< शास्ते 19 >
1 १ त्या दिवसात जेव्हा इस्राएलावर कोणी राजा नव्हता, तेव्हा असे झाले की कोणी लेवी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या सर्वांत दूरच्या भागात राहत होता आणि त्याने आपल्याला यहूदातील बेथलेहेम नगरातील एक स्त्री उपपत्नी करून घेतली होती.
and to be in/on/with day [the] they(masc.) and king nothing in/on/with Israel and to be man Levi to sojourn in/on/with flank mountain: hill country Ephraim and to take: take to/for him woman: wife concubine from Bethlehem Bethlehem Judah
2 २ परंतु त्याच्या उपपत्नीने त्यास सोडून व्यभिचार केला, आणि ती त्यास सोडून यहूदातील बेथलेहेमात आपल्या वडिलाच्या घरी परत गेली, आणि तेथे चार महिने राहिली.
and to fornicate upon him concubine his and to go: went from with him to(wards) house: home father her to(wards) Bethlehem Bethlehem Judah and to be there day four month
3 ३ तेव्हा तिचा पती उठून तिचे मन वळवून तिला माघारी आणावे म्हणून गेला. त्याच्याबरोबर त्याचा नोकर होता व गाढवांची जोडी होती, तेव्हा तिने त्यास आपल्या वडिलाच्या घरात नेले, आणि त्या मुलीच्या वडिलाने त्यास पाहिले, त्यास भेटून तो आनंदित झाला.
and to arise: rise man: husband her and to go: went after her to/for to speak: speak upon heart her (to/for to return: rescue her *Q(K)*) and youth his with him and pair donkey and to come (in): bring him house: home father her and to see: see him father [the] maiden and to rejoice to/for to encounter: meet him
4 ४ त्याच्या सासऱ्याने म्हणजे त्या मुलीच्या वडिलाने त्यास फार आग्रह केला; म्हणून तो त्याच्याकडे तीन दिवस राहिला, आणि तो खाऊन पिऊन तेथे वस्तीस राहिला.
and to strengthen: hold in/on/with him relative his father [the] maiden and to dwell with him three day and to eat and to drink and to lodge there
5 ५ मग चौथ्या दिवशी असे झाले की तो सकाळी लवकर उठला आणि तो जायला तयार झाला, परंतु त्या मुलीच्या वडिलाने आपल्या जावयाला म्हटले, “तू आपल्याला भाकरीच्या तुकड्याचा आधार कर, आणि मग तुम्ही जा.”
and to be in/on/with day [the] fourth and to rise in/on/with morning and to arise: rise to/for to go: went and to say father [the] maiden to(wards) son-in-law his to support heart your morsel food: bread and after to go: went
6 ६ त्या दोघांनी एकत्र बसून खाणेपिणे केले; नंतर त्या मुलीच्या वडिलाने म्हटले, “कृपा करून तू अजून एक रात्र राहायला तयार हो, आणि चांगली वेळ घालव.”
and to dwell and to eat two their together and to drink and to say father [the] maiden to(wards) [the] man be willing please and to lodge and be good heart your
7 ७ जेव्हा लेवी जायला उठला, तेव्हा तरुण मुलीच्या वडिलाने त्यास पुन्हा राहण्याचा आग्रह केला, म्हणून त्याने त्याची जाण्याची योजना बदलली आणि पुन्हा तेथे रात्र घालवली.
and to arise: rise [the] man to/for to go: went and to press in/on/with him relative his and to return: again and to lodge there
8 ८ नंतर पाचव्या दिवशी सकाळी लवकर जायला उठला, “परंतु त्या मुलीच्या वडिलाने म्हटले तू आपल्या पोटाला आधार कर दुपारपर्यंत थांब.” तेव्हा त्या दोघांनी जेवण केले.
and to rise in/on/with morning in/on/with day [the] fifth to/for to go: went and to say father [the] maiden to support please heart your and to delay till to stretch [the] day and to eat two their
9 ९ जेव्हा लेवी, त्याची उपपत्नी व त्याचा नोकर जायला उठले, तेव्हा त्याचा सासरा त्यास बोलला, “आता पाहा मावळतीकडे दिवस उतरला आहे, तुम्ही आज रात्री येथेच राहा; पाहा, दिवस थोडाच राहिला आहे, येथे वस्ती करून तुमच्या मनाला उल्ल्हास होवो; मग सकाळी उठून आपल्या मार्गाने आपल्या घरी जा.”
and to arise: rise [the] man to/for to go: went he/she/it and concubine his and youth his and to say to/for him relative his father [the] maiden behold please to slacken [the] day to/for to grow dark to lodge please behold to camp [the] day to lodge here and be good heart your and to rise tomorrow to/for way: journey your and to go: went to/for tent: home your
10 १० परंतु लेवी ती रात्र घालवायला तयार झाला नाही. तो उठला आणि निघून गेला, मग यबूस म्हणजे यरूशलेमेच्या जवळ आला; तेव्हा त्याच्याबरोबर खोगीर घातलेल्या गाढवांची जोडी, आणि त्याची उपपत्नी होती.
