< योहान 9 >
1 १ तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला.
ตต: ปรํ ยีศุรฺคจฺฉนฺ มารฺคมเธฺย ชนฺมานฺธํ นรมฺ อปศฺยตฺฯ
2 २ तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, “रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?”
ตต: ศิษฺยาสฺตมฺ อปฺฤจฺฉนฺ เห คุโร นโรยํ สฺวปาเปน วา สฺวปิตฺรา: ปาเปนานฺโธ'ชายต?
3 ३ येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.
ตต: ส ปฺรตฺยุทิตวานฺ เอตสฺย วาสฺย ปิโตฺร: ปาปาทฺ เอตาทฺฤโศภูท อิติ นหิ กินฺตฺวเนน ยเถศฺวรสฺย กรฺมฺม ปฺรกาศฺยเต ตทฺเธโตเรวฯ
4 ४ ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.
ทิเน ติษฺฐติ มตฺเปฺรรยิตุ: กรฺมฺม มยา กรฺตฺตวฺยํ ยทา กิมปิ กรฺมฺม น กฺริยเต ตาทฺฤศี นิศาคจฺฉติฯ
5 ५ मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”
อหํ ยาวตฺกาลํ ชคติ ติษฺฐามิ ตาวตฺกาลํ ชคโต โชฺยติ: สฺวรูโปสฺมิฯ
6 ६ असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला.
อิตฺยุกฺตฺตา ภูเมา นิษฺฐีวํ นิกฺษิปฺย เตน ปงฺกํ กฺฤตวานฺ
7 ७ आणि त्यास म्हटले, “जा, शिलोहाच्या तळ्यात धू.” (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला.
ปศฺจาตฺ ตตฺปงฺเกน ตสฺยานฺธสฺย เนเตฺร ปฺรลิปฺย ตมิตฺยาทิศตฺ คตฺวา ศิโลเห 'รฺถาตฺ เปฺรริตนามฺนิ สรสิ สฺนาหิฯ ตโตนฺโธ คตฺวา ตตฺราสฺนาตฺ ตต: ปฺรนฺนจกฺษุ รฺภูตฺวา วฺยาฆุฏฺยาคาตฺฯ
8 ८ म्हणून त्याचे शेजारी व ज्यांनी त्यास भीक मागताना पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, “तो जो बसून भीक मागत असे तो हाच ना?”
อปรญฺจ สมีปวาสิโน โลกา เย จ ตํ ปูรฺวฺวมนฺธมฺ อปศฺยนฺ เต พกฺตฺตุมฺ อารภนฺต โยนฺธโลโก วรฺตฺมนฺยุปวิศฺยาภิกฺษต ส เอวายํ ชน: กึ น ภวติ?
9 ९ कोणी म्हणाले, “हा तो आहे.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे.” पण तो म्हणाला, “मी तोच आहे.”
เกจิทวทนฺ ส เอว เกจิทโวจนฺ ตาทฺฤโศ ภวติ กินฺตุ ส สฺวยมพฺรวีตฺ ส เอวาหํ ภวามิฯ
10 १० म्हणून ते त्यास म्हणाले, “मग तुझे डोळे कसे उघडले?”
อเตอว เต 'ปฺฤจฺฉนฺ ตฺวํ กถํ ทฺฤษฺฏึ ปาปฺตวานฺ?
11 ११ त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांस लावला आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहवर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले.”
ตต: โสวททฺ ยีศนามก เอโก ชโน มม นยเน ปงฺเกน ปฺรลิปฺย อิตฺยาชฺญาปยตฺ ศิโลหกาสารํ คตฺวา ตตฺร สฺนาหิฯ ตตสฺตตฺร คตฺวา มยิ สฺนาเต ทฺฤษฺฏิมหํ ลพฺธวานฺฯ
12 १२ तेव्हा त्यांनी म्हटले, “तो कोठे आहे?” तो म्हणाला, “मला माहीत नाही.”
