< यहोशवा 13 >
1 १ आता यहोशवा म्हातारा आणि चांगल्या उतारवयाचा झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याच्याशी म्हणाला, “तू म्हातारा झाला आहेस आणि तुझे वय पुष्कळ झाले आहे, परंतु अजून पुष्कळ देश काबीज करून घ्यावयाचा राहिला आहे.”
Now Joshua was old and full of years; and the Lord said to him, You are old and full of years, and there is still very much land to be taken.
2 २ हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत;
This is the land which is still to be taken: all the country of the Philistines, and all the Geshurites;
3 ३ मिसराच्या पूर्वेस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत ही जो देश, तो कनान्यांचा मानलेला आहे; गज्जी व अश्दोदी, अष्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी पाच सुभेदार आहेत.
From the Shihor, which is before Egypt, to the edge of Ekron to the north, which is taken to be Canaanite property: the five chiefs of the Philistines; the Gazites, and the Ashdodites, the Ashkelonites, the Gittites, and the Ekronites, as well as the Avvim;
4 ४ दक्षिणेस कनान्यांचा सर्व देश, आणि सीदोन्याचे मारा, अफेक व अमोऱ्यांच्या सीमेपर्यंतचा देश;
On the south: all the land of the Canaanites, and Mearah which is the property of the Zidonians, to Aphek, as far as the limit of the Amorites:
5 ५ आणि गिबली यांचा देश, व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे;
And the land of the Gebalites, and all Lebanon, looking east, from Baal-gad under Mount Hermon as far as Hamath:
6 ६ लबानोनापासून मिस्रफोथ माइमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सीदोनी, यांस मी इस्राएलाच्या संतानापुढून वतनातून बाहेर घालवीन; त्यांचा देश इस्राएलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्ठ्या टाकून वाटून दे.
All the people of the hill-country from Lebanon to Misrephoth-maim, all the Zidonians; them will I send out from before the children of Israel: only make division of it to Israel for a heritage, as I have given you orders to do.
7 ७ तर आता नऊ वंश व अर्धा मनश्शेचा वंश यांस वतन होण्यासाठी या देशाच्या वाटण्या कर.
So now make division of this land for a heritage to the nine tribes, and the half-tribe of Manasseh.
8 ८ मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाला व रऊबेनी व गादी यांना आपल्या वतनाचा वाटा मिळाला आहे; परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यार्देनेच्या पलीकडे पूर्वेस जे दिले ते त्यांचे आहे.
With him the Reubenites and the Gadites have been given their heritage, which Moses gave them, on the east side of Jordan, as Moses, the servant of the Lord, gave them;
9 ९ आर्णोन नदीच्या काठावरले अरोएर म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी ते नगर, तेथून दीबोनापर्यंत मेदब्याची सर्व पठारे ही;
From Aroer, on the edge of the valley of the Arnon, and the town in the middle of the valley, and all the table-land from Medeba to Dibon;
10 १० आणि अमोऱ्यांचा राजा सीहोन ज्याने हेशबोनात राज्य केले त्याची, अम्मोनी संतानांच्या सीमेपर्यंत सर्व नगरे;
And all the towns of Sihon, king of the Amorites, who was ruling in Heshbon, to the limits of the children of Ammon;
11 ११ गिलाद आणि गशूरी व माकाथी यांची सीमा, आणि अवघा हर्मोन डोंगर व सलेखापर्यंत सर्व बाशान;
And Gilead, and the land of the Geshurites and the Maacathites, and all Mount Hermon, and all Bashan to Salecah;
12 १२ म्हणजे रेफाईतला जो एकटाच शेष राहिलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग याचे सारे राज्य, येथल्या सर्वांचा मोशेने मारून वतनातून बाहेर घालवले.
All the kingdom of Og in Bashan, who was ruling in Ashtaroth and in Edrei (he was one of the last of the Rephaim); these did Moses overcome, driving them out of their country.
13 १३ तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी व माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही, तरी आजपर्यंत गशूरी व माकाथी इस्राएलामध्ये राहत आहेत.
However, the people of Israel did not send out the Geshurites, or the Maacathites: but Geshur and Maacath are living among Israel to this day.
14 १४ लेवीच्या वंशाला मात्र त्याने वतन दिले नाही; “इस्राएलाचा देव परमेश्वराने त्यास सांगितल्याप्रमाणे अग्नीतून केलेली अर्पणे,” तेच त्यांचे वतन आहे;
Only to the tribe of Levi he gave no heritage; the offerings of the Lord, the God of Israel, made by fire are his heritage, as he said to him.
15 १५ परंतु रऊबेनाच्या संतानांच्या वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे मोशेने दिले.
And Moses gave their heritage to the tribe of Reuben by their families.
