< शास्ते 2 >
1 १ परमेश्वराचा दूत गिलगालाहून वर बोखीमास चढून आला आणि तो म्हणाला, “मी तुम्हाला मिसरातून काढले आणि तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;
主的神諭 上主的使者從基耳加耳上到波津說:「我使你們由埃及上來,領你們進入了我向你們祖先所誓許的地方;我曾說過:我永不廢棄我與你們所立的盟約,
2 २ तुम्ही या देशात राहणाऱ्यांशी काही करार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हाला सांगितले होते, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?
你們也不可與這地方的居民結約,且要拆毀他們的祭壇。但你們沒有聽從我的聲音;你們這是作的什麼事﹖
3 ३ आणि म्हणून मी देखील म्हणालो, मी कनानी लोकांस तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; पण ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील.”
為此我現在說:我必不把他們從你們面前趕走,他們為你們將是陷阱,他們的神要成為你們的羅網。」
4 ४ परमेश्वराचा दूत जेव्हा सर्व इस्राएल लोकांस हे शब्द बोलला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला आणि रडले
當上主的使者對全以色列子民說這話時,百姓便放聲大哭,
5 ५ त्यांनी त्या जागेचे नाव बोखीम असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले.
因此給那地方起名叫波津。他們在那裏給上主奉獻了祭獻。民長時代的史論
6 ६ जेव्हा यहोशवाने लोकांस निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्राएलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येकजण आपल्या वतनास गेले.
若蘇厄遣散了百姓,以色列子民就各到自己應得的產業去,為佔領那地方。
7 ७ यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कामे पाहिली होती त्यांच्या सर्व दिवसात लोकांनी परमेश्वराची सेवा केली.
當若蘇厄在世時,和他去世後,那些見過上主為以色列所行的大事的長老們還在的時日,百姓都事奉上主。
8 ८ परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला.
上主的僕人,農的兒子若蘇厄一百一十歲時去了世。
9 ९ एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्यास पुरले.
人們把他埋在他地業的境內,即在厄弗辣因山地,加阿士山北面的提默納赫勒斯。
10 १० ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती.
當那一代人都歸於他們的祖先以後,在他們之後,興起了另一代,他們不認識上主,也不知道上主為以色列所行的事蹟。
11 ११ इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले;
以色列子民行了上主視為惡的事,事奉了巴耳諸神。
12 १२ आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवांच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वरास क्रोधाविष्ट केले.
他們離棄了上主他們祖先的天主,即領他們出離埃及地的天主,而隨從了別的神,叩拜他們四周各民族的神,因此觸怒了上主。
13 १३ परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टारोथ यांची उपासना केली;
他們背離了上主,而事奉巴耳和阿市托勒特。
14 १४ इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटणाऱ्यांच्या हवाली केले, त्यांनी त्यांची मालमत्ता लुटली; त्याने त्यांना त्यांच्या आसपासच्या शत्रूंच्या हाती गुलाम म्हणून विकले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.
於是上主對以色列大發忿怒,把他們交在強盜手中,叫強盜搶掠他們;將他們賣給育四周的敵人,使他們不能抵抗他們的敵人;
15 १५ परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे इस्राएल लढण्यास जात तेथे त्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा हात पडून त्यांचा पराभव होई आणि ते फार संकटात पडत.
他們無論去那裏,上主的手總是加害他們,猶如上主所說的,猶如上主向他們所起的誓,使他們受極大的痛苦。
16 १६ मग परमेश्वर न्यायाधीश उभे करी, ते त्यांना त्यांची मालमत्ता लुटणाऱ्याच्या हातून सोडवीत;
上主雖興起民長,拯救他們脫離強盜的手;
17 १७ तरी ते आपल्या न्यायाधीशांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी बुद्धीने अन्य देवांच्या मागे लागले आणि त्यांची उपासना केली. त्यांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळून ज्या मार्गाने चालले होते तो त्यांनी त्वरीत सोडून दिला आणि त्यांनी आपले पूर्वज करत असत तसे केले नाही.
但他們仍不肯聽從他們的民長,反而與外邦的神行淫,頂禮叩拜,迅速地離開了他們祖先所走的服從上主命令的路,沒有照樣行事。
18 १८ परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई.
當上主給他們興起民長時,上主與民長同在,在民長一生的歲月中,救他們脫離仇敵的手,因為上主聽見了他們受壓迫欺凌發出的歎息,而憐憫了他們;
19 १९ पण न्यायाधीश मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व उपासना करीत व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडीत नसत.
可是民長一去世,他們又轉而行惡,行為比他們的祖先更壞,去追隨外神,事奉叩拜他們,總不放棄他們祖先的惡行和頑抗的行為。
20 २० तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही;
因此上主對以色列大發忿怒說:「因為這百姓違犯了我與他們祖先締結的盟約,沒有聽從我的音;
21 २१ म्हणून यहोशवाच्या मृत्यू वेळी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मी देखील येथून पुढे त्यांच्या समोरून घालवून देणार नाही;
為此,若蘇厄死後所剩下的民族,我也不再由他們面前,驅逐任何一個,
22 २२ पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराचे जसे मार्ग पाळले तसे ते चालतात की नाही हे मी पाहीन.”
為試驗以色列是否謹守遵行上主的道路,有如他們的祖先所遵行的一樣。」
23 २३ म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.
因此,上主保留了那些民族,沒有迅速驅逐他們,也沒有把他們交在以色人手中。