< यहोशवा 22 >
1 १ मग यहोशवाने रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला बोलावले;
那時若蘇厄將勒烏本人加特人和默納協半支派的人召來,
2 २ तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचा सेवक मोशे याने जे तुम्हाला आज्ञा करून जे सांगितले होते ते सर्वकाही तुम्ही केले आणि जे मी तुम्हाला आज्ञापिले त्या सर्वांविषयी तुम्ही माझी वाणी ऐकली
對他們說:「上主僕人梅瑟吩咐你們的一切,你們都遵守了,在我吩咐他們的一切事上,你們也都聽了我的話。
3 ३ मागील सर्व दिवसांमध्ये आणि आजपर्यंत तुम्ही आपल्या भावांना सोडले नाही. परंतु आपला देव परमेश्वर याच्या सूचनांचे आणि आज्ञांचे काटेकोरपणे पालन केले आहे.
這許多日子,你們從來沒有你們的的弟兄,直到今天,忠信遵守了上主你們天主的命令。
4 ४ आणि तुमचा देव परमेश्वर याने आपल्या त्याने विसावा दिला आहे; तेव्हा तुम्ही आता माघारी फिरा, आणि परमेश्वराचा सेवक मोशेने यार्देनेच्या पलीकडे दिलेला जो तुमचा स्वतःचा प्रदेश त्यामध्ये आपापल्या तंबूत जाऊन राहा.
現在上主我們的天主,照衪所應許的,使你們的弟兄獲得了安居,你們現在可返回自己的帳幕,回到上主的僕人梅瑟在約旦河東岸,賜你們為產業的地方去,
5 ५ तेव्हा परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या आज्ञा आणि जे शास्त्र दिले आहे; त्याचे काटेकोरपणे पालन करण्याविषयी जपा. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी, सर्व मार्गांत त्याचे अनुसरण करावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याच्याशी बिलगून रहावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार जपा.”
只要要你們遵守上主的僕人梅瑟吩咐你們的誡命和法律:愛慕上主你們的天主,遵行衪的一切道路,謹守衪的誡命,全心人靈歸屬上主,服事上主。」
6 ६ यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला, मग ते आपआपल्या तंबूकडे गेले.
若蘇厄於是祝福了他們,打發他們回去;他們就返回了自己的帳幕。──
7 ७ मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते परंतु त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने त्यांच्या भावांमध्ये पश्चिमेस यार्देनेच्या पश्चिमेला दिले होते; आणखी जेव्हा यहोशवाने त्यांना त्यांच्या तंबूकडे जायला निरोप दिला, आणि त्यांना आशीर्वाद दिला.
梅瑟在巴商已分給了默納協半支派土地。至於另半個支派,若蘇厄在約旦河西,在他們的弟兄中,也分給了他們土地,此外,當若蘇厄打發他們回帳幕的時候,祝福了他們,
8 ८ तेव्हा त्याने त्यांना असे सांगितले की, “बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रुपे आणि सोने, तांबे व लोखंड, आणि पुष्कळ वस्त्रे घेऊन तुम्ही आपल्या तंबूकडे माघारी जा आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या.”
向他們說:「現在你們帶著這許多財物、牛、羊、金銀、銅鐵,和大批衣服回到自己的帳幕,也要將你們從由敵人奪得的財物,分給你們的弟兄! 」
9 ९ मग रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश कनानाच्या देशातल्या शिलोहून इस्राएलाच्या इतर वंशजांतून निघून आपला वतनी गिलाद देश, जो मोशेकडून परमेश्वराने सांगितल्यावरून त्यांच्या वतनाचा झाला, त्यामध्ये जाण्यास माघारी चालले.
勒烏本人、召集人和默納協半支派的人,於是從客納罕的史羅起身,離開以色列人,回到自己得為產業的基肋阿得,即上主藉梅瑟吩咐給他們作為產業的地方。
10 १० तेव्हा यार्देन नदीच्या पश्चिमेच्या कनानातील गलीलोथ येथे रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश पोहचल्यावर, त्यांनी तेथे यार्देनेजवळ मोठी प्रेक्षणीय अशी वेदी बांधली.
當勒烏本人、加得和默納協半支派的人來到屬客納罕地的約旦河附近地區時,在約旦河邊築了一座祭壇,一座高大可觀的祭壇。
11 ११ तेव्हा इस्राएलाच्या इतर लोकांनी असे ऐकले की, पाहा, रऊबेनाचा वंश व गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश यानी कनान देशासमोर यार्देनेवरले गलीलोथ येथे, “जेथे इस्राएलाचे लोक उतरून आले होते तेथे एक वेदी बांधली आहे.”
以色列人聽見說:「看,勒烏本人、加得人和默納協半支派的人,在屬客納罕地的約旦河附近地區,以色列子民境內,築了一座祭壇。」
12 १२ असे जेव्हा इस्राएल लोकांच्या साऱ्या मंडळीने ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांचा सर्व समुदाय त्यांच्याविरुद्ध लढावयास शिलो येथे एकत्र जमला.
