< शास्ते 13 >
1 १ तेव्हा इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते परत केले, यास्तव परमेश्वराने पलिष्ट्यांना त्यांच्यावर चाळीस वर्षे राज्य करण्याची परवानगी दिली.
Un Israēla bērni darīja joprojām, kas Tam Kungam nepatika; tad Tas Kungs tos nodeva Fīlistu rokā četrdesmit gadus.
2 २ तेव्हा सरा येथला दानांच्या कुळाचा कोणी मनुष्य होता; त्याचे नाव मानोहा होते, आणि त्याची स्त्री वांझ होती, यास्तव तिला लेकरू झाले नव्हते.
Un tur bija viens vīrs no Careas, no Dana cilts, un viņa vārds bija Manoūs, un viņa sieva bija neauglīga un nedzemdēja.
3 ३ तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिले, आणि तिला म्हटले, “पाहा, तू गरोदर राहण्यास असमर्थ होतीस, म्हणून तू पुत्राला जन्म देऊ शकली नाहीस, परंतु आता तू गरोदर होऊन पुत्राला जन्म देशील.
Un Tā Kunga eņģelis parādījās tai sievai un uz to sacīja: redzi, tu esi neauglīga un neesi dzemdējusi, bet tu tapsi grūta un dzemdēsi dēlu.
4 ४ आता तू काळजीपूर्वक राहा मद्य किंवा मादक द्रव्य पिऊ नको, आणि जे नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले ते अन्न खाऊ नको.
Tad nu sargies un nedzer vīna nedz stipra dzēriena un neēd nekā, kas nešķīsts.
5 ५ पाहा, तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याचे केस कधीच कापू नकोस कारण तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्राएलाला पलिष्टयाच्या जाचातून सोडवण्याचा आरंभ करील.”
Jo redzi, tu tapsi grūta un dzemdēsi dēlu, kam uz galvu nebūs nākt nekādam dzenamam nazim, jo tas puisis būs Dievam svētīts (nazīrs) no mātes miesām, un viņš sāks Israēli izpestīt no Fīlistu rokas.
6 ६ तेव्हा त्या स्त्रीने जाऊन आपल्या पतीला असे सांगितले की, “देवाचा मनुष्य माझ्याजवळ आला, आणि त्याचे रूप देवाच्या दूताच्या रूपासारखे फार भयंकर होते. म्हणून, तो कोठला, हे मी त्यास विचारले नाही, आणि त्याने आपले नाव मला सांगितले नाही.
Tad tā sieva nāca un runāja uz savu vīru un sacīja: viens Dieva vīrs pie manis atnāca; viņa ģīmis bija kā Dieva eņģeļa ģīmis, ļoti bijājams, un es viņu nevaicāju, no kurienes tas esot, un viņš man arī savu vārdu neteica.
7 ७ परंतु तो मला म्हणाला, पाहा, तू गरोदर होशील, आणि तू पुत्राला जन्म देशील; तर आता तू दारू आणि मादक द्रव्य पिऊ नको आणि जे काही नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले आहे ते अन्न खाऊ नको; कारण तो बाळ तुझ्या गर्भावस्थेपासून त्याच्या मरणापर्यंत देवाचा नाजीर होईल.
Bet viņš uz mani sacīja: redzi, tu tapsi grūta un dzemdēsi dēlu, un nu nedzer vīna nedz stipra dzēriena, nedz ēd ko, kas nešķīsts, jo tas puisis būs Dievam svētīts no mātes miesām līdz pat savai nāves dienai.
8 ८ तेव्हा मानोहाने परमेश्वराजवळ विनंती करून म्हटले, हे माझ्या प्रभू, माझे ऐक, जो देवाचा मनुष्य तू पाठवला होता, त्याने आमच्याजवळ पुन्हा यावे, आणि जो पुत्र जन्मेल, त्याच्यासाठी आम्ही काय करावे, हे आम्हांला शिकवावे.”
