< यहोशवा 10 >
1 १ यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते.
Baada ya haya Adoni-Sedeki mfalme wa Yerusalemu alisikia kuwa Yoshua alikuwa ameteka mji wa Ai na kuuangamiza kabisa, tena alikuwa ameua mfalme wake, kama alivyofanya huko Yeriko na mfalme wake, tena ya kuwa watu wa Gibeoni walikuwa wamefanya mapatano ya amani na Waisraeli, na walikuwa wakiishi karibu yao.
2 २ तेव्हा यरूशलेमातील लोक फार भयभीत झाले, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजकीय नगरासारखे मोठे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष पराक्रमी योद्धे होते.
Yeye na watu wake wakataharuki mno kwa kuwa Gibeoni ulikuwa mji mkubwa kama mmojawapo ya miji ya kifalme; ulikuwa mkubwa kuliko Ai, nao watu wake wote walikuwa mashujaa wa vita.
3 ३ मग यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला,
Hivyo Adoni-Sedeki mfalme wa Yerusalemu akaomba msaada kwa Hohamu mfalme wa Hebroni, Piramu mfalme wa Yarmuthi, Yafia mfalme wa Lakishi, na Debiri mfalme wa Egloni.
4 ४ “वर माझ्याकडे येऊन मला मदत करा, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी समेट केला आहे.”
Akawaambia, “Njooni mnisaidie kuipiga Gibeoni, kwa sababu imefanya mapatano ya amani na Yoshua na Waisraeli.”
5 ५ तेव्हा यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले.
Ndipo hao wafalme watano wa Waamori, ambao ni wafalme wa Yerusalemu, Hebroni, Yarmuthi, Lakishi na Egloni, wakaunganisha majeshi yao. Wakapanda na vikosi vyao vyote, nao wakajipanga dhidi ya Gibeoni na kuishambulia.
6 ६ हे पाहून गिबोनातल्या मनुष्यांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरील मदतीचा हात काढून घेऊ नको; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.
Nao Wagibeoni wakatuma ujumbe kwa Yoshua kwenye kambi ya Gilgali na kumwambia, “Usiwatelekeze watumishi wako. Panda haraka uje kwetu kutuokoa! Tusaidie, kwa sababu wafalme wote wa Waamori wakaao kwenye nchi ya vilima wameunganisha majeshi yao pamoja dhidi yetu.”
7 ७ तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.”
Basi Yoshua akaondoka Gilgali pamoja na jeshi lake lote, wakiwepo watu wote mashujaa wa vita.
8 ८ परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”
Bwana akamwambia Yoshua, “Usiwaogope watu hao, nimewatia mkononi mwako. Hakuna yeyote atakayeweza kushindana nawe.”
9 ९ यहोशवा गिलगालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला
Baada ya Yoshua kutembea usiku kucha kutoka Gilgali, akawashambulia ghafula.
10 १० आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूंत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.
Bwana akawafadhaisha mbele ya Waisraeli, nao wakawashinda kwa ushindi mkuu huko Gibeoni. Israeli wakawafukuza kuelekea njia iendayo Beth-Horoni wakiwaua mpaka kufikia njia iendayo Azeka na Makeda.
11 ११ ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले.
Walipokuwa wakikimbia mbele ya Israeli kwenye barabara iteremkayo kutoka Beth-Horoni hadi Azeka, Bwana akawavumishia mawe makubwa ya mvua kutoka mbinguni, na wengi wao wakauawa na hayo mawe kuliko wale waliouawa kwa upanga wa Waisraeli.
12 १२ परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.”
Katika siku ile ambayo Bwana aliwapeana Waamori kwa Israeli, Yoshua akanena na Bwana akiwa mbele ya Waisraeli akasema: “Wewe jua, simama juu ya Gibeoni, wewe mwezi, tulia juu ya Bonde la Aiyaloni.”
13 १३ तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.
Hivyo jua likasimama, nao mwezi ukatulia, hadi taifa hilo lilipokwisha kujilipizia kisasi kwa adui wake, kama ilivyoandikwa katika Kitabu cha Yashari. Jua likasimama kimya katikati ya mbingu, likachelewa kuzama muda wa siku moja nzima.