16 १६ आणि त्याची प्राप्त झालेली सीमा ही होती, आर्णोन नदीच्या काठावर जे अरोएर, म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबाजवळचा सर्व पठारी प्रदेश;
Their limit was from Aroer, on the edge of the valley of the Arnon, and the town in the middle of the valley, and all the table-land by Medeba;
17 १७ हेशबोन आणि पठारावरील जी सर्व नगरे; दीबोन व बामोथ-बआल व बेथ-बालमोन;
Heshbon and all her towns in the table-land; Dibon, and Bamoth-baal, and Beth-baal-meon;
18 १८ आणि याहस व कदेमोथ, मेफाथ;
And Jahaz, and Kedemoth, and Mephaath;
19 १९ आणि किर्याथाईम व सिब्मा व खोऱ्याच्या डोंगरावरचे सरेथ शहर;
And Kiriathaim, and Sibmah, and Zereth-shahar in the mountain of the valley;
20 २० बेथ-पौर व पिसगाच्या उतरणी व बेथ-यशिमोथ;
And Beth-peor, and the slopes of Pisgah, and Beth-jeshimoth;
21 २१ आणि पठारातली सर्व नगरे; म्हणजे अमोऱ्याचा राजा सीहोन त्याचे सर्व राज्य त्यामध्ये होते; त्याने हेशबोनात राज्य केले; त्यास मोशेने मारले, आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम व सूर व हूर रेबा यांसहीत मारले.
And all the towns of the table-land, and all the kingdom of Sihon, king of the Amorites, who was ruling in Heshbon, whom Moses overcame, together with the chiefs of Midian, Evi, and Rekem, and Zur, and Hur, and Reba, the chiefs of Sihon, who were living in the land.
22 २२ आणि त्यांच्या मारलेल्यामध्ये तो ज्योतिषी बौराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तलवारीने जीवे मारले.
And Balaam, the son of Beor, the prophet, the children of Israel put to death with the sword.
23 २३ तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली; रऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे व त्यांच्या खालची गावे.
And the limit of the children of Reuben was the edge of Jordan. This was the heritage of the children of Reuben by their families, with its towns and its unwalled places.
24 २४ गादाच्या वंशालाही त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने वतन दिले.
And Moses gave their heritage to the tribe of Gad by their families.
25 २५ आणि त्यांची सीमा याजेर व गिलादातली सर्व नगरे व अम्मोन्यांच्या संतानांचा अर्धा देश, राब्बा यांच्यापुढे जे अरोएर तेथपर्यंत झाली.
And their limit was Jazer, and all the towns of Gilead, and half the land of the children of Ammon, to Aroer before Rabbah;
26 २६ आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पापर्यंतचा प्रदेश, आणि बतोनीम व महनाईमापासून दबीरच्या सीमेपर्यंत;
And from Heshbon to Ramath-mizpeh, and Betonim; and from Mahanaim to the edge of Debir;
27 २७ आणि खोऱ्यातले बेथ-हाराम व बेथ-निम्रा व सुक्कोथ व साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा शेष भाग, यार्देन व तिच्यातीरींचा किन्नेरोथ समुद्राच्या काठापर्यंत, असे योर्देनेच्या पलीकडे पूर्वेस झाले.
And in the valley, Beth-haram, and Beth-nimrah, and Succoth, and Zaphon, the rest of the kingdom of Sihon, king of Heshbon, having Jordan for its limit, to the end of the sea of Chinnereth on the east side of Jordan.
28 २८ गादाच्या संतानांच्या, कुळाप्रमाणे त्याचे वतन हेच, ती नगरे व त्यांच्या खालचे गांव.
This is the heritage of the children of Gad by their families, with its towns and its unwalled places
29 २९ आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने वतन दिले; तर मनश्शेच्या अर्ध्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे असे झाले;
And Moses gave their heritage to the half-tribe of Manasseh by their families.
30 ३० की त्यांची सीमा महनाईमापासून सर्व बाशान, म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे अवघे राज्य, बाशानातली याईराची जी अवघी गावे साठ नगरे त्यांसुद्धा;
And their limit was from Mahanaim, all Bashan, all the kingdom of Og, king of Bashan, and all Havvoth-Jair, in Bashan, sixty towns;
31 ३१ आणि अर्धा गिलाद, आणि बाशानात ओगाच्या राज्यातली नगरे अष्टारोथ व एद्रई यांसुद्धाही; असे मनश्शेचा पुत्र माखीर यांच्या संतानांना, म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले.
And half Gilead, and Ashtaroth, and Edrei, towns of the kingdom of Og in Bashan, were for the children of Machir, the son of Manasseh, for half of the children of Machir by their families.
32 ३२ यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे पूर्वेस मवाबाच्या मैदानात मोशेने जी वतने दिली ती हीच.
These are the heritages of which Moses made distribution in the lowlands of Moab, on the other side of Jordan in Jericho, to the east.
33 ३३ लेवीच्या वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने जसे त्यास सांगितले, तसा तोच त्यांचे वतन आहे.
But to the tribe of Levi Moses gave no heritage: the Lord, the God of Israel, is their heritage, as he said to them.