ตทา เต 'วทนฺ ส ปุมานฺ กุตฺร? เตโนกฺตฺตํ นาหํ ชานามิฯ
13 १३ तो जो पूर्वी आंधळा होता त्यास त्यांनी परूश्यांकडे नेले,
อปรํ ตสฺมินฺ ปูรฺวฺวานฺเธ ชเน ผิรูศินำ นิกฏมฺ อานีเต สติ ผิรูศิโนปิ ตมปฺฤจฺฉนฺ กถํ ทฺฤษฺฏึ ปฺราปฺโตสิ?
14 १४ ज्यादिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता.
ตต: ส กถิตวานฺ ส ปงฺเกน มม เนเตฺร 'ลิมฺปตฺ ปศฺจาทฺ สฺนาตฺวา ทฺฤษฺฏิมลเภฯ
15 १५ म्हणून परूश्यांनीही त्यास पुन्हा विचारले. “तुला कसे दिसू लागले?” आणि तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला, तो मी धुऊन टाकल्यावर, मला दिसू लागले.”
กินฺตุ ยีศุ รฺวิศฺรามวาเร กรฺทฺทมํ กฺฤตฺวา ตสฺย นยเน ปฺรสนฺเน'กโรทฺ อิติการณาตฺ กติปยผิรูศิโน'วทนฺ
16 १६ तेव्हा परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळीत नाही.” पण दुसरे म्हणाले, “जो मनुष्य पापी आहे तो असली चिन्हे कशी करू शकतो?”
ส ปุมานฺ อีศฺวรานฺน ยต: ส วิศฺรามวารํ น มนฺยเตฯ ตโตเนฺย เกจิตฺ ปฺรตฺยวทนฺ ปาปี ปุมานฺ กิมฺ เอตาทฺฤศมฺ อาศฺจรฺยฺยํ กรฺมฺม กรฺตฺตุํ ศกฺโนติ?
17 १७ म्हणून, पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, “त्याने जर तुझे डोळे उघडले तर तू त्याच्याविषयी काय म्हणतोस?” तो म्हणाला, “तो एक संदेष्टा आहे.”
อิตฺถํ เตษำ ปรสฺปรํ ภินฺนวากฺยตฺวมฺ อภวตฺฯ ปศฺจาตฺ เต ปุนรปิ ตํ ปูรฺวฺวานฺธํ มานุษมฺ อปฺรากฺษุ: โย ชนสฺตว จกฺษุษี ปฺรสนฺเน กฺฤตวานฺ ตสฺมินฺ ตฺวํ กึ วทสิ? ส อุกฺตฺตวานฺ ส ภวิศทฺวาทีฯ
18 १८ म्हणून यहूदी अधिकाऱ्यांनी ज्याला दृष्टी आली होती त्याच्याविषयी त्याच्या आई-वडीलांना बोलवून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा असून व आता डोळस झाला आहे, यावर विश्वास ठेवला नाही.
ส ทฺฤษฺฏิมฺ อาปฺตวานฺ อิติ ยิหูทียาสฺตสฺย ทฺฤษฺฏึ ปฺราปฺตสฺย ชนสฺย ปิโตฺร รฺมุขาทฺ อศฺรุตฺวา น ปฺรตฺยยนฺฯ
19 १९ त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला म्हणून तुम्ही म्हणता तो हा आहे काय? मग आता त्यास कसे दिसते?”
อเตอว เต ตาวปฺฤจฺฉนฺ ยุวโย รฺยํ ปุตฺรํ ชนฺมานฺธํ วทถ: ส กิมยํ? ตรฺหีทานีํ กถํ ทฺรษฺฏุํ ศกฺโนติ?
20 २० त्याच्या आई-वडीलानी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे; आणि हा आंधळा जन्मला होता हे आम्हास माहीत आहे.
ตตสฺตสฺย ปิตเรา ปฺรตฺยโวจตามฺ อยมฺ อาวโย: ปุตฺร อา ชเนรนฺธศฺจ ตทปฺยาวำ ชานีว:
21 २१ तरी आता त्यास कसे दिसू लागले हे आम्हास माहीत नाही किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हास माहीत नाही. त्यास विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल.”
