< यहोशवा 14 >

1 आणि कनान देशात इस्राएलाच्या लोकांनी जी वतने घेतली, म्हणजे एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएल लोकांच्या वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे पुढारी यांनी त्यास जी वतने दिली ती ही आहेत.
و اینهاست ملکهایی که بنی‌اسرائیل درزمین کنعان گرفتند، که العازار کاهن ویوشع بن نون و روسای آبای اسباط بنی‌اسرائیل برای ایشان تقسیم کردند.۱
2 परमेश्वराने मोशेद्वारे नऊ वंशांविषयी व अर्ध्या वंशाविषयी जशी आज्ञा दिली होती, तसे चिठ्ठ्या टाकून त्यांचे वतनाचे वाटे झाले.
برحسب قرعه، ملکیت ایشان شد، برای نه سبط و نصف سبط، چنانکه خداوند به‌دست موسی‌امر فرموده بود.۲
3 कारण दोन वंशांना व अर्ध्या वंशाला मोशेने यार्देनेच्या पलीकडे वतन दिले होते, परंतु त्यांच्याबरोबर लेव्यांना वतन दिले नाही.
زیرا که موسی ملکیت دو سبط و نصف سبط رابه آن طرف اردن داده بود، امابه لاویان هیچ ملکیت در میان ایشان نداد.۳
4 वास्तविक पाहता योसेफ वंशाचे दोन वंश मनश्शे व एफ्राइम असे होते, आणि लेव्यांना देशात त्यांनी वाटा दिला नाही, केवळ वस्तीसाठी नगरे, आणि त्यांच्या पशूंसाठी व त्यांच्या मालमत्तेसाठी त्यांना फक्त काही नगरात त्यांची जागा दिली.
زیرا پسران یوسف دو سبط بودند، یعنی منسی و افرایم، و به لاویان هیچ قسمت در زمین ندادند، غیر از شهرها به جهت سکونت و اطراف آنها به جهت مواشی واموال ایشان.۴
5 जशी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तसे करून इस्राएल लोकांनी देश वाटून घेतला.
چنانکه خداوند موسی را امرفرموده بود، همچنان بنی‌اسرائیل عمل نموده، زمین را تسلیم کردند.۵
6 आणि यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाजवळ आले तेव्हा कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब तो त्यास म्हणाला, “कादेश-बर्ण्यामध्ये परमेश्वराने देवाचा मनुष्य मोशे याला मजविषयी व तुजविषयी काय सांगितले होते ते तुला माहीतच आहे.
آنگاه بنی یهودا در جلجال نزد یوشع آمدند، و کالیب بن یفنه قنزی وی را گفت: «سخنی را که خداوند به موسی، مرد خدا، درباره من و تو وقادش برنیع گفت می‌دانی.۶
7 परमेश्वराचा सेवक मोशे याने जेव्हा मला कादेश-बर्ण्यापासून देश हेरावयाला पाठवले, तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो, आणि मला त्या देशाविषयी काय वाटते ती बातमी मी त्यास कळवली.
من چهل ساله بودم وقتی که موسی، بنده خداوند، مرا از قادش برنیع برای جاسوسی زمین فرستاد، و برای او خبر بازآوردم چنانکه در دل من بود.۷
8 पण माझे बंधू जे माझ्याबरोबर वर चढून गेले होते त्यांनी लोकांचे मन घाबरून जाईल असे केले, परंतु मी माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलो.
لیکن برادرانم که همراه من رفته بودند دل قوم را گداختند، و اما من یهوه خدای خود را به تمامی دل پیروی کردم.۸
9 तेव्हा त्याच दिवशी मोशेने शपथ वाहून सांगितले की, ज्या भूमीवर तुझे पाऊल चालले ती खात्रीने तुझा व तुझ्या वंशजाचे वतन अशी सर्वकाळ होईल; कारण की तू माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलास.
ودر آن روز موسی قسم خورد و گفت: البته زمینی که پای تو بر آن گذارده شد برای تو و اولادت ملکیت ابدی خواهد بود، زیرا که یهوه خدای مرابه تمامی دل پیروی نمودی.۹
10 १० तर आता पाहा इस्राएल रानात चालत असता, परमेश्वराने ही गोष्ट मोशेला सांगितली, तसे त्याने मला या पंचेचाळीस वर्षात जिवंत ठेवले आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाऐंशी वर्षांचा आहे.
و الان اینک خداوند چنانکه گفته بود این چهل و پنج سال مرازنده نگاه داشته است، از وقتی که خداوند این سخن را به موسی گفت هنگامی که اسرائیل دربیابان راه می‌رفتند، و الان، اینک من امروز هشتادو پنج ساله هستم.۱۰
11 ११ जेव्हा मोशेने मला पाठवले होते, तेव्हाच्या दिवसाप्रमाणे मी आजही सामर्थ्यवान आहे. लढाई करण्याचे व ये जा करण्याचे सामर्थ्य माझ्यात जसे तेव्हा होते तितकेच आजही आहे.
و حال امروز قوت من باقی است مثل روزی که موسی مرا فرستاد، چنانکه قوت من در آن وقت بود، همچنان قوت من الان است، خواه برای جنگ کردن و خواه برای رفتن وآمدن.۱۱
12 १२ तर परमेश्वराने त्यादिवशी ज्या डोंगराळ प्रदेशाविषयी सांगितले, तो हा आता मला दे; कारण त्यादिवशी तू ऐकले होते की, तेथे अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे आहेत; तरी परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन.”
پس الان این کوه را به من بده که در آن روز خداوند درباره‌اش گفت، زیرا تو در آن روزشنیدی که عناقیان در آنجا بودند، و شهرهایش بزرگ و حصاردار است، شاید خداوند با من خواهد بود تا ایشان را بیرون کنم، چنانکه خداوند گفته است.»۱۲
13 १३ तेव्हा यहोशवाने त्यास आशीर्वाद दिला; आणि यफुन्नेचा पुत्र कालेब याला हेब्रोनाचे वतन दिले
پس یوشع او را برکت داد و حبرون را به کالیب بن یفنه به ملکیت بخشید.۱۳
14 १४ यास्तव कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब याचे हेब्रोन वतन आजपर्यंत चालत आहे; कारण की तो इस्राएलाचा देव परमेश्वर याला पूर्ण अनुसरला.
بنابراین حبرون تا امروز ملکیت کالیب بن یفنه قنزی شد، زیرا که یهوه خدای اسرائیل را به تمامی دل پیروی نموده بود.۱۴
15 १५ पूर्वीच्या काळी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते; तो आर्बा अनाकी लोकांमध्ये मोठा मनुष्य होता; नंतर लढाईपासून देशाला विसावा मिळाला.
و قبل از آن نام حبرون، قریه اربع بود که او در میان عناقیان مرد بزرگ ترین بود. پس زمین از جنگ آرام گرفت.۱۵

< यहोशवा 14 >