< शास्ते 8 >
1 १ तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनाला म्हणाली, “तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयाला गेलास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले.
E os de Efraim lhe disseram: Que é isto que fizeste conosco, não chamando-nos quando ias à guerra contra Midiã? E reclamaram dele fortemente.
2 २ तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की, त्याची तुलना तुमच्याशी करावी? एफ्राईमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबीयेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय?
Aos quais ele respondeu: Que fiz eu agora como vós? Não são as sobras das uvas de Efraim melhor que a vindima de Abiezer?
3 ३ मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे?” तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.
Deus entregou em vossas mãos a Orebe e a Zeebe, príncipes de Midiã: e que pude eu fazer como vós? Então a ira deles contra ele se aplacou, logo que ele falou esta palavra.
4 ४ गिदोन व त्याच्याबरोबर जी तीनशे माणसे होती, ती यार्देन ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला.
E veio Gideão ao Jordão para passar, ele e os trezentos homens que trazia consigo, cansados, mas ainda perseguindo.
5 ५ तेव्हा तो सुक्कोथातल्या मनुष्यांना म्हणाला, “माझ्याबरोबरच्या लोकांस तुम्ही कृपा करून भाकरी द्या; कारण ते दमलेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे.”
E disse aos de Sucote: Eu vos rogo que deis à gente que me segue alguns bocados de pão; porque estão cansados, e eu persigo a Zeba e a Zalmuna, reis de Midiã.
6 ६ तेव्हा सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबह व सलमुन्ना यांच्यावर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हास माहीत नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी?
E os principais de Sucote responderam: Está já a mão de Zeba e Zalmuna em tua mão, para que havemos nós de dar pão a teu exército?
7 ७ तेव्हा गिदोन म्हणाला, “जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना ह्यांच्यावर मला विजय देईल, तेव्हा मी रानातल्या काट्यांनी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन.”
E Gideão disse: Pois quando o SENHOR entregar em minha mão a Zeba e a Zalmuna, eu trilharei vossa carne com espinhos e cardos do deserto.
8 ८ नंतर तो तेथून पनुएलास गेला आणि तेथल्या लोकांबरोबर त्याच प्रकारे बोलला, परंतु जसे सुक्कोथातल्या मनुष्यांनी उत्तर दिले होते, तसेच पनुएलातल्या मनुष्यांनी त्यास उत्तर दिले.
E dali subiu a Peniel, e falou-lhes as mesmas palavras. E os de Peniel lhe responderam como haviam respondido os de Sucote.
9 ९ तेव्हा तो पनुएलातल्या मनुष्यांना असे म्हणाला, “जेव्हा मी शांतीने माघारी येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.”
E ele falou também aos de Peniel, dizendo: Quando eu voltar em paz, derrubarei esta torre.
10 १० तेव्हा जेबाह व सलमुन्ना कर्कोरात होते, त्यांचे सैन्यही त्यांच्याबरोबर होते; पूर्वेकडल्या त्यांच्या अवघ्या सैन्यांतले जे उरलेले होते ते सर्व पंधरा हजार होते; त्यांच्यातले जे लढणारे एक लाख वीस हजार पुरुष तलवारीने पडले होते.
E Zeba e Zalmuna estavam em Carcor, e com eles seu exército de como quinze mil homens, todos os que haviam restado de todo aquele acampamento dos orientais: e os mortos haviam sido cento vinte mil homens que tiravam espada.
11 ११ तेव्हा गिदोन नोबाह व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला.
E subindo Gideão até os que habitavam em tendas, à parte oriental de Noba e de Jogbeá, feriu o acampamento, porque estava o exército desprevenido.
12 १२ जेबाह व सलमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून हे मिद्यानाच्या ह्या दोन राजांना पकडले, आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराहट पसरली.
E fugindo Zeba e Zalmuna, ele os seguiu; e tomados os dois reis de Midiã, Zeba e Zalmuna, espantou a todo aquele exército.
13 १३ मग योवाशाचा पुत्र गिदोन हेरेस घाटावरून लढाईहून माघारा आला.
E Gideão filho de Joás voltou da batalha antes que o sol subisse;
14 १४ तेव्हा त्याने सुक्कोथातला एक तरुण मनुष्य धरला, आणि त्याच्याजवळ सल्ला मागितला. त्या तरुण मनुष्याने त्यांना सुक्कोथाचे अधिकारी आणि त्यातले वडील अशा सत्याहत्तर मनुष्यांचे वर्णन लिहून दिले.
E tomou um jovem dos de Sucote, e perguntando-lhe, ele lhe deu por escrito os principais de Sucote e seus anciãos, setenta e sete homens.
15 १५ मग तो सुक्कोथातल्या मनुष्यांजवळ जाऊन बोलला, “हे पाहा, जेबाह व सलमुन्ना! याविषयी तुम्ही माझी थट्टा करीत बोलला, काय, जबाह व सलमुन्ना यांना आधीच जिंकले आहेस काय? आम्हास माहीत नाही तुझ्या सैन्याला आम्ही भाकर का द्यावी?”
E entrando aos de Sucote, disse: Eis aqui a Zeba e a Zalmuna, sobre os quais me escarnecestes, dizendo: Está já a mão de Zeba e de Zalmuna em tua mão, para que demos nós pão a teus homens cansados?
16 १६ नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानातल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या मनुष्यांना शिक्षा केली
E tomou aos anciãos da cidade, e espinhos e cardos do deserto, e castigou com eles aos de Sucote.
17 १७ आणि त्याने पनुएलाचा बुरूज खाली ओढून टाकला, त्या नगरातल्या मनुष्यांना मारून टाकले.