กินฺตฺวธุนา กถํ ทฺฤษฺฏึ ปฺราปฺตวานฺ ตทาวำ นฺ ชานีว: โกสฺย จกฺษุษี ปฺรสนฺเน กฺฤตวานฺ ตทปิ น ชานีว เอษ วย: ปฺราปฺต เอนํ ปฺฤจฺฉต สฺวกถำ สฺวยํ วกฺษฺยติฯ
22 २२ त्याच्या आई-वडीलांना यहूदी अधिकाऱ्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण, तो ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्यास सभास्थानातून घालवावे, असे यहुद्यांचे आधीच एकमत झाले होते.
ยิหูทียานำ ภยาตฺ ตสฺย ปิตเรา วากฺยมิทมฺ อวทตำ ยต: โกปิ มนุโษฺย ยทิ ยีศุมฺ อภิษิกฺตํ วทติ ตรฺหิ ส ภชนคฺฤหาทฺ ทูรีการิษฺยเต ยิหูทียา อิติ มนฺตฺรณามฺ อกุรฺวฺวนฺ
23 २३ यामुळे त्याच्या आई-वडीलानी म्हटले, “तो वयात आलेला आहे, त्यास विचारा.”
อตสฺตสฺย ปิตเรา วฺยาหรตามฺ เอษ วย: ปฺราปฺต เอนํ ปฺฤจฺฉตฯ
24 २४ तेव्हा जो मनुष्य आंधळा होता त्यास त्यांनी दुसर्यांदा बोलावले आणि ते त्यास म्हणाले, “देवाचे गौरव कर; हा मनुष्य पापी आहे हे आम्ही जाणतो.”
ตทา เต ปุนศฺจ ตํ ปูรฺวฺวานฺธมฺ อาหูย วฺยาหรนฺ อีศฺวรสฺย คุณานฺ วท เอษ มนุษฺย: ปาปีติ วยํ ชานีม: ฯ
25 २५ यावरुन त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मी जाणत नाही. मी एक गोष्ट जाणतो; मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते.”
ตทา ส อุกฺตฺตวานฺ ส ปาปี น เวติ นาหํ ชาเน ปูรฺวามนฺธ อาสมหมฺ อธุนา ปศฺยามีติ มาตฺรํ ชานามิฯ
26 २६ म्हणून ते त्यास म्हणाले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”
เต ปุนรปฺฤจฺฉนฺ ส ตฺวำ ปฺรติ กิมกโรตฺ? กถํ เนเตฺร ปฺรสนฺเน 'กโรตฺ?
27 २७ त्याने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास आताच सांगितले, तरी तुम्ही ऐकले नाही; ते पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ पाहता काय?”
ตต: โสวาทีทฺ เอกกฺฤโตฺวกถยํ ยูยํ น ศฺฤณุถ ตรฺหิ กุต: ปุน: โศฺรตุมฺ อิจฺฉถ? ยูยมปิ กึ ตสฺย ศิษฺยา ภวิตุมฺ อิจฺฉถ?
28 २८ तेव्हा त्यांनी त्याची निंदा करून आणि ते त्यास म्हणाले, “तू त्याचा शिष्य आहेस; आम्ही मोशेचे शिष्य आहोत.
ตทา เต ตํ ติรสฺกฺฤตฺย วฺยาหรนฺ ตฺวํ ตสฺย ศิโษฺย วยํ มูสา: ศิษฺยา: ฯ
29 २९ देव मोशेबरोबर बोलला हे आम्हास माहीत आहे. हा कोठला आहे हे आम्हास माहीत नाही.”
มูสาวกฺเตฺรเณศฺวโร ชคาท ตชฺชานีม: กินฺเตฺวษ กุตฺรตฺยโลก อิติ น ชานีม: ฯ
30 ३० त्या मनुष्याने त्यांना उत्तर दिले “हेच तर मोठे आश्चर्य आहे की, हा कोठला आहे हे तुम्हास माहीत नाही; आणि तरी त्याने माझे डोळे उघडले.
โสวททฺ เอษ มม โลจเน ปฺรสนฺเน 'กโรตฺ ตถาปิ กุตฺรตฺยโลก อิติ ยูยํ น ชานีถ เอตทฺ อาศฺจรฺยฺยํ ภวติฯ
31 ३१ आपल्याला हे माहीत आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचे तो ऐकतो.
