< यहोशवा 7 >

1 परंतु इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला; यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला.
しかし、イスラエルの人々は奉納物について罪を犯した。すなわちユダの部族のうちの、ゼラの子ザブデの子であるカルミの子アカンが奉納物を取ったのである。それで主はイスラエルの人々にむかって怒りを発せられた。
2 बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले,
ヨシュアはエリコから人々をつかわし、ベテルの東、ベテアベンの近くにあるアイに行かせようとして、その人々に言った、「上って行って、かの地を探ってきなさい」。人々は上って行って、アイを探ったが、
3 नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांनी तेथे जाऊ नये, “फक्त दोन तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांस जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही; कारण ते लोक थोडकेच आहेत.”
ヨシュアのもとに帰ってきて言った、「民をことごとく行かせるには及びません。ただ二、三千人を上らせて、アイを撃たせなさい。彼らは少ないのですから、民をことごとくあそこへやってほねおりをさせるには及びません」。
4 म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या मनुष्यांपुढे त्यांना पळ काढावा लागला.
そこで民のうち、おおよそ三千人がそこに上ったが、ついにアイの人々の前から逃げ出した。
5 आय येथील मनुष्यांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले; आणि त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांचे धैर्य खचले.
アイの人々は彼らのうち、おおよそ三十六人を殺し、更に彼らを門の前からシバリムまで追って、下り坂で彼らを殺したので、民の心は消えて水のようになった。
6 यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्राएलाचे वडील संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले.
そのためヨシュアは衣服を裂き、イスラエルの長老たちと共に、主の箱の前で、夕方まで地にひれ伏し、ちりをかぶった。
7 मग यहोशवा म्हणाला, हायहाय! “हे प्रभू परमेश्वरा; तू या सर्व लोकांस यार्देन ओलांडून का आणले? अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करण्यासाठी आणलेस का? आम्ही समाधानी होऊन यार्देनेच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते!
ヨシュアは言った、「ああ、主なる神よ、あなたはなにゆえ、この民にヨルダンを渡らせ、われわれをアモリびとの手に渡して滅ぼさせられるのですか。われわれはヨルダンの向こうに、安んじてとどまればよかったのです。
8 हे प्रभू, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली; आता मी काय बोलू?
ああ、主よ。イスラエルがすでに敵に背をむけた今となって、わたしはまた何を言い得ましょう。
9 कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरच्या लोकांस आमचे नाव विसरावयास लावतील. तेव्हा तू आपल्या महान नावासाठी काय करणार आहेस?”
カナンびと、およびこの地に住むすべてのものは、これを聞いて、われわれを攻めかこみ、われわれの名を地から断ち去ってしまうでしょう。それであなたは、あなたの大いなる名のために、何をしようとされるのですか」。
10 १० तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, ऊठ, असा पालथा का पडलास?
主はヨシュアに言われた、「立ちなさい。あなたはどうして、そのようにひれ伏しているのか。
11 ११ इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला कराराचा त्यांनी भंग केला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.
イスラエルは罪を犯し、わたしが彼らに命じておいた契約を破った。彼らは奉納物を取り、盗み、かつ偽って、それを自分の所有物のうちに入れた。
12 १२ त्याचा परिणाम म्हणून इस्राएल लोक आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरत नाहीत, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नाश केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्यामध्ये राहणार नाही.
それでイスラエルの人々は敵に当ることができず、敵に背をむけた。彼らも滅ぼされるべきものとなったからである。あなたがたが、その滅ぼされるべきものを、あなたがたのうちから滅ぼし去るのでなければ、わたしはもはやあなたがたとは共にいないであろう。
13 १३ तर उठ, लोकांस पवित्र कर, त्यांना सांग उद्यासाठी स्वतःला पवित्र करा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू अजून आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करून त्यांचा नाश करा. त्या तुमच्यातून काढून त्यांचा सर्वनाश करीपर्यंत शत्रूपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.”
立って、民を清めて言いなさい、『あなたがたは身を清めて、あすのために備えなさい。イスラエルの神、主はこう仰せられる、「イスラエルよ、あなたがたのうちに、滅ぼされるべきものがある。その滅ぼされるべきものを、あなたがたのうちから除き去るまでは、敵に当ることはできないであろう」。
14 १४ सकाळी तुम्ही आपआपल्या वंशाप्रमाणे हजर राहा. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकाएका घराण्याने पुढे यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकाएका पुरुषाने पुढे यावे;
それゆえ、あすの朝、あなたがたは部族ごとに進み出なければならない。そして主がくじを当てられる部族は、氏族ごとに進みいで、主がくじを当てられる氏族は、家族ごとに進みいで、主がくじを当てられる家族は、男ひとりびとり進み出なければならない。
15 १५ ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्यास त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून त्याचा नाश करावा. कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूढपणाचे काम केले आहे.
