< शास्ते 14 >
1 १ नंतर शमशोन खाली तिम्ना नगरात गेला, आणि त्याने तिम्नामध्ये पलिष्ट्यांच्या मुलींमध्ये एक स्त्री पाहिली.
Šel pak Samson do Tamnata, a uzřel tam ženu ze dcer Filistinských.
2 २ तो जेव्हा माघारी आला तेव्हा त्याने आपल्या बापाला व आईला ह्याविषयी सांगितले, “मी तिम्नात पलिष्ट्यांची एक मुलगी पाहिली आहे; तर आता तुम्ही ती मला पत्नी करून द्या.”
A navrátiv se, oznámil otci svému a mateři své, řka: Viděl jsem ženu v Tamnata ze dcer Filistinských, protož nyní vezměte mi ji za manželku.
3 ३ परंतु त्याचे आई व बाप त्यास म्हणाले, “तुझ्या नातेवाईकांत किंवा तुझ्या लोकांमध्ये कोणी मुली नाहीत काय, म्हणून तू बेसुंती पलिष्ट्यांतली पत्नी करून घ्यायला जात आहेस?” तथापि शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मजसाठी मिळवून द्या; कारण जेव्हा मी तिच्याकडे बघितले तेव्हाच मला ती पसंत पडली आहे.”
I řekl mu otec jeho a matka jeho: Zdali není mezi dcerami bratří tvých a ve všem lidu mém ženy, že sobě vzíti chceš manželku z Filistinských neobřezaných? Odpověděl Samson otci svému: Tuto vezměte mi, nebť mi se líbí.
4 ४ परंतु ही तर परमेश्वराची इच्छा होती की पलिष्ट्यांबरोबर परस्पर विरोध व्हावा, त्याच्या आई आणि बापाला हे समजले नव्हते; कारण त्या वेळेस पलिष्टी इस्राएलावर राज्य करत होते.
Otec pak jeho a matka jeho nevěděli, by to od Hospodina bylo, a že příčiny hledá od Filistinských; nebo toho času panovali Filistinští nad Izraelem.
5 ५ यानंतर शमशोन आणि त्याचे आईबाप खाली तिम्ना येथे जात होते, आणि तिम्नातल्या द्राक्षमळ्यांपर्यंत ते पोहचले, तेव्हा तेथे तरुण सिंह गर्जना करून आला आणि त्याच्या अंगावर येऊ लागला.
Tedy šel Samson a otec jeho i matka jeho do Tamnata. Když pak přišli k vinicím Tamnatským, a aj, lev mladý řvoucí potkal se s ním.
6 ६ तेव्हा परमेश्वराचा आत्मा अचानक त्याच्यावर आला, आणि त्याच्या हाती काही नसताही त्याने जसे करडू फाडावे, तसे सिंहाला सहजरीत्या फाडून टाकले; परंतु त्याने जे केले होते ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही.
I sstoupil na něj Duch Hospodinův, a roztrhl lva, jako by roztrhl kozelce, ačkoli nic neměl v rukou svých. A neoznámil otci ani mateři své, co učinil.
7 ७ तो गेला आणि जाऊन त्या स्त्रीसोबत बोलला; आणि जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले, तेव्हा शमशोनाला ती पसंत पडली.
Přišed tedy, mluvil s ženou tou, a líbila se Samsonovi.
8 ८ काही दिवसानंतर तो तिच्याशी लग्न करण्यास परत गेला, तेव्हा तो त्या सिंहाचे मृत शरीर पाहायला बाजूला वळला; आणि त्या सिंहाच्या मृत शरीरात मधमाश्यांचा थवा व मध तेथे त्याने पाहिला.
Navracuje se pak po několika dnech, aby ji pojal, uchýlil se, aby pohleděl na mrtvého lva, a aj, v těle jeho byl roj včel a med.
9 ९ त्याने तो मध आपल्या हाताने वर काढून घेतला आणि तो चालता चालता खात गेला, जेव्हा आपल्या आईबापाकडे आला तेव्हा त्याने त्यांनाही त्यातला काही दिला, आणि त्यांनी तो खाल्ला; परंतु त्यांना तो मध त्या सिंहाच्या मृत शरीरातून घेतला आहे हे त्याने सांगितले नाही.
A vybrav jej na ruce své, šel cestou a jedl; a přišed k otci svému a mateři své, dal jim, i jedli. Ale nepověděl jim, že z mrtvého lva vyňal ten med.
10 १० नंतर शमशोनाचा बाप ती स्त्री जिथे होती तिथे उतरून खाली गेला, आणि शमशोनाने तेथे मेजवानी दिली, कारण तरुण पुरुषांमध्ये तशी रुढी होती.
Tedy šel otec jeho k ženě té, a učinil tam Samson hody, nebo tak činívali mládenci.
11 ११ तिच्या नातेवाईकांनी त्यास पाहताच त्याच्याबरोबर राहण्यासाठी त्यास तीस मित्र आणून दिले.
Když pak jej viděli tam, vybrali z sebe třidceti tovaryšů, aby byli při něm.