and not be willing [the] man to/for to lodge and to arise: rise and to go: went and to come (in): come till before Jebus he/she/it Jerusalem and with him pair donkey to saddle/tie and concubine his with him
11 ११ जेव्हा ते यबूसजवळ होते तेव्हा दिवस फार उतरला होता, म्हणून त्याच्या नोकराने आपल्या धन्याला म्हटले, “चला, आपण बाजूला वळून यबूसी यांच्या नगराकडे जाऊ आणि त्यामध्ये रात्र घालवू.”
they(masc.) with Jebus and [the] day to go down much and to say [the] youth to(wards) lord his to go: come! [emph?] please and to turn aside: turn aside to(wards) city [the] Jebusite [the] this and to lodge in/on/with her
12 १२ त्याचा धनी त्यास म्हणाला, “जे इस्राएलाचे लोक नाहीत अशा परक्यांच्या नगरात आम्ही वळणार नाही; तर गिबा तेथवर जाऊ.”
and to say to(wards) him lord his not to turn aside: turn aside to(wards) city foreign which not from son: descendant/people Israel they(fem.) and to pass till Gibeah
13 १३ लेवीने आपल्या नोकराला सांगितले, “चल, आपण गिबा किंवा रामा या नगरांपैकी एका ठिकाणी पोहचू आणि त्यामध्ये रात्र घालवू.”
and to say to/for youth his (to go: follow [emph?] *Q(K)*) and to present: come in/on/with one [the] place and to lodge in/on/with Gibeah or in/on/with Ramah
14 १४ मग ते पुढे चालत गेले; आणि बन्यामिनाचा प्रदेश जो गिबा त्याच्याकडे आल्यावर सूर्य मावळला.
and to pass and to go: went and to come (in): come to/for them [the] sun beside [the] Gibeah which to/for Benjamin
15 १५ तेव्हा गिब्यात वस्ती करायला ते तिकडे वळले, नंतर तो जाऊन नगराच्या चौकात बसला, परंतु त्यांना रात्री रहावयास कोणी आपल्या घरी घेऊन गेला नाही.
and to turn aside: turn aside there to/for to come (in): come to/for to lodge in/on/with Gibeah and to come (in): come and to dwell in/on/with street/plaza [the] city and nothing man: anyone to gather [obj] them [the] house: home [to] to/for to lodge
16 १६ परंतु पाहा, संध्याकाळी एक म्हातारा मनुष्य शेतातून आपल्या कामावरून येत होता; तोसुद्धा मनुष्य एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातला होता, परंतु गिब्यात उपरा होता आणि त्या ठिकाणातली माणसे बन्यामिनी होती.
and behold man old to come (in): come from deed: work his from [the] land: country in/on/with evening and [the] man from mountain: hill country Ephraim and he/she/it to sojourn in/on/with Gibeah and human [the] place Benjaminite Benjaminite
17 १७ त्याने तर आपली दृष्टी लावून नगराच्या चौकात तो वाटसरू मनुष्य पाहिला; तेव्हा तो म्हातारा मनुष्य म्हणाला, “तू कोठे जात आहेस? तू कोठून आला आहेस?”
and to lift: look eye his and to see: see [obj] [the] man [the] to journey in/on/with street/plaza [the] city and to say [the] man [the] old where? to go: went and from where? to come (in): come
18 १८ तेव्हा तो त्यास म्हणाला, “आम्ही यहूदाच्या बेथलेहेमाहून आलो आहोत, आणि आम्हांला एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडच्या बाजूस जायचे आहे; तेथला मी आहे; यहूदातील बेथलेहेम येथे गेलो होतो, आणि मला परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जावयाचे आहे; परंतु कोणी मला त्यांच्या घरात घेत नाही.
and to say to(wards) him to pass we from Bethlehem Bethlehem Judah till flank mountain: hill country Ephraim from there I and to go: went till Bethlehem Bethlehem Judah and [obj] house: temple LORD I to go: went and nothing man: anyone to gather [obj] me [the] house: home [to]
19 १९ आमच्या गाढवांसाठी वैरण व दाणाही आहे, आणि माझ्यासाठी व तुझ्या दासीसाठी आणि तुझ्या सेवकाच्या बरोबर जो तरुण नोकर आहे त्याच्यासाठी भाकर व द्राक्षरसही आहे, कोणत्याही गोष्टीची उणीव नाही.”
and also straw also fodder there to/for donkey our and also food: bread and wine there to/for me and to/for maidservant your and to/for youth with servant/slave your nothing need all word: thing
20 २० तेव्हा त्या म्हाताऱ्या मनुष्याने त्यास अभिवादन केले, “तुझ्याबरोबर शांती असो! मी तुझ्या सर्व गरजांची काळजी घेईन. फक्त चौकात रात्र घालवू नको.”
and to say [the] man [the] old peace to/for you except all need your upon me except in/on/with street/plaza not to lodge
21 २१ तेव्हा त्या मनुष्याने लेवीला आपल्या घरी नेले, आणि गाढवास वैरण दिली, नंतर त्यांनी आपले पाय धुऊन खाणेपिणे केले.
