< शास्ते 16 >

1 शमशोन पलिष्टी प्रदेशाच्या गज्जा शहरास गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली आणि तो तिच्याजवळ गेला.
Elment Sámson Azzába; ott meglátott egy parázna asszonyt és bement hozzá.
2 गज्जेकरास सांगण्यात आले की, “शमशोन तिथे आला आहे.” गज्जकरांना ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्याच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पाहत राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळ उजडेपर्यंत आपण वाट पाहू या आणि मग आपण त्यास जिवे मारू.
Megmondták az Azzabelieknek: eljött ide Sámson; erre körülálltak és leselkedtek reá egész éjjel a város kapujában. Hallgatag voltak egész éjjel, mondván: a reggel fölvirradtáig megöljük.
3 शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछान्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीचे दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व, दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले, आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले.
S feküdt Sámson éjfélig, fölkelt éjfélkor, megragadta a város kapujának ajtait meg a két félfát, kirántotta a retesszel együtt és vállaira tette; fölvitte a hegy tetejére, mely Chebrón előtt van.
4 त्यानंतर असे झाले की, तो सोरेक खोऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रीवर प्रेम करू लागला; तिचे नाव तर दलीला होते.
Történt ezután, megszeretett egy asszonyt Szórék völgyében, neve Delíla.
5 पलिष्ट्यांचे राज्याधिकारी तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, शमशोनाचे महान सामर्थ्य कशात आहे आणि आम्ही “त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्यास बांधू, कशा प्रकारे आम्ही त्यास नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ शकू ते युक्तीने विचार. तू हे करशील तर आम्ही प्रत्येकजण तुला अकराशे चांदीची नाणी देऊ.”
Ahhoz fölmentek a filiszteusok fejedelmei és mondták neki: Beszéld őt rá és nézd, miáltal nagy az ereje és miképpen bírnánk vele és megkötözzük őt, hogy lealázzuk; mi pedig adunk neked ki-ki ezer meg száz ezüstöt.
6 आणि त्यामुळे दलीला शमशोनाला म्हणाली, “मी विनंती करते तुझे महान बळ कशात आहे, आणि तुला कोणीही कशाने बांधले म्हणजे तू शक्तीहीन होशील, ते मला सांग.”
Szólt Delíla Sámsonhoz: Mondd meg csak nekem, miáltal nagy az erőd és mivel kötözhetnek meg, hogy lealázzanak?
7 तेव्हा शमशोनाने तिला सांगितले, “धनुष्याच्या न सुकलेल्या अशा सात हिरव्या वाद्यांनी, जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.”
Szólt hozzá Sámson: Ha megkötöznek engem hét nyers ínnal, melyeket meg nem szárítottak, akkor elgyengülök és olyan leszek, mint akármely ember.
8 नंतर पलिष्ट्यांचे अधिकारी सात सालपटे जी सुकली नव्हती, अशी ते घेऊन दलीलाकडे आले, आणि तिने त्यास त्यांनी बांधले.
És fölvittek neki a filiszteusok fejedelmei hét nedves inat, melyeket meg nem szárítottak; és megkötözte őt azokkal –
9 तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसली होती, आणि तिने त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुजवर चालून आले आहेत!” परंतु त्याने जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो तशा धनुष्याच्या त्या सात हिरव्या वाद्या तोडून टाकल्या. आणि त्याच्या बळाचे रहस्य त्यांना समजू शकले नाही.
a lestálló pedig várt nála a kamarában – és szólt hozzá: Filiszteusok ellened, Sámson! Ekkor szétszakította az inakat, mint szétszakad a csepűfonál, mikor tüzet szagol, s nem tudódott ki az ereje.
10 १० दलीला, शमशोनाला म्हणाली, “पाहा, तुम्ही मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली. तुमच्यावर कशाने मात करता येईल ते, मी विनंती करते, मला सांग.”
És szólt Delíla Sámsonhoz: Íme, ámítottál engem és hazugságokat beszéltél nekem; most mondd meg csak nekem, mivel kötözhetnek meg téged?
11 ११ तेव्हा त्याने तिला सांगितले, “जे कधी कामात वापरले नाहीत अशा नव्या दोरांनी जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.”
Szólt hozzá: Ha jól megkötöznek új kötelekkel, melyekkel nem végeztek munkát, akkor elgyengülök és olyan leszek, mint akármely ember.
12 १२ तेव्हा दलीलाने नवे दोर घेऊन त्याने त्यास बांधले, आणि त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले आहेत.” तेव्हा ते आतल्या खोलीत वाट पाहत बसले होते. परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले.
S vett Delíla új köteleket, megkötözte őt azokkal és szólt hozzá: Filiszteusok ellened, Sámson! A lestálló pedig várta a kamarában – és leszakította karjáról, mint madzagot.
