< यहोशवा 21 >

1 तेव्हा लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे मुख्य त्यांच्याजवळ आले.
Afei, Lewifoɔ abusua mu ntuanofoɔ kɔɔ ɔsɔfoɔ Eleasa ne Nun babarima Yosua ne Israel mmusuakuo a aka mu ntuanofoɔ nkyɛn.
2 ते कनान देशातील शिलो येथे म्हणाले की, परमेश्वराने मोशेच्या द्वारे अशी आज्ञा दिली होती की “आम्हांला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या पशूंसाठी त्यांची गायराने द्यावी.”
Wɔka kyerɛɛ wɔn wɔ Silo a ɛwɔ Kanaan asase sɛ, “Awurade hyɛɛ Mose sɛ, ɔmma yɛn nkuro na yɛntena mu ne adidibea mma yɛn anantwie.”
3 यास्तव इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनांतून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
Na sɛdeɛ Awurade hyɛeɛ no, wɔde nkuro a ɛdidi soɔ yi a wɔn adidibea ka ho maa Lewifoɔ sɛ wɔn agyapadeɛ.
4 तेव्हा कहाथीच्या कुळांसाठी चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांतल्या अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा व शिमोनी, बन्यामीन या वंशांच्या वाट्यातून तेरा नगरे मिळाली.
Aaron asefoɔ a na wɔyɛ Kohat abusua mma, na wɔfra Lewi abusuakuo mu no nyaa nkurotoɔ dumiɛnsa a na anka ɛyɛ Yuda, Simeon ne Benyamin mmusuakuo no dea.
5 कहाथीच्या राहिलेल्या वंशजांना एफ्राइमाच्या वंशांतल्या कुळाच्या वाट्यातून व दानाच्या वंशांच्या वाट्यातून व मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून दहा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
Afie a aka wɔ Kohat abusua mu no, wɔmaa wɔn nkurotoɔ edu firii Efraim ne Dan mmusuakuo no ne Manase abusuakuo fa no nsase mu.
6 आणि गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या व आशेर, नफताली, बाशानात मनश्शेच्या अर्ध्या वंशांच्या नगरांपैकी तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
Gerson abusua no nso, wɔmaa wɔn nkurotoɔ dumiɛnsa firii Isakar, Aser, Naftali ne Manase abusuakuo fa no wɔ Basan.
7 मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, व गाद व जबुलून याच्या वंशांतून बारा नगरे मिळाली.
Merari abusua no nyaa nkurotoɔ dumienu firii Ruben, Gad ne Sebulon mmusuakuo no nkyɛn.
8 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
Enti, Israelfoɔ no dii Awurade ɔhyɛ nsɛm a ɔde maa Mose no so. Wɔbɔɔ ntonto kronkron, nam so yiyii saa nkuro yi ne adidibea a ɛkeka ho maa Lewifoɔ.
9 त्यांनी यहूदा व शिमोन यांच्या वंशाच्या विभागातली नगरे दिली, त्यांची नावे सांगितलेली आहेत,
Israelfoɔ no de saa nkuro a ɛyɛ Yuda ne Simeon mmusuakuo no dea no
10 १० लेवी वंशातील कहाथीच्या कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी ही नगरे होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली.
maa Aaron asefoɔ a wɔfra Kohat abusua mu na ɛka Lewi abusuakuo ho no, ɛfiri sɛ, ntonto kronkron a ɛdi ɛkan no bɔɔ wɔn.
11 ११ त्यांना त्यांनी यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाक्याचा पिता याचे नगर किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन आणि त्याची चहुकडली गायराने त्यांना दिली.
Kiriat-Arba a (wɔfrɛ no Hebron), a ɛwɔ Yuda bepɔ asase so ne ɛho adidibea. (Arba yɛ Anak tete agya.)
12 १२ परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती.
Nanso, nsase ne nkuraaseɛ a atwa kuro no ho ahyia no deɛ, wɔde maa Yefune babarima Kaleb.
