< शास्ते 21 >
1 १ आता इस्राएली मनुष्यांनी मिस्पात अशी शपथ वाहिली होती की, “आमच्यातला कोणीही आपल्या मुली बन्यामिनाला लग्नासाठी देणार नाही.”
Entonces los hombres de Israel habían jurado en Mizpa, diciendo: Ninguno de nosotros dará a su hija por esposa a los de Benjamín.
2 २ नंतर लोक बेथेल नगरास गेले आणि संध्याकाळपर्यंत देवापुढे बसून राहिले, आणि मोठ्याने आवाज करून फार दु: खाने रडले.
Y la gente vino a Bet-el, esperando allí hasta la tarde delante de Dios, y se entregó a llorar amargamente.
3 ३ ते मोठ्याने म्हणाले, “हे इस्राएलाच्या देवा परमेश्वरा, इस्राएलात असे का झाले की आज इस्राएलातून एक वंश नाहीसा झाला आहे.”
Y dijeron: Señor, Dios de Israel, ¿por qué ha venido este destino a Israel, que hoy una tribu ha sido separada de Israel?
4 ४ नंतर दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस लवकर उठून तेथे वेदी बांधली, आणि होमार्पण व शांत्यर्पण यज्ञ केले.
Al día siguiente, la gente se levantó temprano e hizo allí un altar, ofreciendo ofrendas quemadas y ofrendas de paz.
5 ५ इस्राएली लोक म्हणाले, सर्व इस्राएली वंशांतला जो कोणी मंडळीत परमेश्वराजवळ चढून आला नाही, असा कोण आहे? कारण जो कोणी परमेश्वराजवळ मिस्पात चढून आला नाही. त्याविषयी अशी महत्त्वाची शपथ केली होती की, “ते म्हणाले, जे कोणी आले नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.”
Y dijeron los hijos de Israel: ¿Quién hay entre todas las tribus de Israel que no subió al Señor en la reunión de todo Israel? Porque habían hecho un gran juramento de que quienquiera que no se acercara a Mizpa al Señor debía ser condenado a muerte.
6 ६ इस्राएलाच्या लोक आपला भाऊ बन्यामीन याविषयी कळवळा करून म्हणाले, “आज इस्राएलातून एक वंश कापला गेला आहे;
Y los hijos de Israel se conmovieron con lástima por su hermano Benjamín, diciendo: Hoy se ha cortado una tribu de Israel.
7 ७ जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी कोण पत्नीची तरतूद करील? कारण आम्ही परमेश्वराजवळ शपथ वाहिली की, आम्ही आपल्या मुलींपैकी कोणीही त्यांना लग्नासाठी देणार नाही.”
¿Qué debemos hacer con respecto a las esposas para aquellos que todavía viven? Porque hemos jurado por el Señor que no les daremos a nuestras hijas por esposas.
8 ८ त्यांनी म्हटले, इस्राएलाच्या वंशांतला जो कोणी “मिस्पात परमेश्वर देवा जवळ चढून आला नाही; असा कोण आहे?” तेव्हा याबेश गिलादातला कोणीही मंडळीत आला नव्हता हे त्यांना कळले.
Y ellos dijeron: ¿Cuál de las tribus de Israel no subió a Mizpa al Señor? Y se vio que nadie había venido de Jabes de Galaad a la reunión.
9 ९ कारण लोकांची मोजणी घेतली गेली, तेव्हा पाहा, याबेश गिलादात राहणाऱ्यांपैकी कोणीही तेथे आला नव्हता.
Porque cuando la gente estaba numerada, ningún hombre de la gente de Jabes de Galaad estaba presente.
10 १० मंडळीने शूर असे बारा हजार पुरुष सूचना देऊन याबेश गिलादाकडे पाठवले, “आणि तुम्ही जाऊन त्यांच्यावर हल्ला करा आणि स्त्रियांना व पुत्रांनासुद्धा तलवारीने मारा.
Entonces ellos (la reunión) enviaron a doce mil de los mejores hombres de combate, y les dieron órdenes, diciendo: ve, y maten a la gente de Jabes de Galaad sin piedad, con sus mujeres y sus niños.
11 ११ हे करा, तुम्हाला जे करायचे ते हेच की सर्व पुरुष आणि जिचा पुरुषाशी लैंगिक संबंध आला आहे ती प्रत्येक स्त्री, त्यांचा नाश करावा.”
Y esto es lo que debes hacer: cada hombre, y toda mujer que haya tenido relaciones sexuales con un hombre, debes matarlo, pero debes mantener a salvo a las vírgenes. Y así lo hicieron.
12 १२ तेव्हा याबेश गिलादाच्या राहणाऱ्यांमध्ये ज्यांचा पुरुषाशी संबंध आला नव्हता, अशा चारशे कुमारी त्यांना मिळाल्या आणि त्यांनी त्यांना कनान देशात शिलो छावणीत आणले.
Entre la gente de Jabes de Galaad había cuatrocientas jóvenes vírgenes que nunca habían tenido relaciones sexuales con un hombre; las llevaron a sus tiendas en Silo, en la tierra de Canaán.
13 १३ तेव्हा सर्व मंडळीने रिम्मोन खडकावर जे बन्यामिनी लोक राहत होते त्यांच्याकडे निरोप पाठवून त्यांच्याशी शांतीचे बोलणे केले.