13 १३ दलीला शमशोनाला म्हणाली, “आतापर्यंत तुम्ही मला फसवत आणि माझ्याशी लबाड्याच करत आला आहात. तुमच्यावर कशाने मात करता येईल, हे मला सांगा.” तेव्हा त्याने तिला सांगितले, जर तू “माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागाबरोबर विणशील आणि नंतर विणकाराच्या फणीच्या नखात वळवशील तर मी इतर मनुष्यासारखा होईन.”
És szólt Delíla Sámsonhoz: Mindeddig ámítottál engem és hazugságokat beszéltél nekem; mondd meg nekem, mivel kötözhetnek meg téged? Szólt hozzá: Ha összeszövöd hajamnak hét fonatját a szövedékkel.
14 १४ तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस विणकाराच्या फणीमध्ये धाग्यांबरोबर ताणून बांधले आणि नंतर मागावर विणले; आणि ती त्यास म्हणाली, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आलेत!” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला.
S beleütötte a szöget és szólt hozzá: Filiszteusok ellened, Sámson! Erre fölébredt álmából és kirántotta a szövőszöget meg a szövedéket.
15 १५ ती त्यास म्हणाली, “तुमचे रहस्य जर तुम्ही मला सांगत नाहीतर, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे तुम्ही कसे म्हणू शकता? तीन वेळा तुम्ही माझी थट्टा केली, आणि आपले महान बळ कशात आहे हे मला सांगितले नाही.”
S mondta neki: Hogyan mondhatod: szeretlek, holott szíved nincsen velem? Immár háromszor ámítottál engem és nem mondtad meg nekem, miáltal nagy az erőd.
16 १६ तिने आपल्या बोलण्याने त्याच्यावर दडपण आणले आणि कटकट करून त्यावर असा दबाव आणला की, त्यास मरून जावेसे वाटू लागले.
És volt, midőn faggatta őt szavaival minden nap és szorította, halálig csüggedt el a lelke.
17 १७ म्हणून शमशोनाने तिला सर्वकाही सांगितले, आणि म्हणाला, “माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीच वस्तरा फिरविला गेला नाही; कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे; जर माझे मुंडन झाले, तर माझे बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन इतर मनुष्यांसारखा होईन.”
Ekkor föltárta neki egész szívét és szólt hozzá: Borotva nem jutott fejemre, mert Isten názírja vagyok anyám méhétől fogva; ha lenyírnak, akkor távozik tőlem az erőm, elgyengülök és olyan leszek, mint akármely ember.
18 १८ जेव्हा दलीलाने पाहिले त्याने आपले सर्वकाही सत्य सांगितले तेव्हा; तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांस बोलावणे पाठवले म्हणाली, “पुन्हा या, कारण त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी आपल्या हाती रुपे घेऊन तिच्याकडे गेले.
Látta Delíla, hogy föltárta neki egész szívét, akkor küldött és hivatta a filiszteusok fejedelmeit, mondván: Ez egyszer jöjjetek fel, mert föltárta nekem egész szívét. – És felmentek hozzá a filiszteusok fejedelmei és fölvitték a pénzt kezükben. –
19 १९ मग तिने त्यास आपल्या मांडीवर गाढ झोपवले. नंतर तिने मनुष्यास बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा कापल्या. तिने त्यास ताब्यात आणण्यास सुरवात केली, आणि त्याचे बळ त्याच्यातून निघून गेले.
És elaltatta őt térdein, hívott egy embert és lenyírta hajának hét fonatfát; így kezdte őt lealázni, és eltávozott tőle az ereje.
20 २० ती म्हणाली, “हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत.” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन उठला म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हालवून सुटेल. परंतु परमेश्वराने त्यास सोडले होते, हे त्यास कळले नाही.
És mondta: filiszteusok ellened, Sámson! Erre fölébredt álmából és mondta: Kijutok, mint egyszer-másszor, és lerázom magamról. De ő nem tudta, hogy az Örökkévaló eltávozott tőle.
21 २१ पलिष्ट्यांनी तर त्यास धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर त्यास खाली गज्जात नेऊन पितळेच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदिशाळेत धान्य दळीत असे.
Ekkor megfogták őt a filiszteusok és kiszúrták szemeit; levitték Azzába és megkötözték bilincsekkel, és őrlenie kellett neki a foglyok házában.
22 २२ तथापि त्याचे मुंडन झाल्यांनतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले.
S kezdett megnőni fejének haja, miután lenyíratott.
23 २३ मग पलिष्ट्यांचे अधिकारी आपला देव दागोन याच्यासाठी मोठा यज्ञ अर्पण करावयास एकत्र जमले; कारण ते म्हणाले, “आमच्या देवाने आमचा शत्रू शमशोन आमच्या हाती दिला आहे.”