13 १३ त्यांनी अहरोन याजकाच्या वंशजाला हत्या करणाऱ्यासाठी आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे गायरान दिले, आणि लिब्ना व त्याचे गायरान;
Nkuro a ɛdidi soɔ yi ne wɔn adidibea no, wɔde maa ɔsɔfoɔ Aaron asefoɔ: Hebron, (dwanekɔbea Kuropɔn), Libna,
14 १४ आणि यत्तीर व त्याचे गायरान, आणि एष्टमोवा व त्याचे गायरान;
Yatir, Estemoa,
15 १५ होलोन व त्याचे गायरान आणि दबीर व त्याचे गायरान;
Holon, Debir,
16 १६ अईन व त्याचे गायरान, आणि युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान; अशी त्या दोन वंशांतली नऊ नगरे दिली;
Ain, Yuta ne Bet-Semes a ɛyɛ nkurotoɔ nkron a wɔnya firii saa mmusuakuo mmienu yi nkyɛn.
17 १७ बन्यामीन वंशातले गिबोन व त्याचे गायरान; गिबा व त्याचे गायरान;
Wɔfiri Benyamin abusuakuo mu de saa nkuro yi ne adidibea a atwa ho ahyia no maa asɔfoɔ: Gibeon, Geba,
18 १८ अनाथोथ व त्याचे गायरान, आणि अलमोन व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली.
Anatot, Almon—a ɛyɛ nkurotoɔ ɛnan.
19 १९ अहरोन वंशातील याजकांना त्यांची तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.
Enti, nkurotoɔ dumiɛnsa na wɔde maa asɔfoɔ a wɔyɛ Aaron asefoɔ no.
20 २० राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांना एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली.
Kohat abusua nkaeɛfoɔ a wɔfiri Lewi abusuakuo mu no nso, wɔde saa nkuro yi ne adidibea a ɛfiri Efraim abusua nkyɛn maa wɔn:
21 २१ त्यांनी हत्या करणाऱ्याच्या आश्रयासाठी एफ्राइमाच्या डोंगरावरचे नगर शखेम व त्याचे गायराने त्यांना दिले; आणि गेजेर व त्याचे गायरान;
Sekem, (dwanekɔbea kuropɔn), Geser.
22 २२ किबसाईम व त्याचे गायरान; आणि बेथ-होरोन तिचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली;
Kibsaim ne Bet-Horon, a ɛyɛ nkurotoɔ ɛnan.
23 २३ दानाच्या वंशातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान;
Saa nkuro ne adidibea yi nso, wɔde maa asɔfoɔ a wɔfiri Dan abusuakuo mu: Elteke ne Gibeton,
24 २४ अयालोन व त्याचे गायरान, गथ-रिम्मोन व त्यांचे गायरान अशी चार नगरे दिली;
Ayalon ne Gat-Rimon, ɛyɛ nkurotoɔ ɛnan.
25 २५ मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व गथ-रिम्मोन त्यांची गायराने, अशी दोन नगरे दिली;
Manase abusuakuo fa no de saa nkuro ne wɔn adidibea maa asɔfoɔ no: Taanak ne Gat-Rimon, ɛyɛ nkurotoɔ mmienu.
26 २६ बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजांना एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने दिली.
Enti, nkuro edu ne wɔn adidibea na wɔde maa Kohat abusua nkaeɛ no.
27 २७ लेवी वंशातील गेर्षोनाच्या कुळाला मनश्शेच्या दुस-या अर्ध्या वंशांतून हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर बाशानातले गोलान व त्यांचे गायरान, आणि बैश्तरा व त्यांचे गायरान अशी दोन नगरे दिली;
Gerson abusua a wɔyɛ Lewi abusuakuo no fa bi no nso, wɔnyaa nkuro mmienu ne wɔn adidibea firii Manase abusua fa no nkyɛn. Nkuro no ne Golan a ɛwɔ Basan (dwanekɔbea kuropɔn) ne Beestra.
28 २८ इस्साखार वंशातले किश्शोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान;
Isakar abusuakuo no nso maa wɔn: Kision, Daberat,
29 २९ यर्मूथ व त्याचे गायरान, एन-गन्नीम व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
Yarmut ne En-Ganim, nkurotoɔ ɛnan a wɔn adidibea ka ho.
