< शास्ते 20 >
1 १ नंतर दान प्रदेशापासून बैर-शेबा शहरापर्यंतचे व गिलाद देशातले सर्व इस्राएली लोक बाहेर आले आणि ते एक मनाचे होऊन परमेश्वराजवळ मिस्पा येथे एकत्र जमा झाले.
於是以色列從但到別是巴,以及住基列地的眾人都出來,如同一人,聚集在米斯巴耶和華面前。
2 २ इस्राएलाच्या सर्व वंशांच्या लोकांचे पुढारी, यांनी देवाच्या लोकांच्या मंडळीत आपले स्थान घेतले, सुमारे चार लाख पायदळ, जे तलवारीने लढण्यास तयार होते.
以色列民的首領,就是各支派的軍長,都站在上帝百姓的會中;拿刀的步兵共有四十萬。
3 ३ आता बन्यामिनी लोकांनी ऐकले की, इस्राएल लोक मिस्पात नगरात जमले आहेत. तेव्हा इस्राएलाचे लोक म्हणाले, “आम्हांला सांगा, ही वाईट गोष्ट कशी घडली?”
以色列人上到米斯巴,便雅憫人都聽見了。以色列人說:「請你將這件惡事的情由對我們說明。」
4 ४ तो लेवी, ज्याच्या पत्नीचा खून झाला होता तिच्या पतीने उत्तर देऊन म्हटले, “मी आणि माझी उपपत्नी बन्यामिनाच्या प्रदेशातील गिबा येथे रात्र घालवण्यासाठी येऊन उतरलो.
那利未人,就是被害之婦人的丈夫,回答說:「我和我的妾到了便雅憫的基比亞住宿。
5 ५ गिबातल्या लोकांनी रात्री माझ्यावर हल्ला करण्यासाठी घराच्या सभोवताली वेढा दिला आणि मला मारण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली.
基比亞人夜間起來,圍了我住的房子,想要殺我,又將我的妾強姦致死。
6 ६ मी आपल्या उपपत्नीला घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या वतन भागातील सर्व प्रांतांत पाठवले. कारण, त्यांनी इस्राएलात दुष्टपणा आणि बलात्कार केला आहे.
我就把我妾的屍身切成塊子,使人拿着傳送以色列得為業的全地,因為基比亞人在以色列中行了兇淫醜惡的事。
7 ७ आता तुम्ही, सर्व इस्राएली लोकांनो, बोला आणि तुमचा सल्ला द्या आणि याकडे लक्ष द्या.”
你們以色列人都當籌劃商議。」
8 ८ सर्व लोक एक मन होऊन एकत्र उठले आणि ते म्हणाले, “आमच्यातला कोणीही आपल्या तंबूकडे जाणार नाही आणि कोणी आपल्या घरी परतणार नाही.
眾民都起來如同一人,說:「我們連一人都不回自己帳棚、自己房屋去。
9 ९ परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहोत. आम्ही चिठ्ठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायचे ठरवू.
我們向基比亞人必這樣行,照所掣的籤去攻擊他們。
10 १० आम्ही इस्राएलाच्या सर्व वंशांतून शंभरातली दहा माणसे व हजारातून शंभर, व दहा हजारातून एक हजार, इतकी माणसे निवडू. ती या लोकांसाठी अन्नसामग्री आणतील, म्हणजे मग ते जाऊन बन्यामिनाच्या गिब्याने इस्राएलात जे दुष्टपण केले, त्यानुसार त्यांना शिक्षा करतील.”
我們要在以色列各支派中,一百人挑取十人,一千人挑取百人,一萬人挑取千人,為民運糧,等大眾到了便雅憫的基比亞,就照基比亞人在以色列中所行的醜事征伐他們。」
11 ११ मग इस्राएलातले सर्व सैन्य एका उद्देशाने एकत्र येऊन त्या नगराविरुद्ध जमले.
於是以色列眾人彼此連合如同一人,聚集攻擊那城。
12 १२ तेव्हा इस्राएल लोकांनी बन्यामिनाच्या सर्व वंशांत माणसे पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये हे काय दुष्टपण घडले आहे?
以色列眾支派打發人去,問便雅憫支派的各家說:「你們中間怎麼做了這樣的惡事呢?
