< यहोशवा 18 >
1 १ मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता.
以色列的全会众都聚集在示罗,把会幕设立在那里,那地已经被他们制伏了。
2 २ तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते.
以色列人中其余的七个支派还没有分给他们地业。
3 ३ यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या लोकांस म्हटले, “जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिला, तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती उशीर करणार आहात?”
约书亚对以色列人说:“耶和华—你们列祖的 神所赐给你们的地,你们耽延不去得,要到几时呢?
4 ४ तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली तीन माणसे नेमा; म्हणजे मी त्यांना पाठवीन, आणि त्यांनी देशात जाऊन चोहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे, वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे.
你们每支派当选举三个人,我要打发他们去,他们就要起身走遍那地,按着各支派应得的地业写明,就回到我这里来。
5 ५ म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत रहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत रहावे.
他们要将地分做七分;犹大仍在南方,住在他的境内。约瑟家仍在北方,住在他的境内。
6 ६ तसे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या सात वाट्यांचे वर्णन लिहा आणि ते वर्णन इकडे माझ्याजवळ आणा; मग येथे आपला देव परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.
你们要将地分做七分,写明了拿到我这里来。我要在耶和华—我们 神面前,为你们拈阄。
7 ७ लेव्यांना तर तुमच्यामध्ये वाटा नाही; कारण की परमेश्वराचे याजकपण तेच त्यांचे वतन आहे; आणि गाद व रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना, यार्देनेच्या पलीकडे पूर्वेला, वतन मिळाले आहे परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना ते दिले आहे.
利未人在你们中间没有分,因为供耶和华祭司的职任就是他们的产业。迦得支派、吕便支派,和玛拿西半支派已经在约旦河东得了地业,就是耶和华仆人摩西所给他们的。”
8 ८ तेव्हा ती माणसे तेथून निघून देशभर फिरली आणि यहोशवाने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली; तो म्हणाला, “देशात चोहोकडे फिरून त्याचे वर्णन लिहा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”
划地势的人起身去的时候,约书亚嘱咐他们说:“你们去走遍那地,划明地势,就回到我这里来。我要在示罗这里,耶和华面前,为你们拈阄。”
9 ९ याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली, आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या सात विभागाचे वर्णन वहीत लिहून त्यांनी शिलोतल्या छावणीत यहोशवाजवळ आणले.
他们就去了,走遍那地,按着城邑分做七分,写在册子上,回到示罗营中见约书亚。
10 १० मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या; असा यहोशवाने तेथे तो देश इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या त्यांच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला.
约书亚就在示罗,耶和华面前,为他们拈阄。约书亚在那里,按着以色列人的支派,将地分给他们。
11 ११ तेव्हा बन्यामिनाच्या वंशजांना नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठ्ठी टाकून जो वाटा मिळाला तो असा; त्यांच्या वाट्याची सीमा यहूदाचे वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली.
便雅悯支派,按着宗族拈阄所得之地,是在犹大、约瑟子孙中间。
12 १२ म्हणजे उत्तर बाजूला त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तरेकडून वर जाऊन, पश्चिमेकडे डोंगरावरून बेथ-आवेनापर्यंत रानात निघते.
他们的北界是从约旦河起,往上贴近耶利哥的北边;又往西通过山地,直到伯·亚文的旷野;
13 १३ मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटारोथ-अद्दार येथे निघते
从那里往南接连到路斯,贴近路斯(路斯就是伯特利),又下到亚他绿·亚达,靠近下伯·和 南边的山;
14 १४ तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथ-होरोनाच्या समोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहूदाचे नगर आणि किर्याथ-बाल तोच किर्याथ-यारीम येथे निघते. याची पश्चिम सीमा हीच.
从那里往西,又转向南,从伯·和 南对面的山,直达到犹大人的城基列·巴力(基列·巴力就是基列·耶琳);这是西界。
15 १५ दक्षिणेकडील सीमा पश्चिमेला सुरू होऊन बाजू किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नेफ्तोहा झऱ्याकडे जाते.
南界是从基列·耶琳的尽边起,往西达到尼弗多亚的水源;
16 १६ मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीसमोरला डोंगर, जो रेफाईमाच्या तळवटीच्या उत्तरेला, त्याच्या काठी उतरली, आणि यबूसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एन-रोगेलास गेली.
又下到欣嫩子谷对面山的尽边,就是利乏音谷北边的山;又下到欣嫩谷,贴近耶布斯的南边;又下到隐·罗结;
17 १७ मग उत्तरेकडे वळून एन-शेमेशाकडे गेली, आणि अदुम्मीम येथील चढणीच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचा मुलगा बोहन याच्या खडकाकडे जाते.
又往北通到隐·示麦,达到亚都冥坡对面的基利绿;又下到吕便之子波罕的磐石;
18 १८ मग ती अराबा याच्या समोरल्या भागी उत्तरेला जाऊन अराबास उतरली.
又接连到亚拉巴对面,往北下到亚拉巴;
19 १९ मग ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन गेली, आणि सीमेचा शेवट क्षारसमुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्देनेच्या मुखापाशी झाला; ही दक्षिण सीमा झाली.
又接连到伯·曷拉的北边,直通到盐海的北汊,就是约旦河的南头;这是南界。
20 २० आणि पूर्वबाजूला त्याची सीमा यार्देन नदी झाली; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळाप्रमाणे, त्यांच्या चहुकडल्या सीमांप्रमाणे, हे होते.
东界是约旦河。这是便雅悯人按着宗族,照他们四围的交界所得的地业。
21 २१ आणि बन्यामीन वंशाला त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली; यरीहो व बेथ-होग्ला व एमेक-केसीस
便雅悯支派按着宗族所得的城邑就是:耶利哥、伯·曷拉、伊麦·基悉、
22 २२ आणि बेथ-अराबा व समाराइम व बेथेल;
伯·亚拉巴、洗玛脸、伯特利、
23 २३ अव्वीम व पारा व आफ्रा;
亚文、巴拉、俄弗拉、
24 २४ कफर-अम्मोनी व अफनी व गिबा; अशी बारा नगरे आणि त्यांची गावे;
基法·阿摩尼、俄弗尼、迦巴,共十二座城,还有属城的村庄;
25 २५ गिबोन व रामा व बैरोथ;
又有基遍、拉玛、比录、
26 २६ मिस्पे व कफीरा व मोजा;
米斯巴、基非拉、摩撒、
27 २७ रेकेम व इपैल व तरला;
利坚、伊利毗勒、他拉拉、
28 २८ सेला, एलेफ व यबूसी म्हणजेच यरूशलेम, गिबाथ, किर्याथ; अशी चवदा नगरे, आणि त्यांची गावे; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे आहे.
洗拉、以利弗、耶布斯(耶布斯就是耶路撒冷)、基比亚、基列,共十四座城,还有属城的村庄。这是便雅悯人按着宗族所得的地业。