14 १४ असा दिवस त्यापुर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
Haijakuwepo siku nyingine kama hiyo kabla au baada, siku ambayo Bwana alimsikiliza mwanadamu. Hakika Bwana alikuwa akiwapigania Israeli.
15 १५ मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
Ndipo Yoshua akarudi kambini huko Gilgali pamoja na Israeli yote.
16 १६ ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
Basi wale wafalme watano wakawa wamekimbia kujificha kwenye pango huko Makeda.
17 १७ मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले.
Yoshua alipoambiwa kuwa wafalme hao watano wamekutwa wakiwa wamejificha ndani ya pango huko Makeda,
18 १८ तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर मनुष्यांचा पहारा बसवा.
akasema, “Vingirisheni mawe makubwa kwenye mdomo wa hilo pango, tena wekeni walinzi wa kulilinda.
19 १९ पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.
Lakini msiwaache! Wafuatieni adui zenu, washambulieni kutoka nyuma, wala msiwaache wafike kwenye miji yao, kwa kuwa Bwana Mungu wenu amewatia mkononi mwenu.”
20 २० यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले.
Hivyo Yoshua pamoja na Waisraeli wakawaangamiza kabisa karibu wote, lakini wachache waliosalia walifika kwenye miji yao yenye maboma.
21 २१ मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही.
Basi jeshi lote likarudi salama kwa Yoshua huko kambini Makeda, na hakuna yeyote aliyetoa neno kinyume cha Waisraeli.
22 २२ मग यहोशवा म्हणाला, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.”
Ndipo Yoshua akasema, “Haya fungueni mdomo wa pango, mniletee hao wafalme watano.”
23 २३ त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.
Kwa hiyo wakawatoa hao wafalme watano nje ya pango: wafalme wa Yerusalemu, Hebroni, Yarmuthi, Lakishi na Egloni.
24 २४ ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेनानायकांना म्हणाला, “पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
Walipokuwa wamewaleta hawa wafalme kwa Yoshua, akawaita watu wote wa Israeli, na kuwaambia majemadari wa vita waliokwenda pamoja naye, “Njooni hapa mweke nyayo zenu juu ya shingo za hawa wafalme.” Basi wakaja wakaweka nyayo zao shingoni.
25 २५ यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, बलवान व निर्भय व्हा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूचे परमेश्वर असेच करील.”
Yoshua akawaambia, “Msiogope, wala msivunjike moyo. Kuweni hodari na wenye ushujaa. Hili ndilo Bwana atakalowatendea adui zenu wote mnaokwenda kupigana nao.”
26 २६ नंतर यहोशवाने त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर टांगलेले होते.
Ndipo Yoshua akawapiga na kuwaua wale wafalme na kuwatundika juu ya miti mitano, nao wakaachwa wakiningʼinia juu ya ile miti hadi jioni.
27 २७ सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत.
Wakati wa kuzama jua Yoshua akaamuru, nao wakawashusha kutoka kwenye ile miti na kuwatupa kwenye lile pango ambalo walikuwa wamejificha. Kwenye mdomo wa lile pango wakaweka mawe makubwa, ambayo yapo hadi leo.
28 २८ त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला; त्यांच्याबरोबर तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.
Siku ile Yoshua akateka Makeda. Akamuua kila mmoja katika ule mji, pamoja na mfalme wake kwa upanga. Hakubakiza mtu yeyote. Akamfanyia mfalme wa Makeda kama vile alivyokuwa amemfanyia mfalme wa Yeriko.
29 २९ मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलांना बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला व लिब्नाच्याविरुद्ध त्यांनी लढाई केली;
Ndipo Yoshua akaondoka Makeda akiwa pamoja na Israeli yote mpaka mji wa Libna na kuushambulia.
30 ३० परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्यातल्या सर्व जिवंत प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यांच्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.