Y toda la reunión enviada a los hombres de Benjamín que estaban en la peña de Rimón, ofreciéndoles paz.
14 १४ तेव्हा बन्यामिनी माघारी आले, आणि त्यांनी याबेश गिलादातल्या स्त्रिया त्यांना पत्नी करून दिल्या; परंतु त्या सर्वांना त्या पुरल्या नाहीत.
Entonces volvió Benjamín; y les dieron las mujeres que habían guardado de la muerte entre las mujeres de Jabes de Galaad, pero aún no les bastaron.
15 १५ लोकांस बन्यामिनाविषयी दु: ख वाटले. कारण की, परमेश्वराने इस्राएलाच्या वंशांत फाटाफूट केली होती.
Y el pueblo se conmovió con lástima por Benjamín, porque el Señor había desatado su ira sobre las tribus de Israel.
16 १६ यास्तव मंडळीच्या वडीलांनी म्हटले, जे उरलेले त्यांना पत्नी मिळण्याविषयी आम्ही काय करावे? कारण त्यांनी “बन्यामिनी स्त्रियांना मारून टाकले होते.”
Entonces los hombres responsables de la reunión dijeron: ¿Cómo vamos a conseguir esposas para el resto de ellos, al ver que las mujeres de Benjamín están muertas?
17 १७ आणखी त्यांनी म्हटले, इस्राएलापासून एक वंश नाश होऊ नये, “म्हणून बन्यामिनाच्या उरलेल्यांना वतन मिळावे.
Y ellos dijeron: Debe haber un heredero para el resto de la descendencia de Benjamín para que una tribu de Israel no pueda ser borrada de la existencia,
18 १८ आम्ही आपल्या कन्येतून त्यांना स्त्रिया करून देऊ शकत नाही. कारण इस्राएलाच्या लोकांनी अशी शपथ वाहिली होती की, जो बन्यामिनाला पत्नी करून देतो, तो शापित होईल.”
Viendo que no podemos darles a nuestras hijas como esposas; Porque los hijos de Israel habían jurado, diciendo: Maldito el que de a Benjamín una mujer.
19 १९ नंतर ते म्हणाले, “शिलोम छावणीमध्ये परमेश्वर देवासाठी दरवर्षी सण असतो, ते बेथेलच्या उत्तरेस, जो रस्ता बेथेलापासून शखेमास चढून जातो, त्याच्या पूर्वेकडे आणि लबानोच्या दक्षिणेस आहे.”
Y dijeron: Mira, todos los años hay una fiesta del Señor en Silo, que está al norte de Betel, en el lado este de la carretera que sube de Betel a Siquem, y en El sur de Lebona.
20 २० त्यांनी बन्यामिनी लोकांस अशी आज्ञा दिली की, “तुम्ही द्राक्षमळ्यांमध्ये जा आणि लपून राहा.
Y dijeron a los varones de Benjamín: Vayan por los viñedos, esperando allí en secreto.
21 २१ मग जेव्हा शिलोतल्या मुली नाचायला निघतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यांतून बाहेर निघून प्रत्येकाने आपल्यासाठी शिलोतल्या कन्येतून पत्नी करून घ्यावी, आणि मग बन्यामिनाच्या देशास परत मागे जावे.
Y viendo; y si las hijas de Silo salen a participar en los bailes, entonces vengan de los viñedos y tomen una esposa para cada uno de ustedes entre las hijas de Silo, y regresen a la tierra de Benjamín.
22 २२ जेव्हा त्यांचे वडील किंवा त्यांचे भाऊबंद एक होऊन आमच्याजवळ निषेध करण्यास येतील, तेव्हा आम्ही त्यांना सांगू, तुम्ही त्यांना राहू द्या, आमच्यावर कृपा करा! कारण लढाईत आम्हांला त्यांच्यातील एकएकासाठी पत्नी मिळाली नाही. आणि तुम्ही शपथेविषयी दोषी नाहीत, कारण तुम्ही स्वतः त्यांना तुमच्या मुली दिल्या नाहीत.”
Y cuando sus padres o sus hermanos vengan y causen problemas, debes decirles: Danos esto como un acto de gracia; porque no las tomamos como esposas para nosotros mismos en la guerra; y si ustedes mismos nos los hubieran dado, habrían sido responsables del juramento roto.
23 २३ यास्तव बन्यामिनाच्या लोकांनी तसे केले, आणि आपल्या संख्येप्रमाणे कन्या पकडून पत्नी करून घेतल्या. नंतर ते माघारी आपल्या वतनावर गेले, आणि तेथे नगरे बांधून त्यामध्ये राहिले.
Así que los hombres de Benjamín hicieron esto, y obtuvieron esposas para cada uno de ellos, sacándolas por la fuerza del baile; luego volvieron a su patrimonio, construyendo sus pueblos y viviendo en ellos.
24 २४ त्यानंतर इस्राएली लोक तेथून आपापल्या वंशाकडे व आपापल्या वतनावर परत गेले.
Entonces los hijos de Israel se fueron de allí, cada uno a su tribu y su familia, cada uno regresó a su herencia.
25 २५ त्या दिवसात इस्राएलावर कोणी राजा नव्हता. प्रत्येकजण त्यास जे बरे वाटे, ते करीत होता.
En aquellos días no había rey en Israel: todo hombre hacía lo que le parecía correcto.