Tad Manoūs pielūdza To Kungu un sacīja: Ak Kungs, lai jel tas Dieva vīrs, ko Tu esi sūtījis, atkal pie mums atnāk un mums māca, ko lai ar to bērnu darām, kas piedzims.
9 ९ तेव्हा देवाने मानोहाचा शब्द ऐकला, यास्तव देवाचा दूत त्या स्त्रीजवळ ती शेतात बसली असता पुन्हा आला तिचा पती मानोहा तिच्यासोबत नव्हता.
Un Dievs paklausīja Manoūs balsi, un tas Dieva eņģelis nāca atkal pie tās sievas; un viņa sēdēja tīrumā, bet Manoūs, viņas vīrs, nebija pie viņas.
10 १० तेव्हा ती स्त्री त्वरीत पळाली आणि आपल्या पतीला म्हणाली: “पाहा, जो पुरुष त्यादिवशी माझ्याजवळ आला होता, तो माझ्या दृष्टीस पडला आहे.”
Tad tā sieva steidzās un skrēja un to pasacīja savam vīram, un uz to sacīja: redzi, tas vīrs man parādījies, kas tai dienā pie manis nāca.
11 ११ मग मानोहा उठून आपल्या पत्नीच्यामागे चालून त्या पुरुषाजवळ गेला, आणि त्यास बोलला, “जो पुरुष माझ्या पत्नीबरोबर बोलला होता,” तो तूच आहेस काय? तेव्हा तो म्हणाला, “होय मीच आहे.”
Tad Manoūs cēlās un gāja savai sievai pakaļ un nāca pie tā vīra un uz to sacīja: vai tu esi tas vīrs, kas uz to sievu runājis? Un tas sacīja: es tas esmu.
12 १२ मग मानोहा म्हणाला, “तुझे शब्द खरे ठरोत; परंतु त्या मुलासाठी काय नियम ठरवले आहेत आणि त्याचे काम काय असेल?”
Tad Manoūs sacīja: kad nu tas notiks, ko tu sacījis, kāds tikums tad būs tam zēnam un kāds būs viņa darbs?
13 १३ तेव्हा परमेश्वराच्या दूताने मानोहाला म्हटले, “जे मी या स्त्रीला सांगितले, त्याविषयी हिने काळजीपूर्वक रहावे.
Un Tā Kunga eņģelis sacīja uz Manoū: no visa, ko es uz to sievu esmu runājis, viņai būs sargāties.
14 १४ द्राक्षवेलापासून जे येते त्यातले काहीही हिने खाऊ नये, आणि मद्य व मादक द्रव्य पिऊ नये, आणि नियमाप्रमाणे जे काही अशुद्ध जाहीर केले आहे ते खाऊ नये; जे सर्व मी हिला आज्ञापिले त्याचे तिने पालन करावे.”
Viņai nebūs ēst nekā, kas no vīna koka izaug, un viņai nebūs dzert ne vīna, ne stipra dzēriena, nedz ēst, kas nešķīsts, visu, ko es viņai esmu pavēlējis, viņai būs turēt.
15 १५ तेव्हा मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “आम्ही तुला विनंती करतो थोडा वेळ थांब, तुझ्यासाठी करडू तयार करण्यास आम्हांला वेळ दे,”
Tad Manoūs sacīja uz Tā Kunga eņģeli: lūdzams, pakavējies un mēs sataisīsim priekš tevis kazlēnu.
16 १६ परंतु परमेश्वराचा दूत मानोहाला बोलला, “मी जरी थांबलो तरी, मी तुझे अन्न खाणार नाही; परंतु जर तू होमार्पण करशील, तर ते तुला परमेश्वर देवाला अर्पण करावे लागेल,” (तेव्हा तो परमेश्वर देवाचा दूत होता, हे मानोहाला कळले नव्हते)
Tad Tā Kunga eņģelis sacīja uz Manoū; jebšu tu mani uzkavētu, tomēr es no tavas maizes neēdīšu, bet ja tu gribi dedzināmo upuri pienest, to tu Tam Kungam vari upurēt. Jo Manoūs nezināja, viņu esam Tā Kunga eņģeli.
