< यहोशवा 21 >
1 १ तेव्हा लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे मुख्य त्यांच्याजवळ आले.
तब लावियों के आबाई ख़ानदानों के सरदार इली'एलियाज़र काहिन और नून के बेटे यशू'अ और बनी इस्राईल के क़बीलों के आबाई ख़ानदानों के सरदारों के पास आये।
2 २ ते कनान देशातील शिलो येथे म्हणाले की, परमेश्वराने मोशेच्या द्वारे अशी आज्ञा दिली होती की “आम्हांला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या पशूंसाठी त्यांची गायराने द्यावी.”
और मुल्क — ए — कना'न के शीलोह में उन से कहने लगे कि ख़ुदावन्द ने मूसा के बारे में हमारे रहने के लिए शहर और हमारे चौपायों के लिए उनकी नवाही के देने का हुक्म किया था।
3 ३ यास्तव इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनांतून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
इसलिए बनी इस्राईल ने अपनी अपनी मीरास में से ख़ुदावन्द के हुक्म के मुताबिक़ यह शहर और उनकी नवाही लावियों को दीं।
4 ४ तेव्हा कहाथीच्या कुळांसाठी चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांतल्या अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा व शिमोनी, बन्यामीन या वंशांच्या वाट्यातून तेरा नगरे मिळाली.
और पर्चा क़िहातियों के नाम पर निकला और हारून काहिन की औलाद को जो लावियों में से थी पर्ची से यहूदाह के क़बीले और शमौन के क़बीले और बिनयमीन के क़बीले में से तेरह शहर मिले।
5 ५ कहाथीच्या राहिलेल्या वंशजांना एफ्राइमाच्या वंशांतल्या कुळाच्या वाट्यातून व दानाच्या वंशांच्या वाट्यातून व मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून दहा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
और बाक़ी बनी क़िहात को इफ़्राईम के क़बीले के घरानों और दान के क़बीले और मनस्सी के आधे क़बीले में से दस शहर पर्ची से मिले।
6 ६ आणि गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या व आशेर, नफताली, बाशानात मनश्शेच्या अर्ध्या वंशांच्या नगरांपैकी तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
और बनी जैरसोन को इश्कार के क़बीले के घरानों औरआशर के क़बीले और नफ़्ताली के क़बीले और मनस्सी के आधे क़बीले में से जो बसन में है तेरह शहर पर्ची से मिले।
7 ७ मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, व गाद व जबुलून याच्या वंशांतून बारा नगरे मिळाली.
और बनी मिरारी को उनके घरानों के मुताबिक़ रूबिन के क़बीले और जद्द के क़बीले और ज़बूलून के क़बीले में से बारह शहर मिले।
8 ८ परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
और बनी इस्राईल ने पर्ची डालकर इन शहरों और इनकी नवाही को जैसा ख़ुदावन्द ने मूसा के बारे में फ़रमाया था लावियों को दिया।
9 ९ त्यांनी यहूदा व शिमोन यांच्या वंशाच्या विभागातली नगरे दिली, त्यांची नावे सांगितलेली आहेत,
उन्होंने बनी यहूदाह के क़बीले और बनी शमौन के क़बीले में से यह शहर दिए जिनके नाम यहाँ मज़कूर है।
10 १० लेवी वंशातील कहाथीच्या कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी ही नगरे होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली.
और यह क़हातियों के ख़ानदानों में से जो लावी की नसल में से थे बनी हारून को मिले क्यूँकि पहला पर्चा उनके नाम का था।
11 ११ त्यांना त्यांनी यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाक्याचा पिता याचे नगर किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन आणि त्याची चहुकडली गायराने त्यांना दिली.
इसलिए उन्होंने यहूदाह के पहाड़ी मुल्क में 'अनाक़ के बाप अरबा' का शहर क़रयत अरबा'जो हबरून कहलाता है म'ए उसके 'इलाक़े के उनको दिया।
12 १२ परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती.