13 १३ तर आता तुम्ही गिब्यांतली जे दुष्ट लोक आहेत ते आम्हांला काढून द्या, म्हणजे आम्ही त्यांना जीवे मारू आणि इस्राएलातून दुष्टाई पूर्णपणे काढून टाकू.” परंतु बन्यामिनी लोकांनी आपले भाऊबंद इस्राएली लोक यांचे ऐकले नाही.
現在你們要將基比亞的那些匪徒交出來,我們好治死他們,從以色列中除掉這惡。」便雅憫人卻不肯聽從他們弟兄以色列人的話。
14 १४ आणि बन्यामिनी लोक इस्राएली लोकांविरुद्ध लढावयास आपल्या नगरांतून गिब्याजवळ जमा झाले.
便雅憫人從他們的各城裏出來,聚集到了基比亞,要與以色列人打仗。
15 १५ त्या दिवशी बन्यामिनी लोकांनी आपल्या नगरांतून तलवारीने लढाई करण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले सव्वीस हजार सैन्य बरोबर घेतले; त्यामध्ये गिब्यात राहणाऱ्या त्या सातशे निवडक पुरुषांची भर घातली.
那時便雅憫人從各城裏點出拿刀的,共有二萬六千;另外還有基比亞人點出七百精兵。
16 १६ त्या सर्व लोकांतले हे सातशे निवडलेले पुरुष डावखुरे होते; त्यांच्या प्रत्येकाचा गोफणीच्या गोट्याचा नेम एक केसभर देखील चुकत नसे.
在眾軍之中有揀選的七百精兵,都是左手便利的,能用機弦甩石打人,毫髮不差。
17 १७ बन्यामिनी सोडून, एकंदर इस्राएली सैन्य चार लाख माणसे, तलवारीने लढण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले होते. ते सर्व लढाऊ पुरुष होते.
便雅憫人之外,點出以色列人拿刀的,共有四十萬,都是戰士。
18 १८ मग इस्राएल लोक उठून बेथेलापर्यंत गेले, आणि त्यांनी देवापासून सल्ला विचारला. त्यांनी विचारले, “बन्यामिनी लोकांशी लढायला आमच्यातून पहिल्याने कोणी जावे?” परमेश्वर देवाने सांगितले, “यहूदाने पहिल्याने जावे.”
以色列人就起來,到伯特利去求問上帝說:「我們中間誰當首先上去與便雅憫人爭戰呢?」耶和華說:「猶大當先上去。」
19 १९ इस्राएली लोक सकाळी उठले आणि त्यांनी गिब्यासमोर लढाईची तयारी केली.
以色列人早晨起來,對着基比亞安營。
20 २० मग इस्राएली सैन्य बन्यामिन्यांविरुद्ध लढायला बाहेर गेले, त्यांनी त्यांच्या विरुद्ध गिबा या ठिकाणी लढाईची व्यूहरचना केली.
以色列人出來,要與便雅憫人打仗,就在基比亞前擺陣。
21 २१ तेव्हा बन्यामिनी सैन्याने गिब्यातून निघून आणि त्या दिवशी इस्राएली सैन्यातील बावीस हजार मनुष्यांना मारले.
便雅憫人就從基比亞出來,當日殺死以色列人二萬二千。
22 २२ तथापि इस्राएली सैन्याने पुन्हा शक्तीशाली होऊन जेथे त्यांनी पहिल्या दिवशी लढाई लावली होती, त्या ठिकाणीच व्यूहरचना केली.
以色列人彼此奮勇,仍在頭一日擺陣的地方又擺陣。
23 २३ आणि इस्राएली लोक वर गेले आणि परमेश्वरासमोर संध्याकाळपर्यंत रडले. आणि त्यांनी परमेश्वरास विचारले, “आमचा बंधू बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय?” परमेश्वर म्हणाला, “त्यांच्यावर हल्ला करा.”
未擺陣之先,以色列人上去,在耶和華面前哭號,直到晚上,求問耶和華說:「我們再去與我們弟兄便雅憫人打仗可以不可以?」耶和華說:「可以上去攻擊他們。」
24 २४ म्हणून दुसऱ्या दिवशी इस्राएली सैन्य बन्यामिनी सैन्याविरुद्ध चालून गेले.
第二日,以色列人就上前攻擊便雅憫人。
25 २५ दुसऱ्या दिवशी, बन्यामिनी लोक गिब्यातून त्यांच्याविरुद्ध बाहेर आले, आणि त्यांनी इस्राएली सैन्यातील अठरा हजार मनुष्यांना मारले, हे सर्व तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले होते.