Também derrubou a torre de Peniel, e matou aos da cidade.
18 १८ मग जेबह व सलमुन्ना यांस तो म्हणाला, “जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती?” तेव्हा ते बोलले, “जसा तू आहेस तशीच ती होती; त्यातला प्रत्येकजण राजाच्या पुत्रासारखा होता.”
Logo disse a Zeba e a Zalmuna: Que maneira de homens tinham aqueles que matastes em Tabor? E eles responderam: Como tu, tais eram aqueles nem mais nem menos, que apareciam filhos de rei.
19 १९ गिदोन म्हणाला, “ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यांना जिवंत वाचवले असते, तर परमेश्वराशपथ मी तुम्हाला मारले नसते.”
E ele disse: Meus irmãos eram, filhos de minha mãe: Vive o SENHOR, que se os tivésseis guardado em vida, eu não vos mataria!
20 २० तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, “तू उठून त्यांना मार. परंतु त्या तरुणाने आपली तलवार काढली नाही; कारण अजूनपर्यंत तो लहानच होता,” म्हणून तो घाबरला.
E disse a Jéter seu primogênito: Levanta-te, e mata-os. Mas o jovem não desembainhou sua espada, porque tinha medo; que ainda era jovem.
21 २१ तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हांला मार, कारण जसा पुरुष, तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यांना मारले, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले.
Então disse Zeba e Zalmuna: Levanta-te tu, e mata-nos; porque como é o homem, tal é sua valentia. E Gideão se levantou, e matou a Zeba e a Zalmuna; e tomou os adornos de crescentes que seus camelos traziam ao pescoço.
22 २२ तेव्हा इस्राएलातल्या मनुष्यांनी गिदोनाला म्हटले, “तू, तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने आमच्यावर राज्य करावे, कारण तू आम्हास मिद्यानाच्या तावडीतून सोडवले आहे.”
E os israelitas disseram a Gideão: Sê nosso senhor, tu, e teu filho, e teu neto; pois que nos livraste da mão de Midiã.
23 २३ तेव्हा गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही, माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही, तर परमेश्वर तुमच्यावर राज्य करील.”
Mas Gideão respondeu: Não serei senhor sobre vós, nem meu filho vos dominará: o SENHOR será vosso Senhor.
24 २४ तरी गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्याजवळ एक मागणे करीन की तुम्ही एकएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे.” त्यामध्ये तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्माएली लोक होते.
E disse-lhes Gideão: Desejo fazer-vos uma petição, que cada um me dê os pendentes de seu despojo. (Porque traziam pendentes de ouro, que eram ismaelitas.)
25 २५ तेव्हा ते बोलले, “आम्ही देतोच देतो.” मग त्यांनी वस्त्र पसरले, आणि त्यातल्या एकएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली.
E eles responderam: De boa vontade os daremos. E segurando uma roupa de vestir, lançou ali cada um os pendentes de seu despojo.
26 २६ आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने एक हजार सातशे शेकेल वजनाचे होते; चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यानी राजांची जांभळी वस्रे यांखेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज ते होते.
E foi o peso dos pendentes de ouro que ele pediu mil e setecentos siclos de ouro; sem contar os ornamentos, e as joias, e vestidos de púrpura, que traziam os reis de Midiã, e sem os colares que traziam seus camelos ao pescoço.
27 २७ तेव्हा गिदोनाने त्याचे याजकाचे एफोद केले, आणि आपले नगर अफ्रा यामध्ये ते ठेवले, मग सर्व इस्राएलानी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला; असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले.
E Gideão fez deles um éfode, o qual fez guardar em sua cidade de Ofra: e todo Israel prostituiu-se atrás desse éfode naquele lugar; e foi por tropeço a Gideão e a sua casa.
28 २८ मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.
Assim foi humilhado Midiã diante dos filhos de Israel, e nunca mais levantaram sua cabeça. E repousou a terra quarenta anos nos dias de Gideão.
29 २९ योवाशाचा पुत्र यरूब्बाल तर आपल्या घरी जाऊन राहिला.
E Jerubaal filho de Joás foi, e habitou em sua casa.
30 ३० आणि गिदोनाला सत्तर पुत्र झाले; कारण त्यास पुष्कळ पत्नी होत्या.
E teve Gideão setenta filhos que saíram de sua coxa, porque teve muitas mulheres.
31 ३१ आणि शखेमात जी त्याची उपपत्नी होती तिच्यापासून त्यास पुत्र झाला, आणि त्याने त्याचे नाव अबीमलेख ठेवले.
E sua concubina que estava em Siquém, também lhe deu um filho; e pôs-lhe por nome Abimeleque.
32 ३२ मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला, आणि त्यास अबीयेजऱ्यांच्या अफ्रा येथे त्याचा पिता योवाश याच्या कबरेत पुरण्यात आले.
E morreu Gideão filho de Joás em boa velhice, e foi sepultado no sepulcro de seu pai Joás, em Ofra dos abiezritas.
33 ३३ तेव्हा असे झाले की, गिदोन मरण पावल्यावर इस्राएलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला, आणि बआल-बरीथ ह्याला आपला देव केले.
E aconteceu que quando morreu Gideão, os filhos de Israel voltaram, e se prostituíram atrás dos baalins, e se puseram por Deus a Baal-Berite.
34 ३४ असे इस्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांना त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही.
E os filhos de Israel não se lembraram do SENHOR seu Deus, que os havia livrado de todos os seus inimigos ao redor;
35 ३५ आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्याप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही.
Nem fizeram misericórdia com a casa de Jerubaal Gideão conforme todo aquele bem que ele havia feito a Israel.