< शास्ते 11 >

1 गिलादी इफ्ताह पराक्रमी वीर होता, परंतु तो वेश्येचा पुत्र होता, आणि गिलाद त्याचा पिता होता.
و یفتاح جلعادی مردی زورآور، شجاع، وپسر فاحشه‌ای بود، و جلعاد یفتاح را تولیدنمود.۱
2 गिलादाच्या पत्नीने त्यापासून दुसऱ्या पुत्रांना जन्म दिला, आणि जेव्हा त्या स्त्रीचे पुत्र मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला घालवून दिले आणि म्हटले, “आमच्या वडिलाच्या घरी तुला वतन प्राप्त होणार नाही; कारण तू दुसऱ्या स्त्रीचा पुत्र आहेस.”
و زن جلعاد پسران برای وی زایید، وچون پسران زنش بزرگ شدند یفتاح را بیرون کرده، به وی گفتند: «تو در خانه پدر ما میراث نخواهی یافت، زیرا که تو پسر زن دیگر هستی.»۲
3 यास्तव इफ्ताह आपल्या भावांपुढून पळाला, आणि टोब देशात जाऊन राहिला; तेव्हा रिकामटेकडी माणसे इफ्ताहाजवळ मिळून त्याच्याबरोबर चालली.
پس یفتاح از حضور برادران خود فرار کرده، درزمین طوب ساکن شد، و مردان باطل نزد یفتاح جمع شده، همراه وی بیرون می‌رفتند.۳
4 मग काही वेळानंतर असे झाले की अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी लढाई केली.
و واقع شد بعد از مرور ایام که بنی عمون بااسرائیل جنگ کردند.۴
5 जेव्हा अम्मोनी लोक इस्राएलाशी लढत असताना असे झाले की गिलादाचे वडील मंडळ इफ्ताहाला टोब देशातून परत आणायला गेले.
و چون بنی عمون بااسرائیل جنگ کردند، مشایخ جلعاد رفتند تایفتاح را از زمین طوب بیاروند.۵
6 तेव्हा ते इफ्ताहाला म्हणाले, “तू येऊन आमचा सेनापती हो, कारण आम्ही अम्मोनी लोकांशी लढत आहो.”
و به یفتاح گفتندبیا سردار ما باش تا با بنی عمون جنگ نماییم.»۶
7 इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांना बोलला, “तुम्ही माझा द्वेष करून माझ्या पित्याच्या घरातून मला घालवले की नाही? तर आता तुम्ही संकटात असता, माझ्याजवळ कशाला आला?”
یفتاح به مشایخ جلعاد گفت: «آیا شما به من بغض ننمودید؟ و مرا از خانه پدرم بیرون نکردید؟ و الان چونکه در تنگی هستید چرا نزدمن آمده‌اید؟»۷
8 तेव्हा गिलादाच्या वडीलांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही आता तुझ्याकडे यासाठी आलो आहो की, तू आमच्याबरोबर येऊन अम्मोनी लोकांशी लढाई करावी, मग तू गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांवर आमचा अधिकारी असा होशील.”
مشایخ جلعاد به یفتاح گفتند: «از این سبب الان نزد تو برگشته‌ایم تا همراه ما آمده، بابنی عمون جنگ نمایی، و بر ما و بر تمامی ساکنان جلعاد سردار باشی.»۸
9 तेव्हा इफ्ताह गिलादाच्या वडीलास म्हणाला, “जर तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढायास माघारी नेले, आणि परमेश्वराने त्यांना माझ्या स्वाधीन केले, तर मी तुमचा अधिकारी असा होईन काय?”
یفتاح به مشایخ جلعادگفت: «اگر مرا برای جنگ کردن با بنی عمون بازآورید و خداوند ایشان را به‌دست من بسپارد، آیامن سردار شما خواهم بود.»۹
10 १० तेव्हा गिलादातील वडीलजन इफ्ताहाला बोलले, “जर तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही करीत नाही, तर आपल्यामध्ये परमेश्वर साक्षी होवो.”
و مشایخ جلعاد به یفتاح گفتند: «خداونددر میان ما شاهد باشد که البته برحسب سخن توعمل خواهیم نمود.۱۰
11 ११ मग इफ्ताह गिलादाच्या वडीलांबरोबर गेला, आणि त्या लोकांनी त्यास आपल्यावर अधिकारी व सेनापती असे करून ठेवले; तेव्हा इफ्ताह आपली सर्व वचने मिस्पात परमेश्वरासमोर बोलला.