อีศฺวร: ปาปินำ กถำ น ศฺฤโณติ กินฺตุ โย ชนสฺตสฺมินฺ ภกฺตึ กฺฤตฺวา ตทิษฺฏกฺริยำ กโรติ ตไสฺยว กถำ ศฺฤโณติ เอตทฺ วยํ ชานีม: ฯ
32 ३२ आंधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी कोणाच्या ऐकण्यात आले नव्हते. (aiōn )
โกปิ มนุโษฺย ชนฺมานฺธาย จกฺษุษี อททาตฺ ชคทารมฺภาทฺ เอตาทฺฤศีํ กถำ โกปิ กทาปิ นาศฺฤโณตฺฯ (aiōn )
33 ३३ हा जर देवापासून नसता तर याला काही करता आले नसते.”
อสฺมาทฺ เอษ มนุโษฺย ยทีศฺวรานฺนาชายต ตรฺหิ กิญฺจิทปีทฺฤศํ กรฺมฺม กรฺตฺตุํ นาศกฺโนตฺฯ
34 ३४ त्यांनी त्यास म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि तू आम्हास शिकवतोस काय?” आणि त्यांनी त्यास बाहेर घालवले.
เต วฺยาหรนฺ ตฺวํ ปาปาทฺ อชายถา: กิมสฺมานฺ ตฺวํ ศิกฺษยสิ? ปศฺจาตฺเต ตํ พหิรกุรฺวฺวนฺฯ
35 ३५ त्यांनी त्यास बाहेर घालवले हे येशूने ऐकले; आणि त्यास तो सापडल्यावर तो त्यास म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”
ตทนนฺตรํ ยิหูทีไย: ส พหิรกฺริยต ยีศุริติ วารฺตฺตำ ศฺรุตฺวา ตํ สากฺษาตฺ ปฺราปฺย ปฺฤษฺฏวานฺ อีศฺวรสฺย ปุเตฺร ตฺวํ วิศฺวสิษิ?
36 ३६ त्याने उत्तर दिले, “साहेब, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?”
ตทา ส ปฺรตฺยโวจตฺ เห ปฺรโภ ส โก ยตฺ ตสฺมินฺนหํ วิศฺวสิมิ?
37 ३७ येशूने त्यास म्हटले, “तू त्यास पाहिले आहे आणि तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”
ตโต ยีศุ: กถิตวานฺ ตฺวํ ตํ ทฺฤษฺฏวานฺ ตฺวยา สากํ ย: กถํ กถยติ เสอว ส: ฯ
38 ३८ तो म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो.” आणि त्याने त्यास नमन केले.
ตทา เห ปฺรโภ วิศฺวสิมีตฺยุกฺตฺวา ส ตํ ปฺรณามตฺฯ
39 ३९ तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी या जगात आलो आहे; यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”
ปศฺจาทฺ ยีศุ: กถิตวานฺ นยนหีนา นยนานิ ปฺราปฺนุวนฺติ นยนวนฺตศฺจานฺธา ภวนฺตีตฺยภิปฺราเยณ ชคทาหมฺ อาคจฺฉมฺฯ
40 ४० तेव्हा परूश्यांतील जे त्याच्याबरोबर होते त्यांनी या गोष्टी ऐकल्या; आणि ते त्यास म्हणाले, “आम्ही पण आंधळे आहोत काय?”
เอตตฺ ศฺรุตฺวา นิกฏสฺถา: กติปยา: ผิรูศิโน วฺยาหรนฺ วยมปิ กิมนฺธา: ?
41 ४१ येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हास पाप नसते, परंतु तुम्ही म्हणता की, ‘आम्हास आता दिसते’, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.”
ตทา ยีศุรวาทีทฺ ยทฺยนฺธา อภวต ตรฺหิ ปาปานิ นาติษฺฐนฺ กินฺตุ ปศฺยามีติ วากฺยวทนาทฺ ยุษฺมากํ ปาปานิ ติษฺฐนฺติฯ