以色列子民一聽說這事,全會眾便聚集在史羅,要去作戰攻打他們。
13 १३ त्यानंतर इस्राएल लोकांनी, रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशांकडे गिलाद येथे निरोपे पाठविले. त्यांनी एलाजार याजक याचा पुत्र फिनहास यालाही पाठवले.
以色列子民便委派厄肋阿匝爾的兒子丕乃哈斯司祭,到基肋阿得地方去見勒烏本人、加得人和默納協半支派人,
14 १४ आणि त्याच्याबरोबर इस्राएलाच्या प्रत्येक वंशातील पूर्वजांच्या घराण्याचा एकएक अधिकारी असे दहा अधिकारी पाठवले; आणि त्यांच्यातील प्रत्येकजण इस्राएलातील आपापल्या वंशाचा प्रमुख होता.
和他們同去的尚有十位領袖,每支派一個,他們都是以色列各家族的族長。
15 १५ तेव्हा गिलाद देशात रऊबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश त्याच्याकडे येऊन त्यांनी येऊन असे सांगितले,
他們來到基肋阿得地方,見勒烏本人、加得人和默納協半支派人,向他們說:
16 १६ परमेश्वराचा सर्व लोकसमुदाय असे म्हणतो की, तुम्ही इस्राएलाच्या देवाविरुद्ध असे पातक का केले? आज या दिवशी तुम्ही वेदी बांधून, परमेश्वराचे अनुसरण करण्याद्वारे परमेश्वराविरुद्ध बंड केले नाही काय?
「上主的全會眾這樣說:你們相反以色列的天主,犯這不信的罪,有什麼意思﹖為什麼你們今天離開上主,另建立祭壇,公開背叛上主﹖
17 १७ पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही,
以前敬拜培敖爾的罪萵為我們還不夠嗎﹖為了那個罪過,災禍降於上主的會眾,直到今天,我們還沒洗淨:
18 १८ सध्याच्या ह्या दिवसात परमेश्वरास अनुसरण्याचे तुम्ही सोडून देत आहात काय? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडाळी केली तर उद्या सर्व इस्राएल मंडळीवर त्याचा क्रोध होईल.
看,你們今天又要離開上主,你們今天違背上主,明天衪必向以色列全會眾發怒。
19 १९ आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुद्ध असला, तर परमेश्वर वतनाच्या देशात, जेथे परमेश्वराचा निवासमंडप राहत आहे तेथे उतरून या, आणि आमच्यामध्ये वतन करून घ्या, परंतु आमचा देव परमेश्वर याच्या वेदी व्यतिरिक्त तुमच्यासाठी दुसरी वेदी बांधून आमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध आणि आमच्याविरुद्ध ही बंड करू नका.
如果你們認為所得的地方不潔,可以回到上主的地方,上主帳幕的所在地,住在我們中間;決不可違背上主,激怒我們,在上主我們的祭壇以外,為自己另築祭壇。
20 २० जेरहाचा पुत्र आखान याने समर्पित वस्तुंविषयी आज्ञेचा भंग केला, आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरुष आपल्या अपराधामुळे एकटाच मेला नाही.
以前則辣黑的子孫阿干,在應毀滅的財物上犯了不忠之罪,雖只他一人犯罪,憤怒豈不是臨到以色列全會眾﹖死在他罪過中的不只他一人」。
21 २१ तेव्हा रऊबेन वंश, व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यांनी इस्राएलाच्या हजार हजार लोकांवर जे जे अधिकारी होते त्यांनी उत्तर देऊन म्हटले,
勒烏本人、加得和默納協半支派的人,回答以色列的首長說:
22 २२ जो समर्थ देव परमेश्वर! जो समर्थ देव परमेश्वर! तो जाणतो; आणि इस्राएल, तोसुद्धा जाणील; हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वराविरुद्ध उल्लंघन असल्यास तू आज आम्हांला वाचवू नकोस;
「大能者天主上主,大能者天主上主清楚知道,以色列也明白:如果我們有違背或干犯上主的事,願衪今天別救我們!
23 २३ परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही जर ही वेदी बांधली, तिच्यावर होमार्पण, पेयार्पण आणि शांत्यर्पणाचे यज्ञ करण्यासाठी जर बांधली असेल, तर त्याबद्दल परमेश्वर स्वतःचे आमचे पारिपत्य करो.
如果我們建築這祭壇,有意離開上主,或有意在祭壇上祭全燔祭、素祭或和平祭,願上主自己懲罰我們!
24 २४ कदापि नाही, आम्ही अशा भीतीने विचार केला कि कदाचित पुढील काळी तुमचे पुत्र आमच्या पुत्रांना म्हणतील की इस्राएलाचा देव परमेश्वर याच्याशी तुमचा काय संबंध आहे?
我們做這事,其實正是顧慮到:將來你們的子孫會對我們的子孫說:你們和上主以色列的天主有什麼關係﹖
25 २५ हे रऊबेनी व गादी लोकहो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे; तुम्हाला परमेश्वरावर हक्क नाही. अशा प्रकारे तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराचे भय धरण्यापासून परावृत्त करतील.