便雅憫人也在這日從基比亞出來,與以色列人接戰,又殺死他們一萬八千,都是拿刀的。
26 २६ नंतर सर्व इस्राएली सैन्य आणि सर्व लोक चढून बेथेल येथे गेले आणि रडले, आणि त्यांनी तेथे परमेश्वर देवासमोर बसले. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत उपास केला, आणि परमेश्वरास होमार्पण व शांत्यर्पणे अर्पण केले.
以色列眾人就上到伯特利,坐在耶和華面前哭號,當日禁食直到晚上;又在耶和華面前獻燔祭和平安祭。
27 २७ आणि इस्राएली लोकांनी परमेश्वर देवाला विचारले, कारण त्या दिवसात देवाच्या कराराचा कोश तेथे होता.
那時,上帝的約櫃在那裏;亞倫的孫子、以利亞撒的兒子非尼哈侍立在約櫃前。以色列人問耶和華說:「我們當再出去與我們弟兄便雅憫人打仗呢?還是罷兵呢?」耶和華說:「你們當上去,因為明日我必將他們交在你們手中。」
28 २८ आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसात त्याची सेवा करत होता. “आम्ही आपला बंधू बन्यामीन याच्या लोकांविरुद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे?” तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, “तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.”
29 २९ मग इस्राएल लोकांनी गिब्याच्या भोवताली गुप्तस्थळी माणसे ठेवली.
以色列人在基比亞的四圍設下伏兵。
30 ३० मग तिसऱ्या दिवशी इस्राएली लोक बन्यामिनाच्या लोकांविरुद्ध लढले, आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिब्याजवळ व्यूहरचना केली.
第三日,以色列人又上去攻擊便雅憫人,在基比亞前擺陣,與前兩次一樣。
31 ३१ तेव्हा बन्यामीनी लोक गेले आणि इस्राएल लोकांविरूद्ध लढले आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर नेण्यात आले. त्यांनी काही लोकांस मारण्यास सुरवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो, त्यामध्ये इस्राएलांपैकी सुमारे तीस पुरुष शेतात त्यांनी मारले;
便雅憫人也出來迎敵,就被引誘離城;在田間兩條路上,一通伯特利,一通基比亞,像前兩次,動手殺死以色列人約有三十個。
32 ३२ बन्यामिनी लोकांनी म्हटले, “त्यांचा पराजय झाला आहे, आणि पहिल्यासारखे ते आमच्यापुढून पळून जात आहेत.” परंतु इस्राएली सैन्य म्हणाले, “आपण मागे पळू आणि त्यांना नगरातल्या रस्त्या पासून दूर काढून आणू.”
便雅憫人說:「他們仍舊敗在我們面前。」但以色列人說:「我們不如逃跑,引誘他們離開城到路上來。」
33 ३३ सर्व इस्राएली सैन्य त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी बआल-तामार येथे लढाईसाठी व्यूहरचना केली. नंतर जे इस्राएली सैन्य गुप्तस्थळीं लपून बसले होते ते आपल्या जागेवरून, मारे गिबा येथून अचानक उठले.
以色列眾人都起來,在巴力‧他瑪擺陣,以色列的伏兵從馬利‧迦巴埋伏的地方衝上前去。
34 ३४ सर्व इस्राएलातले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे.
有以色列人中的一萬精兵,來到基比亞前接戰,勢派甚是凶猛;便雅憫人卻不知道災禍臨近了。
35 ३५ तेव्हा परमेश्वर देवाने बन्यामिनाला इस्राएलापुढे पराजित केले. त्या दिवशी बन्यामिन्यांचे पंचवीस हजार शंभर पुरुष मारले गेले. त्या सर्वांना तलवारीने लढण्याचे शिक्षण देण्यात आले होते.
耶和華使以色列人殺敗便雅憫人。那日,以色列人殺死便雅憫人二萬五千一百,都是拿刀的。
36 ३६ बन्यामिनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामिनी मनुष्यांपुढून बाजूला झाली.
於是便雅憫人知道自己敗了。先是以色列人;因為靠着在基比亞前所設的伏兵,就在便雅憫人面前詐敗。
37 ३७ नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन ते गिब्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या तलवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला ठार मारले.