लेकिन उस शहर के खेतों और गाँव को उन्होंने युफ़न्ना के बेटे कालिब को मीरास के तौर पर दिया।
13 १३ त्यांनी अहरोन याजकाच्या वंशजाला हत्या करणाऱ्यासाठी आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे गायरान दिले, आणि लिब्ना व त्याचे गायरान;
इसलिए उन्होंने हारून का काहिन की औलाद को हबरून जो ख़ूनी की पनाह का शहर था और उसके 'इलाक़े और लिबनाह और उसके 'इलाक़े।
14 १४ आणि यत्तीर व त्याचे गायरान, आणि एष्टमोवा व त्याचे गायरान;
और यतीर और उसके 'इलाक़े और इस्तिमू'अ और उसके 'इलाक़े।
15 १५ होलोन व त्याचे गायरान आणि दबीर व त्याचे गायरान;
और हौलून और उसके 'इलाक़े और दबीर और उसके 'इलाक़े।
16 १६ अईन व त्याचे गायरान, आणि युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान; अशी त्या दोन वंशांतली नऊ नगरे दिली;
और 'ऐन और उसके 'इलाक़े और यूत्ता और उसके 'इलाक़े और बैत शम्स और उसके 'इलाक़े या'नी यह नौ शहर उन दोनों क़बीलों से ले कर दिए।
17 १७ बन्यामीन वंशातले गिबोन व त्याचे गायरान; गिबा व त्याचे गायरान;
और बिनयमीन के क़बीले से जिबा'ऊन और उसके 'इलाक़े और जिबा' और उसके 'इलाक़े।
18 १८ अनाथोथ व त्याचे गायरान, आणि अलमोन व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली.
और अनतोत और उसके 'इलाक़े और 'अलमोन और उसके 'इलाक़े यह चार शहर दिए गए।
19 १९ अहरोन वंशातील याजकांना त्यांची तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.
इसलिए बनी हारून के जो काहिन हैं सब शहर तेरह थे जिनके साथ उनकी नवाही भी थी।
20 २० राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांना एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली.
और बनी क़िहात के घरानों को जो लावी थे या'नी बाक़ी बनी क़िहात को इफ़्राईम के क़बीले से यह शहर पर्ची से मिले।
21 २१ त्यांनी हत्या करणाऱ्याच्या आश्रयासाठी एफ्राइमाच्या डोंगरावरचे नगर शखेम व त्याचे गायराने त्यांना दिले; आणि गेजेर व त्याचे गायरान;
और उन्होंने इफ़्राईम के पहाड़ी मुल्क में उनको सिकम शहर और उसके 'इलाक़े तो ख़ूनी की पनाह के लिए और जज़र और उसके 'इलाक़े।
22 २२ किबसाईम व त्याचे गायरान; आणि बेथ-होरोन तिचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली;
और क़िबज़ैम और उसके 'इलाक़े और बैत हौरून और उसके 'इलाक़े यह चार शहर दिए।
23 २३ दानाच्या वंशातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान;
और दान के क़बीला से इलतिक़िया और उसके 'इलाक़े और जिब्बतून और उसके 'इलाक़े।
24 २४ अयालोन व त्याचे गायरान, गथ-रिम्मोन व त्यांचे गायरान अशी चार नगरे दिली;
और अय्यालोन और उसके 'इलाक़े और जात रिम्मोन और उसके 'इलाक़े यह चार शहर दिए।
25 २५ मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व गथ-रिम्मोन त्यांची गायराने, अशी दोन नगरे दिली;
और मनस्सी के आधे क़बीले से ता'नक और उसके 'इलाक़े और जात रिम्मोन और उसके 'इलाक़े, यह दो शहर दिए।
26 २६ बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजांना एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने दिली.
बाक़ी बनी क़िहात के घरानों के सब शहर अपनी अपनी नवाही के साथ दस थे।
27 २७ लेवी वंशातील गेर्षोनाच्या कुळाला मनश्शेच्या दुस-या अर्ध्या वंशांतून हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर बाशानातले गोलान व त्यांचे गायरान, आणि बैश्तरा व त्यांचे गायरान अशी दोन नगरे दिली;
और बनी जैरसोन को जो लावियों के घरानों में से हैं मनस्सी के दूसरे आधे क़बीले में से उन्होंने बसन में जो लान और उसके 'इलाक़े तो ख़ूनी की पनाह के लिए और बि'अस्तराह और उसके 'इलाक़े यह दो शहर दिए।
28 २८ इस्साखार वंशातले किश्शोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान;
और इश्कार के क़बीले से क़िसयून और उसके 'इलाक़े और दबरत और उसके 'इलाक़े।
29 २९ यर्मूथ व त्याचे गायरान, एन-गन्नीम व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
यरमोत और उसके 'इलाक़े और 'ऐन जन्नीम और उसके 'इलाक़े, यह चार शहर दिए।
30 ३० आणि आशेराच्या वंशातली मिशाल व त्यांचे गायरान, अब्दोन व त्यांचे गायरान,
और आशर के क़बीले से मसाल और उसके 'इलाक़े और अबदोन और उसके 'इलाक़े।
31 ३१ हेलकथ व त्यांचे गायरान, आणि रहोब व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
ख़िलक़त और उसके 'इलाक़े और रहोब और उसके 'इलाक़े यह चार शहर दिए।
32 ३२ नफतालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्यांचे गायरान, आणि हम्मोथ-दोर व त्यांचे गायरान, आणि कार्तान व त्यांचे गायरान, अशी तीन नगरे दिली.