30 ३० आणि आशेराच्या वंशातली मिशाल व त्यांचे गायरान, अब्दोन व त्यांचे गायरान,
Aser abusuakuo no maa Misal, Abdon,
31 ३१ हेलकथ व त्यांचे गायरान, आणि रहोब व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
Helkat ne Rehob, a ɛyɛ nkurotoɔ ɛnan a wɔn adidibea ka ho.
32 ३२ नफतालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्यांचे गायरान, आणि हम्मोथ-दोर व त्यांचे गायरान, आणि कार्तान व त्यांचे गायरान, अशी तीन नगरे दिली.
Naftali abusuakuo no maa wɔn Kedes a ɛwɔ Galilea (dwanekɔbea kuropɔn), Hamot-Dor ne Kartan nkuro mmiɛnsa ne wɔn adidibea.
33 ३३ गेर्षोन्याची सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्यांची गायराने,
Enti, nkuro dumiɛnsa ne ɛho adidibea na wɔde maa Gerson mmusua no.
34 ३४ आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळाला जबुलूनाच्या वंशातले यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान;
Lewifoɔ nkaeɛ a wɔyɛ Merari abusua no nso, wɔnyaa saa nkuro yi a ɛfiri Sebulon abusuakuo nkyɛn: Yokneam, Karta,
35 ३५ दिम्रा व त्याचे गायरान, नहलाल व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
Dimna ne Nahalal—nkurotoɔ ɛnan ne ɛho adidibea.
36 ३६ आणि रऊबेन वंशातले बेजेर व त्यांचे गायरान, आणि याहस व त्यांचे गायरान;
Ruben abusuakuo no nso maa wɔn Beser, Yahas,
37 ३७ कदेमोथ व त्यांचे गायरान, आणि मेफाथ व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
Kedemot ne Mefaat—nkurotoɔ ɛnan ne wɔn adidibea.
38 ३८ आणि गादाच्या वंशांतले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गिलादातले रामोथ व त्यांचे गायरान, महनाईम व त्यांचे गायरान
Gad abusuakuo no maa wɔn Ramot a ɛwɔ Gilead (dwanekɔbea kuropɔn), Mahanaim,
39 ३९ हेशबोन व त्याचे गायरान, याजेर व त्यांचे गायरान, अशी एकंदर चार नगरे दिली.
Hesbon ne Yaser, nkurotoɔ ɛnan ne ho adidibea.
40 ४० लेव्यांच्या कुळातली राहिलेल्या मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांना दिली.
Enti, nkurotoɔ dumienu na wɔde maa Merari abusua.
41 ४१ इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांना एकंदर अठ्ठेचाळीस नगरे, त्यांच्या गायरानासह दिली.
Nkuro dodoɔ ne ɛho adidibea a na ɛwɔ Israelman mu a wɔde maa Lewifoɔ no nyinaa yɛ aduanan nwɔtwe.
42 ४२ ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांना होते.
Na kuro biara wɔ adidibea da ho.
43 ४३ याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले.
Enti, Awurade de nsase a ɔkaa ho ntam sɛ ɔde bɛma wɔn agyanom no maa Israelfoɔ no, na wɔdii so nkonim, tenaa hɔ.
44 ४४ याप्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यास चहूंकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूंतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.
Na Awurade ma wɔnyaa ahomeɛ wɔ afanan nyinaa, sɛdeɛ ɔhyɛɛ wɔn agyanom bɔ no. Wɔn atamfoɔ biara antumi annyina wɔn anim, ɛfiri sɛ, Awurade boaa wɔn ma wɔdii wɔn atamfoɔ so nkonim.
45 ४५ परमेश्वराने इस्राएलाच्या घराण्याला दिलेल्या प्रत्येक उत्तम अभिवचनापैकी एकही पूर्ण झाल्यावाचून राहिले नाही. त्याने दिलेले प्रत्येक अभिवचन घडून आले.
Bɔhyɛ pa biara a Awurade hyɛɛ Israel no nyinaa baa mu.

< यहोशवा 21 >