< यहोशवा 16 >
1 १ योसेफ वंशाला नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, याची सीमा यरीहोजवळ यार्देन नदीपासून यरीहोच्या पूर्वेकडल्या जलसंचयापाशी जाऊन रानातील डोंगराळ प्रदेशातून बेथेल शहरास निघते.
और बनी यूसुफ़ का हिस्सा पर्ची डालकर यरीहू के पास के यरदन से शुरू' हुआ, या'नी पूरब की तरफ़ यरीहू के चश्में बल्कि वीराना पड़ा। फिर उसकी हद यरीहू से पहाड़ी मुल्क होती हुई बैत — एल को गयी।
2 २ मग बेथेलापासून लूजास जाऊन अर्की लोकांची सीमा अटारोथ याजवळून गेली.
फिर बैत — एल से निकल कर लूज़ को गई और अर्कियों की सरहद के पास से गुज़रती हुई 'अतारात पहुँची;
3 ३ पुढे पश्चिमेस यफलेटी लोकांच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोनाच्या सीमेपर्यंत व गेजेर शहरापर्यंत उतरून गेली; आणि तिचा शेवट समुद्राजवळ होता.
और वहाँ से पश्चिम की तरफ़ यफ़लीतियों की सरहद से होती हुई नीचे के बैत हौरून बल्कि जज़र को निकल गयी, और उसका ख़ातिमा समन्दर पर हुआ।
4 ४ याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शे व एफ्राइम यांना वतन मिळाले.
तब बनी यूसुफ़ या'नी मनस्सी और इफ़्राईम ने अपनी अपनी मीरास पर क़ब्ज़ा किया।
5 ५ एफ्राइमाच्या वंशजांची सीमा त्यांच्या कुळांप्रमाणे अशी पडली की त्यांच्या वतनाची सीमा अटारोथ-अद्दार शहराच्या पूर्वेपासून वरल्या बेथ-होरोना पर्यंत होती.
और बनी इफ़्राईम की सरहद उनके घरानों के मुताबिक़ यह थी: पूरब की तरफ़ ऊपर के बैत हौरून तक 'अतारात अदार उनकी हद ठहरी;
6 ६ आणि ती सीमा मिखमथाथाजवळ समुद्राकडे उत्तर बाजूला गेली, आणि पूर्वेस तानथ-शिलोपर्यंत ती सीमा वळली, मग तेथून पुढे पूर्वेस यानोहा तेथवर गेली.
मैं उत्तर की तरफ़ वह हद पश्चिम के मिकमता होती हुई पूरब की तरफ़ तानत सैला को मुड़ी, और वहाँ से यनूहाह के पूरब को गयी;
7 ७ नंतर ती यानोहा पासून अटारोथ शहर व नारा नगर येथपर्यंत उतरली, मग यरीहोस मिळून बाहेर यार्देनेस गेली.
और यनूहाह से 'अतारात और ना'राता होती हुई यरीहू पहुँची, और फिर यरदन को जा निकली;
8 ८ तप्पूहा यापासून पश्चिमेस काना ओढ्यापर्यंत सीमा गेली; आणि तिचा शेवट समुद्रापर्यंत होता; एफ्राइमाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन आहे.
और वह हद तफ़ूह से निकल कर पश्चिम की तरफ़ क़ानाह के नाले को गई और उसका ख़ातिमा समन्दर पर हुआ। बनी इफ़्राईम के क़बीला की मीरास उनके घरानों के मुताबिक़ यही है।
9 ९ आणि मनश्शेच्या वंशजाच्या वतनापैकी कित्येक नगरे एफ्राइमाच्या वंशजासाठी वेगळी केलेली होती; ती सर्व नगरे व त्यांची गावे होती;
और इसके साथ बनी इफ़्राईम के लिए बनी मनस्सी की मीरास में भी शहर अलग किए गये और उन सब शहरों के साथ उनके गाँव भी थे।
10 १० तथापि जे कनानी गेजेरात राहत होते, त्यांना एफ्राइम्यांनी घालविले नाही; यास्तव ते कनानी एफ्राइमामध्ये आजपर्यंत राहत आहे; आणि नेमून दिलेले काम करण्यास ते दास झाले आहेत.
और उन्होंने कना'नियों को जो जज़र में रहते थे न निकाला, बल्कि वह कना'नी आज के दिन तक इफ़्राईमियों में बसे हुए हैं, और ख़ादिम बनकर बेगार का काम करते हैं।