त्याची उपपत्नी होती तिच्यापासून त्यास पुत्र झाला, आणि त्याने त्याचे नाव अबीमलेख ठेवले.
Suria wake, aliyekuwa anaishi huko Shekemu, pia alimzalia mwana, ambaye alimwita Abimeleki.
32 ३२ मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला, आणि त्यास अबीयेजऱ्यांच्या अफ्रा येथे त्याचा पिता योवाश याच्या कबरेत पुरण्यात आले.
Gideoni mwana wa Yoashi akafa akiwa na umri mzuri wa uzee, na akazikwa katika kaburi la Yoashi baba yake huko Ofra ya Waabiezeri.
33 ३३ तेव्हा असे झाले की, गिदोन मरण पावल्यावर इस्राएलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला, आणि बआल-बरीथ ह्याला आपला देव केले.
Mara tu alipofariki Gideoni, Waisraeli wakarudia hali ya uovu na kufanya uasherati kwa kuabudu Mabaali. Wakamsimamisha Baal-Berithi kuwa mungu wao na
34 ३४ असे इस्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांना त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही.
wala hawakumkumbuka Bwana Mungu wao, aliyewaokoa kutoka mikononi mwa adui zao wote kutoka kila upande.
35 ३५ आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्याप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही.
Pia wakashindwa kuitendea mema jamaa ya Yerub-Baali (yaani Gideoni) kwa ajili ya mambo yote mema aliyokuwa amefanya kwa ajili yao.

< शास्ते 8 >