پس یفتاح با مشایخ جلعاد رفت و قوم او را بر خود رئیس و سردارساختند، و یفتاح تمام سخنان خود را به حضورخداوند در مصفه گفت.۱۱
12 १२ मग इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाजवळ वकील पाठवून म्हटले, “माझ्यात आणि तुझ्यात काय भांडण आहे? तू माझ्याशी लढावयास सैन्य घेऊन माझ्या देशात आमचा देश घेण्यास येत आहेस?”
و یفتاح قاصدان نزد ملک بنی عمون فرستاده، گفت: «تو را با من چه‌کار است که نزد من آمده‌ای تا با زمین من جنگ نمایی؟»۱۲
13 १३ तेव्हा अम्मोनी लोकांचा राजा इफ्ताहाच्या वकिलांना बोलला, “कारण की जेव्हा इस्राएल मिसरातून आले, तेव्हा त्यांनी आर्णोन नदीपासून याब्बोक व यार्देन या नद्यापर्यंत माझा देश होता तो त्यांनी हिरावून घेतला; तर आता तो देश शांतीने परत दे.”
ملک بنی عمون به قاصدان یفتاح گفت: «از این سبب که اسرائیل چون از مصر بیرون آمدند زمین مرا ازارنون تا یبوق و اردن گرفتند، پس الان آن زمینهارا به سلامتی به من رد نما.»۱۳
14 १४ तेव्हा इफ्ताहाने पुन्हा दुसरे वकील अम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठवले.
و یفتاح بار دیگر قاصدان نزد ملک بنی عمون فرستاد.۱۴
15 १५ आणि त्यास म्हटले, इफ्ताह असे सांगतो की इस्राएलाने मवाबाचा देश व अम्मोनी लोकांचा देश घेतला नाही.
و او را گفت که «یفتاح چنین می‌گوید: اسرائیل زمین موآب و زمین بنی عمون را نگرفت.۱۵
16 १६ परंतु जेव्हा इस्राएल मिसरातून निघाले, तेव्हा ते सूफ समुद्राजवळच्या रानांतून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले.
زیرا که چون اسرائیل از مصر بیرون آمدند، در بیابان تا بحر قلزم سفر کرده، به قادش رسیدند.»۱۶
17 १७ मग इस्राएलांनी अदोमी राजाजवळ वकील पाठवून म्हटले, “तू कृपा करून आपल्या देशावरून मला जाऊ दे,” परंतु अदोमी राजाने ऐकले नाही, आणि मवाबी राजाजवळही पाठवले, परंतु तोसुद्धा मान्य झाला नाही; यास्तव इस्राएल कादेशात राहिले.
و اسرائیل رسولان نزد ملک ادوم فرستاده، گفتند: «تمنا اینکه از زمین تو بگذریم. اما ملک ادوم قبول نکرد، و نزد ملک موآب نیز فرستادند و او راضی نشد، پس اسرائیل در قادش ماندند.۱۷
18 १८ आणि त्यांनी रानात चालून अदोम देश व मवाब देश यांना फेरी घातली. असे सूर्याच्या उगवतीकडून मवाब देशास येऊन आर्णोनच्या काठी तळ दिला परंतु ते मवाब सीमेत गेले नाहीत; कारण आर्णोन मवाबाची सीमा आहे.
پس در بیابان سیر کرده، زمین ادوم و زمین موآب را دور زدند و به‌جانب شرقی زمین موآب آمده، به آن طرف ارنون اردو زدند، وبه حدود موآب داخل نشدند، زیرا که ارنون حدموآب بود.۱۸
19 १९ तेव्हा इस्राएलानी अमोऱ्यांचा राजा सीहोन याजवळ, म्हणजे हेशबोनातल्या राजाजवळ वकील पाठवले, “आणि इस्राएलांनी त्यास म्हटले, तू कृपेने आपल्या देशावरून आम्हांला आमच्या ठिकाणापर्यंत जाऊ दे.”
و اسرائیل رسولان نزد سیحون، ملک اموریان، ملک حشبون، فرستادند، واسرائیل به وی گفتند: تمنا اینکه از زمین تو به مکان خود عبور نماییم.۱۹
20 २० पण सीहोनाला इस्राएलावर विश्वास नव्हता म्हणून आपल्या सीमेवरून जाऊ देण्याविषयी तयार झाला नाही, परंतु सीहोनाने आपले सर्व लोक मिळवून आणि याहाज गावात तळ देऊन इस्राएलाशी लढाई केली.
اما سیحون بر اسرائیل اعتماد ننمود تا از حدود او بگذرند، بلکه سیحون تمامی قوم خود را جمع کرده، در یاهص اردوزدند و با اسرائیل جنگ نمودند.۲۰
21 २१ तेव्हा इस्राएलाचा देव परमेश्वर याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले; यास्तव इस्राएलानी त्यांचा नाश केला, आणि त्या देशात राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला.
