< यहोशवा 20 >
1 १ मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
og Herren talte til Josva og sa:
2 २ “तू इस्राएल लोकांस सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला ज्या आश्रयस्थानाविषयी सांगितले होते ती नगरे तुम्ही आपल्यासाठी ठरवा;
Tal til Israels barn og si: Avgi de tilfluktsstæder som jeg talte til eder om ved Moses,
3 ३ म्हणजे जो चुकून, नकळत कोणा मनुष्यास जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यामध्ये पळून जावे; याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून आश्रयस्थाने अशी होतील.
så en manndraper som av vanvare, uten å ville det, slår nogen ihjel, kan fly dit; I skal ha dem til tilfluktsstæder for manndraperen, når han flyr for blodhevneren.
4 ४ आणि त्याने त्यातल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेशीच्या दाराशी उभे राहून आपले प्रकरण त्या नगराच्या वडिलांना सांगावे; मग त्यांनी त्यास आपल्या नगरात घेऊन त्यास ठिकाण नेमून द्यावे, आणि त्याने त्यांच्यामध्ये रहावे.
Han skal fly til en av disse byer og stille sig ved inngangen til byens port og legge sin sak frem for de eldste i byen; så skal de ta ham inn til sig i byen og gi ham et sted hos sig hvor han kan bo.
5 ५ आणि जो रक्ताचा सूड घेण्याऱ्याने, त्याचा पाठलाग केला, तरी त्या नगराच्या लोकांनी मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या स्वाधीन करू नये; कारण की त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याला मारले, त्याचे त्याच्याशी पूर्वीपासूनचे वैर नव्हते.
Og når blodhevneren forfølger ham, da skal de ikke overgi manndraperen i hans hånd, fordi han slo sin næste ihjel av vanvare og uten før å ha båret hat til ham.
6 ६ मंडळीसमोर न्याय होईपर्यंत किंवा जो मुख्य याजक त्या दिवसात असेल त्याच्या मरणापर्यंत त्या नगरात त्याने रहावे; नंतर त्या हत्या करणाऱ्याने आपल्या नगरात म्हणजे ज्या नगरातून तो पळाला त्यामध्ये आपल्या घरी माघारी जावे.”
Og han skal bli boende der i byen, til han har stått til doms for menigheten, og til den yppersteprest som da lever, er død; derefter kan manndraperen vende tilbake til sin by og sitt hus, til den by som han rømte fra.
7 ७ यास्तव त्यांनी गालीलात नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन, ही वेगळी करून ठेवली.
Så helliget de Kedes i Galilea i Naftali-fjellene og Sikem i Efra'im-fjellene og Kirjat-Arba, det er Hebron, i Juda-fjellene.
8 ८ पूर्वेस यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे रानातल्या सपाटीवर रऊबेनाच्या वंशांतले बेजेर, आणि गिलादात गाद वंशातले रामोथ, आणि बाशानात मनश्शेच्या वंशातले गोलान ही नगरे वेगळी करून ठेवली.
Og på østsiden av Jordan, som flyter forbi Jeriko, avgav de: av Rubens stamme Beser i ørkenen, på sletten, og av Gads stamme Ramot i Gilead og av Manasse stamme Galon i Basan.
9 ९ ही नगरे इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी, आणि त्यामध्ये राहणारा जो परदेशी त्यांच्यासाठी अशी नेमलेली होती की जो कोणी चुकून मनुष्यास मारतो, त्याने त्यामध्ये पळून जावे, आणि तो सभेपुढे उभा राहीपर्यंत त्याने रक्ताचा सूड घेणाऱ्याच्या हातून मरू नये.
Dette var de byer som blev fastsatt til tilfluktsstæder for alle Israels barn og for de fremmede som opholder sig blandt dem, så hver den som av vanvare slår nogen ihjel, kan fly dit og ikke skal dø for blodhevnerens hånd, før han er blitt stilt frem for menigheten.