< शास्ते 3 >

1 इस्राएल लोकांस कनान देशांतील लढायांचा अनुभव नव्हता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वराने काही राष्ट्रे देशात राहू दिली.
Magi e oganda mane Jehova Nyasaye oweyo mondo otem jo-Israel duto mane ok osekalo e lweny moro amora e piny Kanaan.
2 इस्राएलाच्या नव्या पिढ्यांना, ज्यांना पूर्वी त्या लढायांविषयी काहीच माहीत नव्हते त्यांना तिचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही;
Mano notimo mana mondo opuonjgo nyikwa jo-Israel lweny, mago mane onge gi lony e kedo.
3 पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बाल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.
Ogendinigo ne gin: ruodhi abich mag jo-Filistia, jo-Kanaan duto, jo-Sidon, kod jo-Hivi mane odak e gode mag Lebanon kochakore got Baal Hermon nyaka got Lebo Hamath.
4 इस्राएलाच्या पूर्वजांना मोशेद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.
Jehova Nyasaye nowegi mondo otemgo jo-Israel kendo ongʼego ka ginyalo rito chike mane omiyo kweregi kokalo kuom Musa.
5 अशा प्रकारे इस्राएल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यामध्ये राहू लागले.
Jo-Israel nodak e kind jo-Kanaan, jo-Hiti, jo-Amor, jo-Perizi, jo-Hivi kod jo-Jebus.
6 त्यांनी त्यांच्या मुली आपणास स्त्रिया करून घेतल्या व आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या आणि त्यांच्या देवांची सेवा केली.
Negikendo nyi ogendinigo bangʼe negichiwo nyigi mondo okend gi yawuot pinjego kendo negilamo nyisechegi.
7 इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा मूर्तींची उपासना करू लागले;
Jo-Israel notimo tim mamono e wangʼ Jehova Nyasaye; ne wigi owil gi Jehova Nyasaye ma Nyasachgi mi gitiyone Baal kod Ashera.
8 म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती विकत दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याची सेवा केली.
Mirimb Jehova Nyasaye mager nobiro kuom jo-Israel ma nojwangʼogi e lwet jo-Kushan-Rishathaim ruodh Aram-Naharaim, ma jo-Israel nobedo wasumbinigi kuom higni aboro.
9 इस्राएल लोकांनी परमेश्वराजवळ मोठ्याने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला इस्राएल लोकांच्या मदतीला उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.
To kane giywakne Jehova Nyasaye, nochiwonegi jakony, ma en Othniel wuod Kenaz, owadgi Kaleb matin, mane oresogi.
10 १० त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व त्याने इस्राएलाचा न्याय केला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले,
Roho mar Jehova Nyasaye nobiro kuome, mi nobedo jangʼad bura mar jo-Israel kendo negidhi e lweny. Jehova Nyasaye nochiwo Kushan-Rishathaim ruodh Aram e lwet Othniel, mane oloye.
11 ११ त्यानंतर चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला.
Omiyo piny nobedo gi kwe kuom higni piero angʼwen; nyaka Othniel wuod Kenaz notho.
12 १२ पुन्हा इस्राएल लोकांनी देवाच्या दृष्टीने वाईट ते करून आज्ञा मोडली; आणि त्यांनी काय केले ते त्याने पाहिले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याला इस्राएलावर सबळ केले, कारण इस्राएलांनी जे वाईट ते केले होते हे याप्रकारे परमेश्वराने ते पाहिले होते.
Jo-Israel nochako timo timbe mamono e wangʼ Jehova Nyasaye, kendo nikech timno, Jehova Nyasaye nochiwogi e lwet Eglon ruodh Moab.
13 १३ तेव्हा एग्लोन राजाने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन त्यांच्यावर चाल केली आणि इस्राएलांना पराभूत करून खजुरीचे नगर ताब्यात घेतले.
Eglon kaachiel gi jo-Amon kod jo-Amalek, nobiro momonjo jo-Israel, mi gikawo Dala Maduongʼ mar Jeriko.
14 १४ इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याची अठरा वर्षे सेवा केली.
Jo-Israel nobedo e bwo loch Eglon ruodh Moab kuom higni apar gaboro.
15 १५ परंतु इस्राएल लोकांनी देवाकडे मोठ्याने आरोळी केली, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांच्या मदतीला उभा केला; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हाती इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला भेट पाठवली.
Jo-Israel nochako oywak ne Jehova Nyasaye mi nomiyogi jakony, Ehud, wuod Gera ja-Benjamin, mane racham. Jo-Israel noore gi chudo ir Eglon ruodh Moab.
16 १६ एहूदाने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली
Ehud nothedho pand ligangla ma dhoge ariyo ma borne dirom fut achiel gi nus, mane oliere e bamne korachwich ei lepe.