A filiszteusok fejedelmei pedig összegyűltek, hogy tartanak nagy áldozatot Dágón istenüknek, meg örömünnepre; és mondták: Kezünkbe adta istenünk Sámsont, a mi ellenségünket.
24 २४ तेव्हा लोकांनी त्यास पाहून त्यांच्या देवाची स्तुती केली; त्यांनी असे म्हटले की, “आमच्या देवाने, जो आमचा शत्रू त्याच्यावर, विजय मिळवला आहे आणि देशात आमचा नाश करणारा, ज्याने आमच्यातल्या पुष्कळांना मारले, त्यास आमच्या देवाने आमच्या हाती दिले आहे.”
Meglátta őt a nép, és dicsérték istenüket, mert mondták: Kezünkbe adta istenünk ellenségünket, országunk pusztítóját s a ki megsokasította elesettjeinket!
25 २५ आणि ते जेव्हा आनंद साजरा करत होते तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही शमशोनाला बोलवा, म्हणजे तो आमची करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला बंदिवानांच्या घरातून बोलावले, आणि तो त्यांच्यापुढे थट्टेचे पात्र झाला, आणि त्यांनी त्यास खांबांच्या मध्ये उभे केले होते.
És volt, midőn jó kedvük lett, azt mondták: Hívjátok Sámsont, hogy játszadozzon nekünk. És hívták Sámsont a foglyok házából és játszadozott előttük, és állították őt az oszlopok közé.
26 २६ शमशोन त्याचा हात धरणाऱ्या मुलाला म्हणाला, “ज्या खांबांचा ह्या इमारतीला आधार आहे, ते मी चाचपावे म्हणून तू मला त्यांजवळ ने, म्हणजे मी त्याच्यावर टेकेन.”
Ekkor szólt Sámson a fiúhoz, ki őt kezénél fogta: Hagyj engem, hadd tapogatom meg az oszlopokat, melyeken áll a ház, majd támaszkodom rájuk.
27 २७ ते सभागृह तर पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते, आणि पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे होते; सुमारे तीन हजार स्त्री-पुरूष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते.
A ház pedig tele volt férfiakkal és asszonyokkal, és ott voltak mind a filiszteusok fejedelmei; a tetőn pedig mintegy háromezer férfi és asszony, a kik nézték Sámson játékát.
28 २८ तेव्हा शमशोनाने परमेश्वर देवाला हाक मारीत म्हटले, “हे प्रभू देवा, कृपाकरून माझी आठवण कर, आणि हे देवा, या वेळेस एकदाच मात्र कृपा करून मला बळकट कर; म्हणजे मी आपल्या दोन डोळ्यांविषयी पलिष्ट्यांचा एकदम सूड उगवून घेईन.”
Ekkor kiáltott Sámson az Örökkévalóhoz és mondta: Uram, Örökkévaló, emlékezzél, kérlek, meg rólam és erősíts meg csak ez egyszer, oh Isten, hadd álljak bosszút egy bosszúval két szememért a filiszteusokon.
29 २९ नंतर ज्या दोन मधल्या खांबांवर ते सभागृह उभे राहिलेले होते, आणि ज्यांचा त्यास आधार होता, त्यांच्यातला एक शमशोनाने आपल्या उजव्या हाताने आणि दुसरा आपल्या डाव्या हाताने धरला.
Erre átfogta Sámson a középső hét oszlopot, melyeken állt a ház, és rájuk támaszkodott: az egyiket jobbjával, a másikat baljával.
30 ३० तेव्हा शमशोन म्हणाला, “पलिष्ट्यांच्या बरोबर माझाही जीव जावो!” मग त्याने सर्व बळ एकवटून ते खांब ढकलले, आणि ते सभागृह त्या अधिकाऱ्यांवर व त्यातल्या सर्व लोकांवर पडले. अशा रीतीने तो जिवंत असताना त्याने जितके मारले होते, त्यांपेक्षाही त्याच्या मरणाच्या वेळी त्याने जे मारले ते अधिक होते.
És mondta Sámson: Haljon meg lelkem a filiszteusokkal együtt! Neki hajolt erővel és ledőlt a ház a fejedelmekre és az egész népre, mely benne volt; és számosabbak voltak a halottak, kiket megölt halálában, mint a kiket megölt életében.
31 ३१ नंतर त्याचे भाऊ व त्याच्या पित्याचे घरचे सर्व लोक यांनी खाली जाऊन त्यास उचलून आणले, आणि त्यास नेऊन सरा व अष्टावोल यामध्ये त्याचा पिता मानोहा याच्या कबरेत पुरले; त्याने तर वीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
És lementek testvérei és atyjának egész háza, fölvették őt, fölmentek és eltemették őt Czorea és Estáól között, atyjának Mánóachnak sírjában. Ő pedig bírája volt Izraélnek húsz évig.

< शास्ते 16 >