< यहोशवा 20 >

1 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
خداوند به یوشع فرمود:
2 “तू इस्राएल लोकांस सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला ज्या आश्रयस्थानाविषयी सांगितले होते ती नगरे तुम्ही आपल्यासाठी ठरवा;
«به مردم اسرائیل بگو که شهرهای پناهگاه را که قبلاً دستورهای آن را توسط موسی به شما داده بودم، تعیین کنند،
3 म्हणजे जो चुकून, नकळत कोणा मनुष्यास जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यामध्ये पळून जावे; याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून आश्रयस्थाने अशी होतील.
تا اگر کسی مرتکب قتل غیرعمد شود به آنجا پناه ببرد و از انتقام بستگان مقتول در امان باشد.
4 आणि त्याने त्यातल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेशीच्या दाराशी उभे राहून आपले प्रकरण त्या नगराच्या वडिलांना सांगावे; मग त्यांनी त्यास आपल्या नगरात घेऊन त्यास ठिकाण नेमून द्यावे, आणि त्याने त्यांच्यामध्ये रहावे.
وقتی قاتل به یکی از این شهرها برسد باید به دروازهٔ شهر که محل قضاوت است برود و قضیه را برای بزرگان شهر شرح دهد. آنها نیز باید او را به داخل شهر برده، مکانی برای زندگی کردن به او بدهند تا پیش ایشان بماند.
5 आणि जो रक्ताचा सूड घेण्याऱ्याने, त्याचा पाठलाग केला, तरी त्या नगराच्या लोकांनी मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या स्वाधीन करू नये; कारण की त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याला मारले, त्याचे त्याच्याशी पूर्वीपासूनचे वैर नव्हते.
اگر یکی از بستگان مقتول برای کشتن قاتل بیاید، نباید قاتل را تسلیم نمایند، چون او به طور تصادفی مرتکب عمل قتل شده است، نه از روی کینه و غرض.
6 मंडळीसमोर न्याय होईपर्यंत किंवा जो मुख्य याजक त्या दिवसात असेल त्याच्या मरणापर्यंत त्या नगरात त्याने रहावे; नंतर त्या हत्या करणाऱ्याने आपल्या नगरात म्हणजे ज्या नगरातून तो पळाला त्यामध्ये आपल्या घरी माघारी जावे.”
او باید تا زمان محاکمه‌اش در حضور مردم، و تا وفات رئیس کهنه‌ای که در زمان واقعه بر مصدر کار بوده است، در آن شهر بماند. اما بعد از آن، آزاد است و می‌تواند به شهر و خانهٔ خود بازگردد.»
7 यास्तव त्यांनी गालीलात नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, ही वेगळी करून ठेवली.
پس این شهرها برای پناهگاه اختصاص یافتند: قادش جلیل در کوهستان نفتالی، شکیم در کوهستان افرایم و قریهٔ اربع (که حبرون نیز نامیده می‌شد) در کوهستان یهودا.
8 पूर्वेस यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे रानातल्या सपाटीवर रऊबेनाच्या वंशांतले बेजेर, आणि गिलादात गाद वंशातले रामोथ, आणि बाशानात मनश्शेच्या वंशातले गोलान ही नगरे वेगळी करून ठेवली.
همچنین در سمت شرقی رود اردن، در شرق اریحا، این شهرها برای پناهگاه اختصاص یافتند: باصر در صحرا از زمین قبیلهٔ رئوبین، راموت در جلعاد از زمین قبیلهٔ جاد و جولان در باشان از زمین قبیلهٔ منسی.
9 ही नगरे इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी, आणि त्यामध्ये राहणारा जो परदेशी त्यांच्यासाठी अशी नेमलेली होती की जो कोणी चुकून मनुष्यास मारतो, त्याने त्यामध्ये पळून जावे, आणि तो सभेपुढे उभा राहीपर्यंत त्याने रक्ताचा सूड घेणाऱ्याच्या हातून मरू नये.
شهرهای پناهگاه، هم برای اسرائیلی‌ها بود و هم برای غریبانی که در میان ایشان زندگی می‌کردند، تا اگر کسی ناخواسته مرتکب قتل شود، به یکی از آنها فرار کند تا قبل از محاکمه‌اش در حضور مردم، به دست مدعی خون مقتول، کشته نشود.

< यहोशवा 20 >