و یهوه خدای اسرائیل سیحون و تمامی قومش را به‌دست اسرائیل تسلیم نمود که ایشان را شکست دادند، پس اسرائیل تمامی زمین اموریانی که ساکن آن ولایت بودند در تصرف آوردند.۲۱
22 २२ असे त्यांनी आर्णोनपासून याब्बोकपर्यंत आणि रानापासून यार्देनेपर्यंत अमोऱ्यांचे सर्व प्रांत वतन करून घेतले.
و تمامی حدود اموریان را از ارنون تا بیوق و از بیابان تااردن به تصرف آوردند.۲۲
23 २३ तर आता इस्राएलाचा देव परमेश्वर याने आपले लोक इस्राएल याच्यापुढून अमोऱ्यांना घालवले; आणि आता तू त्यांच्या देशाच्या मालमत्तेचा ताबा घेतोस काय?
پس حال یهوه، خدای اسرائیل، اموریان را از حضور قوم خود اسرائیل اخراج نموده است، و آیا تو آنها را به تصرف خواهی آورد؟۲۳
24 २४ तुझा देव कमोश तुला जे वतन देतो, ते तू ठेवशील की नाही? तसे आमचा देव परमेश्वर याने ज्या लोकांस घालवून दिले त्यांच्या सर्व वतनावर आमचा ताबा असावा.
آیا آنچه خدای تو، کموش به تصرف تو بیاورد، مالک آن نخواهی شد؟ وهمچنین هرکه را یهوه، خدای ما از حضور مااخراج نماید آنها را مالک خواهیم بود.۲۴
25 २५ तर आता सिप्पोरपुत्र बालाक मवाब राजा यापेक्षा तू चांगला आहेस की काय? इस्राएलाशी वाद करण्यास त्याने आव्हान दिले काय? त्याने त्याच्याशी कधी लढाई पुकारली काय?
و حال آیا تو از بالاق بن صفور، ملک موآب بهتر هستی وآیا او با اسرائیل هرگز مقاتله کرد یا با ایشان جنگ نمود؟۲۵
26 २६ जेव्हा इस्राएल हेशबोनात व त्याच्या गावात, आणि अरोएर व त्याच्या गावांत, आणि आर्णोनच्या तीरावरल्या सर्व नगरांत तीनशे वर्षे राहिले, त्या वेळेमध्ये तुम्ही ती का काढून घेतली नाहीत.
هنگامی که اسرائیل در حشبون ودهاتش و عروعیر و دهاتش و در همه شهرهایی که بر کناره ارنون است، سیصد سال ساکن بودند پس در آن مدت چرا آنها را باز نگرفتید؟۲۶
27 २७ मी तर तुझा काही अपराध केला नाही, परंतु तू माझ्याशी लढण्याने माझे वाईट करतोस; परमेश्वर जो न्यायाधीश तो आज इस्राएली लोक व अम्मोनी लोक यांमध्ये न्याय करो.
من به تو گناه نکردم بلکه تو به من بدی کردی که با من جنگ می‌نمایی. پس یهوه که داور مطلق است امروز در میان بنی‌اسرائیل و بنی عمون داوری نماید.»۲۷
28 २८ तथापि अम्मोनी लोकांच्या राजाने आपल्याजवळ इफ्ताहाने जी चेतावणी पाठवली ती नाकारली.
اما ملک بنی عمون سخن یفتاح را که به او فرستاده بود، گوش نگرفت.۲۸
29 २९ आणि परमेश्वराचा आत्मा इफ्ताहाला प्राप्त झाला, नंतर गिलाद व मनश्शे यामध्ये तो चहूकडे गेला, आणि गिलादी मिस्पा त्यामध्ये चहूकडे गेला, मग तेथून अम्मोनी लोकांकडे गेला.
و روح خداوند بر یفتاح آمد و او از جلعادو منسی گذشت و از مصفه جلعاد عبور کرد و ازمصفه جلعاد به سوی بنی عمون گذشت.۲۹
30 ३० इफ्ताहाने परमेश्वराजवळ नवस करून म्हटले “जर तू माझ्या हाती अम्मोनी लोक देशील तर,
ویفتاح برای خداوند نذر کرده، گفت: «اگربنی عمون را به‌دست من تسلیم نمایی،۳۰
31 ३१ असे होईल की मी अम्मोनी लोकांपासून शांतीने माघारी आलो तेव्हा मला भेटावयाला जे काही माझ्या घराच्या दाराबाहेर येईल, ते परमेश्वराचे होईल, आणि मी त्याचे होमार्पण यज्ञ करीन.”