12 १२ मग शमशोन त्यांना म्हणाला, “आता मी तुम्हाला कोडे सांगतो; मेजवानीच्या सात दिवसात जर तुमच्यातील कोणी जर त्याचे उत्तर शोधून मला सांगितले, तर मी तुम्हाला तागाचे तीस झगे व कपड्यांचे तीस संच जोड देईन.
I řekl jim Samson: Vydám vám pohádku, kterouž jestliže mi právě vysvětlíte za sedm dní těchto hodů a uhodnete, dám vám třidceti čechlů a třidcatero roucho proměnné.
13 १३ परंतु जर तुम्हाला त्याचे उत्तर मिळाले नाही, तर, तुम्ही मला तागाचे तीस झगे व कपड्याचे तीस संच जोड द्यावे.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “तुझे कोडे आम्हांला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकू.”
Jestliže mi pak nebudete moci uhodnouti, dáte vy mně třidceti čechlů a třidcatero roucho proměnné. Kteříž odpověděli jemu: Vydej pohádku svou, ať ji slyšíme.
14 १४ तो त्यास म्हणाला, खाणाऱ्यामधून खाण्याजोगे काही बाहेर निघते, बळकटातून काहीतरी गोड बाहेर निघते. परंतु तीन दिवसात तर त्याच्या पाहुण्यांना त्याचे उत्तर मिळाले नाही.
I řekl jim: Z zžírajícího vyšel pokrm, a z silného vyšla sladkost. I nemohli uhodnouti pohádky té za tři dni.
15 १५ नंतर चौथ्या दिवशी ते शमशोनाच्या पत्नीला म्हणाले, “तू आपल्या नवऱ्याकडून युक्तीने कोड्याचे उत्तर मिळवून आम्हांला सांग, नाही तर आम्ही तुला व तुझ्या वडिलाच्या कुटुंबाला जाळून टाकू; तुम्ही आम्हांला दरिद्री करण्यासाठी म्हणून बोलावले आहे काय?”
Stalo se pak dne sedmého, (nebo byli řekli ženě Samsonově: Namluv muže svého, ať nám vyloží tu pohádku, ať nespálíme tě i domu otce tvého ohněm. Proto-liž, abyste našeho statku dostali, pozvali jste nás? Či co?
16 १६ तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यासमोर रडून म्हणू लागली, “तुम्ही केवळ माझा द्वेष करता! माझ्यावर प्रीती करतच नाही. तुम्ही माझ्या लोकांस तर कोडे सांगितले आहे, परंतु त्याचे उत्तर मला सांगितले नाही.” परंतु शमशोन तिला म्हणाला, “पहा, मी आपल्या आईबापाला ते सांगितले नाही, तर तुला कसे सांगू?”
I plakala žena Samsonova na něj, řkuci: Jistě nenávidíš mne a nemiluješ mne; pohádku jsi vydal synům lidu mého, a mně jí nechceš povědíti. Kterýž řekl jí: Hle, otci mému a mateři neoznámil jsem, a tobě mám povědíti?
17 १७ मेजवानीच्या सातही दिवसांपर्यंत ती त्याच्याकडे रडतच होती; आणि सातव्या दिवशी त्याने तिला त्याचे उत्तर सांगितले, कारण तिने त्याच्यावर खूप दबाव आणला होता. मग तिने त्या कोड्याचे उत्तर तिच्या लोकांच्या नातेवाईकांना सांगितले.
I plakala na něj do sedmého dne, v nichž měli hody). Dne tedy sedmého pověděl jí, nebo trápila jej; kterážto oznámila pohádku synům lidu svého.
18 १८ आणि सातव्या दिवशी सूर्य मावळण्यापूर्वी त्या नगरातल्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “मधापेक्षा गोड ते काय? सिंहापेक्षा बळकट काय आहे?” तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “जर तुम्ही माझ्या कालवडीला नांगराला जुंपले नसते, तर तुम्हाला माझे कोडे उलगडता आलेच नसते.”
Muži tedy města toho dne sedmého, prvé než slunce zapadlo, řekli jemu: Co sladšího nad med, a co silnějšího nad lva? Kterýž řekl jim: Byste byli neorali mou jalovičkou, neuhodli byste pohádky mé.
19 १९ नंतर परमेश्वराचा आत्मा एकाएकी सामर्थ्याने त्याच्यावर आला. शमशोन खाली अष्कलोन नगरास गेला आणि त्याने त्यांच्यातले तीस पुरुष मारले, त्यांना लुबाडून घेतले आणि त्याच्या कोड्याचे उत्तर सांगणाऱ्यांना त्याने ते कपड्यांचे जोड दिले; त्यास खूप राग आला होता, आणि तो त्याच्या वडिलाच्या घरी निघून गेला.
I sstoupil na něj Duch Hospodinův, a šel do Aškalon, a pobil z nich třidceti mužů. A vzav loupeže jejich, dal šaty proměnné těm, jenž uhodli pohádku, a rozhněvav se velmi, odšel do domu otce svého.
20 २० इकडे शमशोनाची पत्नी त्याच्या जवळच्या मित्राला देऊन टाकण्यात आली.
Žena pak Samsonova dostala se jednomu z tovaryšů jeho, kteréhož on byl k sobě připojil.