天主定了約旦河為我們和你們勒烏本和和得人之間的界限,你們和上主已沒有分子。這樣你們的子孫必使我們的的子孫不再敬畏上主。
26 २६ यास्तव आम्ही म्हटले की, “चला आपणासाठी एक वेदी बांधू, जी होमार्पणासाठी किंवा यज्ञार्पणासाठी नसेल.”
因此我們想:我們還是建築一座祭壇,不是為獻全燔祭,也不是為祭獻犧牲,
27 २७ तर ती, आमच्या व तुमच्यामध्ये, आणि आमच्यामागे आमच्या पिढ्यांमध्ये हे साक्ष देण्यासाठी व्हावी; अशी की आम्ही परमेश्वरासमोर आपल्या होमार्पणांनी व आपल्या यज्ञार्पणांनी व आपल्या शांत्यर्पणांनी त्याची सेवा करीत जावी; आणि पुढल्या काळी तुमच्या संतानानी आमच्या संतानांना असे म्हणू नये की, “परमेश्वरावर तुमचा काही हक्क नाही.”
只是為在你我之間,在你我後人之間作一證據,證明我們願在上主面前以全燔祭犧牲及和平祭敬禮上主,免得日後你們的子孫對我們的子孫說:你們與上主已沒有分子o
28 २८ यास्तव आम्ही म्हटले की, पुढे जेव्हा ते लोक आम्हांला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यांना असे सांगू की तुम्ही परमेश्वराच्या वेदीचा नमुना “पाहा; ही आमच्या पूर्वजांनी ती होमबली किंवा यज्ञार्पणासाठी बांधली नाही तर ही आमच्या व तुमच्यामध्ये साक्ष देण्यासाठी म्हणून आहे.”
因此我們想:日後如有人對我們或我們的子孫說,我們可以說:你們試看我們的祖先所築的上主的祭壇的式樣,不是為獻全燔祭,也不是為獻犧牲,而是為作你我之間的證劇。
29 २९ आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण, किंवा यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर याची त्याच्या निवासमंडपाच्यासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि प्रभूला अनुसरण्याचे सोडून देण्याचे आमच्या हातून कदापि न घडो.
我們今天沒有意思違背上主,離開上主,在上主我們天主的帳幕前的祭壇以外,為獻全墦祭、素祭和犧牲,另建立一祭壇。」
30 ३० तेव्हा रऊबेन वंश, गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या फिनहास याजक व त्याच्याबरोबर जे असलेले अधिकारी म्हणजे इस्राएलाच्या प्रत्येक वंशाचे जे प्रमुख पुरुष होते, तेव्हा त्यांना बरे वाटले.
司祭丕乃哈斯和同他同來的會眾的首領,即以色列人的族長,聽了勒烏本人、加得人和默納協人所的話,都表示滿意。
31 ३१ यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फिनहास ह्याने रऊबेन वंश व गाद वंश, व मनश्शे वंश यांना सांगितले, “आज आम्हांला कळले की, परमेश्वर आमच्यामध्ये आहे; कारण की तुम्ही परमेश्वराचा काही गुन्हा केला नाही; येणेकरून तुम्ही इस्राएल लोकांस परमेश्वराच्या हातातून सोडवले आहे.”
厄肋阿則爾的兒子丕乃哈司祭對勒烏本人、加得人和默納協人說:「今天我們知道上主是在我們中間,因為你們對上主沒有犯過這樣不忠信的罪,現在你們由上主手中救了以色列子民。」
32 ३२ मग रऊबेन वंश व गाद वंश यांपासून गिलाद देशातून एलाजार याजक याचा पुत्र फिनहास व ते अधिकारी यानी कनान देशात इस्राएलाच्या लोकांजवळ माघारे येऊन त्यांना वर्तमान सांगितले.
厄肋阿則爾的兒子丕乃哈司祭和首領便離開勒烏本人、加得人和默納協半支派的人,從基肋阿得地方回到客納罕地見以色列子民,給他們報告了這事。
33 ३३ तेव्हा इस्राएल लोकांचे समाधान होऊन त्यांनी देवाचा धन्यवाद केला, आणि ज्या देशात रऊबेन वंश व गाद वंश राहिले होते, तेव्हा रऊबेन व गाद यांच्याविरुद्ध लढाई करून त्यांचा नाश करावा असे ते कधीच म्हणाले नाही.
以色列子民對這報告都表示滿意,遂頌揚上主,不再想作戰攻打勒烏本人和加得人,毀滅他們所住的地方。
34 ३४ तेव्हा रऊबेन व गाद यानी त्या वेदीला “एद” असे नाव दिले; कारण, “परमेश्वर हाच देव आहे,” याची ती आमच्यामध्ये “साक्ष” असेल.
勒烏本人和加得人給那祭壇起名叫「赫得,」因為他們說:「這祭壇在我們中間證明上主是真天主。」