آنگاه وقتی که به سلامتی از بنی عمون برگردم، هر‌چه به استقبال من از در خانه‌ام بیرون آید از آن خداوندخواهد بود، و آن را برای قربانی سوختنی خواهم گذرانید.»۳۱
32 ३२ तर इफ्ताह अम्मोनी लोकांविरुद्ध लढावयाला त्याकडे गेला, या प्रकारे परमेश्वराने त्यास विजय दिला.
پس یفتاح به سوی بنی عمون گذشت تا با ایشان جنگ نماید، و خداوند ایشان را به‌دست او تسلیم کرد.۳۲
33 ३३ आणि अरोएरापासून मिन्नीथाजवळ येईपर्यंत त्यास मारून वीस नगरे घेतली, आणि द्राक्षमळ्यांच्या आबेल-करामीमपर्यंत त्यांची फार मोठी कत्तल केली; असे अम्मोनी लोक इस्राएल लोकांच्या स्वाधीन झाले.
و ایشان را از عروعیرتا منیت که بیست شهر بود و تا آبیل کرامیم به صدمه بسیار عظیم شکست داد، و بنی عمون ازحضور بنی‌اسرائیل مغلوب شدند.۳۳
34 ३४ मग इफ्ताह मिस्पात आपल्या घरी आला; तेव्हा पाहा, त्याची कन्या त्यास भेटायला डफ व नाचणारे यांच्यासह बाहेर आली; ती तर त्याचे एकुलते एक मूल होती; तिच्याशिवाय त्यास पुत्र किंवा कन्या नव्हती.
و یفتاح به مصفه به خانه خود آمد و اینک دخترش به استقبال وی با دف و رقص بیرون آمدو او دختر یگانه او بود و غیر از او پسری یادختری نداشت.۳۴
35 ३५ तेव्हा असे झाले की त्याने तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून म्हटले, “हाय! माझ्या मुली! तू मला दु: खाने पिळून टाकले आहे, आणि मला दुःख देणारी यामध्ये तूही आहेस! मी परमेश्वराकडे शपथ वाहिली आहे; यास्तव मला वचनाविरूद्ध वळता येत नाही.”
و چون او را دید، لباس خودرا دریده، گفت: «آه‌ای دختر من، مرا بسیار ذلیل کردی و تو یکی از آزارندگان من شدی، زیرا دهان خود را به خداوند باز نموده‌ام و نمی توانم برگردم.»۳۵
36 ३६ तेव्हा ती त्यास बोलली, “हे माझ्या बापा, तू परमेश्वराकडे नवस केला आहे, तर तू जे वचन दिले त्याप्रमाणे तू माझ्याशी सर्वकाही कर; कारण परमेश्वराने तुझे शत्रू अम्मोनी लोक यांचा तुझ्यासाठी सूड घेतला आहे.”
و او وی را گفت: «ای پدر من دهان خود را نزد خداوند باز کردی پس با من چنانکه ازدهانت بیرون آمد عمل نما، چونکه خداوند انتقام تو را از دشمنانت بنی عمون کشیده است.»۳۶
37 ३७ आणखी तिने आपल्या बापाला म्हटले, “माझ्यासाठी ही एक गोष्ट करा की मला दोन महिन्यांची रजा द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल शोक करेल.”
و به پدر خود گفت: «این کار به من معمول شود. دو ماه مرا مهلت بده تا رفته بر کوهها گردش نمایم وبرای بکریت خود با رفقایم ماتم گیرم.»۳۷
38 ३८ तेव्हा त्याने म्हटले, “जा.” असे त्याने तिला दोन महिने सोडले, आणि ती आपल्या मैत्रिणीबरोबर डोंगरांवर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल रडली.
اوگفت: «برو». و او را دو ماه روانه نمود پس او بارفقای خود رفته، برای بکریتش بر کوهها ماتم گرفت.۳۸
39 ३९ मग दोन महिन्यांच्या शेवटी असे झाले की ती आपल्या बापाजवळ माघारी आली, नंतर त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. तिचा पुरुषाबरोबर कधीच शारीरीक संबंध आला नव्हता, आणि इस्राएलात अशी रित झाली की,
و واقع شد که بعد از انقضای دو ماه نزدپدر خود برگشت و او موافق نذری که کرده بود به او عمل نمود، و آن دختر مردی را نشناخت، پس در اسرائیل عادت شد،۳۹
40 ४० प्रत्येक वर्षी इस्राएलातल्या मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या कन्येचे स्मरण करायाला वर्षातील चार दिवस जात जावे.
که دختران اسرائیل سال به سال می‌رفتند تا برای دختر یفتاح جلعادی چهار روز در هر سال ماتم گیرند.۴۰

< शास्ते 11 >