< शास्ते 4 >
1 १ एहूद मरण पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट गोष्टी करून पुन्हा आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले हे त्याने पाहिले.
エホデが死んだ後、イスラエルの人々がまた主の前に悪をおこなったので、
2 २ तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन जो हासोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले; सीसरा नावाचा त्याच्या सैन्याचा सेनापती होता आणि तो परराष्ट्रीयांचे नगर हरोशेथ येथे राहत होता.
主は、ハゾルで世を治めていたカナンの王ヤビンの手に彼らを売りわたされた。ヤビンの軍勢の長はハロセテ・ゴイムに住んでいたシセラであった。
3 ३ त्याच्याकडे नऊशें लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांवर जाचजुलूम करून त्यांचा छळ केला, म्हणून इस्राएल लोकांनी मोठ्याने रडून परमेश्वराच्या मदतीकरिता धावा केला.
彼は鉄の戦車九百両をもち、二十年の間イスラエルの人々を激しくしえたげたので、イスラエルの人々は主に向かって呼ばわった。
4 ४ त्या वेळी लप्पिदोथाची पत्नी दबोरा भविष्यवादीण ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करीत होती.
そのころラピドテの妻、女預言者デボラがイスラエルをさばいていた。
5 ५ एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोराच्या खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे त्यांचा वाद सोडवण्यास येत असत.
彼女はエフライムの山地のラマとベテルの間にあるデボラのしゅろの木の下に座し、イスラエルの人々は彼女のもとに上ってきて、さばきをうけた。
6 ६ तिने अबीनवामाचा पुत्र बाराक ह्याला नफताली लोकांच्या केदेश प्रदेशातून बोलावणे पाठवून म्हटले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष आपणाबरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे.
デボラは人をつかわして、ナフタリのケデシからアビノアムの子バラクを招いて言った、「イスラエルの神、主はあなたに、こう命じられるではありませんか、『ナフタリの部族とゼブルンの部族から一万人を率い、行って、タボル山に陣をしけ。
7 ७ तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्यास तुझ्या हाती देईन.”
わたしはヤビンの軍勢の長シセラとその戦車と軍隊とをキション川に引き寄せて、あなたに出あわせ、彼をあなたの手にわたすであろう』」。
8 ८ बाराक तिला म्हणाला, “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, पण तू माझ्याबरोबर येणार नसलीस तर मी जाणार नाही.”
バラクは彼女に言った、「あなたがもし一緒に行ってくだされば、わたしは行きます。しかし、一緒に行ってくださらないならば、行きません」。
9 ९ ती म्हणाली, “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ज्या मार्गाने तू जाणार आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे.” मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.
デボラは言った、「必ずあなたと一緒に行きます。しかしあなたは今行く道では誉を得ないでしょう。主はシセラを女の手にわたされるからです」。デボラは立ってバラクと一緒にケデシに行った。
10 १० बाराकाने जबुलून व नफताली येथील पुरुषांना केदेश येथे एकत्रित बोलावले; मग त्याच्या मागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.
バラクはゼブルンとナフタリをケデシに呼び集め、一万人を従えて上った。デボラも彼と共に上った。
11 ११ मोशेचा सासरा होबाब याचे वंशज केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा वेगळा होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली तळ देऊन राहिला होता.
時にケニびとヘベルはモーセのしゅうとホバブの子孫であるケニびとから分れて、ケデシに近いザアナイムのかしの木までも遠く行って天幕を張っていた。
12 १२ इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,
アビノアムの子バラクがタボル山に上ったと、人々がシセラに告げたので、
13 १३ तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशें लोखंडी रथ आणि आपल्याजवळचे सर्व सैन्य, परराष्ट्रीयांचे हरोशेथापासून किशोन नदीपर्यंत बोलावून एकवट केले.
シセラは自分の戦車の全部すなわち鉄の戦車九百両と、自分と共におるすべての民をハロセテ・ゴイムからキション川に呼び集めた。
14 १४ दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसरावर तुला विजय दिला आहे; देव तुझ्यापुढे निघाला आहे की नाही?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून खाली उतरले.
デボラはバラクに言った、「さあ、立ちあがりなさい。きょうは主がシセラをあなたの手にわたされる日です。主はあなたに先立って出られるではありませんか」。そこでバラクは一万人を従えてタボル山から下った。
15 १५ परमेश्वराने सीसरा व त्याचे सर्व रथ आणि त्याचे सैन्य ह्यांना गोंधळून टाकले; आणि बाराकाच्या मनुष्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.
主はつるぎをもってシセラとすべての戦車および軍勢をことごとくバラクの前に撃ち敗られたので、シセラは戦車から飛びおり、徒歩で逃げ去った。
16 १६ पण इकडे बाराकाने विदेश्याच्या हरोशेथपर्यंत रथाचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीच्या धारेने पडली; त्यांच्यातला एकही वाचला नाही.
バラクは戦車と軍勢とを追撃してハロセテ・ゴイムまで行った。シセラの軍勢はことごとくつるぎにたおれて、残ったものはひとりもなかった。
17 १७ सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची पत्नी याएल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे यांचे सख्य होते.
しかしシセラは徒歩で逃げ去って、ケニびとヘベルの妻ヤエルの天幕に行った。ハゾルの王ヤビンとケニびとヘベルの家とは互にむつまじかったからである。
18 १८ तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्यास म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे येण्यास भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्यास कांबळीखाली लपवले.
ヤエルは出てきてシセラを迎え、彼に言った、「おはいりください。主よ、どうぞうちへおはいりください。恐れるにはおよびません」。シセラが天幕にはいったので、ヤエルは毛布をもって彼をおおった。
19 १९ तो तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला दे. मला तहान लागली आहे.” तेव्हा तिने चामड्याची दुधाची पिशवी उघडून त्यास दूध प्यावयाला दिले व तिने त्यास पुन्हा झाकले.
シセラはヤエルに言った、「どうぞ、わたしに水を少し飲ませてください。のどがかわきましたから」。ヤエルは乳の皮袋を開いて彼に飲ませ、また彼をおおった。
20 २० तो तिला म्हणाला, “डेऱ्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.”
シセラはまたヤエルに言った、「天幕の入口に立っていてください。もし人がきて、あなたに『だれか、ここにおりますか』と問うならば『おりません』と答えてください」。
21 २१ मग हेबेराची पत्नी याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आली पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रूतली, तो थकून गेल्यामुळे त्यास गाढ झोप लागली होती आणि तो तसाच मेला.
しかし彼が疲れて熟睡したとき、ヘベルの妻ヤエルは天幕のくぎを取り、手に槌を携えて彼に忍び寄り、こめかみにくぎを打ち込んで地に刺し通したので、彼は息絶えて死んだ。
22 २२ बाराक सीसराचा पाठलाग करीत आला तेव्हा त्यास याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हाला दाखवते.” तो तिच्यासोबत आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.
バラクがシセラを追ってきたとき、ヤエルは彼を出迎えて言った、「おいでなさい。あなたが求めている人をお見せしましょう」。彼がヤエルの天幕にはいって見ると、シセラはこめかみにくぎを打たれて倒れて死んでいた。
23 २३ अशा प्रकारे त्यादिवशी कनानाचा राजा याबीन ह्याला देवाने इस्राएल लोकांपुढे पराजित केले.
こうしてその日、神はカナンの王ヤビンをイスラエルの人々の前に撃ち敗られた。
24 २४ कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर इस्राएल लोकांची सत्ता अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.
そしてイスラエルの人々の手はますますカナンびとの王ヤビンの上に重くなって、ついにカナンの王ヤビンを滅ぼすに至った。