< योना 4 >
1 १ परंतु यामुळे योनाला फार वाईट वाटले व त्यास राग आला.
But this seemed very wrong to Jonah, and he was angry.
2 २ तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, “हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस.
And he made prayer to the Lord and said, O Lord, is this not what I said when I was still in my country? This is why I took care to go in flight to Tarshish: for I was certain that you were a loving God, full of pity, slow to be angry and great in mercy, and ready to be turned from your purpose of evil.
3 ३ माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, माझा जीव घे, कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते.”
So now, O Lord, give ear to my prayer and take my life from me; for death is better for me than life.
4 ४ मग परमेश्वर म्हणाला, “तुला राग येणे चांगले आहे काय?”
And the Lord said, Have you any right to be angry?
5 ५ मग योना बाहेर निघून निनवे शहराच्या पूर्व दिशेला बसला; तेथे तो एक मंडप करून सावलीत, शहराचे काय होईल हे पाहत बसला.
Then Jonah went out of the town, and took his seat on the east side of the town and made himself a roof of branches and took his seat under its shade till he saw what would become of the town.
6 ६ मग परमेश्वर देवाने योनाच्या डोक्यावर सावलीसाठी एक वेली उगविली, म्हणजे त्याने दुःखातून मुक्त व्हावे असे केले. त्या वेलीमुळे योनाला खूप आनंद झाला.
And the Lord God made a vine come up over Jonah to give him shade over his head. And Jonah was very glad because of the vine.
7 ७ मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा तयार केला, तो त्या वेलीला लागल्यामुळे ती वेल सुकून गेली.
But early on the morning after, God made ready a worm for the destruction of the vine, and it became dry and dead.
8 ८ मग देवाने, सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून झळईचा वारा सोडला; आणि ऊन योनाच्या डोक्याला लागले त्याने तो मूर्छित झाला व त्यास मरण येवो अशी तो विनवणी करत म्हणाला, “मला जिवंत राहण्यापेक्षा मरण चांगले वाटते.”
Then when the sun came up, God sent a burning east wind: and so great was the heat of the sun on his head that Jonah was overcome, and, requesting death for himself, said, Death is better for me than life.
9 ९ मग देव योनाला म्हणाला, “त्या वेलीमुळे तुला राग येणे हे चांगले आहे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.”
And the Lord said to Jonah, Have you any right to be angry about the vine? And he said, I have a right to be truly angry.
10 १० परमेश्वर त्यास म्हणाला, “या वेलीसाठी तू काहीच कष्ट केले नाहीस व तू हिला मोठे केले नाही, ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली, त्या वेलीची तुला एवढी काळजी आहे;
And the Lord said, You had pity on the vine, for which you did no work and for the growth of which you were not responsible; which came up in a night and came to an end in a night;
11 ११ ज्यांना उजव्या व डाव्या हाताचा फरक समजत नाही असे एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त लोक या मोठ्या निनवे शहरात आहेत आणि पुष्कळ गुरेढोरे आहेत. त्यांची मी काळजी करू नये काय?”
And am I not to have mercy on Nineveh, that great town, in which there are more than a hundred and twenty thousand persons without the power of judging between right and left, as well as much cattle?