< योना 1 >

1 अमित्तयाचा पुत्र योना याच्याकडे परमेश्वराचे वचन आले की,
ख़ुदावन्द का कलाम यूनाह बिन अमितै पर नाज़िल हुआ।
2 “ऊठ, व त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि तिकडे जाऊन त्याच्याविरुध्द आरोळी कर; कारण त्यांची दुष्टता मजसमोर वर आली आहे.”
कि उठ, उस बड़े शहर निनवे को जा और उसके ख़िलाफ़ 'ऐलान कर; क्यूँकि उनकी बुराई मेरे सामने पहुँची है।
3 परंतु योना परमेश्वराच्या सान्निध्यापासून तार्शीश शहरास दूर पळून जायला निघाला, आणि याफो येथे गेला, तेव्हा तार्शीसास जाणारे एक जहाज त्यास सापडले; मग त्याने प्रवासाचे भाडे दिले व परमेश्वराच्या सान्निध्यापासून त्यांच्याबरोबर दूर तार्शिशास जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला.
लेकिन यूनाह ख़ुदावन्द के सामने से तरसीस को भागा, और याफ़ा में पहुँचा और वहाँ उसे तरसीस को जाने वाला जहाज़ मिला; और वह किराया देकर उसमे सवार हुआ ताकि ख़ुदावन्द के सामने से तरसीस को जहाज़ वालों के साथ जाए।
4 परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले.
लेकिन ख़ुदावन्द ने समन्दर पर बड़ी आँधी भेजी, और समन्दर में सख़्त तूफ़ान बर्पा हुआ, और अँदेशा था कि जहाज़ तबाह हो जाए।
5 तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपल्या देवाला हाक मारू लागले व जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता.
तब मल्लाह हैरान हुए और हर एक ने अपने मा'बूद को पुकारा; और वह सामान जो जहाज़ में था समन्दर में डाल दिया ताकि उसे हल्का करें, लेकिन यूनाह जहाज़ के अन्दर पड़ा सो रहा था।
6 मग जहाजाचा मुख्यनायक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ आपल्या ईश्वराला हाक मार, कदाचित तुझा ईश्वर आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”
तब ना ख़ुदा उसके पास जाकर कहने लगा, “तू क्यों पड़ा सो रहा है? उठ अपने मा'बूद को पुकार! शायद हम को याद करे और हम हलाक न हों।”
7 ते सर्व एकमेकाला म्हणाले, “चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर आले आहे; हे आपणास कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली.
और उन्होंने आपस में कहा, “आओ, हम पर्ची डालकर देखें कि यह आफ़त हम पर किस की वजह से आई।” चुनाँचे उन्होंने पर्ची डाला, और यूनाह का नाम निकला।
8 तेव्हा त्यांनी योनाला म्हटले, “आम्ही तुला विनंती करतो, कोणामुळे हे संकट आम्हावर आले आहे, हे तू आम्हास सांग; तुझा धंदा काय आहे आणि तू कोठून आला आहेस? तुझा देश कोणता आणि तू कोणत्या लोकांपैकी आहेस?”
तब उन्होंने उस से कहा, तू हम को बता कि यह आफ़त हम पर किस की वजह से आई है? तेरा क्या पेशा है, और तू कहाँ से आया है?, तेरा वतन कहाँ है, और तू किस क़ौम का है?,
9 योनाने त्यांना म्हटले; “मी इब्री आहे; ज्या स्वर्गातल्या देवाने समुद्र व कोरडी भूमी उत्पन्न केली त्या परमेश्वराचे मी भय धरतो.”
उसने उनसे कहा, “मैं इब्रानी हूँ और ख़ुदावन्द आसमान के ख़ुदा बहर — ओ — बर्र के ख़ालिक़ से डरता हूँ।”
10 १० मग त्या लोकांस अत्यंत भीती वाटली; आणि ते योनाला म्हणाले, “तू हे काय केले?” कारण त्या लोकांनी जाणले की तो परमेश्वरासमोरून पळून जात आहे, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते.
तब वह ख़ौफ़ज़दा होकर उस से कहने लगे, तू ने यह क्या किया? क्यूँकि उनको मा'लूम था कि वह ख़ुदावन्द के सामने से भागा है, इसलिए कि उस ने ख़ुद उन से कहा था।
11 ११ मग ते योनाला म्हणाले, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझे काय करावे?” कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता.
तब उन्होंने उस से पूछा, “हम तुझ से क्या करें कि समन्दर हमारे लिए ठहर जाए?” क्यूँकि समन्दर ज़्यादा तूफ़ानी होता जाता था
12 १२ तो त्यास म्हणाला, “तुम्ही मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे समुद्र तुमच्यासाठी शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला माहीत आहे.”
तब उस ने उन से कहा, “मुझे उठा कर समन्दर में फ़ेंक दो, तो तुम्हारे लिए समन्दर ठहर जाएगा; क्यूँकि मै जानता हूँ कि यह बड़ा तूफ़ान तुम पर मेरी ही वजह से आया है।”
13 १३ तरीसुध्दा त्या मनुष्यांनी जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्हविले; परंतु ते काही करू शकत नव्हते, कारण समुद्र त्यांजवर अधिकाधिक खवळत चालला होता.
तो भी मल्लाहों ने डंडा चलाने में बड़ी मेहनत की कि किनारे पर पहुँचें, लेकिन न पहुँच सके, क्यूँकि समन्दर उनके ख़िलाफ़ और भी ज़्यादा तूफ़ानी होता जाता था।
14 १४ तेव्हा ते परमेश्वराचा धावा करत म्हणाले, “हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो या मनुष्याच्या जिवामुळे आमचा नाश होऊ नये, आणि त्याच्या मृत्यूचा दोष आम्हावर येऊ नये; कारण हे परमेश्वरा, जसे तुला योग्य वाटेल तसे तू केले आहेस.”
तब उन्होंने ख़ुदावन्द के सामने गिड़गिड़ा कर कहा, ऐ ख़ुदावन्द हम तेरी मिन्नत करते हैं कि हम इस आदमी की जान की वजह से हलाक न हों, और तू ख़ून — ए — नाहक़ को हमारी गर्दन पर न डाले; क्यूँकि ऐ ख़ुदावन्द, तूने जो चाहा वही किया।
15 १५ नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला.
और उन्होंने यूनाह को उठा कर समन्दर में फेंक दिया और समन्दर के मौजों का ज़ोर रुक गया।
16 १६ मग त्या मनुष्यांस परमेश्वराची खूप भीती वाटली, आणि त्यांनी परमेश्वरास यज्ञ केला आणि नवसही केले.
तब वह ख़ुदावन्द से बहुत डर गए, और उन्होंने उसके सामने क़ुर्बानी पेश कीं और नज़्रें मानीं
17 १७ मग योनाला गिळण्यास परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. योना तीन दिवस आणि तीन रात्री त्या माशाच्या पोटात होता.
लेकिन ख़ुदावन्द ने एक बड़ी मछली मुक़र्रर कर रख्खी थी कि यूनाह को निगल जाए; और यूनाह तीन दिन रात मछली के पेट में रहा।

< योना 1 >