そしてその滅ぼされるべきものを持っていて、くじを当てられた者は、その持ち物全部と共に、火で焼かれなければならない。主の契約を破りイスラエルのうちに愚かなことを行ったからである』」。
16 १६ यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्राएलाचा एकएक वंश समोर आणला, आणि यहूदा वंश पकडला गेला.
こうしてヨシュアは朝早く起き、イスラエルを部族ごとに進み出させたところ、ユダの部族がくじに当り、
17 १७ मग त्याने यहूदाची कुळे जवळ आणली, तेव्हा जेरह कूळ पकडले गेले. आणि जेरहाच्या कुळातले एकएक घराणे समोर आणण्यात आले तेव्हा जब्दीला पकडण्यात आले.
ユダのもろもろの氏族を進み出させたところ、ゼラびとの氏族が、くじに当った。ゼラびとの氏族を家族ごとに進み出させたところ、ザブデの家族が、くじに当った。
18 १८ मग त्या घराण्यातील एकएका पुरुषास जवळ आणले तेव्हा यहूदा वंशातील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान हा पकडला गेला.
ザブデの家族を男ひとりびとり進み出させたところ、アカンがくじに当った。アカンはユダの部族のうちの、ゼラの子、ザブデの子なるカルミの子である。
19 १९ तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर याला गौरव दे आणि तुझ्या गुन्ह्यांची कबुली कर; कृपा करून तू काय केले ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नको.”
その時ヨシュアはアカンに言った、「わが子よ、イスラエルの神、主に栄光を帰し、また主をさんびし、あなたのしたことを今わたしに告げなさい。わたしに隠してはならない」。
20 २० आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, “मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध पाप केले आहे; आणि मी जे केले ते हे:
アカンはヨシュアに答えた、「ほんとうにわたしはイスラエルの神、主に対して罪を犯しました。わたしがしたのはこうです。
21 २१ लुटीमध्ये एक सुंदर शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या तेव्हा मला त्या घेण्याची इच्छा झाली. माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत आणि रुपे त्याच्या खाली आहे.”
わたしはぶんどり物のうちに、シナルの美しい外套一枚と銀二百シケルと、目方五十シケルの金の延べ棒一本のあるのを見て、ほしくなり、それを取りました。わたしの天幕の中に、地に隠してあります。銀はその下にあります」。
22 २२ तेव्हा यहोशवाने दूत पाठवले. ते तंबूकडे धावत गेले, आणि पाहा, त्याच्या तंबूत त्या वस्तू लपवलेल्या होत्या व त्याच्या खाली रुपे होते.
そこでヨシュアは使者たちをつかわした。使者たちが天幕に走っていって見ると、それは彼の天幕に隠してあって、銀もその下にあった。
23 २३ त्याने त्या तंबूतून काढून यहोशवा आणि सर्व इस्राएल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या.
彼らはそれを天幕の中から取り出して、ヨシュアとイスラエルのすべての人々の所に携えてきたので、それを主の前に置いた。
24 २४ त्यानंतर यहोशवाने व त्यासोबतच्या सर्व इस्राएल लोकांनी जेरहाचा पुत्र आखान याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याची मुले व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडेमेंढरांचे कळप, त्याचा तंबू व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले.
ヨシュアはすべてのイスラエルびとと共に、ゼラの子アカンを捕え、かの銀と外套と金の延べ棒、および彼のむすこ、娘、牛、ろば、羊、天幕など、彼の持ち物をことごとく取って、アコルの谷へ引いていった。
25 २५ यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्यास दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.
そしてヨシュアは言った、「なぜあなたはわれわれを悩ましたのか。主は、きょう、あなたを悩まされるであろう」。やがてすべてのイスラエルびとは石で彼を撃ち殺し、また彼の家族をも石で撃ち殺し、火をもって焼いた。
26 २६ त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली; ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला राग शांत झाला. यावरुन त्या स्थळाला आजपर्यंत अखोरचे खोरे असे म्हणतात.
そしてアカンの上に石塚を大きく積み上げたが、それは今日まで残っている。そして主は激しい怒りをやめられたが、このことによって、その所の名は今日までアコルの谷と呼ばれている。

< यहोशवा 7 >