and to come (in): bring him to/for house: home his (and to feed *Q(k)*) to/for donkey and to wash: wash foot their and to eat and to drink
22 २२ ते आनंदात वेळ घालवत असताना, त्या नगरातले दुष्ट लोक, “घराला वेढून आणि दारावर ठोकून, त्या म्हाताऱ्या घरधन्याला म्हणू लागले की, जो मनुष्य तुझ्या घरात आला आहे, त्यास तू बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर समागम करू.”
they(masc.) be good [obj] heart their and behold human [the] city human son: young animal Belial to turn: surround [obj] [the] house: home to beat upon [the] door and to say to(wards) [the] man master: men [the] house: home [the] old to/for to say to come out: send [obj] [the] man which to come (in): come to(wards) house: home your and to know him
23 २३ मग तो मनुष्य, त्या घराचा धनी बाहेर त्यांच्याजवळ जाऊन त्यांना बोलला, “नाही, माझ्या भावांनो मी विनंती करतो अशी वाईट गोष्ट करू नका; हा मनुष्य माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, तर तुम्ही हा दुष्टपणा करू नका.
and to come out: come to(wards) them [the] man master [the] house: home and to say to(wards) them not brother: compatriot my not be evil please after which to come (in): come [the] man [the] this to(wards) house: home my not to make: do [obj] [the] folly [the] this
24 २४ पाहा, माझी कुमारी कन्या व याची उपपत्नी येथे आहेत. मी तिला आता बाहेर आणतो; मग तुम्ही तिची अब्रू घ्या व तुम्हाला जे बरे वाटते तसे तुम्ही तिच्याशी करा; परंतु या मनुष्याशी असे दुष्टाईचे कृत्य करू नका.”
behold daughter my [the] virgin and concubine his to come out: send please [obj] them and to afflict [obj] them and to make: do to/for them [the] pleasant in/on/with eye: appearance your and to/for man [the] this not to make: do word: thing [the] folly [the] this
25 २५ तथापि ती माणसे त्याचे ऐकायला तयार झाली नाहीत; तेव्हा त्या मनुष्याने आपली उपपत्नी घेऊन आणि बाहेर त्यांच्याजवळ आणली. मग त्यांनी तिच्यासोबत कुकर्म केले आणि सारी रात्र वाईट रीतीने वागवले आणि पहाट झाली असता तिला सोडले.
and not be willing [the] human to/for to hear: hear to/for him and to strengthen: hold [the] man in/on/with concubine his and to come out: come to(wards) them [the] outside and to know [obj] her and to abuse in/on/with her all [the] night till [the] morning and to send: let go her (like/as to ascend: dawn *Q(K)*) [the] dawn
26 २६ तेव्हा पहाटेच्या वेळेस ती स्त्री येऊन जेथे आपला धनी होता, त्या मनुष्याच्या घराच्या दाराजवळ उजेड होईपर्यंत पडून राहिली.
and to come (in): come [the] woman to/for to turn [the] morning and to fall: kill entrance house: home [the] man which lord her there till [the] light
27 २७ जेव्हा सकाळी तिच्या धन्याने उठून घराची दारे उघडली, आणि आपल्या मार्गाने जायला तो बाहेर निघाला; तर पाहा, ती त्याची उपपत्नी घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंबरठ्यावर होते.
and to arise: rise lord her in/on/with morning and to open door [the] house: home and to come out: come to/for to go: went to/for way: journey his and behold [the] woman concubine his to fall: kill entrance [the] house: home and hand her upon [the] threshold
28 २८ तेव्हा लेवीने तिला म्हटले, “ऊठ, म्हणजे आपण जाऊ.” परंतु तिने उत्तर दिले नाही; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणी गेला.
and to say to(wards) her to arise: rise and to go: went and nothing to answer and to take: bring her upon [the] donkey and to arise: rise [the] man and to go: went to/for place his
29 २९ मग आपल्या घरी पोहचल्यावर त्याने सुरी घेतली, आणि आपल्या उपपत्नीला घेऊन कापले, तिचा एकएक अवयव कापून बारा तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या प्रत्येक ठिकाणी पाठवून दिले.
and to come (in): come to(wards) house: home his and to take: take [obj] [the] knife and to strengthen: hold in/on/with concubine his and to cut her to/for bone her to/for two ten piece and to send: depart her in/on/with all border: area Israel
30 ३० ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी म्हटले, “मिसर देशातून इस्राएल लोक पुन्हा आले, त्या दिवसापासून आजपर्यंत यासारखी गोष्ट घडली नाही, आणि कधी दृष्टीस पडली नाही; याविषयी तुम्ही विचार करा! आम्हांला सल्ला द्या! काय करावे ते आम्हांला सांगा!”
and to be all [the] to see: see and to say not to be and not to see: see like/as this to/for from day to ascend: rise son: descendant/people Israel from land: country/planet Egypt till [the] day: today [the] this to set: consider to/for you upon her to plan and to speak: speak