17 १७ मग मानोहाने परमेश्वराच्या दूताला म्हटले, “तुझे नाव काय आहे, कारण की तुझे बोलणे खरे ठरल्यावर आम्ही तुझा आदर करू?”
Un Manoūs sacīja uz Tā Kunga eņģeli: kā tavs vārds? Ka tevi varam godāt, kad notiks pēc tava vārda.
18 १८ तेव्हा परमेश्वराचा दूत त्यास म्हणाला, “तू माझे नाव कशासाठी विचारतोस? ते आश्चर्यजनक आहे.”
Tad Tā Kunga eņģelis uz viņu sacīja: kāpēc tu tā vaicā pēc Mana Vārda, kas taču ir brīnišķīgs?
19 १९ मग मानोहाने अन्नार्पणासह करडू घेऊन, परमेश्वर, जो आश्चर्यकर्म करणारा त्यास खडकावर होमार्पण केले; तेव्हा मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना,
Tad Manoūs ņēma kazlēnu un to ēdamo upuri, un to upurēja Tam Kungam uz tās klints; un viņš darīja brīnumu un Manoūs un viņa sieva skatījās.
20 २० जेव्हा अग्नी वेदीवरून आकाशात चढला, तेव्हा परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या अग्नीतून वर आकाशात चढला. मानोहा व त्याची पत्नी यांनी हे पाहिले आणि आपली तोंडे भूमीस लावून नमन केले.
Jo kad liesma no altāra virsas šāvās pret debesi, tad Tā Kunga eņģelis uzkāpa altāra liesmā. Un Manoūs un viņa sieva to redzēja un metās pie zemes uz saviem vaigiem.
21 २१ मग परमेश्वराचा दूत मानोहाच्या व त्याच्या पत्नीच्या दृष्टीस फिरून पडला नाही; तेव्हा मानोहाला कळले की, तो परमेश्वराचा दूत होता.
Un Tā Kunga eņģelis neparādījās vairs ne Manoūm, nedz viņa sievai. Tad Manoūs atzina, ka tas bija Tā Kunga eņģelis.
22 २२ मग मानोहा आपल्या पत्नीला म्हणाला, आपण खचीत मरू, कारण आपण देवाला पाहिले आहे.
Un Manoūs sacīja uz savu sievu: mēs tiešām mirsim, jo mēs esam Dievu redzējuši.
23 २३ तेव्हा त्याची पत्नी त्यास म्हणाली, “जर परमेश्वर देवाला आपल्याला मारायची इच्छा असती, तर त्याने आपल्या हातातून होमार्पण व अन्नार्पण स्वीकारले नसते, आणि या सर्व गोष्टी आपल्याला दाखवल्या नसत्या, तसेच या वेळेसारखे वर्तमान आपल्याला ऐकवले नसते.”
Bet viņa sieva uz viņu sacīja: kad Tas Kungs mūs gribētu nokaut, tad Viņš to dedzināmo upuri un ēdamo upuri nebūtu pieņēmis no mūsu rokām; Viņš arī visas šīs lietas mums nebūtu parādījis, nedz mums to licis dzirdēt šai laikā.
24 २४ नंतर त्या स्त्रीला पुत्र झाला, आणि तिने त्याचे नाव शमशोन ठेवले; तो पुत्र वाढत गेला, या प्रकारे परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला.
Un tā sieva dzemdēja dēlu un nosauca viņa vārdu Simsons, un tas zēns uzauga, un Tas Kungs to svētīja.
25 २५ तेव्हा सरा व अष्टावोल यांच्या दरम्यान महने-दानाच्या छावणीत त्यास परमेश्वराचा आत्मा प्रेरणा करू लागला.
Un Tā Kunga Gars viņu sāka skubināt Dana lēģerī starp Careu un Estaoli.