और नफ़्ताली के क़बीले से जलील में क़ादिस और उसके 'इलाक़े तो ख़ूनी की पनाह के लिए और हम्मात दूर और उसके 'इलाक़े और क़रतान और उसके 'इलाक़े, यह तीन शहर दिए।
33 ३३ गेर्षोन्याची सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्यांची गायराने,
इसलिए जैरसोनियों के घरानों के मुताबिक़ उनके सब शहर अपनी अपनी नवाही के साथ तेरह थे।
34 ३४ आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळाला जबुलूनाच्या वंशातले यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान;
और बनी मिरारी के घरानों को जो बाक़ी लावी थे ज़बूलून के क़बीला से यक़'नियाम और उसके 'इलाक़े, क़रताह और उसके 'इलाक़े।
35 ३५ दिम्रा व त्याचे गायरान, नहलाल व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
दिमना और उसके 'इलाक़े, नहलाल और उसके 'इलाक़े, यह चार शहर दिए।
36 ३६ आणि रऊबेन वंशातले बेजेर व त्यांचे गायरान, आणि याहस व त्यांचे गायरान;
और रूबिन के क़बीले से बसर और उसके 'इलाक़े, यहसा और उसके 'इलाक़े।
37 ३७ कदेमोथ व त्यांचे गायरान, आणि मेफाथ व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
क़दीमात और उसके 'इलाक़े और मिफ़'अत और उसके 'इलाक़े, यह चार शहर दिये।
38 ३८ आणि गादाच्या वंशांतले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गिलादातले रामोथ व त्यांचे गायरान, महनाईम व त्यांचे गायरान
और जद्द के क़बीले से जिल'आद में रामा और उसके 'इलाक़े तो ख़ूनी की पनाह के लिए और महनाइम और उसके 'इलाक़े।
39 ३९ हेशबोन व त्याचे गायरान, याजेर व त्यांचे गायरान, अशी एकंदर चार नगरे दिली.
हस्बोन और उसके 'इलाक़े, या'ज़ेर और उसके 'इलाक़े, कुल चार शहर दिए।
40 ४० लेव्यांच्या कुळातली राहिलेल्या मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांना दिली.
इसलिए ये सब शहर उनके घरानों के मुताबिक़ बनी मिरारी के थे, जो लावियों के घरानों के बाक़ी लोग थे उनको पर्ची से बारह शहर मिले।
41 ४१ इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांना एकंदर अठ्ठेचाळीस नगरे, त्यांच्या गायरानासह दिली.
तब बनी इस्राईल की मिल्कियत के बीच लावियों के सब शहर अपनी अपनी नवाही के साथ अठतालीस थे।
42 ४२ ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांना होते.
उन शहरों में से हर एक शहर अपने गिर्द की नवाही के साथ था सब शहर ऐसे ही थे।
43 ४३ याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले.
यूँ ख़ुदावन्द ने इस्राईलियों को वह सारा मुल्क दिया जिसे उनके बाप दादा को देने की क़सम उस ने खाई थी और वह उस पर क़ाबिज़ हो कर उसमें बस गये।
44 ४४ याप्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यास चहूंकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूंतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.
और ख़ुदावन्द ने उन सब बातों के मुताबिक़ जिनकी क़सम उस ने उनके बाप दादा से खाई थी चारों तरफ़ से उनको आराम दिया और उनके सब दुश्मनों में से एक आदमी भी उनके सामने खड़ा न रहा, ख़ुदावन्द ने उनके सब दुश्मनों को उनके क़ब्ज़े में कर दिया।
45 ४५ परमेश्वराने इस्राएलाच्या घराण्याला दिलेल्या प्रत्येक उत्तम अभिवचनापैकी एकही पूर्ण झाल्यावाचून राहिले नाही. त्याने दिलेले प्रत्येक अभिवचन घडून आले.
और जितनी अच्छी बातें ख़ुदावन्द ने इस्राईल के घराने से कही थीं उन में से एक भी न छूटी, सब की सब पूरी हुईं।