Bwana pia akautia huo mji wa Libna pamoja na mfalme wake mikononi mwa Israeli. Yoshua akaangamiza ule mji na kila mtu aliyekuwa ndani yake kwa upanga. Hakubakiza huko mtu yeyote. Akamfanyia mfalme wa Libna kama alivyokuwa amemfanyia mfalme wa Yeriko.
31 ३१ त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला. त्याने त्यासमोर तळ दिला आणि त्याच्याविरुध्द लढला.
Kisha Yoshua akaondoka Libna kwenda Lakishi akiwa pamoja na Israeli yote; wakajipanga dhidi yake na kuushambulia.
32 ३२ परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला.
Bwana akautia Lakishi mikononi mwa Israeli, Yoshua akauteka siku ya pili. Yoshua akauangamiza mji na kila kilichokuwa ndani yake kwa upanga, kama tu vile alivyokuwa ameufanyia mji wa Libna.
33 ३३ तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखीशाला मदत देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्यास व त्याच्या लोकांस एवढा मार दिला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
Wakati huo huo, Horamu mfalme wa Gezeri alikuwa amepanda ili kusaidia Lakishi, lakini Yoshua akamshinda pamoja na jeshi lake, hadi hapakubakia mtu yeyote.
34 ३४ मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.
Ndipo Yoshua akaondoka Lakishi kwenda Egloni akiwa pamoja na Israeli yote; wakajipanga dhidi yake na kuushambulia.
35 ३५ त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला.
Wakauteka mji huo siku ile ile, wakaupiga kwa upanga na kumwangamiza kila mmoja aliyekuwa ndani yake, kama vile walivyokuwa wameufanyia Lakishi.
36 ३६ मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला. आणि ते त्याच्याशी लढले;
Kisha Yoshua akapanda kutoka Egloni kwenda Hebroni akiwa pamoja na Israeli yote na kuushambulia.
37 ३७ त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचा समूळ नाश केला.
Wakauteka mji na kuupiga kwa upanga, pamoja na mfalme wake, vijiji vyake na kila mmoja aliyekuwa ndani yake. Hawakubakiza mtu yeyote. Kama vile huko Egloni, waliuangamiza kabisa pamoja na kila mmoja aliyekuwa ndani yake.
38 ३८ नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरास चालून गेला आणि त्याच्याविरुध्द लढला.
Ndipo Yoshua na Israeli wote wakageuka na kuushambulia Debiri.
39 ३९ त्याने ते तेथला राजा व त्याची सर्व नगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला. तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही हेब्रोनाचे, लिब्ना व त्याचा राजा यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा यांचेही केले.
Wakauteka mji, mfalme wake na vijiji vyake, na kuupiga kwa upanga. Kila mmoja aliyekuwa ndani yake wakamwangamiza kabisa. Hawakubakiza mtu yeyote. Wakaufanyia Debiri na mfalme wake kama vile walivyokuwa wameifanyia miji ya Libna na Hebroni na wafalme wao.
40 ४० या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशांचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांना काबीज केले; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जिवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला.
Hivyo Yoshua akalishinda eneo hilo lote, ikiwa ni pamoja na nchi ya vilima, na Negebu, na sehemu ya magharibi chini ya vilima, materemko ya milima, pamoja na wafalme wake wote. Hakubakiza mtu yeyote. Akaangamiza kabisa kila kitu chenye pumzi, kama vile Bwana, Mungu wa Israeli, alivyokuwa ameamuru.
41 ४१ यहोशवाने तलवारीने हल्ला करून कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलूख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत त्याने मारला.
Yoshua akawashinda kuanzia Kadesh-Barnea hadi Gaza na kutoka eneo lote la Gosheni hadi Gibeoni.
42 ४२ हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
Wafalme hawa wote pamoja na nchi zao Yoshua aliwashinda kwa wakati mmoja, kwa sababu Bwana, Mungu wa Israeli, aliwapigania Israeli.
43 ४३ मग यहोशवा आणि त्याच्याबरोबर सर्व इस्राएल गिलगाल येथील छावणीकडे माघारी आले.
Ndipo Yoshua akarudi pamoja na Israeli yote kwenye kambi huko Gilgali.