伏兵急忙闖進基比亞,用刀殺死全城的人。
38 ३८ आता दबा धरणारे आणि इस्राएली सैन्यात सांकेतिक खूण ठरली होती की त्यांनी नगरातून उंच धुराचा उंच लोळ चढवावा.
以色列人預先同伏兵約定在城內放火,以煙氣上騰為號。
39 ३९ आणि इस्राएली सैन्य लढाईत मागे फिरू लागले; आता बन्यामिन्याने हल्ल्याला सुरवात केली आणि इस्राएलांतली सुमारे तीस माणसे मारली. आणि त्यांनी म्हटले, “खात्रीने पाहिल्या लढाईसारखे ते आमच्यापुढे पराजित झालेत.”
以色列人臨退陣的時候,便雅憫人動手殺死以色列人,約有三十個,就說:「他們仍像前次被我們殺敗了。」
40 ४० परंतु नगरातून धुराचा लोळ उंच चढू लागला, तेव्हा बन्यामिन्यांनी आपल्या पाठीमागे वळून पाहिले आणि संपूर्ण नगरातून धुराचा लोळ आकाशात चढत असल्याचे त्यांना दिसले.
當煙氣如柱從城中上騰的時候,便雅憫人回頭觀看,見全城的煙氣沖天。
41 ४१ नंतर इस्राएली सैन्य मागे उलटून त्यांच्यावर हल्ला चढवला. बन्यामिनी माणसे फार घाबरली, कारण त्यांनी पाहिले की, आपल्यावर अरिष्ट आले आहे, हे त्यांच्या लक्षात आले.
以色列人又轉身回來,便雅憫人就甚驚惶,因為看見災禍臨到自己了。
42 ४२ यास्तव ते इस्राएलाच्या सैन्यापुढून रानाच्या वाटेने निसटून पळाले; तथापि लढाईने त्यांना गाठले. इस्राएलाच्या सैन्याने बाहेर येऊन, जेथे कोठे ते गावातून बाहेर निघाले होते तेथे त्यांना मारले.
他們在以色列人面前轉身往曠野逃跑;以色列人在後面追殺。那從各城裏出來的,也都夾攻殺滅他們。
43 ४३ त्यांनी बन्यामिन्यांना चोहोकडून वेढले आणि नोहा येथपासून ते त्यांच्या पाठीस लागले; त्यांनी गिब्यासमोर पूर्वेकडे त्यांना पायदळी तुडवून मारले.
以色列人圍繞便雅憫人,追趕他們,在他們歇腳之處、對着日出之地的基比亞踐踏他們。
44 ४४ बन्यामिनातले अठरा हजार सैनिक मारले गेले; ती सर्व माणसे लढाईत पटाईत होती.
便雅憫人死了的有一萬八千,都是勇士。
45 ४५ जे मागे फिरले ते रानात रिम्मोन खडकाकडे पळून गेले. तथापि त्यांनी त्यातले पाच हजार पुरुष रस्त्यावर वेचून मारले, आणि गिदोमापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यातले दोन हजार पुरुष आणखी मारले.
其餘的人轉身向曠野逃跑,往臨門磐去。以色列人在道路上殺了他們五千人,如拾取遺穗一樣,追到基頓又殺了他們二千人。
46 ४६ त्या दिवशी बन्यामिनातले जे सर्व पडले ते तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले आणि अनुभवी असे पंचवीस हजार पुरुष होते; ते सर्व लढाईत प्रसिद्ध शूर लोक होते.
那日便雅憫死了的共有二萬五千人,都是拿刀的勇士。
47 ४७ परंतु सहाशे पुरुष फिरून रानात रिम्मोन खडकावर पळून गेले. आणि ते रिम्मोन खडकावर चार महिने राहिले.
只剩下六百人,轉身向曠野逃跑,到了臨門磐,就在那裏住了四個月。
48 ४८ नंतर इस्राएली सैन्यांनी मागे फिरून बन्यामिनी लोकांवर हल्ला केला आणि नगरातली सर्व माणसे व गुरेढोरे आणि जे काही त्यांना सापडले ती प्रत्येक गोष्ट त्यांनी तलवारीने मारली, आणि त्यांच्या मार्गातील प्रत्येक नगर त्यांनी आग लावून जाळून टाकले.
以色列人又轉到便雅憫地,將各城的人和牲畜,並一切所遇見的,都用刀殺盡,又放火燒了一切城邑。