17 १७ त्याने मवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढे भेट सादर केली; एग्लोन हा फार लठ्ठ होता.
Ne ochiwo chudo ne Eglon ruodh Moab, mane ngʼat machwe ahinya.
18 १८ भेट दिल्यानंतर त्याने भेट घेऊन आलेल्या लोकांस त्याने निरोप दिला;
Bangʼ ka Ehud nosechiwo chudo, nooro jogo mane okelo chudo mondo odogi.
19 १९ पण गिलगालाजवळील कोरीव मूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत मागे येऊन तो म्हणाला, महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, “गप्प राहा, तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले.”
Kane oneno gigo mopa man Gilgal ne olokore en owuon kendo owacho niya, “An kodi gi wach ma lingʼ-lingʼ, yaye ruoth.” Ruoth nowacho niya, “Lingʼ thi!” Kendo joge duto mantie noa moweye.
20 २० एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. “एहूद म्हणाला,” “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे,” तेव्हा तो आसनावरून उठला.
Eka Ehud nosudo ire kama nobetie kende e agola ma malo mar ode mar yweyo, mane ojabetie ndalo oro mi owacho niya, “Nyasaye oora iri.” Ka Ruoth noa malo e kome,
21 २१ मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार काढून राजाच्या पोटात खुपसली;
Ehud norieyo bade koracham, mi owuodho ligangla koa e bamne korachwich kendo ochwoyo ii ruoth.
22 २२ पात्यांबरोबर मूठही आत गेली, आणि चरबीत रूतून बसली त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; त्याचे टोक पाठीतून बाहेर निघाली होती.
Ligangla nodonjo e iye molal kuno gi loge duto motuch nyaka e dier ngʼeye oko. Ehud ne ok opudho liganglano oko, kendo bor noume.
23 २३ मग द्वारमंडपाच्या बाहेर येऊन वर जाऊन एहूदाने माडीचे दरवाजे कुलूप लावून बंद केले.
Eka Ehud nowuok gie otuchi manie wi tado; nochiego dhoudi manie agola mamalo mi olorogi.
24 २४ तो निघून गेल्यावर त्याचे दास येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना वाटले की, “तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.”
Bangʼ kane osedhi, jotich nobiro kendo oyudo ka dhoudi manie agola mamalo olor. Negiwacho niya, “Nyaka bed ni okonyore e agola ma iye mar ot.”
25 २५ त्यांना मोठी काळजी वाटू लागली, आपण कर्तव्यात दुर्लक्ष करीत आहोत असे त्यांना वाटले, तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तर त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता.
Negirito ma wigi okuot, to kane ok oyawo dhout agola, negikawo kifungu kendo giyawogi. Kanyo negineno ruodhgi koriere e dier ot, kosetho.
26 २६ सेवक तर आश्चर्य करीत काय करावे वाट पाहत होते तोपर्यंत एहूद निसटून पळून कोरीव मूर्तींच्या जागेच्या पलिकडे सईर येथे जाऊन पोहचला.
Kane pod girito, Ehud noluchore mi owuok odhi. Ne okalo machiegni gi gik mopa mi opondo odhi Seira.
27 २७ तेथे गेल्यावर त्याने एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्राएल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले, आणि तो त्यांच्यापुढे चालला.
Kane ochopo kanyo, nogoyo turumbete e piny gode mag Efraim, kendo jo-Israel nolor kode piny koa e got, ka otelonegi.
28 २८ तो त्यांना म्हणाला, “माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्वराने तुमचे मवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत.” तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही.
Nowachonegi niya, “Luwauru, nimar Jehova Nyasaye osechiwo Moab, jasiku, e lwetu.” Omiyo ne giluwe kendo negikawo bath aora Jordan mane ochiko yo Moab, maonge ngʼama ne nyalo pondo mondo okadh aora Jordan.
29 २९ त्या वेळी त्यांनी मवाब्यांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यातला कोणीही बचावला नाही.
E sechego neginego jo-Moab madirom alufu apar, jogo mongirore kendo maroteke; maonge ngʼama nopondo kata achiel.
30 ३० अशा प्रकारे मवाब त्या दिवशी इस्राएलाच्या सत्तेखाली आला. ह्यानंतर देशाला ऐंशी वर्षे विसावा मिळाला.
Chiengʼno Moab nobedo e bwo loch Israel, kendo piny nobedo gi kwe kuom higni piero aboro.
31 ३१ एहूदानंतर अनाथाचा मुलगा शमगार न्यायाधीश झाला; त्याने सहाशे पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जिवे मारले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची संकटातून सुटका केली.
Bangʼ Ehud, Shamgar wuod Anath nobiro, en ema ne onego jo-Filistia mia auchiel gi bidhi. En bende noreso jo-Israel.

< शास्ते 3 >